1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल.
2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील.
3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील.
4. कोणी आपल्या वाहनाला डाव्या बाजूने ओव्हरटेक करून पुढे गेल्यास ही गोष्ट सार्वजनिक करू नये. हा वाहन संथ चालवितो अशी लोक आपली सगळीकडे जाहीरात करतील.
5. वाहनाच्या अपघात विम्याची मुदत संपली असेल तर ही गोष्ट सार्वजनिक करू नये. त्यामुळे आपलीच प्रतिष्ठा कमी होईल.
प्रतिक्रिया
10 Sep 2015 - 1:26 pm | जिन्क्स
अशी विंडंबणे आता बास करा. किती बोर कराल!
10 Sep 2015 - 2:16 pm | खटपट्या
हे विडंबन आहे?
मला तर रहदारीच्या नियमाबद्द्लचा धागा वाटला.
11 Sep 2015 - 3:35 pm | बाळ सप्रे
विडंबन समजले..
पण जे करा सांगितलय तुम्ही त्यानेच आजकाल हसे होते असा अनुभव आहे !!
11 Sep 2015 - 3:56 pm | द-बाहुबली
खिक्क... और आने दो.
11 Sep 2015 - 5:34 pm | विवेकपटाईत
दिल्लीत तरी निदान सुरक्षित घरी पोहचणे शक्य नाही. विमा उतरवून घ्या १२ रुपय्या वाला.
14 Sep 2015 - 11:40 am | हेमंत लाटकर
श्रीगुरूजी विडंबन फोल झाले 8 प्रतिसादावर:)
14 Sep 2015 - 2:34 pm | श्रीगुरुजी
ते होणारच होतं. मूळ लेखच इतका जबरदस्त होता की तितका प्रतिभावान लेख लिहिण्याइतकी प्रतिभा आमच्यात बिलकुल नाही. त्यामुळे हे होणारच होतं.