Skip to main content

माहिती

तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत (ऐसी अक्षरे -२५)

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 15/05/2025 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
अतत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत हे संशोधक डॉ .बी. आर जोशी अगदीच छोटेखानी पुस्तक वाचले. भारतीय तत्त्वज्ञान परंपरांपैकी एकाही तत्त्व‌ज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी जन्म पुरेसा नाही, हे पुन्हा पटले.

भुलेश्वर मंदिर सौंदर्य

लेखक Bhakti यांनी बुधवार, 14/05/2025 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
१ भुलेश्वर मंदिर हे मंगलगड किंवा दौलतमंगल किल्ला नावाच्या डोंगरी किल्ल्यावर(पुणे जिल्हा) वसलेले आहे. १३ व्या शतकात यादव राजवंशातील राजा कृष्णदेवराय यांनी या मंदिराची पुनर्बाधणी केली. नंतर मराठ्यांनी त्यांच्या राजवटीत त्याची भर घातली. भुलेश्वर मंदिर खूप वेळा नष्ट आणि पुनर्बाधणी करण्यात आले आहे.

एआय, एआय, तू आहेस तरी काय?

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 05/05/2025 07:02 या दिवशी प्रकाशित केले.
ए.आय. म्हणजे काय, हे खुद्द त्यालाच विचारावे असा विचार मनात आला, मग त्यासाठी चत्ग्प्त मरत्झि (chatGPT marathi) ला आवाहन केल्यावर खालील उत्तरे आली: ------------------------------------------------------- आवाहन : एक मराठी कविता लिहा, ज्यात Artificial Intelligence बद्दल सोप्या भाषेत सांगोपांग माहिती असेल.

गीतारहस्य चिंतन -प्रकरण ५ (सुखदुःखविवेक)

लेखक Bhakti यांनी सोमवार, 14/04/2025 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
सुखदुःखविवेक -भाग-१ #सुखाचीव्याख्या/सुखाची संज्ञा अनेक प्रकारे सांगता येत असली तरी सुख हे दुःखाशीच निगडीत अधिक सुखकारक ठरते. व्याख्या १. नैयायिक - "अनुकूलवेदनीयं सुख' - जी वेदना आपल्याला अनुकूल असते ते सुख आणि "प्रतिकूलवेदनीयं दुःखं 'जी वेदना आपल्याला प्रतिकूल ते दुःख, या वेदना जन्मतःच सिद्ध आणि केवळ अनुभवगम्य आहेत. व्याख्या-२ मागील प्रकरणांतील कर्माप्रमाणे सुखही वेदांतांत "आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक' तीन प्रकारचे असे म्हणता येईल. -आधिभौतिक हे बाहय किंवा शरीराचे / इंद्रियाचे सुखदुःख • आध्यात्मिक हे सर्व मानसिक वा बाह्य संयोगावाचून उद्‌भवणारे सुखदुःख आहे. व्याख्या -3 प्रतीकारो व्

लोकमान्य(होमरूल -स्वराज्य संघ)

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 03/04/2025 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
१ १८८८ ला स्थानिक परिषदेतून टिळक कॉंग्रेसमध्ये आले.कर्झनच्या अन्यायकारी बंगालच्या फाळणीच्या कारस्थानानंतर कॉंग्रेसमध्ये जहाल मतवाद्यांची फळी त्यांनी प्रस्थापित केली.परंतू जहाल -मवाळ वादात जहाल मतवाद्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले,कॉंग्रेस फुटली.पुढे टिळकांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश मिळावा यासा

लोकमान्य (राजद्रोह खटला)

लेखक Bhakti यांनी बुधवार, 02/04/2025 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
टिळकांच्या या खटल्यापूर्वीच भारतीय लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक दमनाची प्रशासकीय आणि कायदेशीर चौकट ब्रिटिशांनी उभारून ठेवली होती. जी कुठली घडामोड ब्रिटिशांच्या मते त्यांचे भारतावरील नियंत्रण नाकारू पाहणारी ठरू शकेल, त्यामागील व्यक्तींवर 'राजद्रोहा'चे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढत होते. ब्रिटिश सरकारविषयी तिरस्कार वाढविणारे, त्या सरकारचा अवमान करू पाहणारे किंवा त्या सरकारविषयी अप्रीती निर्माण करू पाहणारे कोणतेही वर्तन 'राजद्रोह' ठरविले जाऊ शकत असे. टिळकांवर हा राजद्रोहाचा आरोप एकंदर तीनदा ठेवला गेला. पहिल्यांदा १८९७ मध्ये, नंतर १९०८ आणि लगेच १९१६ मध्ये. १.

