हे हृदय कसे बापाचे......!

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
20 Jun 2015 - 5:32 pm

(उद्या जगभरात माणसांच्या दुनियेत Father’s Day साजरा होईल. पण पक्ष्यांच्या मुक्त जगातला हा रोजचा Father’s Day वाचकांसाठी....)

रणरणते वाळवंट. निर्मम सूर्य. नजर टाकली तरी, आपले डोळे भाजून जावेत!
अशा ठिकाणी कुठला पक्षी रहात असेल, वस्ती करीत असेल, मनातही येत नाही.
पण निसर्गाची किमया आणि माया अगाध!
............. ............. ................
एक पक्षीण आपल्या नवजात पिलांना पोटाशी घेऊन खुरट्या झुडपांआड बसलेली. पिलेही आपल्या आईच्या पोटाच्या सावलीला बिलगून, आजूबाजूला टुकूटुकू पाहतायेत. असल्या रणरणत्या वाळवंटात त्यांना दानापाणी कुठून मिळत असेल? पण जो चोच देतो, तो दानापाणी देतोच देतो. हि कथा आहे वाळवंटात राहणाऱ्या भाट तीतरची! Sandgrouse या पक्ष्यांची!
हे पक्षी वाळवंट, ओसाड जमिनीवर राहतात. ओसाडवाडीत झाडी नसल्याने, साहजिकच हे आपला निवारा खुरट्या झाडाझुडपात करतात.पिले झाल्यावर, घरात राहून आई पिलांची देखभाल करते, तर बाप दानापाण्याच्या शोधार्थ बाहेर पडतो.
............. ............. ................
रणरणत्या उन्हात शेकडो मैल पंखपीट केल्यावर, शेवटी कुठेतरी खळगाभर पाणी दिसते.बाप आनंदाने पाण्यावर झेपावतो. तापलेले पंख निवतात. स्वतः पोटभर पाणी पितो. मनात, घरातल्या नाजूक पिलांची आठवण, काळजी असतेच. त्यांच्यासाठी इतक्या दूर पाणी कसे घेऊन जायचे?
मग बाप जराशा खोल पाण्यात आपली छाती आणि पोट बुडवतो. हळूहळू छाती आणि पोटापासले मवाळ पंख पाणी शोषून घेतात. पुरेसे पाणी शोषून झाले कि हा बाप भरल्या हृदयाने आपल्या घरट्याकडे उडू लागतो.......परत तितकेच मैल, तितकीच रणरण!
घराजवळ येताच, त्याची पिले लुटूलुटू त्याच्या जवळ येतात. पाणी कुठेय?
बापाच्या भरल्या छातीत ते आपल्या इवल्या इवल्या चोची खुपसतात, पाणी पिऊ लागतात....
भरल्या हृदयाच्या बापाच्या चेहऱ्यावरचे भाव, बघणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू उमटवतात.
.......... ...........
भाट तीतरच्या छाती आणि पोटावरचे पंख blotting paper सारखे काम करतात, तर त्याच्या पिलांच्या चोची, शाई ओढून घेणाऱ्या dropper सारख्या काम करतात. याच निसर्गदत्त देणगीमुळे Sandgrouse भर वाळवंटात निर्धास्तपणे राहतो. वाढतो. पुढील पिढीचे संगोपन करतो.
मरुभूमीला जीवनाचा पंखस्पर्श होतो!
( अधिक माहितीसाठी Google, wiki इत्यादी आहेतच! पण bbc nature ने यांच्यावर एक अप्रतिम video clip तयार केली आहे. हा त्याचा धागा http://www.bbc.co.uk/programmes/p00mspbc.
विशेष विनंती : कुणी मिपाकराने भाट तीतरचा फोटो प्रतिक्रियेत डकवला तर, खूप बरे होईल. मला ते इथे डकवणे जमत नाहीये. तसे करणाराचे आगाऊ धन्यवाद.)
हो आणि, सर्व वाचक/लेखक बापांना (आणि बाप वाचक/लेखकांना पण )शुभेच्छा.
या लेखासाठी आमचे पक्षीमित्र आणि अभ्यासक श्री. राजेंद्र प्रधान यांनी शंकानिरसन करून मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार!

.

