नमस्कार लोकहो!
करोना नामे मायावी थोतांड चालूच आहे. मायावी अशासाठी म्हंटलंय की पूर्वी एका मायावी राक्षसाच्या रूपातनं दुसरा राक्षस जन्म घ्यायचा, त्याचा धर्तीवर करोना या पहिल्या थोतांडातनं लस नावाचं दुसरं थोतांड उत्पन्न होतंय. आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये. हां, लशीमुळे रोग नाहीसा होतो असा सार्वत्रिक भ्रम प्रचलित आहे. कारण की भरपूर प्रमाणावर तसा प्रचार केला गेलाय.
या बाबतीत आपल्याला दोन नेते जाम आवडले. मोदींनी मुखपट्टी उघडपणे नाकारली तर राज ठाकऱ्यांनी तिच्यासंबंधी भीडमुर्वत बाळगली नाही.
डॉक्टर सुझन हम्फ्रीज या अमेरिकेतल्या खऱ्याखुऱ्या म्हणजे मेडिकल डॉक्टर असून पेशाने मूत्रपिंडतत्ज्ञा आहेत. त्यांनी लशींकरणाविषयी प्रचंड शोधाशोध करून माहिती मिळवून २०१३ साली एक पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव : Dissolving Illusions - Disease, Vaccines, and The Forgotten History (2013) by Suzanne Humphries MD. हे पुस्तक येथे उपलब्ध आहे :
१. https://www.amazon.in/Dissolving-Illusions-Disease-Vaccines-Forgotten/dp...
२. https://www.amazon.co.uk/Dissolving-Illusions-Disease-Vaccines-Forgotten...
हे पुस्तक लिहितांना डॉक्टरबाईंनी रोमन बिस्त्रियांक या विदातत्ज्ञाची मदत घेतली आहे. सदर लेख या पुस्तकाची तोंडओळख करवून देण्यासाठी लिहिणार होतो. पण थोडं लिहिल्यावर कळलं की पुस्तकपरिचय हा आपला प्रांत नव्हे. मग म्हंटलं की सरळ सारांशच लिहून टाकूया. माझ्यासारख्या आळश्याला तेव्हढंच जमण्यासारखं आहे.
तर आता मुद्द्याकडे वळूया.
प्रकरण १ : गेले ते दिन गेले ( एकदाचे ) ....
हे प्रकरण १९ व्या शतकातल्या ( म्हणजे इ.स. १८०० चं शतक ) जुन्या जमान्यातील सामान्य माणसाच्या आरोग्य अवस्थेचं किंवा अनावस्थेचं वर्णन करतं. गरीब माणसाचं सरासरी आयुर्मान १५ ते १६ वर्षं होतं. ते इतकं कमी असण्याचं कारण साथीचे रोग हे होतं. इंग्लंडमध्ये रोगांच्या साथी नेमेची येत असंत. भरीस भर म्हणून दाटलेली वस्ती व अंधारी घरं अशा रोगट वातावरणात रोग फोफावायला उत्तेजन देत. शिवाय अन्नपाण्याची ददात होतीच. पोषक अन्न केवळ उच्चभ्रू लोकांच्या मुलांनाच मिळे. पाणीही अशुद्धच प्यावं लागंत असे. संडास व पिण्याचं पाणी एकत्र होणं सर्वसामान्य बाब असे. घोड्याची लीद, डुकराचं प्रेत व खाण्याची टपरी लंडनच्या रस्त्यावर सुखेनैव एकत्र नांदत. वा न्यूयॉर्कमध्ये रोगट डुकरांचं मांस गरीब लोकांना बिनधास्तपणे विकलं जाई.
प्रकरण २ : बालकांची हलाखी ....
या प्रकरणांत १९ व्या शतकातल्या ( म्हणजे इ.स. १८०० चं शतक ) गरीब कुटुंबातल्या बालकांची हलाखीची स्थिती वर्णिलेली आहे. त्यांना दिवसाचे बाराबारा तास मजुरी करावी लागे व पगार जेमतेम खाण्यापूरता मिळे. अगदी मुलीसुद्धा खाणीसारख्या प्राणघातक जागेत बिनदिक्कीतपणे कामाला जुंपल्या जात. तिसाव्या वर्षापर्यंत कोणी जगली तर ती अपवादात्मक घटना असे. पारा, शिसे, आर्सेनिक वगैरे विषारी पदार्थांशी बालकांचा संपर्क येणे ही एक किरकोळ बाब असे. जखमा व दुखापती नित्याच्याच असंत.
जगातल्या सर्वात श्रीमंत राष्ट्र असलेल्या अमेरिकेत दरवर्षी २,५०,००० बालकांचा कुपोषणाने मृत्यू होई. बालकामगार ठिकठिकाणी असले तरी बालकामगार हा शब्द मात्र आजून अस्तित्वात यायचा होता. अतीव व जीवघेण्या श्रमांतनं सुटायचा मार्ग नव्हता. मग कष्टांचा विसर पाडण्यासाठी व्यसनांचा आधार घेतला जाई. त्यामुळे तब्ब्येत अधिकंच खराब होई. ऐन वाढीच्या वयांत व्यसनं केली की प्रजनन व आयुर्मान यांवर विपरीत परिणाम होई.
प्रकरण ३ : रोग हा नियम तर निरामय जीवन हा अपवाद
रोग हा आयुष्याचा अविभाज्य घटक कसा होता, ते या प्रकरणांत सांगितलं आहे. औद्योगिक क्रांतीमुळे गावं ओस पडून शहरांत अनियोजित व प्रचंड गर्दी झाली होती. शहरी जागामालकांनी नफ्यावर डोळा ठेवून श्रमिकांसाठी अतिशय दाटीवाटीने निवासालये बांधली. तिथे राहायची व्यवस्था अत्यंत अस्वच्छ असे. हे रोगांना आमंत्रण असे. रोगांच्या साथीत माणसं आषाढी माश्यांसारखी टपाटप ( की पटापट ? ) मरून पडायची. मलनि:सारण यंत्रणा नामक प्रकार अस्तित्वात नसल्याने विषमज्वर ( = टायफस ), पटकी ( = कॉलरा ), हगवण वगैरेंची सतत मांदियाळी असे.
रोग्यांना हाताळण्याच्या आधी डॉक्टर व परिचारिका यांनी स्वत: निर्जंतुक होणं १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरु झालं. वैद्यकीय क्षेत्राची काय अवस्था होती ते कळलं ना ? पुढे अनेक रोगांनी उडवलेल्या हाहाकाराच्या कहाण्या दिल्या आहेत. किमान स्वच्छता पाळल्याने लागणीचं प्रमाण कसं झपाट्याने घसरू लागलं ते ही दिलं आहे.
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने.
प्रकरण ४ : देवीचा रोग व पहिली लस
देवीच्या लशीने माणसं कशी मेली, ते या प्रकरणात सांगितलं आहे. रोगापेक्षा औषध भयंकर. कारण की लस तयार करतांना लागण झलेला विषाणूत फेरफार ( = म्युटेशन ) होत असे. हा फेरफार हाताळायचा निश्चित मार्ग कोणाकडेही नव्हता. सब घोडे बारा टक्के या हिशोबाने एकंच लस सरसकट सर्वांना दिली जाई. परिणामी एकाच आजाराचे वेगवेगळे विषाणू निर्माण झाले. वेल डन. इ.स. १७५० च्या सुमारास ज्या लशी विकसित झाल्या त्या गोऱ्यांपेक्षा काळू लोकांना जास्त हानीकारक होत्या. हा मुद्दाही चर्चेत घेतला पाहिजे. १९०८ च्या सुमारास लशींमुळे मिळणारं संरक्षण तात्पुरतं असतं हे लक्षांत आलं.
लान्सेट जर्नलने डॉक्टर जेन्नरच्या देवीच्या लशीवर रोचक टिपणी केली आहे. त्यानुसार ही लस गाईच्या सडांपासून विकसित केलेली नसून घोड्याच्या पुळीपासनं मिळवलेली होती. ही लस नंतर गाय, माणूस व इतर पशूंतून फिरवण्यात आली. आजच्या घडीला देवीची लस म्हणून जे काही आहे ते नैसर्गिक नसून कृत्रिम एजंट आहे. तरीही जेन्नरला देविच्या लशीचा संशोधक म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे. तत्कालीन डॉक्टरांनी लगेच दाखवून दिलं की गाईच्या सडांपासून लस मिळालेल्या अनेकांना नंतर देवी आल्या होत्या.
या परिस्थितीत दयाळू इंग्रज सरकारने इंग्लंडात जबरदस्तीने लशी टोचवल्या. परिणामी लशींच्या या कृत्रिम हस्तक्षेपामुळे देवी रोगाची साथ अधिक तीव्र झाली. १८४४ ला लंडन च्या देवीच्या रुग्णालयात १७८१ पेक्षा जास्त रोगी दाखल झाले. रोगापेक्षा लस भयंकर ठरली. बोस्टन (इंग्लंड) मध्ये सुमारे ४० वर्षं नाहीसा झालेला देवीचा रोग लशी टोचल्यावर परत उफाळून आला. पुढे लशीकरणामुळे निर्माण झालेल्या नवीन रोगांची व मृत्यूंची महिती दिलेली आहे.
प्रकरण ५ : दूषित लशी
रोगजंतूंमुले रोग होतात हे मत स्वीकारलं जाण्यापूर्वी दूषितत्वाचं मोजमाप केलं गेलं नव्हतं. त्यामुळे जंतुसिद्धांतावर ( = Germ Theory वर ) प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. नंतर खूर असलेल्या जनावरांना होणारा मुखपादरोग दूषित लशींमुळे माणसांना कसा होऊ लागला याची सुरस व चमत्कारिक कहाणी वर्णिलेली आहे.
प्रकरण ६ : भली थोरली निदर्शने
एका बापाचं पहिलं मूल लशीमुळे मेलं होतं. साहजिकंच त्याने दुसऱ्या मुलाच्या लशीकरणाला विरोध केला. त्याबद्दल बापाला तुरुंगात पाठवलं गेलं. कित्ती सुंदर न्याय !
या प्रकरणात इंग्लंडमधल्या लेस्टर ( = Leicester ) नगरात लोकांनी लशीकरणाच्या थोतांडाविरुद्ध कसा लढा दिला ते सांगितलंय. लोकांना लशीकरण नको होतं कारण लहान बालकांचे भयानक हाल व्हायचे. कोण आई आपल्या तान्ह्या मुलाला सरकारी कसायांच्या तावडीत सोपवेल ?
आर्थर वॉर्ड गरीब मजूर होता. त्याची पहिली दोन मुलं लशीमुले जखमी झाली होती. त्याने तिसऱ्यास लस टोचायला नकार दिला. त्यामुळे सरकारी कसाई त्याच्या घरी पोहोचले. तो घरी नव्हता तर त्याच्या पोटुशा बायकोला धमक्या देऊन दंड भरायला लावला. तिच्याकडे पैसे नव्हते व घरातली चीजवस्तू दंडमूल्याची भरपाई इतकी नव्हती. तिला कसाई खेचडत तुरुंगात घेऊन गेले. त्यामुळे तिच्या मुदतपूर्व प्रसूतीतून मृत बालक जन्मलं. आवडली तुम्हाला कथा ?
लेस्टरचे लोकं देवीच्या लशीचा जनक डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांस बालहत्यारी म्हणायचे.
प्रकरण ७ : चाकोरीबाह्य प्रयोग
देवीच्या रोगाविरुद्ध लेस्टर नगरात उदयाला आलेली अलगीकरणाची पद्धत ( = quarantine ) कशी होती ते या प्रकरणात वर्णिलेलं आहे. देवीची लस टोचण्याऐवजी अलगीकरण हा उपाय बराच प्रभावशाली होता. डॉक्टर मिलर्ड यांनी १९१० साली निष्कर्ष काढला की अर्भकांना दिलेल्या देवीच्या लशीमुळे रोगफैलाव कमी झाला नाही. सक्तीची लसटोचणी आजिबात समर्थनीय नाही.
पण सरकारी कसायांनी घबराट माजवली की कधीतरी मोठ्ठी साथ येणार. तशी साथ कधीच आली नाही. उलट लेस्टर मधली देवीच्या रोग्यांची संख्या लशीकृत झालेल्या उर्वरित इंग्लंडच्या मानाने काबूत राहिली होती.
