क्रीडायुद्धस्य कथा - दहा सेकंदांचं युद्ध
"तुला माहित्ये .... सगळे नऊच्या नऊ ग्रह जर एका लायनित आले ना..... त्या दिवशी पृथ्वी खतम होऊन जाणार!" आमचे ८ वर्षांचे ज्येष्ठ मित्रवर्य आम्हा ६ वर्षाच्या पोरांना सांगायचे. ते ऐकून जी टरकली होती म्हणता....त्यानंतरचे बरेच दिवस आकाशाकडे बघून सगळ्या ग्रह तार्यांची पोझिशन तपासण्यात गेले होते. जाम टेन्शन आलं होतं तेव्हा. तेव्हाच्या प्रदुषणविरहित आकाशात नेहमी दिसणारे गुरू, शनी, मंगळ वगैरे एकमेकांपासून हातभर अंतर ठेऊन आहेत बघितलं की हायसं वाटायचं. पल्याड शुक्र, बुध आणि न दिसणारे राहू केतू काही का गोंधळ घालेनात. जोपर्यंत ही नऊ लोकं एकत्र येत नाहीत तो पर्यंत प्रॉब्लेम इल्ले.