http://www.misalpav.com/node/32108
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस: निकाल
नमस्कार मंडळी! बाराव्या स्पर्धेचा निकाल जाहीर करायला काही अपरिहार्य कारणाने उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. निकाल जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. पाऊस हा तसा सोपा विषय होता मात्र पाऊस कमी झाल्याने की काय कोणजाणे, छायाचित्रे जरा कमी आली. पण तरी काही खूप छान छायाचित्रे बघायला मिळाली.
पहिला क्रमांक आला कपिलमुनी यांच्या छायाचित्राचा.
.
.
दुसरा क्रमांक आहे आशय ढवळे यांचा
हे एक उत्कृष्ट छायाचित्र आहे.
तिसरा क्रमांक आहे सोंड्या यांच्या छायाचित्राचा
.
.
पहिल्या आणि दुसर्या छायाचित्रात अगदीच कमी म्हणजे २ गुणांचा फरक होता. याशिवाय अजिंक्य विश्वास आणि शामसुंदर यांच्या छायाचित्रांना बर्याच वाचकांनी पसंती दिली. ज्यांचे स्पर्धेत क्रमांक येऊ शकले नाहीत ती इतर सर्व छायाचित्रेही उल्लेखनीय होती. नन्दादीप, वेल्लाभट, प्रभो, चौकटराजा, विशाल कुलकर्णी, सर्वांचीच सुंदर छायाचित्रे बघायला मिळाली. किल्लेदार आणि आशय ढवळे यांनी त्यांच्या खास छायाचित्रांबद्दल जरूर लिहावे ही विनंती!
पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि कौतुक करणार्या वाचक आणि मतदात्यांना धन्यवाद!
आता १५ दिवस विश्रांती घेऊया आणि १७ सप्टेंबर श्रीगणेश चतुर्थीला नवी स्पर्धा सुरू करू. विषय असेल अर्थातच "माझा बाप्पा". तुमच्या घरच्या श्रीगणेशमूर्तींची, सजावटींची उत्तमोत्तम छायाचित्रे तेव्हा सर्व वाचकांना बघायला मिळू देत! धन्यवाद!!
प्रतिक्रिया
3 Sep 2015 - 11:40 pm | लालगरूड
अभिनंदन
3 Sep 2015 - 11:49 pm | प्यारे१
विजेत्यांचे हार्दिक अभिनन्दन!!!
'उत्तेजनार्थ' म्हणून आणखी एका फोटोला बक्षीस द्यायला हवं होतं खरंतर ;)
4 Sep 2015 - 7:09 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या ह्या ह्या. प्यारे काका कालपासुन सुटलेत जोरात :P!!
4 Sep 2015 - 1:27 pm | चिगो
भन्नाटच कोटी, प्यारे.. कालपासून 'रिवायटल' घ्यायला लागलास का काय, भावा? ;-)
4 Sep 2015 - 1:40 pm | कपिलमुनी
चांदीचा पेल्यामधून पाणी पितात ते आजकाल !
असे ऐकून आहे =))
4 Sep 2015 - 2:08 pm | प्यारे१
फ़ोटो आठवला ना सगळ्यांना ????
मग झालं तर!
4 Sep 2015 - 4:33 pm | नाखु
चांगली "चांदी" झाली म्हणायची की तुमची !!!!
मुनीवरचा पक्का शेजारी नाखु
4 Sep 2015 - 5:14 pm | प्यारे१
या!
तुम्हीच बाकी होतात.
- उधारीवरआणूनपुस्पगुचदेऊस्वागतसमितीसचिव
4 Sep 2015 - 12:18 am | अत्रुप्त आत्मा
4 Sep 2015 - 5:33 am | चौकटराजा
आमची हीच स्मायली पण डोळे हिरवे नाहीत असे समजावे. ते नारायण धारपांच्या कथेतील वाटतात. आमचे मन हिरवे आहे ! मी काढलेला फोटो त्यावेळी कॅमेरा वापरणे अशक्य होते अशा वेळी काढला. रपरप पाउस व दरीतून येणारे भन्नाट वारे असे चित्र होते. विजेत्यांचे अभिनंदन !
4 Sep 2015 - 7:01 am | संजय पाटिल
सर्व विजेत्यांचे अभिनंदन,...
4 Sep 2015 - 7:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
कमुदादा आणि अन्य विजेत्यांचे हार्दिक हाबिणंदन. रच्याकने तो वीजेचा फोटो जब्राट टायमिंग लाउन काढलाय.
4 Sep 2015 - 8:26 am | नाखु
मी कप्तानाच्या श्ब्दाबाहेर ( आणि जहाजाबाहेरही) नाही !!!!!
4 Sep 2015 - 2:32 pm | चौकटराजा
मला चिंचवडात रहायचेय ! व कप्तान तसा आडनावाशी बेईमान आहे. पयशे भरतो सर्वांच्या चा चे ! मागेपुढे पहात नाही.
4 Sep 2015 - 7:16 am | प्रचेतस
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
अतिशय उत्कृष्ट छायाचित्रे होती.
4 Sep 2015 - 7:22 am | अजया
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
4 Sep 2015 - 9:48 am | नाव आडनाव
अभिनंदन मित्रांनो :)
4 Sep 2015 - 10:01 am | नीलमोहर
विजेत्यांचे अभिनन्दन !!
4 Sep 2015 - 10:37 am | शामसुन्दर
सर्व विजेत्यांचे अभिनंदन,...