लस म्हणजे जणू अमृत आहे असा अपप्रचार धूमधडाक्याने केला जातो. प्रत्यक्षात लस हे एक थोतांड आहे. लेस्टर पद्धत नंतर युगोस्लाव्हियात १९७२ साली वापरण्यात आली.
प्रकरण ८ : सरकारी दडपशाही
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस इंग्रज सरकारने इंग्लंडमध्ये लसटोचणीच्या सक्तीच्या मोहिमा राबवल्या. भले बालकं मरोत अथवा जायबंदी होवोत. पर्यायी वैद्यकीय दृष्टीकोनास अर्थातंच केराची टोपली दाखवण्यात आली. या मोहिमांना न्यायालयाचाही पाठींबा मिळे. जो नागरिक या सक्तीस विरोध करेल त्यास दंड, जप्ती, इत्यादिस सामोरे जावे लागे. अमेरिकेतही अशी प्रकरणे घडली.
त्या वेळेस युजेनिक्स नामक दुर्बलोच्छेदक शास्त्र जाम प्रचलित होतं. लस घेतलेल्यावर त्रास होणारे लोकं जगण्यास नालायक आहेत असा युजेनिक्सचा सिद्धांत असल्याचं लोकांनी मनावर घेतलं. मानसिक दृष्ट्या अस्थिर लोकांचं निर्बीजीकरण करण्यात येत असे. त्याच धर्तीवर लस न घेतलेल्यांचे निर्बीजीकरण करण्यात येईल अशी भीती व्यक्त होत असे. युजेनिक्स ( = दुर्बलोच्छेदन ) आणि सक्तीची लसटोचणी यांचा घनिष्ट संबंध आहे. नाझी राजवटीत युजेनिक्स ला राजमान्यत्व लाभलं होतं.
प्रकरण ९ : आर्थर स्मिथ या बालकाची यातनामय कहाणी
या यातना आर्थर स्मिथ नामे ११ वर्षीय बालकाला झालेल्या आहेत. ही लशीच्या दुष्परिणामांची कहाणी आहे. तो कसाबसा वाचला खरा, पण अंगावर डाग पडले ते कायमचे. काही बालकं इतकी सुदैवी नव्हती. त्यांच्याही कहाण्या या प्रकरणांत आहेत.
प्रकरण १० : आरोग्यक्रांती
गटाराचं पातळलेलं पाणी हे प्रमुख पेय नसेल तर आरोग्य सुधारणार नाही काय ? या प्रकरणात वैयक्तिक व खासकरून सार्वजनिक स्वच्छतेमुळे आरोग्य कसं सुधारलं ते वर्णिलेलं आहे. गलिच्छपणामुळे रोग होतात हे १९ व्या शतकाच्या मध्यात युरोप-अमेरिकेच्या जणू गावीच नव्हतं. धारणा बदलल्याने हळूहळू आरोग्यात वाढ होत गेली. अर्थात, झोपडपट्टीदादांनी स्वच्छतेच्या सुधारणांना विरोध केलाच. कारण झोपडपट्ट्यांपासनं त्यांचा फायदा होत होता. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात लंडनमध्ये हळूहळू मलनि:सारण सुविधा उभारण्यात आल्या. जलकक्ष म्हणजे water closet म्हणजे WC ही संज्ञा उदयास आली. त्याआधी मानवी विष्ठा कुठेही टाकली जायची. २० व्या शतकाच्या पहिल्या दशकांत ( म्हणजे १९०० सालच्या आसपास ) हे जलकक्ष लंडन पालिकेच्या गटारांना जोडले जाऊ लागले. आज आपण युरोप-अमेरिका-भारत इत्यादी देशांच्या शहरांत जी गटारव्यवस्था पाहतो ती केवळ शंभर सव्वाशे वर्षंच जुनी आहे.
दुधाचं पाश्चरीकरण सुरु झालं. त्यमुळे बालमृत्यू प्रचंड प्रमाणावर उणावले. याखेरीज इतर सामाजिक सुधारणाही राबवल्या जाऊ लगल्या. उदा. : किमान वेतन, नोकरीच्या जागी सुरक्षितता नियम, बालकांची पिळवणुकीविरुद्ध कायदा, इत्यादि. त्यामुळे जीवनमान ( life standard) उंचावलं.
या सर्व सुधारणांत लशीचं योगदान नगण्य होतं. पण हवा अशी केली गेली की लशीमुळे म्हणे रोग नाहीसे होतात.
प्रकरण ११ : साथीच्या रोगांत आश्चर्यजनक घट
अमेरिकेत देवी ५ पैकी १ ठार मारीत. हे प्रमाण घटून ५० पैकी १ वर आलं व नंतर ३८० पैकी १ वर घसरलं. १८९७ च्या अखेरीस अमेरिकेत तीव्र देवी जवळजवळ नामशेष झाला. १९५० पर्यंत इंग्लंड व अमेरिकेतनं देवीच्या साथी नामशेष झाल्या होत्या. पूर्ण लशीकरण न करताही हे साध्य झालं. स्कार्लेट ताप ( स्कार्लेट फीव्हर ) तर कुठल्याही लशीशिवाय नाहीसा झाला.
अशाच अनेक रोगांची घट ( विषमज्वर, डांग्या खोकला, डिप्थेरिया, क्षय, हगवण ) आलेखांसह दर्शवली आहे.
रुग्णालये ही अस्वच्छ व दाटीग्रस्त असल्याने लागणकेंद्रे होती. ती हळूहळू सुधारू लागली होती. एकंदरीत आहार, पोषण, स्वच्छता, इत्यादि आरोग्यविषयक जाणिवांत सुधारणा होत गेल्या. यांत लशीचा सहभाग जराही नव्हता.
प्रकरण १२ : पोलियो परतून आलाय
पोलियोची लस पहिल्यांदा शोधणाऱ्या जोनास साल्कने ( डॅरल साल्क सह ) म्हंटलंय की ही दुर्बळ विषाणूयुक्त लस कधीकधी पोलियोस रोखण्याऐवजी रोगाचा प्रादुर्भाव घडवून आणू शकते. दुसरी लस डॉक्टर साबिनने शोधलेली मौखिक लस आहे. तिच्यानेही आज पोलियो होऊ शकतो. पोलियोचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी बुल्बर पोलियो हा सर्वात गंभीर प्रकार आहे. तो मेंदूच्या लंबमज्जेस ( = ब्रेनस्टेम ) हानी पोहोचवतो. त्यातून पुढे पक्षाघात होतो. पण हा पक्षाघाती पोलियो फार कमी प्रमाणावर आढळतो. नैसर्गिक पोलियोचा विषाणू अनेक शतकांपासून मानवी आतड्यांत सुखेनैव नांदंत आला आहे. मग विसाव्या शतकात नेमकं काय घडलं की, ज्यामुळे त्याच्यापायी पक्षाघात होऊ लागले ?
मौखिक लशीचे जनक डॉक्टर अल्बर्ट साबिन यांनी नेमका प्रश्न विचारलाय. अमेरिकी नेटिव्हांत पोलियोरुद्ध आपसूक प्रतिकारशक्ती उत्पन्न झाली होती. मात्र प्रगत व स्वच्छतेबाबत दक्ष असलेल्या अमेरिकी वसाहतींत पोलियोची लागण का होतेय ? हा पोलियो विसाव्या शतकांतच का उदयाला आला ? विषाणू तर हजारो वर्षांपासून माणसाच्या आतड्यांत रहात आलाय. तर पोलियोचं कारण आहे कृत्रिम आहार. साखर, मैदा, दारू, तंबाखू, इत्यादी सवयी तसेच डीडीटी, अर्सेनिक, विविध लशी, प्रतिजैविके यांच्यामुळे माणसाची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी झाली. म्हणून पोलियोसारख्या रोगांमुळे पक्षाघात होऊ लागले.
पोलियोच्या छत्राखाली अनेक रोग समाविष्ट केले गेले. तसेच इतर कारणामुळे पक्षाघात झाला तरी त्यावर पोलियो म्हणून छाप मारण्यात यायचे. आज जसं काही झालं की लगेच करोनाचा छाप मारला जातो, अगदी तसंच पूर्वीही झालंय. पुढे लेखिकेने पोलियोच्या व्याख्येविषयी प्रश्न उपस्थित केलेत.
वाव्या शतकाच्या पूर्वार्धात पोलियोच्या उपचारांत बाधित स्नायूस जखडून टाकीत असंत. जखडल्यामुळे स्नायूची अधिकंच हानी होई. उलट स्नायू मोकळे केले व ठराविक व्यायाम केले तर तो बरा ( = रीकव्हर ) व्हायचं प्रमाण वाढे. याबाबत सिस्टर केनी हिचे व्यायामोपचार प्रसिद्ध झाले. पण ऐकणार कोण. लशीचे मार्केटिंग करायला जखडलेली बालकं अधिक उपयुक्त ठरतात, मोकळेपणे बागडणारी नव्हे.
पोलियो पूर्णपणे गेलेला नाहीये. त्याला ट्रान्सव्हर्स मायलिटीस असं नवीन नाव मिळालंय. माझ्या अंदाजाप्रमाणे मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा देखील पोलियोचाच एक प्रकार असावा. ट्रान्सव्हर्स मायलिटीस होण्याच्या संभाव्य कारणांमध्ये लस हे ही एक कारण आहे.
पुढे लेखिकेने डीडीटी मुळे पोलियोसारखं एक लक्षण बळावतं, त्याचा सांगोपांग उहापोह केला आहे. भारतातल्या डीडीटी चा सुळसुळाट असल्याने त्यावरही भाष्य केलं आहे. नंतर लेखिकेने अर्सेनिक विषबाधेवर चर्चा केली आहे. या विशाबाधेतून पोलियो सदृश लक्षणं उत्पन्न होतात. अर्सेनिक हे औषध म्हणून सुरक्षित मानलं जाई. साहजिकंच अर्सेनिकच्या विषबाधेचे रोगी पोलियोचे म्हणून गणले जात. यानंतर लेखिकेने सिफिलीसच्या पोलियोसदृश काही लक्षणांचा विचार केला आहे.
पुढे लेखिकेने पोलियोच्या व्याधीमूल्याचा ( = मॉर्बिडिटी चा ) विचार केला आहे. कालानुक्रमे व्याधीमूल्य कसकसं बदलंत गेलं हे मांडलं आहे. बालकांच्या टॉन्सिल ग्रंथी उचकटून काढल्याने पोलीयोत कशी वाढ झाली ते चर्चिलेलं आहे. क जीवनसत्वामुळे पोलियो कशा बरा झाला याच्या अभ्यासकथा ( = केस स्टडीज ) वर्णिलेल्या आहेत.
यापुढे प्रयोगशाळेतल्या लशीमुळे रोगाची साथ कशी आली व बळावली ते लिहिलं आहे.
यापुढे पोलियोचा विषाणू कृत्रिम पद्धतीने निर्माण करता येतो, हे लिहिलेलं आहे. ही पद्धत रासायनिक असून अजैविक आहे.
यापुढे साल्कच्या लशीमुळे उत्पन्न झालेली कटर नामे कुप्रसिद्ध रोगाची साथ वर्णिलेली आहे. यांत लशीतल्या जिवंत विषाणूमुळे अनेक बालकं व नजीकचे लोकं विनाकारण मेले, तर काहीजण जन्मभरासाठी लुळेपांगळे झाले. सक्तीच्या लस टोचणीचा समर्थक पॉल ऑफिट याने मान्य केलंय की कटर रोग हा कृत्रिम असून नैसर्गिक पोलियोपेक्षा कैक पटीने जास्त हानिकारक आहे. कटर व वायथ या दोन आस्थापनांच्या लशी वैज्ञानिक चाचणीप्रक्रिया पार न पडताच बाजारात येऊ दिल्या गेल्या.... यासाठी सुरक्षा निकष धाब्यावर बसवण्यात आले.... बाकी सगळं मी सांगंत बसंत नाही.
यानंतर माकडाच्या उतींतून निर्मिलेल्या लशीत कर्करोगजन्य पदार्थ सापडल्याचं लिहिलंय. या दूषित लशीमुळे कर्करोग होण्याचं प्रमाण वाढलं.
