घोस्टहंटर-१

DEADPOOL's picture
DEADPOOL in जनातलं, मनातलं
16 Dec 2015 - 10:36 pm

"व्हू आर यू?"
"युवर डेथ!"
तो खाली कोसळला!
"मनिष उठ!"
एलिझाबेथ मनिषला उठवत होती. गेले काही दिवस मनिषचे झोपेचे प्रमाण वाढले होते. एलिझाबेथ याच काळजीत होती. शिवाय आताची केस तिच्या काळजीत भर घालत होती.
ग्रेग मॉरिसन मर्डर केस!
सर्व घोस्टहंटर यामुळे हादरले होते, कारण ग्रेग मॉरिसन हा घोस्टहंटर लोकांचा मुकुटमणी होता. जगात जिवंत लोक जेवढे भूतांना घाबरत नसतील तेवढी भुते ग्रेग मॉरिसनला घाबरत असत.
"झोपू दे मला!"
"अरे मूर्ख उठ!"
"मी केस सॉल्व करतोय."
एलिझाबेथ आता पूर्णपणे कंटाळली होती. कारण ग्रेगच्या अँत्यविधिला सर्व घोस्टहंटर हजर राहणार होते. कीम्बहुना ग्रेगच्या मृत्युचे कारण तिथेच कळू शकत होते.
"मर तिकडेच!" एलिझाबेथ चिडली आणि रूमच्या बाहेर पडली.
ग्रेगच्या अँत्यविधिला सर्व घोस्टहंटर हजर होते.ग्रेग यातील बऱ्याच जणांचा गुरु होता. सर्वप्रथम ब्रायन ओला ग्रेगला श्रध्दांजली वाहण्यासाठी उभा राहिला.
"ग्रेग माझा गुरु होता. पण याहून जास्त तो माझा मित्र होता. जगात यापेक्षा मोठा घोस्टहंटर होणार नाही, कीम्बहुना यापेक्षा चांगला माणूस होणार नाही!"
आळीपाळीने सर्वानी ग्रेगला श्रध्दांजली वाहिली. एलिझाबेथ अजूनही मनिषची वाट बघत होती.
थोड्यावेळाने एक कार तिथे येऊन थांबली.
मनिष कारमधून उतरला!
"सॉरी मला उशीर झाला. तुम्ही ग्रेगला पुरले?"
"अजून नाही." ब्रायन उत्तरला.
"ओके अजून इतकाही उशीर झाला नाही."
मनिष धावतच शवपेटीजवळ गेला.त्याने खिशातुन एक बाटली काढली, आणि ग्रेगच्या तोंडावर ओतली.
क्षणार्धात ग्रेग उठून बसला!
"वेलकम बॅक ग्रेग." मनिष म्हणाला.
"फ्रॉम डेथ!"ग्रेग हसत म्हणाला.

क्रमशः

हे ठिकाणधोरणवावरसंस्कृतीकलानाट्यवाङ्मयकथाशुद्धलेखनदेशांतरप्रकटनआस्वादलेखमाहितीसंदर्भप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

एस's picture

16 Dec 2015 - 10:57 pm | एस

इंटरेस्टिंग!

DEADPOOL's picture

17 Dec 2015 - 12:16 pm | DEADPOOL

धँस!

अभ्या..'s picture

17 Dec 2015 - 1:28 am | अभ्या..

हे घोस्ट हंटर म्हणजे काय असतेय?
मला खरेच माहीत नाही. गुगलायचा कंटाळा आहे.

DEADPOOL's picture

17 Dec 2015 - 12:20 pm | DEADPOOL

आपल्याकडे जसे मांत्रिक असतात भुते उतरवण्यासाठी, तसे घोस्टहंटर!
यांची आयुधे म्हणजे चांदीची शस्त्रे, पवित्र जल आणि क्रॉस!

नाखु's picture

17 Dec 2015 - 12:21 pm | नाखु

याच्या तिप्पट आम्चा डांगे साय्बांचा प्रतीसाद असतो...
वाचतो म्हणेपर्यंत संपला की भाग.

प्रतीसादमात्र नाखु

DEADPOOL's picture

17 Dec 2015 - 12:24 pm | DEADPOOL

पुढचा भाग मोठा टाकतो!
कथा उत्कंठावर्धक वळणावर क्रमशः ठेवायला हवी.

कपिलमुनी's picture

17 Dec 2015 - 4:38 pm | कपिलमुनी

हहपुवा !!

अद्द्या's picture

17 Dec 2015 - 12:22 pm | अद्द्या

सुरुवात मस्तच झाली आहे .

DEADPOOL's picture

17 Dec 2015 - 12:25 pm | DEADPOOL

अभी तो एंड बाकी है!

जव्हेरगंज's picture

17 Dec 2015 - 3:42 pm | जव्हेरगंज

:)

मी-सौरभ's picture

17 Dec 2015 - 6:39 pm | मी-सौरभ

:)

अजया's picture

17 Dec 2015 - 7:06 pm | अजया

पुभाप्र

जातवेद's picture

18 Dec 2015 - 11:35 am | जातवेद

+१

विशाल कुलकर्णी's picture

18 Dec 2015 - 11:46 am | विशाल कुलकर्णी

पुभाप्र ..

सविता००१'s picture

18 Dec 2015 - 1:16 pm | सविता००१

पुभाप्र ..

DEADPOOL's picture

18 Dec 2015 - 1:44 pm | DEADPOOL

धन्यवाद मंडळी!