4 Sep 2015 - 10:40 am | वेल्लाभट
विजेत्यांचे अभिनंदन आयोजकांचे आभार
4 Sep 2015 - 11:37 am | प्रभो
मस्त! अभिनंदन.
4 Sep 2015 - 1:53 pm | सविता००१
सर्व विजेत्यांचे
4 Sep 2015 - 4:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन !
5 Sep 2015 - 6:41 pm | ढंप्या
सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन !!!
सं. मं. एक विनंती.... (आधीच करायची होती पण स्पर्धक असल्याने नाही करवली)
फोटो स्पर्धेसाठी देताना, जी माहीती देतो त्यात फोटो कशाने काढला ते पण देतो म्हणजे, मोबाईल,किंवा
पाँईट-शूट / प्रो .... वगैरे वगैरे... त्याच्या आधारावरच जर वर्गवारी करून निकाल दिला तर....
म्हणजे मोबाईलच्या फोटोचे वेगळे विजेते, पाँईट-शूट / प्रो चे वेगळे विजेते असे...
काय आहे.... तंत्राबरोबर उपकरणाने पण बराच फरक पडतो...
बघा जरा मनावर घ्या.........!!!
6 Sep 2015 - 12:07 pm | एस
एक छायाचित्रकार म्हणून या प्रतिसादातील मुद्द्याबद्दल मत देतो. तंत्राबरोबर उपकरणाने बराच फरक पडतो हे मान्य. पण तंत्रच नसेल तर उपकरण काही कामाचे नसते. डीएसएलआर सोडा, अगदी हासेलब्लाड बाळगणारेदेखील काहीही छायाचित्रे काढत बसतात हे पाहिले आहे. आणि अगदी मोबाइलच्या व्हीजीए कॅमेर्यानेसुद्धा उपलब्ध परिस्थितीचा पुरेपूर वापर करून नेत्रसुखद छायाचित्रण करू शकणारेही पाहिले आहेत.
तंत्र विरुद्ध उपकरण असे जर पहावयाचे झाले तर तंत्र म्हणजेच कौशल्य हे केव्हाही सरस ठरेल. त्यामुळे जसे एखाद्या निष्णात शेफला आपण त्याच्या महागड्या कुकर, चमचे, कढया यासारख्या वस्तूंवरून भाव न देता त्याच्या स्वयंपाकाच्या कौशल्यालाच फक्त आदर देतो तसेच छायाचित्रकारालासुद्धा तुम्ही कोणता कॅमेरा वापरला, कुठली लेन्स वापरली असे प्रश्न तशीच तांत्रिक गरज नसताना विचारून त्याच्या/तिच्या कौशल्याचा अपमान करू नये. मला माझ्याकडे असणार्या गिअर (उपकरणांचा संच) बद्दल कुणी विचारल्यास मी अजिबात उत्तर देत नाही. कारण कॅमेर्यामागील माझा डोळा हा कॅमेरा व लेन्सपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. माझा कॅमेरा दुसर्याला देऊन त्याला माझ्यासारखी छायाचित्रे घेता येणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा त्या व्यक्तीकडेही तसेच कौशल्य आणि तीच कलासक्त नजर असेल.
याच कारणामुळे महागडी उपकरणे घेण्याची स्वप्ने पाहणार्या उतावीळ लोकांना मी आधी त्यांच्याकडे असणार्या उपकरणांच्या क्षमतेला 'आउटग्रो' करण्याचा सल्ला देतो.
राहता राहिला प्रश्न उपकरणांच्या वर्गवारीनुसार स्पर्धेचे विभाग करण्याचा, तर ही स्वागतार्ह सूचना आहे. हल्ली 'बेटर फोटोग्राफी' सारखी मासिकेही केवळ मोबाइलने घेतलेल्या छायाचित्रांची स्पर्धा घेऊ लागलेली आहेत, तसाच प्रयोग मिपावरही करण्यास हरकत नाही. एखादी स्पर्धा फक्त मोबाइल छायाचित्रणाची घ्यावी. पण सारांश - उपकरणांचे अवडंबर माजवू नये.
6 Sep 2015 - 12:12 pm | एस
ढिस्स्स्क्लेमर्र : मी एकदम सामान्य छायाचित्रकार असून छायाचित्रण अजून शिकतो आहे. ;-) ;-) ;-)
6 Sep 2015 - 9:34 pm | ढंप्या
चेष्टा करता का राव गरीबाची.......!!!
7 Sep 2015 - 2:16 pm | वेल्लाभट
कळकळ पोचली.....
संपूर्ण सहमत.
6 Sep 2015 - 9:32 pm | ढंप्या
अगदी मान्य..... _____/\_____
एवढीच मागणी....!!!
8 Sep 2015 - 9:04 pm | पैसा
स्वॅप्सचा प्रतिसाद महत्त्वाचा. आवडला.
मोबाईलवर काढलेल्या फोटोंसाठी स्वतंत्र स्पर्धा घ्यायचा विचार जरूर आहे. सध्या सणासुदीचे विषय आणि विशेष परीक्षकांकडून एक स्पर्धा झाल्यानंतर हा प्रकार प्राधान्याने घेऊ.
7 Sep 2015 - 1:44 pm | मी-सौरभ
विजेत्यांचे आभिनंदन
8 Sep 2015 - 7:30 pm | नया है वह
विजेत्यांचे आभिनंदन !!