आता या प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भारतातील पल्स पोलियोच्या लशीचा गोंधळ वर्णिलेला आहे. प्रयोगशील लस असल्याने रोगाचं उच्चाटन तर झालं नाहीच, वर अतिरिक्त रोग बळावले. नैसर्गिक पोलियोपेक्षा कृत्रिम पोलियो जास्त प्राणघातक ठरला. भारतात नैसर्गिक पोलियोची जागा कृत्रिम पोलियोने घेतली आहे. वेल डन ! ५ वर्षाच्या बालकाला ३२ डोस दिले गेलेत. फार छान !!
निष्कर्ष : मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक पोलियो नाहीसा होत चाललाय. आता फक्त कृत्रिम पोलियो उरेल आणि नवजात बालकाला जन्मत:च मिळणारी पोलियोची रोगप्रतिकारक शक्ती निरुपयोगी ठरेल. आता बसा बोंबलंत.
प्रकरण १३ : डांग्या खोकला (Pertusis)
या रोगाने अमेरिकेत १९११ साली सुमारे १ लाख लोकांचा बळी घेतला. तर १९६० साली याने त्यामानाने नगण्य बळी घेतले. १९४० च्या दशकांत डांग्या खोकल्याची लस वापरांत पसरली, पण त्यापूर्वीच रोगाचा मृत्यूदर ९२ % ने खालावला होता. इंग्लंड व वेल्स मधले निकाल याहून ठाशीव आहेत. त्यांनुसार लशीकरणापूर्वी मृत्यूदर ९९ % ने खालावला होता. तसेच १९८४ साली उघडकीस आलं की डांग्या खोकल्याची लसटोचणी बंद केल्यावर त्याचे रोगी कमी झाले.
शिवाय लस टोचल्याने रोग बळावण्याची नेहमीची रड आहेच. क्यालीफोर्नियातल्या सान रफायेल येथल्या रुग्णालयात २०१२ सालच्या अभ्यासानुसार डांग्या खोकला झालेल्या बालकांपैकी बहुसंख्य बालकांना लस टोचली होती. याचा अर्थ ही लस आजीव सुरक्षा देण्यास पूर्णपणे असमर्थ ( की अपयशी ? ) ठरली होती. मग द्यायचीच कशाला ? झक मारायला ?
यापुढे लेखिकेने प्रतिपिंड आद्यपराध अर्थात Original Antigenic Sin ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर लस टोचल्याने प्रतिकार यंत्रणा पंगू होते किंवा वेडीवाकडी वागू लागते. त्यामुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती क्षीण होते. परिणामी ज्या रोगाची लस टोचली आहे, नेमक्या त्याच रोगाला माणूस बळी पडतो. लशीद्वारे दुर्बळ विषाणू सोडल्याने प्रतिकारयंत्रणेची फसवणूक होते. ही फसवणूक सुधारता येत नाही. मग टोचून घेत बसा आयुष्यभर लशी एकापाठोपाठ एक. यापायी डांग्या खोकला आता बालकांना न होता प्रौढांना होतोय.
कोणीही लशीकरण तत्ज्ञ प्रतिपिंड आद्यपराधाविषयी काहीही बोलंत नाही. लशीसंबंधी मूलभूत प्रश्न उपस्थित होतात ना ! बोलायला तोंड आहे कुठे !
प्रकरण १४ : गोवर
१९ व्या शतकात ( १८०० चं शतक ) इंग्लंड व अमेरिकेत दर दोनेक वर्षांनी गोवराची साथ यायची. दाखल मुलांपैकी २० % परलोकवासी व्हायची. पण हे प्रमाण १९६० पर्यंत प्रचंड घसरलं. ही घसरण लशीकरणाच्या अगोदर झालेली आहे. स्वच्छता, आहार व पोषण यांत सुधारणा झाल्याने हा फरक पडला आहे.
गोवराच्या मृत विषाणूंच्या लशीमुळे अधिक तीव्र रोगाची लागण होई. हा नेमका उलट परिणाम आहे. रोगप्रतिकारक यंत्रणेत लशीने अनावश्यक हस्तक्षेप केल्याने झालेला प्रतिपिंड आद्यपराध हे मूळ कारण आहे. तसंच जिवंत लशीमुळेही गोवर होई. या गोवरामुळे ताप येऊन पुरळ उठे. हा परिणाम टाळण्यासाठी गोवराची प्रतिपिंडे टोचली जात. त्यांच्यामुळे रोगप्रकरण अधिक गुंतागुंतीचं होई.
यानंतर अमेरिकेतल्या गोवर लशीकरण प्रकल्पाचं अपयश वर्णिलेलं आहे. अनावश्यक लशीकरणामुळे गोवर मोठ्या माणसांनाही होऊ लागला. परत डांग्या खोकल्यासारखीच परिस्थिती उद्भवली. गोवराच्या लागणी व्हायच्या. मात्र अमेरिकेत सगळं खापर लस न घेतलेल्यांवर फोडण्यात आलं. खरा प्रकार असा होता की लशीमुले नैसर्गिक प्रतिकारक्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाला होता. २००० साली अमरिकेतनं गोवर संपल्याचं जाहीर करण्यात आलं, परंतु हे जाहीर विधान २०१२ साली मागे घेतलं गेलं. एकदा का लस घेतली की आयुष्यभर परत परत घ्यावी लागते. करोनाचं असंच होणारे. याविषयी शंका नको.
यानंतर प्रतिपिंडांविषयी प्रश्न उपस्थित केला आहे. प्रतिपिंडे ही खरोखरंच रोगजंतूंना ठार मारतात की ती केवळ अंगुलीनिर्देशक लेबल असतात ? प्रतिपिंडांची कमतरता ( agamma-globulinemia ) असतांनाही गोवर बरा झाल्याची काही प्रकरणं घडलीत. यावरून लस व तिची उपयुक्तता यावर भलं थोरलं प्रश्नचिन्ह चिकटतं.
यानंतर प्रतिपिंड प्रोत्साहन प्रक्रिया वर्णिली आहे. कधीकधी प्रतिपिंडांमुळे विषाणूस यजमान पेशीस ओळखणं सोपं पडतं. यांस antibody dependent enhancement म्हणतात. याचा अर्थ लस टोचल्याने तिच्या परिणामामुळे लागण व्हायची शक्यता वाढते. हा नेमका विपरीत परिणाम आहे.
काही लशींमुळे पुरळ न उठता गोवर होतो. गोवराच्या विषाणूमुळे पुरळ येत नसून शरीराने विषाणूंवर हल्ला केल्याने उठतं. जर लस टोचली तर प्रतिकारक्षमता बिघडल्याने पुरळ उठंत नाही, तरीपण रोग होतोच. असा बिनलक्षणी गोवरही झाल्याची प्रकरणं उजेडांत आलेलीआहेत. मग लस घेतलेल्यांना कळणार कसं की लस अपयशी ठरली आहे ते ? बसा बोंबलंत.
यानंतर गोवराची लागण कमी होण्याविषयी संभाव्य कारणांचा विचार केला आहे.
यानंतर लशीमुळे अर्भकाच्या मातृदत्त प्रतिकारशक्तीचा कसा ऱ्हास होतो ते वर्णिलेलं आहे. गोवरावर आईचं दूध व लस यापैकी आईचं दूध अधिक परिणामकारक आहे.
यानंतर जीवनसत्वांचा योग्य पुरवठा प्रतिकारशक्ती कशी वाढवतो ते सांगितलं आहे.
प्रकरण १५ : उपासमार, स्कर्व्ही व क जीवनसत्व
शीर्षकावरनं कळतं या प्रकरणात काय असणारे ते.
स्कर्व्ही म्हणजे धातुविदरण या व्याधीचं लक्षण हिरड्यांवर सर्वप्रथम दिसून येतं. मात्र ही पूर्ण शरीराची व्याधी आहे. हिच्यात शरीरास धरून ठेवणारी कोलाजेन ( collagen ) नामे ऊती विदीर्ण पावते. त्यामुळे शरीर अक्षरश: खिळखिळे होते. आहारातनं क जीवनसत्व न मिळाल्याने ही व्याधी होते. हिचा परिणाम हिरड्यांवर सर्वप्रथम दिसून येतो. त्या हुळहुळ्या होऊन जराशा धक्क्याने रक्त पाझरू लागतं. ही व्याधी बळावल्यावर रोगी थकव्याने वारंवार झोपू लागतो व एके दिवशी कायमचा झोपतो.
अमेरिकेत इ.स. १८५० च्या दशकात क्यालिफोर्नियात सोन्यासाठी धडपड अर्थात गोल्ड रश ऐन भरात होती. तेव्हा धातुविदरण व्याधीने पटकी ( = कॉलरा ) पेक्षा जास्त बळी घेतले. अमेरिकी नागरी युद्धात ( इ.स. १८६१ ते १८६५ ) प्रत्यक्ष लढाईत कामी आलेल्या सैनिकांची संख्या अवघी १ % होती. बाकीचे ९९ % रोगराई व इतर कारणांनी मृत्युमुखी पडले होते. यांत धातुविदरण व हगवण आघाडीवर होते.
क जीवनसत्वात अस्कॉर्बिक आम्ल असतं. त्यामुळे पेशींचं चयापचय सुधारतं. मुडदूस ही व्याधी ड जीवनसत्वाच्या कमतरतेने होते. मात्र हिच्यातनं बरं होण्यासाठी ड संगे क जीवनसत्वही आवश्यक असतं. क जीवनसत्व एखाद्या प्रतिजैविकासारखं काम करतांनाही आढळून आलंय.
कालांतराने आहारात सुधारणा झाल्याने धातुविदरण व्याधी उतरणीस लागली. उदा. : इंग्लंडध्ये धातुविदरण व्याधीची लागण इतर सांसर्गिक आजारांसारखी झपाट्याने खाली आली. क जीवनसत्व केवळ व्याधींवर उपयुक्त नसून सर्वसाधारण रोगप्रतिकारशक्ती देखील बळकट करतं. कुठल्याश्या निरर्थक लशी टोचून घेण्यापेक्षा आहारात सुधारणा केलेली काय वाईट ?
क जीवनसत्व जर इतकं गुणी आहे तर मग आपले डॉक्टर हे आपल्याला समजावून का सांगंत नाहीत, असा प्रश्न पडतो. क जीवनसत्वाच्या परिणामाविषयी नियोजित स्वैरचाचण्या ( = randomised controlled trials ) आजवर कोणीही घेतल्या नाहीयेत. इतक्या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष करून नेमकं काय साध्य होतं ? उत्तर सोप्पंय, औषध आस्थापनांचा फायदा !
प्रकरण १६ : हरवलेले उपचार
शीर्षकावरनं कळतं या प्रकरणात काय असणारे ते.
आधुनिक वैद्यकातल्या अनेक घातक संकल्पना केवळ अंधविश्वासाच्या आधारे प्रचलित करण्यात आल्या. उदा.: दुर्बलोच्छेद ( = Eugenics ), थालीडोमाईड, डाय-ईथाईल-स्टिल-बेस्ट्रॉल. यांत एक भर म्हणजे केवळ लस टोचल्याने रोग बरा होतो. प्रत्यक्षात लस ही रोगापासून संरक्षण करीत नाही. या प्रकरणात इतर सुलभ, स्वस्त व अधिक परिणामकारक उपायांचा विचार केला आहे.
विषय बराच मोठा आहे. या छोट्याशा प्रकरणांत दालचिनी, कांदा, लसूण, एन्चिनेशिया, जिकामा, ताज्या फळांचा रस, सफरचंदाचे सायडर व्हिनेगर, कॉड माशाच्या यकृताचे तेल, रजतभस्म द्राव ( चांदीचे कोलॉयडल सोल्युशन ), इत्यादि पदार्थांच्या जंतुघ्न गुणांचा परामर्श घेतला आहे.
काही उदाहरणे : प्रतिजैविकांना दाद न देणारे नफ्फड ब्याक्टेरिया दालचिनीमुळे आटोक्यात येतात. कांदा भरपूर खाणाऱ्या जवळजवळ सर्व ( इटालियन, पोलिश, हंगेरियन, इत्यादि ) लोकांना देवी येत नाहीत. लसणाने क्षय व डांग्या खोकला यांवर उतार पडतो.
