नवकवी आणि आचार्य अत्रे
१९२९ साली 'पहिले कविसंमेलन' भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात भरले होते. या कविसंमेलनाचे आचार्य अत्रे स्वागताध्यक्ष होते त्यांनी तिथे केलेले भाषण हे भविष्याचा किती वेध घेणारे होते हे त्याचा सारांश वाचल्यावर लक्षात येईलच.
त्यांच्या भाषणाचा सारांश त्यांच्या शब्दात.......
"तशाच या सणासुदीच्या कविता. चंद्राला गिऱ्हाण लागले म्हणजे दान मागण्यासाठी जशी काही लोकांची धांदल उडते, तसे एखादा सण आला म्हणजे आमचे कवी लोक सैरावैरा धावू लागतात. संक्रांत आली की यांचा शिमगा सुरू झालाच. दसरा आला की हे घोड्यावर बसून शिलंगणाला निघालेच.
मिसळपाव