गीतारहस्यचिंतन ४ -आधिभौतिकसुखवाद

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 01/04/2025 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
#गीतारहस्य४ #आधिभौतिकसुखवाद दुःखादुद्विजते सर्वः सर्वस्य सुखमीप्सितम् । मभा. शां. १३९.६१ दुःखाचा सर्वांसच कंटाळा असतो आणि सुख सर्वांसच हवे असते. कोणत्याही कर्माचे केवळ बाह्य फल पाहून नीतीचा व अनीतीचा निर्णय करणाऱ्या पक्षास टिळकांनी 'आधिभौतिक सुखवाद' हे नाव दिले आहे. बाह्य फलाहून नीतीमत्तेचा निर्णय होत असतांना ही सोपी पद्‌धत सोडून त्यासाठी आत्मानात्मविचारांत शिरायची गरजच नाही, हे आधिभौतिक सुखवाद्यांचे म्हणणे. त्यामुळे त्यांच्यासाठी अध्यात्म तर अतिशय निरर्थक गोष्ट आहे.

बाजाराचा कल : २४ फेब्रुवारीचा आठवडा

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 23/02/2025 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
बाजाराचा कल : २४ फेब्रुवारीचा आठवडा ========================= मंडळी मागील आठवड्यात जे नकारात्मक चित्र युयुत्सु-नेट ने दाखवले त्या प्रमाणे परत एकदा मार्केटने आपला मगदूर दाखवला. या आठवड्यात मात्र चित्र वेगळे आहे. बाजारात अजून करेक्शन येणं बाकी आहे असं तज्ञ मंडळी सांगत असताना मॉडेल मात्र चढा-सूर आळवत आहे. कदाचित या खेपेस युयुत्सु-नेट याखेपेला नक्की गंडेल असे वाटते. त्यामुळे माझी उत्सूकता किंचित ताणली गेली आहे.

गीतारहस्य चिंतन -३

लेखक Bhakti यांनी शनिवार, 15/02/2025 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
#गीतारहस्य प्रकरण तिसरे -कर्मयोगशास्त्र "तस्माद‌योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्"(गीता २.५०) "म्हणून तू योगाचा आश्रय कर, कर्म करण्याची जी शैली, चातुर्य किंवा कुशलता त्यास योग म्हणतात." योग शब्दाची व्याख्या लक्षण आहे. कर्माकर्माच्या विवंचनेत अनेक अडचणी उद्‌भवतात, तेव्हा ते काम सोडून कर्माचा लोप न करता', योग' म्हणजे युक्ती शहाण्या पुरुषाने स्वीकारली पाहिजे, तुहि स्वीकार. ' तस्माद‌द्योगाय युज्यस्व' हे श्रीकृष्णाचे अर्जुनास प्रथम सांगणे आहे, आणि हा योग म्हणजे कर्मयोगशास्त्र होय. कर्म कर्म शब्द 'कृ' धातूपासून निघाला आहे.

गीतारहस्य चिंतन-२

लेखक Bhakti यांनी शनिवार, 08/02/2025 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
गीतारहस्य चिंतन -१ #कर्मजिज्ञासा२ * अस्तेय (चोरी) एकाने यथान्याय मिळवलेली संपत्ती चोरून किंवा लुटून नेण्याची इतरांना मोकळीक मिळेल तर द्रव्यसंचय करण्याचे बंद पडून सर्वांचेच नुकसान होईल, समाजाची घडी विस्कळून सर्वत्र अनवस्था होईल हे निर्विवाद आहे.