प्रकरण १७ : भीती व धारणा
लोकांची समजूत करवून दिलीये की जग धोकादायक आहे. म्हणून तुम्ही तुमची सुरक्षा सरकार व मोठ्या आस्थापनांच्या हाती सोपवा. ती तशी खरोखरंच सोपवावी का ? उत्तर नकारार्थी आहे. लोकांनी आपला शहाणपणा व सुरक्षा का म्हणून गहाण ठेवायची ? या विषयाचा सदर प्रकरणांत उहापोह केला आहे. या भीतीच्या कचाट्यातनं डॉक्टरांचीही सुटका नाही. खूपदा ते ही स्वतंत्र विचार त्यागून प्रचारतंत्रास बळी पडतात.
आज अलोपथीच्या मते मानवी शरीर म्हणजे रसायनांचा समूह असून त्यास शल्यकर्म, रसायने, प्रतिजैविके वगैरेंच्या सहाय्याने कसंबसं नियंत्रणात ठेवायचं असतं. हे नियंत्रण कुठवर, तर जीव जाणार नाही या बेताने. असो.
डॉक्टर चार्ल्स क्रेटन ( Dr. Charles Creighton ) याने १९०३ साली देवीच्या लशीचे धोके, परिणामकारकता, पुनर्लशीकरण व कायदेशीर बाबी यांविषयी बरंच लेखन केलं. त्याचा एक अहवाल बनवला व तो एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका मध्ये प्रसिद्धही झाला. पण १९२२ साली हा मजकूर गाळून त्या जागी लसोपचार नामे मजकूर घुसडण्यात आला. त्यात कसलाही पुरावा नसतांना लशीमुळे रोगप्रतिकारक शक्ती मिळते असा धादांत असत्य दावा केला गेला. कोणी केलं हे ? ओळखा पाहू ! ही विलक्षण लस म्हणे एडवर्ड जेन्नरने शोधली. घंटा तिच्यायला संशोधन.
यापुढे जेन्नरचा हवाला देऊन 'घातक रोगजंतू व जीवनरक्षक लस' ही बिनबुडाधी धारणा ठासून वारंवार मांडली जाऊ लागली. १९२० च्या दशकांत व नंतर अमेरिकेत अनेक चित्रविचित्र ( bizzare ) लशींचा सुळसुळाट झाला आणि त्यांच्या पोकळ व भरमसाट दाव्यांना ऊत चढला. तो आजवर टिकून आहे. साहजिकंच आजचं अलोपथी वैद्यक हा एक रिलीजन होऊन बसला आहे. दुसरं काय !
लागणप्रवर्तक हे लागणकारक नव्हेत. Infection agents are not cause of infections. या सत्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. उदा. : पेलाग्रा या विकारापायी हगवण, त्वचादाह, निद्रानाश होतो असं मानण्यात येई. आज खरंतर ही व्याधी बी-३ या जीवनसत्वाच्या अभावी होते हे स्पष्ट झालंय. पण एके काळी पेलाग्राचा विषाणू असल्याचा समज प्रचलित होता. आज 'करोनाचा विषाणू' ही अशीच एक थोतांडी संकल्पना प्रचलित आहे.
लस अयशस्वी ठरली की मग लस न घेतलेल्या जागरूक लोकांवर साथीच्या रोगांचं दोषारोपण करणं हा वैद्यकीय प्रस्थापितांचा एक आवडता खेळ आहे. हल्ली हे खापर विषाणूचं जनुकीय उत्परिवर्तनावर ( = जेनेटिक म्युटेशन वर ) फोडलं जातं. हे एक उपथोतांड आहे. मग 'नवीन व अधिक प्रभावी' लशी शोधण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. जुन्या लशीचे दोष व अपयश यांवर आपसूक पांघरूण टाकता येतं. मुळांत लस ही रोगनिवारण करणारी नसतेच. पण लक्षांत कोण घेतो. लोकंही भीतीपायी नवीन लशीवर विश्वास ठेवतात. असा एकंदरीत मामला आहे.
यानंतर इंग्लंडात लशी टोचण्यापूर्वीच साथींचे रोग कसे आटोक्यात आले होते त्याची आकडेवारी व आलेख दिलेले आहेत.
अमेरिकेत स्कार्लेट ताप हा पूर्वी एक जीवघेणा रोग होता जो आता नामशेष झाला आहे. तो लशीशिवाय नाहीसा झाला. अर्थात, लसनिर्मितीचे प्रयोग करण्यांत आलेच. अशीच एक प्रयोगशील लस निरोगी असलेल्या शिकाऊ परिचारिकांना टोचल्यावर सगळ्या एका वर्षभरांत मृत्युमुखी पडल्या. आता कळलं स्कार्लेट तापावर लस का काढली नाही ते ?
असो.
संपलं एकदाचं पुस्तक.
विचार, मनन व चिंतनाचं उपकंत्राट देता येत नाही. या गोष्टी स्वत:च्या स्वत:च कराव्या लागतात. एव्हढं जरी ध्यानी आलं तरी पुस्तक सार्थकी लागलं, म्हणेन मी.
---------------x---------------x---------------
लांबलचक सारांश वाचून कंटाळलात ? आता थोडा इतरत्र फेरफटका मारूया. सांगायचा मुद्दा असा की केवळ प्रपकांडाद्वारे ( = प्रोपोगंडा द्वारे ) लस हे जणू अमृत आहे असा आभास उत्पन्न केला आहे. तर असा गोबेल्सी अपप्रचार पूर्वी कधी झाला होता याचा धांडोळा घेतला. तेव्हा महाभारतात एक उदाहरण सापडलं.
पुष्ट, बलवान, नम्र व सतेज पांडव पाहून हस्तिनापुराची लोकं त्यांनाच भावी राजे मानू लागली. त्यामुळे दुर्योधनाचा जळफळाट झाला. पांडवांचा काटा काढण्यासाठी त्यांना दूरदेशी पाठवावं असं त्यानं ठरवलं. तो बापाला म्हणजे धृतराष्ट्राला म्हणाला की एकदा का पांडव दूर गेले की मी राज्यावर बसेन. मग कुंती व ते परत जरी आले तरी काही हरकत नाही. मी त्यांना बघून घेईन. प्रत्यक्षात त्याला पांडवांची हत्या करायची होती. मात्र हा गुप्त हेतू कोणालाही कळू न द्यायची काळजी घेतली.
आता, पांडवांना निघून जा असं थेट सांगणं शक्य नव्हतं. तेव्हा दुर्योधन बापाला आपली योजना समजावतांना म्हणाला की भीष्म मी व पांडवांप्रति समानदृष्टी बाळगून आहे. द्रोण व अश्वत्थामा माझे आहेत. कृप या दोघांना सोडणार नाही कारण हे त्याचे मेहुणा व भाचा आहेत. राहता राहिला विदुर, पण तो आपल्या अन्नाचा ओशाळा आहे. यावर धृतराष्ट्र या योजनेस राजी झाला. मग दुर्योधनाने धनमानादि पारितोषिकांद्वारे प्रधानवृंदास आपल्याकडे वळवून घेतलं. या वश झालेल्या मंत्र्यांनी धृतराष्ट्राच्या आज्ञेवरून वारणावत नगरीची प्रशंसा आरंभली. तसंच धृतराष्ट्राच्या भाट व चरणांनी त्या नगरीची वारेमाप स्तुती केली. तिथे शिवपुजेची पर्वणी आल्याची खरीखुरी बातमीही विशेषकरून पसरवली. पांडवांच्या मनात वारणावताविषयी उत्सुकता निर्माण झाल्याचं कळताच धृतराष्ट्र त्यांना म्हणाला की जत्रेला जाऊन विपुल दानधर्म करून या. धृतराष्ट्राची इच्छा युधिष्ठिरास कळून आली. पण विदुराचे सहाय्य आहे म्हणून त्यानं ही योजना स्वीकारली.
गमनदिनी जेव्हा पांडव हस्तिनापुरातल्या प्रतिष्ठित ब्राह्मणांचा निरोप घ्यायला गेले तेव्हा त्या विप्रांनी धृतराष्ट्रास बराच दोष दिला. पंडू सर्वांना पित्याप्रमाणे वाटंत असे, याउलट धृतराष्ट्रास पांडव डोळ्यासमोर नको झालेत. भीष्माने पांडवांना जाण्याची परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न उपस्थित केला. भीष्माची बुद्धी चळली आहे, सबब आपण हस्तिनापुर त्यागून धर्माच्या मागे गेले पाहिजे असं म्हणू लागले. ब्राह्मणांनी आपणहून निर्वासित होणे हा त्याकाळी राज्याचा फार मोठा अपमान मानला जाई. परिस्थिती इथवर फिसकटली होती. तरीपण युधिष्ठिराने धृतराष्ट्राच्या चांगुलपणाचा भरवसा देऊन ब्राह्मणांना तिथेच थांबायची विनंती केली. ती त्यांनी मानली.
पुढे मग पांडव वारणावतात गेले, नंतर सुमारे वर्षभराने लाक्षागृह प्रकरण घडलं. त्यातनं ते सुखरूप निसटले खरे, पण त्यांना रानोमाळ भटकावं लागलं. भटकतांना हिडींब व बकासुर वगैरे प्रकरणेही घडली. एकदा युधिष्ठिराच्या मनांत विचार आला की आपण असेच फिरंत राहिलो तर दुर्योधन आपल्यास कुठेतरी गाठून ठार मारेल. काहीतरी उपाय शोधायला हवा. फिरताफिरता पांडव व कुंती काम्पिल्य नगरीपाशी आले. तेव्हा पांडवांना कृष्ण यादव नामे एक अत्यंत लबाड इसम भेटला. शिवाय तो नेमका पांडवांचा आतेभाऊही निघाला. त्याच्यापाशी युधिष्ठिराने आपली व्यथा बोलून दाखवली. कृष्णाला कळलं की पांडव आपल्या बरेच उपयोगाचे आहेत. आज दुर्योधानामुळे ते रानोमाळ हिंडताहेत. उद्या जरासंधापायी मथुरेकर यादवांवर हीच वेळ येऊ शकते.
तेव्हा त्या लबाड माणसाने द्रौपदीस वरण्याचा आपला हेतू बाजूला सारला व आपल्या जागी पांडवांपैकी एकाची मनोमन नियुक्ती केली. वरकरणी मात्र त्याने युधिष्ठिरास एखाद्या प्रबळ राजाचं सहाय्य घ्यायला सुचवलं. पुढे असंही म्हणाला की जरा घाई करा. कारण की काम्पिल्य नगरीचा राजा द्रुपद याची मुलगी उपवर आहे, तेव्हा तुम्ही त्याचीच सोयरिक करून घ्या. आजंच तिचं स्वयंवर आहे. पुढे अर्जुनानं द्रौपदी जिंकली व कुंतीच्या अहैतुक आशीर्वचनामुळे ती इतर चार पांडवांचीही पत्नी झाली. आता पांडवांची ओळख पटली होती. मग हस्तिनापुरास परत कसं जायचं याविषयी विचारविनिमय चालू होता. इतक्यात तिथनंच विदुराकरवी पांडवांना सपत्नीक आगमनाचं आमंत्रण आलं.
लोकहो, पहा, आत्ताप्रमाणेच सुमारे दहा पंधरा वर्षांपूर्वी पंडू व माद्रीच्या मृत्यूनंतर कुंती पांडवांना घेऊन हस्तिनापुरास आली होती. तेव्हा तिला लोकांची सहानुभूती तरी होती. भीष्माने तिला बाहेरच्या बाहेर न फुटवता मोठ्या मनाने आश्रय दिला. यावेळेस मात्र भीष्मानेच तिला व पांडवांना हाकून लावलं होतं. मात्र असं असलं तरीही आता द्रौपदीच्या केवळ अस्तित्वाने पांडवांना अपरिमित बळ प्राप्त झालं. इतकं जबर बळ मिळालं की तुरुंग फोडून इतस्तत: भटकणारा युधिष्ठीर कालांतराने चक्क राजसूय यज्ञ करता झाला. द्रौपदी ही काय चीज आहे ते यातनं कळतं.
असो. आता आपण परत वर्तमानकाळात येऊया किंवा जाऊया.
---------------x---------------x---------------
आलांत वर्तमानांत ? उत्तम. आता आपल्यासाठी म्हणजे सामान्य माणसासाठी काही प्रश्न हजर आहेत.
१. हस्तिनापुरातल्या ब्राह्मणांनी भीष्माची उलटीसुलटी घेतली. त्यांच्याकडे तितकी नैतिक शक्ती होती. करोनाच्या लशीच्या थोतांडाविरुद्ध कोण नैतिक शक्तिशाली ब्राह्मण आपल्यासाठी उभा राहणार आहे ?
