Skip to main content

संदर्भ

मराठी दिन २०१८: अहिराणी भाषेचा गोडवा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/03/2018 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
अहिराणी भाषेचा गोडवा लोकसाहित्य हे ज्या त्या बोलीभाषेतच सापडते. अहिराणीत लोकसाहित्याचे खूप मोठे भांडार आहे.

मराठी दिन २०१८ - आधुनिक तत्त्वांवर लिहिलेल्या मराठीच्या पहिल्या कोशाची जन्मकथा

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी मंगळवार, 27/02/2018 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
'आधुनिक तत्त्वांवर लिहिलेल्या मराठीच्या पहिल्या कोशाची जन्मकथा.' आजची मराठी भाषा आणि सुशिक्षितांचे लेखी मराठी हे दोन्ही सांप्रतच्या स्वरूपाला येईपर्यंत अनेक वळणातून गेलेले आहे. कृ.पां. कुलकर्णी ह्यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यव्यवस्थेत बदल हे भाषेतील बदलाचे प्रमुख कारण असते आणि त्यानुसार प्रारंभापासून आजपर्यंत यादवकालीन, बहामनीकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन अशी मराठीची वेगवेगळी रूपे आपणास दिसतात. (मराठी भाषा - उद्गम व विकास, पृ. १७७). निश्चितपणे मराठी म्हणता येईल अशी भाषा ११-१२व्या शतकांपासून अनेक ठिकाणी शिलालेखांतून आणि नंतर ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांमधून भेटू लागते.

अविश्वसनीय सत्यकथा - डीएनए मिसमॅच

लेखक ट्रेड मार्क यांनी शुक्रवार, 29/09/2017 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांचे (मुलगा आणि मुलगी दोन्हीचा यात समावेश आहे) डीएनए त्यांच्या जैविक मातापित्यांशी जुळतात हे विज्ञानाने सिद्ध झालेले आहे. त्यातही एखाद्या वेळेस पिता कोण आहे हे सिद्ध करायला डीएनए टेस्ट लागेल पण जन्मदाती आई तर कोण आहे हे सिद्ध करायला डीएनए टेस्टची सुद्धा गरज भासू नये. पण लिडिया फेअरचाईल्ड नावाच्या एका आईच्या बाबतीत एक अविश्वनीय घटना घडली. तिला २ मुले होती आणि तिसऱ्या वेळेला ती गर्भवती असताना तिने आणि तिच्या नवऱ्याने घटस्फोट घ्यायचे ठरवले. कोर्टाने मुलांच्या पालनपोषणाचा हक्क ठरवण्यासाठी आई वडील आणि मुलांची डीएनए टेस्ट करायचे आदेश दिले.

प्रिय नर्मदेस

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 24/09/2017 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
( आज सरिता दिन. त्या निमित्त.....) प्रिय नर्मदेस, कारण काहीही असो, माणूस अनिकेत होतो तेव्हा पाण्यापाशी पोहचतो. मी तुझ्यापाशी पोहचले. अजून ती पहाट आठवते. मध्यरात्री कधीतरी मराठी मुलुख मागे पडला. दुसरा मुलुख लागला हे एसी गाडीतही कसं कळतं? पण कळतं. माणसं निराळी भासू लागली. हळूहळू अनोळखी भाषा कानावर पडू लागली. लक्ष देऊन ऐकलं कि कळतेय असं वाटायचं. पण थकून गेले. किती वेळ कान ताणणार? उन्हाळ्यातील पहाट म्हणजे तशी सकाळच. एकदम गाडीचा आवाज बदलला. कुणी म्हणालं, ‘नर्मदाजी’. मी फट्कन खिडकीवरचा जाड पडदा बाजूला सारला. बाहेर पाहिलं ....... गाडी तुझ्यावरच्या एका अजस्त्र पुलावर उभी होती. टोल भरायला.

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

'संगीतज्ञानी इळैयाराजा'

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 02/06/2017 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
ते ट्रिनीटी कॉलेज ऑफ म्युझिक, लंडन चे सुवर्ण पदक विजेते आहेत. BBC ने घेतलेल्या सर्वेक्षणात ते भारतातील सर्वोत्कृष्ट संगीतकार ठरले.त्यांच्या 'दलपति' या सिनेमातलं 'रक्कम्मा कय्य थट्टू' हे जगातलं ૪ थ्या क्रमांकाचं सार्वकालीन पसंती दिलेलं गीत! ६००० पेक्षा अधिक गाणी त्यांनी संगीतबध्द केली.१००० पेक्षा अधिक सिनेमांना त्यांनी संगीत दिलं.एस.जानकी,के.जे.येसुदास,चित्रा,एस पी बालसुब्रह्मण्यम् हे त्यांचे आवडते गायक.यांच्यासोबत सर्वाधिक गाणी त्यांनी संगीतबध्द केली.सर्वाधिक गाणी तमिळ भाषेत! तमिळ लोकसंगीत यांनी जागतिक पातळीवर नेलं.पारंपारीक तमिळ वाद्यांबरोबरच इलेक्ट्रॉनिक वाद्येही फार सुंदर पध्दती

दांडी मारणे - एक विलक्षण कला

लेखक किसन शिंदे यांनी शुक्रवार, 24/03/2017 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्‍याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.

प्रमोशन

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 23/03/2017 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
माॅर्निंग ब्रेकची वेळ. ब्रेकफास्ट काऊंटरवर मार्निंग शिफ्टच्या एम्प्लाॅईजची तुरळक गर्दी होती. बेनमेरीमधल्या स्टीलच्या ट्रेमधून अनेक पदार्थांचा संमिश्र असा वास दरवळत होता, पण त्यातूनही रस्समचा वास ब-यापैकी नाकाला ठसका देत होता. मधूनच बाजूला टांगलेल्या निळ्या रंगाच्या फ्लाय किलरमध्ये माश्या चिकटल्याबरोबरचा 'चट..चट' आवाज काही नवख्या एम्प्लाॅईजचे लक्ष वेधत होता. लॉगईन करून दोन चार कामाचे मेल चेक केल्यानंतर रोहन आणि मिंजल कॅन्टीनमध्ये ब्रेकफास्टसाठी आले होते.

मराठी भाषा दिन २०१७: अनुक्रमणिका

लेखक संपादक मंडळ यांनी बुधवार, 22/02/2017 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
1

अनुक्रमणिका

१) भाषा आणि बोली

लेखक: अमोल४५७२ (भाषा व बोली परस्पर संबंध याबद्दल लेख)
पूर्वी आदिमानव अप्रगत होता, त्या काळात हातवारे, खुणा करून त्याचं मनोगत व्यक्त करत असे. नंतरच्या काळात तो जसजसा प्रगत होत गेला, शेती करू लागला, गटागटाने राहू लागला, तसतसा हातवारे व खाणाखुणा यापेक्षाही जास्त तोंडाने विविध आवाज काढून व्यक्त होऊ लागला.