जीवनमान
काही मानवी अनुभव
प्रेषक, तिमा, Wed, 17/04/2013 - 13:50आम्ही दोघी सख्ख्या बहिणी. ती थोडी उजळ.मी सावळीच आहे.. एका उंच इमारतीत रहातो आम्ही. आई आमच्या लहानपणीच गेली. म्हणजे एक दिवशी रात्री ती जी बाहेर गेली ती परत आलीच नाही. मग आम्ही दोघीच उरलो एकमेकींना. एका घरी जास्त काळ नाही रहायचो. पण जेंव्हा भेटायचो तेंव्हा आमच्या चु(क्)चु(क) वाणीत भरपूर गप्पा मारायचो. मी जात्याच खोडकर होते. तरी बहीण नेहमी मला म्हणायची," तू बाई फार धोका पत्करतेस. एकदिवशी जीवावर बेतेल तेंव्हा समजेल." पण मला आवडायच्या खोड्या काढायला!
इवलेसे बीज
प्रेषक, शुचि, Mon, 15/04/2013 - 19:49हा धागा "ईंटरॅक्टीव्ह" रुपाचा असून, अतिखाजगी गोष्टींत संदिग्धता राखून प्रतिक्रिया देता आल्यास उत्तमच. आपल्यापैकी प्रत्येकाने आवडो न आवडो, आयुष्यात चढ-उतार अनुभवले आहेत. पैकी "लाईफ डिफायनिंग" असे कोणते क्षण आपल्याला सांगता येतील? म्हणजे काही निर्णय आपण घेतो ज्यांचा परीणाम तेव्हा जाणवत नाही पण कालांतराने खूप प्रभाव जाणवतो. आपल्या एखाद्या निर्णयाने, अन्य व्यक्तीने केलेल्या कृतीने किंवा त्यावरच्या आपल्या प्रतिक्रियेने -आयुष्याला चढती अथवा उतरती कळा लागली असे प्रसंग, निर्णय, क्षण येथे जरुर शेअर करावेत.
अनसंग हीरो
प्रेषक, अमोल उद्गिरकर, Sat, 13/04/2013 - 14:34ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम ने मागची २ दशक जागतिक क्रिकेट वर वर्चस्व गाजवल. प्रचंड गुणवत्ता, Never say die attitude, आणि मिळालेले कुशल कर्णधार यामुळे ऑस्ट्रेलिया ने इतर टीम्स ना तोंड वर काढण्याची संधी कधी दिलीच नाही. त्यामुळे मागच्या काही वर्षात ऑस्ट्रेलिया चे अनेक दिग्गज खेळाडू निवृत्त झाले आणि त्यांची जागा घेणारे नवीन खेळाडू तितके चांगले नसल्याने त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळायाला लागला. परवा त्यांचा वेगवान गोलंदाज शॉन टेट म्हणाला की गिलेस्पी, हेडन, वॉर्न ह्यानी इतक्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती. ऑस्ट्रेलिया संघाच्या गळतीची अनेक विश्लेषण वाचली.
अलि अँड द बॉल: कुंपणाआडचं आभाळ
प्रेषक, रमताराम, Fri, 12/04/2013 - 20:32मुलांचा फुटबॉलचा खेळ रंगात आला आहे. प्रचंड कोलाहल, आरडाओरड्याने त्यांनी आसमंत दणाणून सोडला आहे. कॅमेराही त्यांच्या मधे धावणार्या त्या चेंडूचा पाठलाग करू पाहतो, पण जमत नाही त्याला. इतक्यात एक बदामी डोळ्याचा खट्याळ पोरगा तो चेंडू उचलून धूम ठोकतो. उरलेली सारी मुले त्याच्या मागे लागतात. पण तो फार दूर जाऊ शकत नाही, एक भक्कम कुंपण त्याच्या वाटेत उभे आहे. त्या कुंपणाला पाठ लावून तो चेंडू नेण्यासाठी आलेल्या त्या मुलांना चिडवतो आहे. ते ही सगळे मिळून त्याच्यावर धावून जातात नि चेंडू हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताहेत. हात उंच करून तो चेंडू त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे.
वेडी....
प्रेषक, विसोबा खेचर, Wed, 10/04/2013 - 19:33साधारणपणे ९० चं दशक असेल..
ठाणे स्थानकावर एक वेडसर भिकारीण दिसायची.. नेहमी तिच्या हातात एक तान्हं मूल असे..तिच्या हावभावावरून, वागणुकीवरून ती वेडसर होती हे निश्चित.. रहायचीही स्थानकाच्याच परिसरात..