उत्तर : कोणीच नाही. आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे. त्यासाठी नैतिक शक्ती म्हणून कर्मसाधना करायला पाहिजेच.
२. कोणती द्रौपदी आपल्यासाठी वरमाला घेऊन सज्ज आहे ?
उत्तर : कोणीच नाही. आपणंच आपल्याला लशीच्या शोधार्थ रानोमाळ हिंडण्यापासून वाचवायचं आहे. त्यासाठी मजबूत भक्तीसाधना हवीच.
३. कोण विदुर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे ?
उत्तर : मी आहे ना गामा पैलवान, विदुरासारखा मार्गदर्शन करणारा. मी नीतिमत्तेचा महामेरू असून स्वयंघोषित धर्ममार्तंडही आहे. मी सांगतो की आपण सारे मिळून युधिष्ठिरासारखी धर्मसाधना करूया.
सांगायचा मुद्दा काये की कर्म, भक्ती, धर्म यांमध्ये साधना हा सामायिक घटक आहे. ती साधना म्हणजे नामजप. तो करायला हवाच. चांगला सणकून करूया आणि या करोना नामे थोतांडास पार पळवून लावूया.
॥ जयजय रघुवीर समर्थ ॥
आपला नम्र,
-गामा पैलवान
प्रतिक्रिया
1 Mar 2021 - 6:31 am | चित्रगुप्त
करोनाची लस मी घेणार नाही आहे. मागे एका लेखात (कोविडः एक इष्टापत्ती ?) लिहिल्याप्रमाणे आम्हा उभयतांना कोविडबाधा होऊन त्यातून आम्ही कोणताही औषधोपचार न करता पूर्ण बरे झालेलो आहोत. बाकी नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते फक्त आपल्याला ते ठाऊक नसल्याने आपल्याला उगाचच धास्ती वाटत रहाते याची मला स्वानुभवावरून खात्री पटलेली आहे.
1 Mar 2021 - 12:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>>करोनाची लस मी घेणार नाही आहे.
खरं म्हणजे, असे म्हणनेच मोठं धाडस आहे. बाकी आपण औषध उपचार न घेताही बरे झालात असे समजणे म्हणजे करोनाच्या असण्यावर शंका उपस्थित करणे आहे. करोनाबद्दल आपल्या मनात इतकी भिती भरवल्या गेली की आज रात्री आठ वाजेच्या नंतर खिड़कीच्या फ़टीतून तुम्ही बाहेर जरी बघितलं तरी करोनाचे विषाणु आणि तुमची नजरा-नजर झाली असे समजून करोना तुमच्या डोळ्यावाटे शरिरात प्रवेश करेल असे वाटायचे. डोळेच नव्हे तर, शरीराच्या कोणत्याही भागातून करोना आत प्रवेश करेल असे वाटायचे. इतकी ती दहशत होती. ( thanks टू मीडिया आणि सरकार) मला तर इतकी दहशत बसली की जग नष्ट होऊन फक्त झुरळच उरतील आणि मग ते जग कसे असेल असाही विचार मी करायचो.
आता लस येईल, तेव्हा लस येईल म्हणून प्रेयसीची वाट पाहणा-या प्रियकरासारखे, किंवा बस थांब्यावर बसची वाट पाहतो तसे आतुर होतो. प्रयत्न सुरु होते आणि एकदाचे लशीचे वेगवेगळे व्हर्जन्स आले. कोणती लस द्यायची ते उपलब्ध साठ्यावर असेल असे सरकारने म्हटल्यापासून लशीबद्दलचा आत्मविश्वास जरा कमी झाला. तुमची लस नुसते पाणी आहे, अशी एका कंपनीची टिका दुस-या कंपनीवर होती. त्याच्या आठवणीने तर लशीची भानगड़ नको असेही वाटून गेले.
आज सकाळीच जेव्हा मिपावर लशीच्या थोतांडावर लेख वाचला आणि खुप आनंद झाला. आता आनंद का झाला ते नेमकं सांगता येत नाही, पण झाला.
पण आपण लस घेऊन टाकू. परिणाम होऊ की ना होऊ.....प्लासिबो इफेक्ट आता काही रिस्क नाही, असे मनाचे समाधान तरी होईल.
बाकी, नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते,असे समजू आणि देव्हा-यातल्या देवासमोरची घंटी घेऊ, नसेल तर थाळी घेऊ, दिवाबत्ती करू करोना गो, करोना गो असे म्हणू, हाय काय आणि नाय काय...!
-दिलीप बिरुटे
1 Mar 2021 - 5:59 pm | उपयोजक
अडीचशे रुपये! :)
1 Mar 2021 - 6:17 pm | मुक्त विहारि
पण, इतक्यात घाई करू नका....
राजकीय नेते, थेट जनसंपर्क टाळू शकतात, आपण तसे करू शकत नाही...
घरातून काम करत असाल तर, जनसंपर्क टाळणे, हा सर्वोत्तम उपाय आहे.
10 Mar 2021 - 8:47 pm | चित्रगुप्त
सध्या हितं आमेरिकेत आहोत गेले आठेक महिने. गप गुमान घरीच. किंवा फारतर येकट्याने मोकळ्यात फिरायला जाणे. कोणी कुणाकडे जात नाहिये वगैरे. आता जरा लोकांनी थोडंबहुत जाणं-येणं सुरु केलय म्हणून एक-दोघांना फोन केला आणि काही मराठी मंडळी फिरायला गेलेलो असताना भेटली - मग घरी या निवांत गप्पा करायला नवीन केलेली चित्रं बघायला वगैरे म्हणालो तर त्यांचा पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही व्ह्याक्शीण घेटलाय का ? अजून नाही म्हटल्यावर लौकरात लौकर घ्या म्हणून काढता पाय घेणे. आता काही काळानंतर भारतात परतायचे आहे तेंव्हाही व्ह्याक्शीण घेतले असल्याचे दाखवावे लागणार. म्हणजे आता घ्यावीच लागणार लस्सी.
1 Mar 2021 - 6:58 am | मुक्त विहारि
अशा वेळी आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात,"शांत रहा.. अभ्यास करा.. मनन करा आणि मग निर्णय घ्या."
1 Mar 2021 - 8:35 am | उपयोजक
कोणी महाराज खरंच आहेत का? की काल्पनिक? :)
1 Mar 2021 - 9:17 am | मुक्त विहारि
काहींना मानस पुत्र, मानस कुटुंब किंवा मानस मुलगी असते....
तसेच आमचे हे मानस बाबा महाराज आहेत...
दोन चार पेगांची आहुती चढवली की, ते आत्मिक प्रगट होतात....
डोंबिवली हे जागतिक केंद्र असल्याने म्हणा किंवा आमची आराधना उत्तम असल्याने म्हणा, ते आमच्या आराधनेने कधी कधी प्रसन्न होतात...
सध्या ते आम्हाला, आर्थिक षटरिपू ह्या विषयी प्रवचन देत आहेत...
बाबा महाराज डोंबोलीकर, यांचे म्हणणे, जास्त मनावर घेऊ नये, ही विनंती.
1 Mar 2021 - 9:42 am | कानडाऊ योगेशु
ते तेच स्वतः आहेत हो. मुविकाकांचा अल्टर ईगो!;) (ह.घ्या)
1 Mar 2021 - 8:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखन आवडलं. लेखाबाबत आणि लशी बाबत अनेकांचे मतभेद होऊ शकतील, पण लेख पटणारा आहे. करोना प्रतिबंधक लस आयुष्यभर तुमचं संरक्षण करू शकणार नाही, हेही खरं आहे, पण काही काळासाठी प्रतिबंध नक्कीच होऊ शकेल असेही वाटते.
-दिलीप बिरुटे
(कन्फ्यूज)
>>>>>आपल्याला दोन नेते जाम आवडले. मोदींनी मुखपट्टी उघडपणे नाकारली.......
माझं या विषयावर आणि त्यांच्या काल कर्तुत्वावर काही दिवस मौन आहे, मुखपट्टीच लावली आहे असे समजा.
-दिलीप बिरुटे
(मुखपट्टीधारक)
1 Mar 2021 - 8:36 am | उपयोजक
ला परत नरेंद्र मोदीच निवडून येणार आहेत. :)
1 Mar 2021 - 9:01 am | कंजूस
वैज्ञानिकच ठेवा म्हणतो. महाभारत त्यात आणू नका. तो एक वेगळाच करा.
----------------------
एक उदाहरण पाहा
काविळीसाठी आयुर्वेदात - यकृत बिघडून पित्तरस अधिक किंवा उणे निर्माण झाल्याने होणारा रोग धरला आहे. त्रिकटू चूर्ण आणि एरंड पानांचा रस हे बरे करतात.
हेच मॉडर्न मेडसन, संशोधनातून लिवरचे A,B,C, D प्रकार शोधून वेगवेगळ्या लशी केल्या. रोग होऊ नये म्हणून लस. रोग झाल्यावर फक्त बी कॉम्प्लेक्स.
आयुर्वेद औषध अजूनही गुणकारी आहे!!
1 Mar 2021 - 9:04 am | कंजूस
मत मांडाच. पण परिस्थिती ही अशी आहे. करोनाची लस शोधताहेत पण औषध का शोधत नाहीत?
1 Mar 2021 - 9:11 am | गवि
कारण व्हायरस ऊर्फ विषाणूची लागण एकदा झाली की थेट त्याच्यावर उपचार करुन मारणे अवघड़ पडते. Bacteria बाबत अँटीबायोटीक औषधे उपयोगी पडतात . व्हायरस मारण्याबाबत मर्यादा येतात. त्यावर केवळ बाह्य लक्षणे कमी करणारे उपायच मुख्यतः करता येतात.
1 Mar 2021 - 10:33 am | Bhakti
बरोबर
शेवटी आपली प्रतिरोधक क्षमता महत्त्वाची आहे.
1 Mar 2021 - 9:23 am | चौकटराजा
हे पुस्तक २०१३ साली लिहिलेले असल्याने २०२१ साली ते कालबाह्य झाले असण्याची शक्यता आहे ! अशक्त झालेला विषाणू शरीरात टोचल्याने प्रतिपिंडे निर्माण होऊन शरीर त्याच्या पेशीप्रवेशाला मारक अशी योजना करते असा दावा लस याबाबत आतापर्यंत करण्यात आला आहे ! आताची लस या तंत्रावर आधारित नाही अशी माझी माहिती आहे ! लस घेतल्याने प्रत्येकास भक्कम संरक्षण मिळालेच पाहिजे असा दावा निसर्गच मुळी करीत नसतो. यासाठीच तर ते शेवटचे वाक्य डॉक्टरांनी जपून ठेवलेले असते " बॉडी रिस्पॉन्स देत नाही औषधाना ! " आज देखील मला असे वाटते की नेहमीच रोग अनेकांना होत असतात ,अनेक माणसे काहीही औषध न घेता बरी होत असतात ते त्यांच्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीने . पण हे सगळे अव्यक्त पातळीवर होत असल्यानं त्याचा तपशील ठेवता येत नाही ! ही केवळ तर्का ने जाणण्याची गोष्ट आहे ! तर्कट हे फायद्याचे ही ठरते वा अगदी उलट ! महाजनो गत: स: पंथः या नात्याने मी लस घेणार आहे ! लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल !
1 Mar 2021 - 9:31 am | मुक्त विहारि
आमचे बाबा महाराज डोंबोलीकर हेच म्हणतात ....सध्या
शांत रहा, घरात पडीक रहा, सांसर्गिक रोग असल्याने, जन संपर्क टाळा.लशीचे बरेवाईट परिणाम दिसायला वेळ लागेल.
1 Mar 2021 - 9:52 am | गोंधळी
लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल ! चौ रा काका हे काही पटले नाही.
