मंजर-ए-सुब्हा उर्फ मांजरसुंबा किल्ला

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
25 Jan 2025 - 12:20 pm

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व गड किल्ले गर्दीने भरून जातात.तेव्हा ट्रेक कॅम्पने आदल्या दिवशीच छोटासा मॉर्निंग ट्रेक घेतला...मांजरसुंबा गड!
आ
मी अजूनही हा गड पाहिला नव्हता.पण गोरक्षनाथ गड,डोंगरगणला जातांना उंचावर असलेला हा गड कायम आकर्षित करायचा.गड खुप उंच आहे असे वाटायचे.विशालदादाला जेव्हा सांगितले की पहिल्यांदाच जाणार आहे.तेव्हा तो म्हणाला १० मिनिटांत चढून जाता येते.खरोखर १० मिनिटांत मी गड चढले.उगाच इतके दिवस घालवले असं वाटलं.गडावर गेल्यावर पूर्वेकडे एक मुख्य दरवाजा- कमान आहे .जिचे छत ,भिंती,खिडक्या आकर्षक आहे.सकाळचे ६.४५ वाजले होते.सूर्योदयाचे ते रंग उधळणीचे मोहक आकाश डोळ्यांत साठवत होते.सूर्याची लाल केशरी चमचमती बिंदी गोजिरी होती.सर्वांनी प्रजासत्ताक दिनाचा पूर्व सूर्योदय तिरंग्यासह फोटो घेत अनुभवला.पुढे आत गेल्यावर एक विस्तीर्ण पठार आहे.तिथेच एक अर्धवट सुरक्षित वास्तू बाकी आहे.समोर पूर्वेलाच पाण्याचे भव्य टाके आहे.
अ
इ

उ

क
१

२
मांजरसुंबा हा गड- किल्ला १४ व्या शतकात निजामाच्या काळात सलाबत खान नावाच्या सरदाराने बांधला होता.संभाजीनगर त्याकाळच्या देवगिरी?नगरातून शत्रू सैन्यावर लक्ष देण्यासाठी हा उंचावर टेहाळणीसाठी बांधलेला किल्ला होता.याचे मूळ नाव मंजर -ए- सुब्हा असे होते जे अपभ्रंश होऊन मांजरसुंबा /मांजरसुभा झाले.खरोखर सुबहाच सुंदर दृश्य जे इथून पाहिले ते विसरू शकणार नाही.
३

४

या किल्ल्याला अजून एक ओळख आहे ती म्हणजे हत्तीची मोट!

पठाराच्या दुसऱ्या बाजूला एक दुमजली हवा महाल/ बुरूज आहे.त्याला हत्तीची मोट म्हणतात कारण बुरूजाची खाली तीन पाण्याची टाके आहेत.तसेच तिथे मोट बांधायची सोय आहे.टाक्याकडे खाली जाण्यासाठी पायऱ्यांची सोय आहे.पण नंतरची वाट थोडी अवघड आहे.वेळेअभावी आम्ही बुरूजावरूनच टाके पाहिले.
हा फोटो अभ्यासक रोहन गाडेकर यांच्या सौजन्याने देत आहे.
७
ट्रेक कॅम्पने ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रश्नोत्तरे घेतले.तसेच एका कागदावर स्वतःमध्ये काय बदल करू इच्छितो ज्याने स्वतःचे आणि समाजाचे हित साधले जाईल हे लिहून ही अँक्टिव्हिटी केली.राष्ट्रगीतासह छोट्याशा सुरेख ट्रेकची सांगता केली.
७

प्रवासआस्वादमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

लेखन, किल्ल्याची ओळख, प्रचि सर्व सुंदर आहे.

घरा पासून जवळच आहे वाटते.

Bhakti's picture

25 Jan 2025 - 6:11 pm | Bhakti

हो,२५-२७ किमी.

अगदी हेच म्हणायला आलो होतो..

विजुभाऊ's picture

25 Jan 2025 - 2:19 pm | विजुभाऊ

मस्त.
तो सुबहचा सूर्यबिंब. खरोखर १०००००००० नौबती झाडाव्या इतका छान आलाय.
तुम्ही तेथे होतात. तो अनुभवायला.

हो,हा सूर्योदय खुपच सुंदर होता.

छान! अंबेजोगाईला जाताना अनेकदा मांजरसुंभा लागले, परंतु हा गड काही बघितला नाही कारण...

गोरक्षनाथ गड,डोंगरगणला जातांना उंचावर असलेला हा गड कायम आकर्षित करायचा.गड खुप उंच आहे असे वाटायचे.

हेच 😀

कपिलमुनी's picture

26 Jan 2025 - 10:50 pm | कपिलमुनी

लेख आणि प्रचि आवडले

सगळे फोटो खूपच छान आहेत.
२५-२७ कि.मी. कुठून आहे ? पुण्याहून किती अंतर आहे ?

पुण्याहून दूर आहे.पण कधी संभाजी नगरला किंवा शनिशिंगणापूर किंवा पैस मंदिराकडे अहिल्यानगरहून जात असाल तर वांबोरीकडे जाणारे वळण घ्या.मांजरसुंबा, गोरक्षनाथ गड दोन्ही २ तासात करा आणि पुढे जाऊ शकता.

चंद्रसूर्यकुमार's picture

27 Jan 2025 - 3:19 pm | चंद्रसूर्यकुमार

मस्त लेख आणि फोटो. किल्ल्याचे नाव आवडले.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jan 2025 - 11:36 pm | अमरेंद्र बाहुबली

मस्त माहिती ताई! अशीच फिरत रहा लिहीत रहा!

सौंदाळा's picture

28 Jan 2025 - 10:07 am | सौंदाळा

माहिती आणि फोटो छानच

गोरगावलेकर's picture

28 Jan 2025 - 4:24 pm | गोरगावलेकर

लेख आवडला

प्रचेतस's picture

28 Jan 2025 - 5:26 pm | प्रचेतस

छान लिहिले आहे, गड आणि गडावरील वास्तू पूर्वीच्या वैभवशाली निजामशाही काळाची कल्पना देतात.

संभाजीनगर त्याकाळच्या देवगिरी?नगरातून शत्रू सैन्यावर लक्ष देण्यासाठी हा उंचावर टेहाळणीसाठी बांधलेला किल्ला होता

निजामशाही काळात आजच्या छत्रपती संभाजीनगरचे नाव खडकी होते. जे राष्ट्रकूट काळातील कटक (सैन्याचा तळ) ह्या मूळच्या नावपासून आले होते.

मांजरसुंबा ह्याच नावाचा डोंगर राजमाची आणि ढाकच्या मध्ये आहे. त्याचं आभाळावेरी घुसलेलं शिखर फारच देखणं दिसतं.

कटक ते खडकी काय अनोखा प्रवास दिसतोय ;)
राजमाचीचा मांजरसुंबा पाहयला पाहिजे.

श्रीरंग_जोशी's picture

31 Jan 2025 - 12:35 am | श्रीरंग_जोशी

सुंदर छायाचित्रे अन वर्णन. मांजरसुंबा किल्ल्याची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.