संदर्भ मूल्याचा प्रश्न

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
29 Jan 2016 - 10:25 pm

काही वेळा काही लोक अशी माहिती, मुद्दे आणि तर्क आणि अजब निष्कर्ष घेऊन येतात की त्या त्या क्षेत्रातील जाणकार मंडळीसुद्धा दोन क्षण स्तंभीत होऊन जावीत, मग संदर्भ मागीतले जातात संदर्भ दिले गेलेच तर कुठलेसे संदर्भ अचानक समोर ठेवले जाताना दिसतात पण त्यांची विश्वासार्हता आणि तर्कसुसंगतता प्रथम दर्शनी साशंकीत असण्याची शक्यता असू शकते. विज्ञान, समाजशास्त्रे आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील माहिती आणि सांख्यिकी बाबत हे बरेच होताना दिसते. काही लोक कोणत्याही माहिती स्रोतावर विश्वास ठेवतात, काही लोक विश्वासार्ह माहिती सुद्धा सोईची नसल्यास स्रोताच्या विश्वासार्हतेबाबत साशंकता दर्शवून गैरसोईची माहिती नाकारताना दिसतात, काही लोक अमूक स्रोतातील माहिती आहे ती बरोबरच आहे ह्या हट्टाला पोहोचलेले असतात.

बर्‍याच माहितीं आणि दाव्यांना दुजोर्‍याचा अभाव असतो, समसमीक्षण (पिअर रिव्ह्यू) झालेला नसते. बहुतांश त्रुटीयूक्त माहिती आणि दाव्यांचे सयुक्तीक दोष दिग्दर्शन, खंडन, तार्कीक उणीवांची मांडणी या प्रक्रीयेतून बाहेर न पडताच बातम्यांमध्ये प्रसिद्धीस येते आणि अशा त्रुटीयुक्त माहितीच्या दाव्यांवर आधारलेले निष्कर्षांमध्ये त्रुटी असण्याची बरीच शक्यता असते.

असे समुदाय आणि भाषा ज्यांना पुरेशा माहिती नोंदी आणि स्रोतांचा अभाव आहे त्यांची स्थिती आणखीनच केविलवाणी असते. आपल्या समोर येत असलेल्या माहितीचे विश्लेषण कसे करावे आणि संदर्भ मूल्य कसे ठरवावे हा एक गहन प्रश्न काही वेळा चक्क आ वासून समोर उभा टाकताना दिसतो.

मांडणीतंत्रसमीक्षामाध्यमवेधमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

29 Jan 2016 - 10:39 pm | श्रीरंग_जोशी

थोडी उदाहरणे दिल्यास नेमकेपणाने चर्चा होऊ शकेल असे वाटते.

मिपावरील जाणकारांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.

माहितगार's picture

29 Jan 2016 - 10:45 pm | माहितगार

वेळे अभावी लगेच उदाहरणे आणि संदर्भ देणे जमले नाही, पण तुमच्या आशयाशी सहमत आहे - भविष्यात विकिपीडिया संदर्भाने प्रसंगोप्पात विस्तार करण्याचा मानस आहेच- पण असे प्रसंगाचे मिपाकरांनाही अनुभव येत असणार तेव्हा मिपाकर मंडळी उदाहरणे देण्यात सहभागी होतील अशी विनंती आणि आशा.

प्राची अश्विनी's picture

30 Jan 2016 - 10:44 am | प्राची अश्विनी

@श्रीरंग_जोशी,
उदा. लाळ आणि टेस्टेस्टेरॉन .=))

समसमीक्षण हा शब्द आवडला.

लेखात व्यक्त केलेल्या चिंतेबद्दल सहमत आहे. मिपा किंवा इतरत्रही बर्‍याच चर्चांमधून हे भान पाळले जात नाही असे दिसते. येथे तर्कशुद्ध विचार मांडू पाहणार्‍यांना आपण म्हणालात तसे स्तंभित व्हायची वेळयेते.