मांडणीवावरसंस्कृतीसमाजजीवनमानराहणीभूगोलविज्ञानप्रकटनप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादमाध्यमवेधलेखसंदर्भविरंगुळा

प्रतिक्रिया

शशांक कोणो's picture

20 Jun 2015 - 5:34 pm | शशांक कोणो

लई भारी .......

जयंत कुलकर्णी's picture

20 Jun 2015 - 7:38 pm | जयंत कुलकर्णी

मस्त.........

किती छान! पितृदिनानिमित्ताने आलेली माहिती आवडली.

यशोधरा's picture

20 Jun 2015 - 7:46 pm | यशोधरा

मस्त :) डॉक्यु बघेन.

विवेकपटाईत's picture

20 Jun 2015 - 7:55 pm | विवेकपटाईत

आवडलं

सचिन's picture

20 Jun 2015 - 8:53 pm | सचिन

मलाही आवडलं !! खूपच छान !

बबिता बा's picture

21 Jun 2015 - 6:27 am | बबिता बा

शुभेच्छा

अन्या दातार's picture

21 Jun 2015 - 6:33 am | अन्या दातार

समयोचित व छान माहिती :)

वा! खूपच छान माहिती.

अशाच प्रकारचे अजून एक उदाहरण म्हणजे हॉर्नबिल किंवा धनेश या पक्ष्याचे. एखाद्या झाडाच्या ढोलीत मादी अंडी घालते. मग नर त्या ढोलीत बसून ती उबवतो. मादी बाहेरून ती ढोली चिखलाने बंद करते आणि केवळ चारा आतल्या नराला देता येईल इतपतच छिद्र ठेवते. आतापर्यंत पक्षिसंशोधकांचा असा समज होता की आत मादी असते. पण खरेतर ढोलीत स्वतःला दिवसेंदिवस कोंडून घेणारा नर असतो.

(माहिती साभार पक्षितज्ञ श्री. मारुती चितमपल्ली यांच्या एका पुस्तकातून.)

आणखीही उदाहरणे सांगता येतील. एम्परर पेंग्वीन या अ‍ॅन्टार्क्टिका खंडात आढळणार्‍या पक्ष्यातही मादी मासे पकडून घेऊन येण्याची जबाबदारी स्वीकारते, तर नर हा तिथल्या जीवघेण्या थंडीत काहीही न खातापिता अंडे उबवत बसतो.

सस्तन प्राण्यांमध्ये मात्र पिलांच्या संगोपनाची जबाबदारी ही मादीवर बहुतांश वेळेस आलेली दिसून येते.

स्वीत स्वाति's picture

27 Jun 2015 - 2:05 pm | स्वीत स्वाति

मस्त

स्पंदना's picture

21 Jun 2015 - 8:33 am | स्पंदना

वा तर्री ताई.
अगदी दिन विषेश साधून हां लेख आला.
स्वैप्स यांची माहिती सुद्धा खरच अवाक करणारी. माझ्या सुद्धा माहिती प्रमाणे मादी आत आणि नर बाहेर असच होत.

श्रीरंग_जोशी's picture

21 Jun 2015 - 8:52 am | श्रीरंग_जोशी

समयोचित लेखन भावले.

स्वॅप्स यांचा माहितीपूर्ण प्रतिसादही आवडला.

के.पी.'s picture

21 Jun 2015 - 9:22 am | के.पी.

सुंदर माहिती!!

अगदी समयोचित माहितीपूर्ण धागा.

निशांत५'s picture

21 Jun 2015 - 9:40 am | निशांत५

Chan

नूतन सावंत's picture

21 Jun 2015 - 10:46 am | नूतन सावंत

तर्रीताईचा लेख आणि स्वॅप्स यांचा माहितीपूर्ण प्रतिसाद,दोन्ही भारीच आहे.

रातराणी's picture

21 Jun 2015 - 1:32 pm | रातराणी

खूप सुंदर! थ्री चियर्स टू all वंडरफुल पप्पा :)

चुकलामाकला's picture

22 Jun 2015 - 6:29 pm | चुकलामाकला

लेख आणि स्वॅप्स यान्चा प्रतिसाद दोन्ही आवडले.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jun 2015 - 12:52 am | अत्रुप्त आत्मा

आवडलं!

कौशिकी०२५'s picture

27 Jun 2015 - 11:50 am | कौशिकी०२५

मस्तंच..!

स्वीत स्वाति's picture

27 Jun 2015 - 2:04 pm | स्वीत स्वाति

नवीन माहिती मिळाली .