माहिती

पैशाचे झाड भाग :-३

अतरंगी's picture
अतरंगी in जनातलं, मनातलं
25 Jan 2023 - 9:08 am

भाग १. https://www.misalpav.com/node/51032

भाग २ https://www.misalpav.com/node/51038

" अभ्या कुठे आहेस?"

" गावातच आहे, का रे?"

"विनितला पॅरेलेसिसचा अ‍ॅटॅक आलाय, रुबीला नेलंय. "

" निघतो लगेच. पंधरा मिनिटात पोचतो.'

एकेचाळीसाव्या वर्षी अ‍ॅटॅक यायला विनितची अनुवंशिक जाडी, त्याचे कामाचे स्वरुप, खाण्या पिण्याच्या सवयी, सगळेच कारणीभुत होते. कमी हालचाल, त्यात त्याला व्यायमाची फार आवड नव्हती.

अर्थव्यवहारगुंतवणूकअनुभवमतमाहिती

पैशाचे झाड- भाग १

अतरंगी's picture
अतरंगी in जनातलं, मनातलं
23 Jan 2023 - 9:29 am

"हॅलो"

"बोल"

" कुठे आहेस?"

" घरी"

"किती वेळ लागेल?"

"का?"

"अरे, का म्हणजे? तू येतोएस ना? सगळे थांबले आहेत?"

"कोण थांबले आहेत? आणि कुठे?"

विनितला कळेचना की, हा असा का बोलतोय?

"अरे तू गृपवर मेसेज नाही पाहीले का?"

"नाही, माझा स्मार्ट फोन बंद आहे. काय झालं? "

"नित्याच्या घरी सगळे बसलोय ये लवकर.."

"स्टॉक आहे की घेऊन येऊ?"

"अरे तीन खंबे आहेत, सगळे आज लोळत नाहीतर झिम्मा खेळतच घरी जाणार आहेत. तू ये फक्त"

पंधरा मिनिटात येतो असे सांगून अभिने फोन कट केला.

अर्थव्यवहारगुंतवणूकअनुभवमतमाहिती

पुस्तक परिचय: कोल्हाट्याचं पोर - लेखक: किशोर काळे

सुजित जाधव's picture
सुजित जाधव in जनातलं, मनातलं
9 Jan 2023 - 6:27 pm

मागच्या वर्षी वाचनालयात पुस्तक शोधत असताना माझ्या हाती किशोर शांताबाईं काळे यांचं कोल्हाट्याचं पोर नावाचं पुस्तक लागलं. पुस्तकाच्या मलपृष्टावरील ओळी वाचल्यानंतर दुःख झालं आणि किशोर काळे व त्यांच्या आईबद्दल मनात उत्सुकता निर्माण झाली. त्याच दिवशी हे पुस्तक मी घरी नेलं आणि एका बैठकीत मी ते वाचून काढलं होत.. काही दिवसांपूर्वी मी ते दुसऱ्यांदा वाचलं आणि त्याबद्दल लिहण्याचा मोह आवरला नाही…

वाङ्मयलेखमाहिती

अंतर्गत सीमावाद (भाग-२)

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
24 Dec 2022 - 10:50 pm

ईशान्येकडील राज्यांमधील सीमावाद
स्वातंत्र्यानंतर ईशान्येकडील आसाम, नागालँड, त्रिपुरा इत्यादी प्रदेशांचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण झाले. मात्र त्यात आसाममध्ये अनेक भाषिक, वांशिक, धार्मिक गटांचा समावेश असल्यामुळं हे सर्वात मोठं आणि वैविध्यपूर्ण घटकराज्य बनलं होतं. कालांतरानं स्थनिक समुदायांची मागणी आणि भाषावार प्रांतरचनेचं सूत्र यांच्या आधारावर आसाममधून विविध घटकराज्यांची निर्मिती करण्यात आली. तसं होत असताना सर्व घटकराज्यांनी एकमेकांच्या प्रदेशावर आपापले दावे करण्यास सुरुवात केली. त्यामुळं त्यांच्यात सीमावादाला सुरुवात झाली.

धोरणइतिहासराजकारणसमीक्षालेखबातमीमाहिती

गाण्यासंदर्भात मदत हवी आहे.

शाहिर's picture
शाहिर in जनातलं, मनातलं
13 Nov 2022 - 1:20 pm

खालील गाण्याचे अर्धेच शब्द उपलब्ध आहेत.. मिपाकरांना विनंती हे गाणे पूर्णपणे उपलब्ध असल्यास इथे पोस्ट करावे. धन्यवाद!

मी पाया पडते पदर पसरते
सवत मला हो आणू नका ||

घरात होती आई ची मी लाडकी गळसरी
बापाच्या मोटेला दोर रेशमाचे शेंदरी
गोगलगाय मी अशी नखानं
येता - जाता खुडू नका
मी पाया पडते ..........

कलासंगीतमाहितीसंदर्भचौकशीमदत

टी -२० विश्वचषकातील भारताची घोडदौड

सुजित जाधव's picture
सुजित जाधव in जनातलं, मनातलं
3 Nov 2022 - 8:54 pm

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेली टी-२० विश्वचषक स्पर्धा मध्यावर आलेली आहे.. या स्पर्धेत पहिल्या चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकत भारत ग्रुप २ मध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.. या लेखाच्या माध्यमातून आपण भारतीय संघाच्या एकंदर कामगिरी बद्दल बोलणार आहोत.

पहिल्या सामन्यात अटीतटीच्या लढतीत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आणि विश्वचषकाला धडाक्यात सुरूवात केली. या सामन्यानंतर भारतीय संघाची आणि धुवांधार अर्धशतक झळकावनाऱ्या विराटची खूप वाहवा झाली. विराट कोहलीने या सामन्यात ५३ चेंडूत ८२ धावा बनवल्या आणि सामनावीर होण्याचा मान पटकावला.

क्रीडामाहिती

दिवाळी विशेष – भायखळ्याचं स्टेशन

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
23 Oct 2022 - 12:11 pm

Byculla

यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं मुंबईमधल्या भायखळा रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीविषयीचा हा विशेष लेख. मुंबईत अनेकवेळा जाणं झालं असलं तरी भायखळ्याला जाऊन त्या स्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीला भेट देण्याची संधी अलिकडेच मिळाली होती.

मांडणीसंस्कृतीइतिहासमुक्तकप्रवासविचारलेखअनुभवमाहितीविरंगुळा