आता सतत अगदी जातायेता तिच्यावर लक्ष जायचं असं नव्हे..परंतु ती दिसायचीच.. ती दिसली की माझ्यासारखे अनेक जण कदाचित तिला नोटीस करत असतील आणि अनेक जण नसतीलही..
या गोष्टीला, म्हणजे तिच्या अशा नेहमी दिसण्याला माझ्या आठवणीप्रमाणे ५-६ वर्ष तरी सहज झाली असतील..
निमित्त फक्त एका भेटीचे
प्रेषक, सुज्ञ माणुस, Mon, 08/04/2013 - 13:39निमित्त फक्त एका भेटीचे
परवाच आई च्या तोंडून तिच्या शाळेतल्या बाईंची भेट ऐकली. पहिल्या दोन वाक्यातच डोळ्यात पाणी उभे राहिले. खरेतर त्या काळाची ती गोष्ट, ऐकून सोडून देण्यापलीकडे काहीही हातात नव्हते. पण आमच्या मातोश्रींचे बोलणेच इतके अमोघ, की त्यातल्या भावनांची मनात गर्दी व्हायला काही क्षणांचा अवकाश. मन भूतकाळात केव्हाच वाहून जाते. आठवणी आणि भावनांचा कल्लोळ असा काही उठतो की अश्रूंचे हळुवार टीपके सैरावैरा धावू पाहतात इवल्याश्या डोळ्याच्या पटांगणावर.
वेदना
प्रेषक, रेशा, Fri, 05/04/2013 - 09:13बोलायचे आहे काही, सांगायचे आहे काही
भावनेस तिच्या कसे, शब्दांचे वावडे बाई
वेदना मुकेपणाची, सलत आत राही
निश:ब्दात गुज हे, गुंफीयले जात नाही
मनाचा सय्यम मोठा, परी उर फुटो पाही
पाणावल्या डोळ्यांनी, ती जळतच राही
आनंदते आक्रंदते परी, ओठांवर काही नाही
आंदोलने मनातली, जणू गोठून आत जाती
उपभोगले त्याने बाईपण, ती वेदनेत न्हाली
जीवन उरले फक्त .. जगणे जळून जाई
... रेशा
ओज-शंकराची कहाणी
प्रेषक, नरेंद्र गोळे, Wed, 03/04/2013 - 12:59श्री. शंकर दिनकर उपाख्य भैयाजी काणे (जन्मः ६ डिसेंबर १९२४, वरवडे, रत्नागिरी – मृत्यूः २६ ऑक्टोंबर १९९९, कोल्हापूर) हे न्यू तुसॉम, जिल्हा उख्रूल, मणीपूर राज्य, भारत, ह्या त्यांच्या कर्मभूमीत, ओज-शंकर म्हणून ओळखले जातात. तिथे, पूर्व-सीमा-विकास-प्रतिष्ठानतर्फे स्थापन करण्यात आलेल्या ओज-शंकर विद्यालयाच्या स्वरूपात, आज त्यांचे कार्य दिमाखाने उभे आहे. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या त्यांच्या जीवनव्यापी ध्यासाचे, आज एका मोठ्या चळवळीत रूपांतरण झालेले आहे. त्या त्यांच्या भरतभूस ललामभूत ठरलेल्या कार्याची ही कहाणी आहे.
नायक क्रमांक एक
प्रेषक, ज्ञानोबाचे पैजार, Tue, 02/04/2013 - 16:17आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी.
या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी.
(कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे)
(ज्याच्या कडे बर्यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे. तिच्या आईने तीला बर्यापैकी कपडे घालुन चित्रीकरणाला पाठवायचे आश्वासन दिले आहे)
सोत्रींचा दारूवरचा लेख आणि मी
प्रेषक, पाषाणभेद, Sun, 31/03/2013 - 22:22सोमवारी मिसळपाववरचा सोत्रींचा दारूवरचा लेख वाचला. दारू म्हणजे काय या हे समजवून देणे काही सोपे काम नाही. ते दारू पिण्याइतकेच महत्त्वाचे आणि अवघड काम सोत्रीसारख्या माणसाने खुपच सोप्या पद्धतीने सांगितले आहे. आजकाल लिहीणे सोपे झाल्याने जो तो आपआपले अनूभव लिहीत बसतो. कुणी किल्यावर भटकंतीचे लेख लिहीतो, कुणी वेगवेगळे पदार्थ कसे करायचे ते सांगतो. हे असले अनुभव वाचल्यामुळे इतरांना किती त्रास होत असतो याची लिहीणार्याला काय कल्पना? लगोलग दारूवरचे सगळे लेख वाचून काढले.