1 Mar 2021 - 10:36 am | चौकटराजा
कोणतेही औषध वा लस बाजारात येण्यापूर्वी त्याचे काही दुश्परिणाम माणसावर होतात की नाही हे पाहण्यासाठी काही स्वयंसेवक गरजेचे असतात ! ही लस बाजारात येण्यापूर्वी अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून त्या लसीची ७० टकके परिणामकारकता सिद्ध केली आहे ! तरी ही काही लोकांना त्यावर शंका आहे ! रसायन विज्ञानाचा विषय नसून मानस शास्त्राचा झाला आहे ! वरील स्वयंसेवकांत अनेक तरुण मंडळीही असतीलच ना ! आता धोका पत्करण्यात मी म्हातारा मग मागे का राहू ? आता राहता राहिला संशय लस निर्माते ,राजकारणी व डॉक्टर यांच्या तोडपाण्याचा ! त्यावरही संदेह लोकांना आहे ! तो ही दूर होऊन सत्य पुढे येण्याचे श्रेय संशोधकांप्रमाणेच या स्वयंसेवकांनाही आहे हे नाकारू नये !
2 Mar 2021 - 7:41 pm | प्रकाश घाटपांडे
वा मस्त एकदम गिनीपिग प्रतिसाद. :)
1 Mar 2021 - 10:09 am | माईसाहेब कुरसूंदीकर
उत्तम माहिती.
सध्यातरी लस घेण्यापलिकडे पर्याय दिसत नाही. लस घेतल्याने करोना पूर्ण जाणार नाही हे माहित आहे .
1 Mar 2021 - 10:30 am | Bhakti
लसीवर चांगलाच ऊहापोह आहे.जीवानमान उंचावण हेच महत्त्वाचे आहे हे तर त्रिकाल बाधित सत्य आहे.पण म्हणून संशोधन सर्व थोडांत हे काय पटल नाही.
कंजूस यांच्याप्रमाणेच मलापण आयुर्वेद महान आहे त्यात अजूनही शक्ती आहे हे पटल,पण मग प्रश्न पडला रामदेवबाबाच "औषध ?" करोनावर घ्यायच का? (भयानक विचार)..
चौरा यांचं मत पटल लस न घेणं ही चुक ठरु शकते.
बाकी महाभारतची उजाळणी आवडली :)
1 Mar 2021 - 10:37 am | आंद्रे वडापाव
1 Mar 2021 - 10:44 am | Bhakti
ते घेणारच होते.
पण त्या अखिलेश बाबाला प्रोटोकॉल,नियम वगैरे काहीच कळत नाही.काहीही बरळत होता.(हा हा)
1 Mar 2021 - 12:29 pm | Rajesh188
लस च नाही तर सर्वच बाबतीत अवास्तव दावे करण्याचे प्रमाण खूप आहे.सायन्स मॅगझिन मध्ये सुद्धा सर्रास खोटे दावे केले जातात.
1 Mar 2021 - 1:42 pm | टवाळ कार्टा
लै भारी, लहान बाळांना पॉलिओच्या लसीऐवजी गोमूत्र द्या, सगळ्या डॉक्टरांना घरी बसवा
मिपाची अशीच प्रगती होवो
1 Mar 2021 - 2:05 pm | Rajesh188
फक्त स्वच्छ हवा.
रासायनिक खत आणि कीटक नाशक न वापरलेलं अन्न आणि पालेभाजी.
शुद्ध पाणी.
संकरित जनावर चे दूध पूर्ण बंद.
आणि स्वच्छ आणि मोकळा परिसर .
एवढे उपलब्ध झाले तर.
लस,औषध ह्यांची बिलकुल गरज नाही
1 Mar 2021 - 2:18 pm | खेडूत
असं कुठलं ठिकाण पाहण्यात आहे काय?
तिथेच जाऊन हरी हरी करत उर्वरित आयुष्य घालवावे हे बरे!
1 Mar 2021 - 3:30 pm | टवाळ कार्टा
या सगळ्या गोष्टी कदाचित १५०/२०० वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.१८५०) नक्कीच होत्या तर तेव्हा माणसे जास्त जगायची कि आत्ता जास्त जगतात?
1 Mar 2021 - 4:01 pm | Rajesh188
मलेरिया,अतिसार,प्लेग ह्या मुळे लोक जास्त मरायची .
कारण योग्य उपचार नव्हते.
पण उपचार निर्माण झाल्यावर ते प्रमाण कमी झाले.
त्याला लसी कारणीभूत नाहीत.
आता जे आयुष्य वाढले आहे असे वाटत आहे ते कोणाचे?
ज्यांचे राहणीमान,आहार, विहार नैसर्गिक होता
त्यांचेच.
म्हणजे १९४५ ते १९७० पर्यंत ज्यांचा जन्म आहे त्यांचेच.
त्याला कारण शुध्द आहार,शुद्ध हवा,आणि जोडीला वैधकिय सुविधा हे आहे.
पण त्या पुढची पिढी अनेक रोगाने त्रस्त आहे कमी वयात
मधुमेह
ब्लड प्रेशर.
किडनी चे प्रॉब्लेम
खूप जास्त वजन
आणि अशा अनेक रोगांनी आताची पिढी कमी वयात त्रस्त आहे.
ह्याला एकमेव कारण आरोग्य व्यवस्थेचे बाजारीकरण आणि प्रदूषित,हवा,पाणी,अन्न,हे आहे
बाजारीकरण मुळे नसलेले गुण चिकटवून केलेली औषनिर्माणशास्त्र ची होत असलेली जाहिरात
लेखिका हेच सांगत आहे.
1 Mar 2021 - 4:12 pm | टवाळ कार्टा
ओके :)
तुमच्यासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?
1 Mar 2021 - 4:24 pm | आग्या१९९०
ह्यांच्या मुलांना नव्हे तर ह्यांनाच देवीचे जिवंत विषाणू टोचून घ्यावेत. नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढली कि नाही हे ही कळेल.
1 Mar 2021 - 2:41 pm | गोंधळी
सांगायचा मुद्दा काये की कर्म, भक्ती, धर्म यांमध्ये साधना हा सामायिक घटक आहे. ती साधना म्हणजे नामजप. तो करायला हवाच. चांगला सणकून करूया आणि या करोना नामे थोतांडास पार पळवून लावूया.
म्हणजे तुम्ही आजारी पडल्यावर वैद्यबुवां कडे जातच नाहीत का? नामजप करुन बरे होता?
बाकी अध्यात्माशी सांगड घालत जगणं खुप कठीण काम वाट्ते. ego मुळे असेल कदाचीत.
1 Mar 2021 - 4:09 pm | मुक्त विहारि
सासूला, सुनेच्या जाचापासून वाचवते
सुनेला, सासू पासून वाचवते
स्वतःचे षंढत्व लपवायला
धंदा वाढवायला
लोकांची फसवणूक करायला
जागा ढापायला
असे ह्या कातड्याचे विविध उपयोग आहेत
आध्यात्मिक माणूस, एक नंबरचा स्वार्थी आणि खोटारडा असतो, हे मी अनुभवले आहे,
2 Mar 2021 - 4:42 am | nutanm
मुक्तविहारी , मी सुध्दा हे अनुभवलेय व कायमच अनुभवत राहीन, घरात व बाहेर.
1 Mar 2021 - 3:27 pm | टवाळ कार्टा
लेखकासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?
1 Mar 2021 - 4:24 pm | मुक्त विहारि
पुर्वी गल्लोगल्ली, किंवा दरेक शाळेत, एक तरी पोलियोग्रस्त, व्यक्ती असायचीच,
आता नाही
---------------------
त्यामुळे, आपण लस टोचून घ्यायची. मी थोडे दिवस वाट बघून, मग कुणाकडून लस टोचून घ्यायची?, लस टोचून घेतल्या नंतर कुठे रहायचे? इत्यादि साधकबाधक विचार करून, मगच ठरवीन....
घाई गडबडीत, असे निर्णय न घेणेच उत्तम, असे माझे वैयक्तिक मत आहे...
बाय द वे,
लस टोचून घेतली की, एक जोरदार कट्टा करू...
1 Mar 2021 - 8:19 pm | कानडाऊ योगेशु
आणि एकमेकांना आपापल्या लसस्टोरीज सांगु! ;)
1 Mar 2021 - 11:11 pm | सुक्या
हा हा हा . . .
ते लस्टस्टोरीज असे वाचले ... उगाच गुदगुल्या झाल्या . . .
1 Mar 2021 - 4:19 pm | जॉन रीज
आपले जुने लेख आणि हा लेख अशी तुलना करता आपला i.d. कुणी चोरला असावा असे वाटते कारण आपण असे लिखाण कराल असे वाटत नाही आणि लेखाची शैलीही मागील लेखांशी जुळत नाही.
1 Mar 2021 - 7:34 pm | कंजूस
आणि नाव बदललेले पै वेगळे.
1 Mar 2021 - 7:36 pm | सूक्ष्मजीव
मी एका ओळखीच्या डॉक्टर सोबत जे कोरोना काळात महानगरपालिके कडून हंगामी करोना सेवे साठी भरती केले आहेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली.
त्यांना मोफत लस दिली जात होती. या लशीचा प्रभाव किती काळ राहील हे विचारल्यावर ते म्हणाले की ही लस नसून एक प्रकारचा इम्यूनिटी बूस्टर आहे जे सर्व सर्दी, पडसे, खोकला, ताप इत्यादी आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते.
याबद्दल जाणकार काय म्हणतात?
2 Mar 2021 - 3:39 am | गामा पैलवान
सूक्ष्मजीव,
पर्यायी दृष्टीकोन असलेल्या डॉक्टरांना आपल्या आस्था ( = concerns ) मांडायला वाव मिळावा हा सदर लेख लिहिण्यामागे हेतू आहे.
धन्यवाद! :-)
आ.न.,
-गा.पै.
1 Mar 2021 - 9:14 pm | Vichar Manus
करोना च नाही तर सगळ्या लशी हे थोतांड आहे असे लेखकाला म्हणायचे आहे, ते पटत नाही. या विषयावर डॉ. खरे यांचे मत वाचायला आवडेल
1 Mar 2021 - 9:16 pm | निमिष ध.
मिपावर असा लेख असणे - तो सुद्धा करोनासारख्या अवघड काळात हे एक सामाजीक आरोग्याकरता हानीकारक आहे. वेगवेगळी मते असणे वेगळे आणि त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येणे वेगळे. त्यामुळेच इथे उत्तर लिहीतो आहे.
त्या ज्या कोण सुझान हम्फ्रीज आहेत त्यांना क्वॅक (ढोंगी वैद्द्य) म्हटलेले आहे - https://medika.life/dr-suzanne-humphries-on-medikas-quack-scale/
त्यांच्या पुस्तकातील मिसल्स चे दाखले कसे खोटे आहेत ते इथे नीट सांगितलेले आहे - https://medium.com/@visualvaccines/why-dr-suzanne-humphries-an-anti-vacc...
अमेरिकेत ५ लाखांहून लोक मेलेली आहेत करोनामुळे आणि जगभरात जवळ जवळ २५ लाख लोकसंख्या दगावलेली आहे. असे असताना असा बेजवाबदार लेख येणे हे चांगले नाही.
कृपया कोणीही या लेखाला वाचून करोना लशीबद्दल आपली मते बनवू नयेत ही माझी कळकळीची विनंती.
1 Mar 2021 - 10:51 pm | पिनाक
अगदी बरोबर. हेंच म्हणायला इथे आलो होतो. उगीच सरकारचा त्रास वाढवू नका..गप गुमान लस घ्या आणि कामावर चला. लै झालं घरी बसून.
2 Mar 2021 - 2:57 am | गामा पैलवान
निमिष ध.,
पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर सुझन हम्फ्रीझ कधीही होमियोपाथ नव्हत्या. त्यांनी अलोपथी सोडून इतर कोणतीही उपचारपद्धती सुचवली नाहीये. तुम्ही दिलेल्या दोन्ही दुव्यांत डॉक्टरबाईंना होमियोपाथ व अवांतर चिकित्सक म्हंटलेलं आहे, जे साफ चुकीचं आहे.
इझाबेला बाईंचा आरोप २०१५ च्या आसपासचा म्हणजे बराच जुना आहे. डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांच्या संकेतस्थळावर या आरोपांचं खंडन केलेलं आहे : http://www.dissolvingillusions.com/critiques/
वानगीदाखल एक वृथा आरोप दाखवतो :
प्रत्यक्षांत उपरोक्त पुस्तकात डॉक्टरबाईंनी क जीवनसत्वाच्या चाचण्या घेतल्या नाहीत म्हणून विधान केलंय. हे क जीवनसत्वाचं प्रमोटिंग नव्हे.
असो.
