सायकलिंग ह्या स्पोर्टमध्ये भारतीयांनी मिळवलेला विजय,

वेल's picture
वेल in जनातलं, मनातलं
29 Jun 2015 - 6:24 pm

नाशिक मधील डॉ महेन्द्र महाजन वय ३९ आणि डॉ हितेन्द्र महाजन वय ४४ यांनी जगातली एक अत्यंत कठिण सायकल रेस अमेरिकेतील RAAM आज पूर्ण केली. ही रेस त्यांनी team india:vision for tribals ह्या नावाने टीम रेस म्हणून पूर्ण केली. ३००० मैलाची ही रेस दोन जणांच्या ह्या टीमला नऊ दिवसात पूर्ण करायची होती. ती त्यांनी आठ दिवस चौदा तास आणी ५५ मिनिटांमध्ये पूर्ण केली. अमेरिकेच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंचे अंतर ह्यात पार करायचे होते. अनेक घाटांमधून जाणार्‍या रस्त्यावर ९००० फूट उंचीचा सर्वात मोठा पासदेखील होता. भारतातील अजून दहा सायक्लिस्ट त्यांच्या क्रूमध्ये होते.

ह्यापूर्वी महाजन भावांनी भारतात २००, ३००, ४००, ६००, १००० अशा ब्रेव्हे सायकल रेसेस पूर्ण केल्या आहेत. ह्याशिवाय भूतानच्या टूर ऑफ द ड्रॅगन नावाच्या २६८ किमी च्या रेसमध्येही भाग घेउन ती वेळेआधी पूर्ण केली आहे. ह्या रेसमध्ये हिमालयातले ४ पासेस कव्हर करावे लागतात. ह्या रेसला डेथ रेस असेही म्हणतात.

RAAM मध्ये भाग घेणारी ही पहिली भारतीय टीम. ह्यापूर्वी चार भारतीयांनी ह्या रेस मध्ये वैयक्तिक रित्या भाग घेतला होता.

ह्या टीमने RAAM मध्ये पूर्ण केलेल्या प्रत्येक शंभर किमी मागे प्रत्येक १०० किमी मागे ५ कॅटॅरॅक्ट आणि १ कॉर्नियल इम्प्लांट या प्रमाणाने आदिवासींच्या eye surgeries करण्याचा संकल्प नाशिकच्या कल्पतरू फाऊंडेशनने सोडला आहे.

महाजन भावांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

https://www.facebook.com/RAAM2015India?fref=ts (टीमचे फेबु पेज)

क्रीडाशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jun 2015 - 6:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

वाहवा ! ब्राव्हो !!

डॉ महेन्द्र महाजन आणि डॉ हितेन्द्र महाजन यांचे हार्दीक अभिनंदन !!! ३९ आणि ४४ अशी त्यांची वये पाहता अनेक (भारतीय आणि परदेशीही) तरुणांना त्यांनी लाज वाटायला लावली असेल. पण, त्याहून जास्त, ते अनेकांचे स्फुर्तीस्थान ठरोत अशी शुभेच्छा आहे !

नाशिकच्या कल्पतरू फाऊंडेशनने आदिवासींच्या डोळ्याच्या ४८ शल्यक्रिया करण्याचा संकल्प सोडला आहे तोही स्पृहणिय आहे.

आजचा दिवस चांगला आहे !

उगा काहितरीच's picture

29 Jun 2015 - 6:39 pm | उगा काहितरीच

अभिनंदन !

थोडा बदल आहे. लिहिताना थोडी चूक झाली.

प्रत्येक १०० किमी मागे ५ कॅटॅरॅक्ट आणि १ कॉर्नियल इम्प्लांट असा संकल्प आहे. मला लेख संपादित करता येत नाही म्हणून इथे लिहित आहे.

पैसा's picture

29 Jun 2015 - 6:52 pm | पैसा

त्यांचे हार्दिक अभिनंदन! कल्पतरू फौंडेशनचा उपक्रमसुद्धा कौतुक करण्यासारखा!

संदीप डांगे's picture

29 Jun 2015 - 6:53 pm | संदीप डांगे

डेथ रेसबद्दल त्यांचे अनुभव वाचले होते तेव्हा पासून त्यांच्याबद्दल मनात अपार आदर आहे.

दोघांना एक कडक सॅल्यूट, देशांची मान अभिमानाने उंचावल्याबद्दल.

विशाल कुलकर्णी's picture

29 Jun 2015 - 6:54 pm | विशाल कुलकर्णी

ग्रेट न्युज ! अभिनंदन आणि अभिवादन _/\_

वेल's picture

29 Jun 2015 - 7:35 pm | वेल

RAAM बद्दल थोडेसे - रॅम ही अल्ट्रा लाँग डिस्टन सायकलींग रेस आहे. ३००० माईल्स ( किमी नव्हे) हे ठरलेल्या वेळे आधी पूर्ण करावे लागतात. त्याबद्दल ह्या साईट वर जास्त माहिती मिळेल. http://www.raceacrossamerica.org/raam/raamfp.php?N_webcat_id=1

ह्या टीमने रीले प्रकारात भाग घेतला होता.

चिगो's picture

29 Jun 2015 - 7:49 pm | चिगो

विजेत्यांच्या आणि त्यांना पाठींबा देणार्‍या कल्पतरु फाऊंडेशनचे अभिनंदन..

वा! फार छान वाटले वाचून. अभिमानास्पद कामगिरी आणि तितकाच कौतुकास्पद संकल्पही!

आनंदी गोपाळ's picture

29 Jun 2015 - 8:22 pm | आनंदी गोपाळ

डॉ. हितेंद्र हे अ‍ॅनास्थेटिस्ट आहेत, धाकटे बंधू महेंद्र हे डेंटिस्ट आहेत.