शेअर ब्रोकर्सची सेवाही ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत
श्री. वर्गीस यांनी एका सार्वजनिक कंपनीच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मिळणाऱ्या निवृत्तीवेतनाला जोड म्हणून शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यास सुरवात केली. या व्यवहारात धोका गृहित असल्याने ते व त्यांची पत्नी मर्यादित रक्कम या व्यवहारात गुंतवण्याची काळजी घेत. परंतु "विनाश काले विपरीत बुद्धी " या न्यायाने मे. इंडिया बुल्स फ़िनान्शिअल सर्विसेसचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. चेरियन यांच्या सल्ल्याने भरीला पडून त्यानी म. टे .नि . लि. चे १०,००० शेअर्स प्रती शेअर रु. २१९/- या दराने विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी इंडिया बुल्स कडून रु. २३/- लाखांचे कर्जही काढले. या कंपनीशी संलग्न असलेल्या मे.