लशीच्या दुष्परिणामांवर कोणीही काहीच का बोलंत नाही?
मी डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांना संशोधिका मानंत नाही. त्यांनी कुठलाही नवा शोध लावलेला नाहीये. त्यांनी फक्त जुना विदा ठळकपणे समोर मांडलाय. जो आजपर्यंत कोणीच मांडला नव्हता. या विदाप्रस्तुतीमुळे लशीविषयी आणि जंतुसिद्धांताविषयी काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. कोणाकडे उत्तरं आहेत का?
आ.न.,
-गा.पै.
2 Mar 2021 - 2:25 pm | बाजीगर
गा.पै. यांच्याविषयी मला आदर आहे.
पण या लेखाला मी विरोध करतो.
नाही हो.
चूक गलत राँगनंबर,
गल्ली चूकलात. खूप भटकलात.
महाभारत संदर्भ पूर्ण अनावश्यक.
माझ्या माहितीतले दक्ष जागरुक मित्र करोना ने मरण पावलेत.
कृृपया स्वच्छता पाळा ( त्यावर गा,पै. आपण योग्य जोर दिलात, स्वच्छ पाणी प्या / पोषक व घरचा आहार घ्या / यथाशक्ती व्यायाम,चालणं करा, अकारण जागू नका.
आणि हो ...लस घ्या...त्यावर डोकं खपवू नका.
हा धागा delit करा.
(एवढा research आणि टंकण्याचे श्रम, मुद्दे मांडण्याचे कसब याची मला कदर आहे)
2 Mar 2021 - 4:13 pm | मदनबाण
गा.पै, हिंदुस्थानातील लसी बाबत गैर समज उत्पन्न होइल असे लेखन सध्य काळात योग्य नाही ! ती किती उपायकारक आहे हे येत्या काळात कळेलच परंतु उगाच लसी विषयी शंका घ्यावी असे सध्या कोणतेच कारण नाही.
परदेशातील स्थिती मात्र वेगळी दिसते आणि त्या बद्धल अनेक बातम्या इथे वाचण्यास मिळतील :-
Coronavirus COVID19
जाता जाता :- तेव्हा पांडवांना कृष्ण यादव नामे एक अत्यंत लबाड इसम भेटला.
या बद्धल विशेष आक्षेप ! आपल्या लिखाणासाठी परमेश्वरास कशास बोल लावावे ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |
2 Mar 2021 - 4:21 pm | Rajesh188
कशा साठी हा लेख delete करायला हवा,लेखात दुसरी बाजू मांडली आहे समजून घ्यायला काय हरकत आहे.प्रतेक विषयावरील दोन्ही बाजू समोर यायलाच हवी.लेख वाचून लगेच लोक लसी बद्द्ल निगेटिव्ह मत बनवतील असे इथे काही लोकांना का वाटत ह्याचेच मोठं आश्चर्य वाटत.
वाचणारी माणसं आहेत प्रत्येकाला स्वतःची बुध्दी असते चांगले वाईट,योग्य,अयोग्य सर्वांना समजत .त्यांना गाढव समजू नका.
मीच शहाणा मलाच योग्य अयोग्य कळत बाकी लोक बुद्धिहीन आहेत असले गैर समज काढून टाका.
आणि लेख delete करायची काही गरज नाही.
2 Mar 2021 - 6:41 pm | टवाळ कार्टा
http://misalpav.com/comment/1096610#comment-1096610
याचे उत्तर देता का?
2 Mar 2021 - 7:02 pm | Rajesh188
मी तरी लस टोचून घेणार नाही.
आणि देवू,क्षय,पोलिओ ह्यांची लस टोचली म्हणून ते जगातून कमी झाले आहेत हे तुमचे मत आहे माझे नाही.
तुम्हीच त्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसा.
2 Mar 2021 - 7:35 pm | मुक्त विहारि
हे मस्तच .....
2 Mar 2021 - 10:11 pm | टवाळ कार्टा
तुम्ही लस टोचून घ्या किंवा नका घेउ...कोणालाही शष्प फरक पडत नाही. मी विचारलेला प्रश्न "तुम्ही लस टोचून घेणार की नाही?" हा नाहीये तर "तुमच्या मुलांना लहान असताना पोलिओ वगैरेच्या लस टोचवल्यात का?" असा आहे.
तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?
अजूनही प्रश्न समजला नसेल तर सांगा....अजून सोप्या मराठीत लिहिन :)
2 Mar 2021 - 10:36 pm | Rajesh188
आपले विचार कधीच दुसऱ्या वर थोपवयचे नसतात हा साधा common सेन्स आहे.
त्या मुळे मुलांना लस दिलेली आहे.ज्या लसी देण्याचे वेळापत्रक सरकार नी तयार केले आहे त्या प्रमाणे.
पण
आजच्या काळात वैधकीय व्यवसाय हा प्रामाणिक राहिला नाही ह्या वर माझे ठाम मत आहे .
मग ते संशोधक असतील तर ते कोणत्या तरी व्यापारी कंपनी शी बांधील असतात आणि त्यांच्या इशर्या वरूनच त्यांचे संशोधन आणि त्याची माहिती ह्याचा प्रचार ,प्रसार ते करत असतात.
मोठमोठ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांचा वापर करून घेतात.
ह्या मध्ये शेवटच्या स्तरावर डॉक्टर मंडळी असतात त्यांचे कार्य कसे चालते ह्याचे अनेक किस्से लोकांना माहीत आहेत.
लुटमार करणारा व्यवसाय असे वर्णन केले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
मी माझ्या विषयी निर्णय घेताना मात्र त्याचा विचार करतो.
एक तर आजारी पडत नाही पण कधी पडलो तर खूप पाच सहा दिवस तरी डॉक्टर कडे जात नाही औषध ही रोग बरे करत नाहीत तर रोग वाढवतात असे माझे मत आहे.
अगदीच गरजेचं झाले तर च dr कडे जातो.
ते पण माझ्या family dr कडेच.
बाकी कोणाकडे नाही.
आता सर्व उत्तर दिली आहेत परत एकच प्रश्न विचारू नका
2 Mar 2021 - 11:05 pm | टवाळ कार्टा
(एकदाचे) उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद...पहिल्या वेळीच उत्तर लिहिले तर परत परत प्रश्न विचारले जात नाहीत :)
30 Apr 2021 - 11:26 am | बेंगुताई
ठाम मत हाहाहा.पण सगळ्या डॉक्टरांचा ठेका तुम्ही म्हणून का घ्यायचा? गलत बात! आणि फॅमिली डॉक्टर पण डॉक्टरचं असतील नाही का ?
2 Mar 2021 - 7:39 pm | मुक्त विहारि
गोवर, काजण्या, गालगुंड, यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे किंवा त्यांना अटकाव करणारी, प्रतिकारक्षमता तरी वाढलेली आहे
लस टोचून घेणे हे उत्तम, हे तुझे मत, मला तरी मान्य आहे
2 Mar 2021 - 4:29 pm | स्मिता.
केवळ करोनाच नाही तर इतरही अनेक दुर्धर रोगांवरचे लसीकरण आवश्यकच आहे. आधीच्या अनेक महत्त्वाच्या लसींची माहिती आणि आकडेवारी एक गूगल सर्च केला की सापडेल आणि करोनाच्या लशीची माहिती समजून घ्यायची असल्यास इंग्लंडची (युके) आकडेवारी अभ्यासून बघता येते.
तेथे जानेवारीच्या मध्यापासून तर अखेरपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली होती. भारताच्या तुलनेत खूप लहान आणि कमी लोकसंख्येच्या या देशात दिवसाला सरासरी ६०,००० बाधीत तर दररोज सरासरी १५०० मृत्यू होत होते. त्यात भर म्हणून हे दिवस तिथल्या कडक हिवाळ्याचे, अनेक दिवस तापमान शून्याच्या मागे-पुढे असते. पण लॉकडाऊन सोबतच लसीकरणाच्या जोरावर एका महिन्याच्या कालावधीत, आजच्या दिवसाला बाधीत आणि मृत्यूचे आकडे १० पटीने कमी झाले आहेत (सरासरी ६००० बाधीत आणि १५० मृत्यू). आलेख पाहिला तर लक्षात येतं की तिथल्या पहिल्या आणि दुसर्या लाटेच्या तुलनेत ही तिसरी लाट बरीच मोठी असली तरी उच्चांकानंतर बाधितांची संख्या झपाट्याने खाली आली आहे.
हा एका महिन्यातला फरक केवळ लसीकरणामुळे शक्य झाला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आधीच्या लसींच्या तुलनेत ही लस नवीन आहे आणि कमी कालवधीत बनवली आहे हे खरं असलं तरी आता लस शोधण्याचं तंत्रज्ञानसुद्धा आधीपेक्षा खूप विकसीत झालं आहे हे लक्षात घ्यायला हवं.
करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?
2 Mar 2021 - 6:13 pm | निपा
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने.
हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही .
देवीचा रोग व पहिली लस
लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा.
https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0...
बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...
2 Mar 2021 - 6:14 pm | निपा
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने.
हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही .
देवीचा रोग व पहिली लस
लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा.
https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0...
बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...
2 Mar 2021 - 7:56 pm | गामा पैलवान
स्मिता.,
करोना हे एक थोतांड आहे. कारण की अमेरिकेत ऑगस्ट २०२० पर्यंत ( म्हणजे गेल्या सहा सात महिन्यांपर्यंत ) हा विषाणू अलग केला गेला नव्हता.
हे गूगल करून पहा : "Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available,"
बाकी, इथे इंग्लंडात PHE ( = Public Health England ) कडे करोना विषाणू अलग केल्याची शष्प माहिती नाही : https://www.whatdotheyknow.com/request/679566/response/1625332/attach/2/...
करोनाचा विषाणू अलग केलेला नसतांना कोणती दिव्य लस उत्पन्न केली गेलीये? थोतांड ते थोतांडच !
आ.न.,
-गा.पै.
2 Mar 2021 - 8:07 pm | प्रकाश घाटपांडे
गामाजी लैच दंगा होनार इथे आता. कोविड प्रकारच्या विषाणुंचा एक समूह तर आहे ना?
30 Apr 2021 - 11:34 am | बेंगुताई
मग मानसं कशाने बर मरत असतील? बहुतेक स्वच्छ भारत अभियान कमी पडले असणार! बाकीच्या देशाचं आपल्याला काही माहीत नाही बुवा.
30 Apr 2021 - 11:55 am | रंगीला रतन
साधा सर्दी पडसा झालेली लोकं आपल्याला करोना झालाय या गैरसमजुतीने उगाच घाबरून मेली आहेत. जगात करोनाचा विषाणु अस्तीत्वात नाही हेच सत्य आहे! तुम्ही आम्ही कीतीही ओरडुन सांगीतले तरी धागालेखक विषाणुचे अस्तीत्व मान्य करणार नाहीत. हां पण सनातन प्रभातने तसा दावा केला तर आणि तरच त्यांचे मतपरीवर्तन नक्की होइल :)
2 Mar 2021 - 9:14 pm | Rajesh188
प्लेग,देवी,इत्यादी रोग निर्माण करणारे जिवाणू ,विषाणू आज सुद्धा मानवी शरीरावर हल्ला करतात पण त्या व्यक्ती नी त्या आजाराची लस घेतली असल्या मुळे लोक आता त्या आजारांना बळी पडत नाहीत .हे कस सिद्ध केले जाते शास्त्रीय पद्धती नी.
कोणी असे सिद्ध करून दाखवलं आहे का?
की ते रोग कारक विषाणू,जिवाणू आता अस्तित्वातच नाहीत हे त्याला कारण आहे.
2 Mar 2021 - 10:08 pm | उपयोजक
https://youtu.be/uVSibJ07PFQ
BKC त लसीकरणाला तुफान गर्दी
2 Mar 2021 - 11:29 pm | Bhakti
फायझर लसीबाबत चांगला दुवा मिळाला..कोवीशिल्ड आणि भारत बायोटेक लसीवर शोधत आहे. ्
https://www.technologyreview.com/2020/12/09/1013538/what-are-the-ingredi...
