कालच्या रविवारी एका चित्रवाणी कार्यक्रमात उंच माझा झोका हा कार्यक्रम चालू होता तेव्हा एक बातमी अचानक आठवली. ‘पीटर ड्रकर चॅलेन्ज’ नावाची एक दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर भरणारी निबंधस्पर्धा २०१५ या वर्षासाठी नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत दरवर्षी जागतिक स्तरावरून निबंध सादर केले जातात. या वर्षी ही स्पर्धा मुंबईच्या कु. नमिता नारकर या मराठी मुलीने प्रथम क्रमांक मिळवून जिंकलेली आहे. स्पर्धेचा विषय होता ‘ह्यूमन डिफरन्सेस’. नोव्हेंबरमध्ये व्हिएन्ना येथे पारितोषिक वितरण समारंभ आहे.
दोनचार वर्षापूर्वीच तिने जैव-औषध यांत्रिकी (बायो मेडिकल) अभियांत्रिकी हा विषय घेऊन बीई ही पदवी मुंबई विश्वविद्यालयातून घेतांना विद्यापीठात सातवा क्रमांक मिळवला होता. तेव्हाच खरे तर तिच्या असामान्य प्रज्ञेची चुणूक पाहायला मिळाली होती. त्यानंतर तिने फिलीपाईन्समधून व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी घेतली. सध्या ती एका अत्याधुनिक हृदयशल्यसाधने बनवणार्या जपानी कंपनीत उच्च हुद्द्यावर काम करते.
या झळझळीत, नेत्रदीपक यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि उत्तरोत्तर असेच यश तिला मिळो अशा शुभेच्छा.
प्रतिक्रिया
14 Sep 2015 - 5:35 pm | एस
अभिनंदन आणि शुभेच्छा..! ब्रेनड्रेनचे अजून एक उदाहरण पाहून खिन्न झालो.
14 Sep 2015 - 6:41 pm | सुधीर कांदळकर
आणि आघाडीच्या, सुप्रसिद्ध हृदय शल्यविशारदांना उदा. हृदयशल्यविशारद डॉ. मुळे, डॉ. भट्टाचार्य यांना आधुनिक उत्पादनांची , त्यांच्या वैशिष्ट्यांची आणि ती कशी वापरावीत त्या तंत्राची माहिती देते.
14 Sep 2015 - 7:18 pm | एस
अच्छा! ग्रेट.
14 Sep 2015 - 6:43 pm | रेवती
बातमी आवडली.
14 Sep 2015 - 7:18 pm | प्यारे१
हार्दिक अभिनंदन.
वैयक्तिक मत : माहितीचा भाग तोकडा वाटला. यात याच मुलीबद्द्ल्ल काय खास वगैरे विषय गौण आहेत. तिचं कौतुक करताना सोहळ्याबद्दल सुद्धा काही माहिती मिळायला हवी होती.
14 Sep 2015 - 8:09 pm | सस्नेह
अभिमान आणि कौतुकास्पद बातमी !
14 Sep 2015 - 8:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
कु. नमिता नारकरचे अभिनंदन आणि उत्तरोत्तर अधिकाधिक यशासाठी शुभेच्छा !!
नमितासंबंधी अजून माहिती असल्यास ती वाचायला आवडेल.
15 Sep 2015 - 7:41 am | बोका-ए-आझम
अभिमानास्पद बातमी! हार्दिक अभिनंदन!
15 Sep 2015 - 9:53 am | उगा काहितरीच
मूळ निबंध वाचायला आवडेल . लिंक मिळेल का ?
16 Sep 2015 - 2:07 am | अमृतेश सराफ
प्रस्तुत निबंध ह्या लिंकवरून डाऊनलोड करता येईल.
17 Sep 2015 - 9:27 am | उगा काहितरीच
धन्यवाद लिंक बद्दल .
16 Sep 2015 - 6:18 am | सुधीर कांदळकर
स्व्~अप्स, रेवती, प्यारे १, स्नेहांकिता, डॉ. सुहास म्हात्रे, बोका ए आझम, उगा काहीतरीच, आणि अमृतेश सराफ,
सर्वांना धन्यवाद.
@प्यारे १: ़इच्यबद्दल माहिती द्ययची तिच्या परवानगीशिवाय काही लिहिणे अप्रशस्त वाटले. शिवाय मूळ हेतू एवढाच होता आणि आहे की मराठी माणसाच्या अभिमानाची गोष्ट सर्वांना सांगावी.
माझ्या खेडेगावातील घरातल्या भ्रमणध्वनीच्या २जी संदेशाच्या लहरीवर माझी महाजालावरील लुडबूड चालते. काल मुख्य पान उघडल्यावर काहीच होत नव्हते म्हणून प्रतिसदांना उत्तर देता आले नाही. विलंबाबद्दल क्षमस्व.
16 Sep 2015 - 6:50 am | अमृतेश सराफ
कु. नमिता नारकर हिचे हार्दिक अभिनंदन !!!
16 Sep 2015 - 11:33 am | स्वाती दिनेश
छान बातमी, नमिताचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
स्वाती
16 Sep 2015 - 12:09 pm | रातराणी
भारी ! नमिताचे अभिनंदन!
17 Sep 2015 - 2:11 am | दिवाकर कुलकर्णी
स्फूर्तिदायक!!!