3 Mar 2021 - 6:14 pm | Bhakti
कोव्हिड लस कशी बनवली.यामध्ये एस प्रोटीन्स+चिंम्पाझी अडिनो व्हायरसचा उपयोग कसा केला सांगितले आहे.
https://youtu.be/35Idb_lCU4o
3 Mar 2021 - 6:54 pm | मुक्त विहारि
मनापासून धन्यवाद
3 Mar 2021 - 7:51 pm | Rajesh188
त्यांना होणारे साथी चे आजार काही महिन्यात संपुष्टात येतात ना .
कसे .
ना लस ना औषध .
तरी मानव जेवढं आजारांनी ,रोग राई नी मृत्यू मुखी पडतो तेवढे प्राणी पडत नाहीत.
ह्याची पण काही तरी कारणे असतील ना.
प्लेग उंदरा पासून माणसात संक्रमित होत होता.
आता उंदरांना पण प्लेग होत नाही.
4 Mar 2021 - 4:43 am | चौकस२१२
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड !
बरं.. अमेरिकेत , इंग्लंड इटली ब्राझील मध्ये हजारो लाखो मेले हे पण एक थोडांतच का? कि त्यांना लपवून ठेवलाय मोहावी वाळवंटात कि आल्प्स मध्ये ?
आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये
यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल
4 Mar 2021 - 10:41 am | मुक्त विहारि
माझ्या लहानपणी, देवीचे आणि पोलियोचे जितके रोगी दिसायचे, तितके आता दिसत नाहीत...
4 Mar 2021 - 10:49 am | Rajesh188
माझ्या लहानपणी मधुमेह, लठ्पणा,लहान वयात चशमे,लहान वयात केस पांढरे झालेल्या व्यक्ती दिसत नव्हत्या पण आता मात्र सर्रास दिसत आहेत.
उच्च रक्तदाब असणारे तर खूपच आहेत पाहिले तेवढे नव्हते.
कमी वयातच दातांचे आणि हिरड्यांचे विकार असलेली लोक पण वाढली आहेत.
32 दात 32 वर्षापर्यंत सुद्धा टिकत नाहीत पाच दहा कमी होतातच.
4 Mar 2021 - 10:54 am | मराठी_माणूस
सहमत
4 Mar 2021 - 12:05 pm | मुक्त विहारि
लशींच्या बाबतीत बोलत आहोत...
आहार, विहार, आचार याबाबत बोलत नाही आहोत...
4 Mar 2021 - 11:22 am | Rajesh188
माझ्या गावात मला वाटतं एकच कुष्ठ रोगाचा रोगी होता तो पण वय झालेला.
बाकी मी प्लेग चा आजार बघितला नाही ना अनुभवला आहे.
पण हिवताप,अतिसार ,कांजण्या हे आजार असायचे आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे .पण हिवताप आणि अतिसार आज सुद्धा जीवघेणा आहे.
उपचार वेळेवर मिळाले नाहीत तर.
सर्वात जास्त लोक हिवताप,अतिसार ह्या मुळेच पूर्वी लोक मृत्यू मुखी पडत असत आता तशी स्थिती नाही .
औषध उपचार नी ह्या रोगावर विजय मिळवला आहे.
रोग राई कमी होण्याचे स्वच्छता हे कारण नक्कीच आहे .
धनुर्वात,rabies, ह्याचा रोगी मी आज पर्यंत तरी बघितला नाही.
पण हे दोन्ही आजार पण घातक आहेत.
आधुनिक वैद्यक शास्त्र नी लोकांचे आयुष्य वाढवले आहे ह्या विषयी शंका नाही.
पण आता परत त्या शास्त्राला उतरती कळा लागली आहे असे म्हणता येईल.
सेवा भावनेने संशोधन आणि उपचार मधल्या काळात होत होते आता त्याला बाजारू स्वरूप आले आहे.
4 Mar 2021 - 3:24 pm | गामा पैलवान
चौकस२१२,
तुमचा इथला संदेश वाचला.
१.
बरोबर. करोनाचा विषाणू हे आजूनही थोतांडच आहे. जो विषाणू अद्याप विलग करता आलेला नाही, त्यावर म्हणे लस बनवली आहे. पब्लिक इतकं मूर्ख आहे का विश्वास ठेवायला?
२.
सहमत आहे. निदान माहिती तरी मिळेल.
जमल्यास डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांचं उपरोक्त पुस्तक वाचून पहा. निदान त्यातल्या साथीच्या रोगांचे आलेख तरी बघा म्हणून सुचवेन.
३.
हो. मेकॉलेछाप राज्यपद्धती असली की हे असं होतंच.
आ.न.,
-गा.पै.
5 Mar 2021 - 4:22 am | चौकस२१२
१०० + अधिक देश त्यांची सरकार पूर्ण गंडली , आणि ती सुद्धा काही सरकारे पार उजव्या विचारसरणी ची आणि काही डाव्या तरी गंडली होय??? अरे बापरे
म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का?
बरं आपण ४थय प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळलेत .. हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय !
बरं उत्तर द्या नका देऊ... आपली "थेरी "कळली एक काम करा तो शोधलेख एवढी मेहनत घेऊन लहिलेलेला जरा मटा किंवा लोकसत्तेत छापायला पाठवा ..( कुबेर साहेब स्वागतच करतील कारण त्यात त्यांना "सरकारने लोकांनां कसे गंडवले याचे अजून एक शास्त्रीय उदाहरण मिळेल अप्लाय कृपेने ) जनताच उत्तर देईल तुम्ह्ल्ला
अहो काय हे.. चाललंय तुमचा
हा हे समजू शकतो कि काही गोष्टींवर आपण प्रश्न उभे करू जसे कि
( राजेश तुम्ही पण ऐका ) लस चुकीच्या पदहतीने विकसित केली असावी , त्यात आर्थिक घोटाळा असेल, इतर उपायातील त्रुटी , पण हे सगळंच खोटा आहे ! असा दावा !
5 Mar 2021 - 2:10 pm | Rajesh188
Corona लसी मुळे corona होणार नाही ह्याची शाश्वती आहे का.
कोणत्याच संस्थेने covid ची लस किती दिवस covid विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण करेल ह्या विषयी ठाम विधान केलेले नाही.
म्हणजे हे लसी करण प्रोयागिक आहे.निष्कर्ष अजुन यायचा आहे.
7 Mar 2021 - 9:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लस १०० % करोनाला प्रतिबंध करेल असा विदा अजुन दिसला नाही. ९० टक्के प्रतिबंध होईल असे समजले तरी १० % रिस्क आहेच. काय नाय, सतत मास्क घालणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धूणे सॅनिटाइजरचा वापर करणे काळजी घेणे हाच सुरक्षित राहण्याचा उत्तम उपाय आहे. करोना समजा झालाच तर औषधोपचाराने तो बराही होतो.
बाकी, अजुन एक करोनास प्रतिबंध करायचा थेट लशी इतकाच उपाय, जोरजोरात थाळी वाजविणे आणि गॅलरीत जाऊन दिवाबत्ती करणे त्याचंही महत्व काही कमी नव्हतं, नाही. त्याचाही विदा येणे अजुन बाकी आहे. =))
च्यायला, आयुष्यात लै गमती जमती केल्या या करोनाने. मागे वळून पाहिल्यावर हसून हसून पुरेवाट होते.
-दिलीप बिरुटे
5 Mar 2021 - 3:46 pm | टवाळ कार्टा
मिपाकर इतके महत्वाचे निष्कर्ष काढत असतील तर पुढचा नोबेल मिपाकरंना मिळणारच....हाकानाका
5 Mar 2021 - 3:52 pm | मुक्त विहारि
मिपा वरील चर्चा वाचूनच, केवळ भारतच न्हवे तर,चीन, अमेरिका, पाकिस्तान आपली परराष्ट्रीय धोरणे ठरवतात.... त्यात आता, नोबेल पुरस्कार पण टाकायला हरकत नाही...
5 Mar 2021 - 8:54 pm | गामा पैलवान
चौकस२१२,
१.
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते?
करोनामुळे मृत असा छाप मारला तर अमेरिकन सरकार रोग्याचे सगळे पैसे द्यायचं. मग कोण कशाला बिनकरोनाचं प्रमाणपत्र देईल? एक लेख सापडला : https://eu.usatoday.com/story/news/factcheck/2020/04/24/fact-check-medic...
शितावरून भाताची परीक्षा.
इथे इंग्लंडमध्ये आता फ्ल्यू चे मृत्यू अचानक नाहीसे झाले. त्यांची जागा करोनाने घेतली. घरोघरी मातीच्याच चुली म्हणावं का ?
करोनचा विषाणू आजघडीला विलग ( = isolate ) झालेला नाहीये. भविष्यात तो कधी विलग होण्याची शक्यता माझ्या मते तरी ० आहे. मग नेमकी कशाची चाचणी केली जाते? आणि नेमकी कसली लस टोचली जाते?
२.
होच मुळी. निदान आजवरचा तरी हा सर्वात मोठ्ठा झोल आहे.
आ.न.,
-गा.पै.
5 Mar 2021 - 9:34 pm | रंगीला रतन
करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते?
तेवढीच जेवढी त्याला थोतांड म्हणायला लागते.
5 Mar 2021 - 10:23 pm | गामा पैलवान
रंगीला रतन,
हे बरोबर बोललात.
तुमच्याकडे करोनाविषाणू विलगीकृत म्हणजे आयसोलेटेड केलेला आहे का? थेट रोग्याकडून नमुना मिळवलेला पाहिजे. माकडाच्या मूत्रपिंडावर वसवलेली वस्ती किंवा डुकराच्या गळ्याखाली लोंबणारी मांसरुडे ओघळून पडलेल्या चरबीच्या कणांवर वाढवलेली बुरशी वगैरे नको.
असा विषाणू तुमच्याकडे नसेल तर करोना हे थोतांडच आहे. च महत्त्वाचा. आणि हे विधान करायला मला काडीचीही अक्कल वापरावी लागली नाही. तुमच्या उपरोक्त उद्गारांना माझं पूर्ण अनुमोदन आहे.
आ.न.,
-गा.पै.
5 Mar 2021 - 10:44 pm | रंगीला रतन
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते?
या वाक्याचाआणि तो करोनाविषाणू आयसोलेटेड आहे क नाही याचा काय संबंध?
असल्यास तो स्पष्ट कराच.
आपला उद्धट
रंगीला रतन
6 Mar 2021 - 3:36 pm | गामा पैलवान
रंगीला रतन,
तोच तर माझाही प्रश्न आहे. करोनाचा अस्सल नमुना अस्तित्वात नाही. तरीपण तो रोग्याच्या शरीरात मात्र सापडतो आहे. त्याचप्रमाणे तो निरोगी माणसातही असू शकतो. आणि तो पसरतोही म्हणे.
याचाच अर्थ 'करोना' 'शोधण्याची' चाचणी करोनाइतकीच भंपक आहे.
आ.न.,
-गा.पै.
30 Apr 2021 - 12:00 pm | बेंगुताई
त्यासाठी तुम्हाला प्रयोगशाळेत भेट द्यावी लागेल(मास्क लाउन जा बरं का?) तिथे रुग्णांचे swab असतात तिथे कदाचित दिसतील पण.(बघा एकदा उघड्या डोळ्यांनी दिसले तर) आता नसतीलच विषाणू तर दिसतीलच कशे?काहीही करतात हे लोक दिवसरात्र ते पपई किट घालून काय तर swab घेऊन काय बघतात काय माहीत काय भेटणार त्यात शेम्बडाशिवाय?
5 Mar 2021 - 8:59 pm | Rajesh188
जेव्हा पासून लस पुराण चालू आहे तेव्हा पासून मला काही प्रश्न पडतात.
गूगल वर उत्तर शोधली पण सविस्तर,उत्तर मिळाले नाही.
१) covid१९ व्हायरस चे इन्फेक्शन होवून बरे झालेल्या रुग्णात जी प्रतीपिंड तयार होतात ,किंवा covid व्हायरस विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण होते .
ती प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरक आहे?
२) एकदा covid होवून गेल्या नंतर त्याच व्यक्ती ला परत covid झाला अशी जगात किती उदाहरणे आहेत( मी तर वाचले आहे अशी फक्त ५० उदाहरणे जगात आहेत)
आणि माझ्या संपर्कात असलेल्या ज्या लोकांना covid झाला होता त्या मधील कोणालाच परत covid झालेला आहे.
ना कोणा कडून तशी केस ऐकण्यात आली.
इथे कोणाला reinfection झालेला covid रुग्ण माहीत आहे का?