#गीतारहस्य
प्रकरण तिसरे -कर्मयोगशास्त्र
"तस्मादयोगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्"(गीता २.५०)
"म्हणून तू योगाचा आश्रय कर, कर्म करण्याची जी शैली, चातुर्य किंवा कुशलता त्यास योग म्हणतात."
योग शब्दाची व्याख्या लक्षण आहे.
कर्माकर्माच्या विवंचनेत अनेक अडचणी उद्भवतात, तेव्हा ते काम सोडून कर्माचा लोप न करता', योग' म्हणजे युक्ती शहाण्या पुरुषाने स्वीकारली पाहिजे, तुहि स्वीकार.
' तस्मादद्योगाय युज्यस्व' हे श्रीकृष्णाचे अर्जुनास प्रथम सांगणे आहे, आणि हा योग म्हणजे कर्मयोगशास्त्र होय.
कर्म
कर्म शब्द 'कृ' धातूपासून निघाला आहे. अर्थ- करणे, व्यापार हालचाल असा आहे.
वैदिकनुसार ही कर्म विभागणी
१.यज्ञार्थ (ऋत्वर्थ) श्रौत- स्वतंत्ररीत्या फल न देणारी अतएव अबंधक.
२.पुरुषार्थ - पुरुषाच्या फायद्याची अतएव बंधक संहिता, ब्राह्मण ग्रंथात या कर्माचे महत्त्व आहे
३.स्मार्त कर्म-उपनिषदांत ब्रम्हज्ञान प्राप्ती यज्ञाहून श्रेष्ठ मानली गेली. "यज्ञाथर्यात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धन यज्ञार्थ केलेली कर्म बंधक नाहीत, बाकीचीं सर्व कर्म बंधक आहेत.
याज्ञयागादि वैदिक कर्म म्हणजे स्मार्त कर्म तर याशिवाय दुसरे हि क्षत्रियास युद्ध, वैश्यास वाणिज्य वगैरे ही कर्म
४.पौराणिक कर्म - केवल पुराणांतूनच पहिल्याने विस्ताराने प्रतिपादिली असलेली व्रत, उपोषण वगैरे कर्म.
*या कर्मांचे पुन्हा नित्य, नैमित्तिक काम्य आणि निषिद्ध हे भेद आहेत.
पण गीतेचा मुख्य विषय केवळ ही कर्म इतका संकुचित नाही. प्रसंगानुसार 'जगणे किंवा मरणे' या दोन कर्मही कोणते पत्करावे याचाहि विचार करण्याची जरुरी पडते, तो कर्तव्यप्रती विहितकर्म हा अर्थ होतो.
योग -
पातंजलसूत्रोक्त समाधि किंवा ध्यानयोग हा उपनिषदांतूनहि या शब्दाचा वापर होतो परंतू गीतेत हा अर्थ आणखी व्यापक आहे.
योग हा शब्द युज म्हणजे जोडणे या धातूपासून निघाला आहे. अर्थ - जोड, जुळणी, मिळवणी, संगति, एकत्रावस्थिती आहे.
पुढे तशी स्थिती प्राप्त होण्याचा 'उपाय, साधन, युक्ति इलाज म्हणजे कर्म असाहि अर्थ आहे.
*एकोहि योगोऽस्य भवेद्वधाय'
द्रोणाचार्याना जिंकण्याचा एकच मार्ग- योग (साधन, युक्ती) आहे हे कृष्णाने सांगितलेले आहेच. (मभाः द्रो. १८१.३९)
गीतेत योग, योगी किंवा योगी शब्दापासून झालेले सामासिक शब्द सुमारे ८० वेळा आलेले आहेत. कोठेही ,चार-पाच ठिकाणी सोडता 'पातंजल योग' अर्थ अभिप्रेत नाही.
"योगः कर्मसु कौशलम” (गीः २.५०)
योग म्हणजे कर्म करण्याची काही विशेष प्रकारची कुशलता, युक्ति वा चतुराई, शैली. उदा 'द्रव्यप्राप्तियोग'
पुढे जाऊन श्रीकृष्ण सांगतात योगस्थ होत आसक्ति सोडून कर्म कर (गी२.४१-४६,४८)
• योग म्हणजे सिद्धी व असिद्धी यांचे ठायी समत्वभाव फलाशने कर्म करण्यापेक्षा समत्वबुद्धीवा योगच श्रेष्ठ (गीता १. ४९)
*योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन (गी. ६.३)
ज्ञानप्राप्तीनंतर संन्यास आणि कर्मयोग या दोन मार्गाचा स्वीकार करावा हे वैदिक काळात सांगितले आहेच. [गी-५.२] सांख्ययोगौ या संज्ञा यालाच(ज्ञान-कर्म) उद्देशून आहेत (गी. ५.४).
म्हणूनच अर्जुनाला गीतेत वेळोवेळी योगी हो (गी २.४८,२.५०, ४.४२, ३.३.) हे जे सांगितले आहे, त्याच्या अर्थ तपस्वी । पातंजली योगी अशा नव्हे तर योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत' म्हणजे 'युक्तीने कर्म करणारा योगी- कर्मयोगी हो असा आहे. कर्मयोग या शब्दाऐवजी केवळ 'योग' हा शब्द महाभारतातही वापरला आहे.
ब्रम्हविद्यायां- योगशास्त्र यातील योगशास्त्र यालाच समानार्थी शब्द कर्मयोगशास्त्र गीतारहस्यामध्ये वापरला आहे.
शास्त्र
कर्म करण्याचे मार्ग ज्या शास्त्राद्वारे चांगले, वाईट इ. ठरवले जाते ते कर्मयोगशास्त्र. कोणत्याही कर्मार्ची शास्त्रातील विषयांची चर्चा तीन मार्गांनी होते.
१) आधिभौतिक - जड सृष्टीतील पदार्थ इंद्रियांना ज्याप्रमाणे प्राप्त होतात त्याचप्रमाणे ते आहेत-
उदा सूर्याचे वजन, अंतर, प्रकाश इ. गुणांचे परीक्षण करणे.
२.आधिदैविक-जड सृष्टीतील पदार्थाच्या मुळाशी काय आहे, यामागे दुसरे काही तत्व आहे का?
उदा. सूर्याच्या गोळयात तदधिष्ठात्री सूर्य नावाची देवता आहे, हे मानले.
३.आध्यात्मिक विवेचन [metaphysical] - जड सृष्टीमध्ये हजारो जड पदार्थ हजारो देवता न मानता, सृष्टीचे व्यवहार चालवणारी व मनुष्याचे शरीरांत आत्मस्वरुपाने राहून त्याला सृष्टीचे ज्ञान देणारी एकच
इंद्रियातीत विचिच्छक्ति आहे. उदाः सूर्य, चंद्र आदिचे व्यवहार था अचिंत्य शक्तीच्या प्रेरणेने होते.
धर्म
अर्जुनाला मी हे जे युद्ध करीत आहे ते धर्म्य की अधर्म्य, पुण्य का पाप हा प्रश्न पडला. कोणते कर्म चांगले कोणते वाईट हे दाखविण्यासाठी धर्म आणि अधर्म या दोन शब्दांचा वापर झाला आहे.
'धर्म' हा शब्द पारलौकिक धर्म आणि व्यावहारिक धर्म म्हणजेच नीतीधर्म आणि धर्म हा एकेरी शब्द असा येतो.
समाजधारणा
धर्म या शब्दाचा व्यावहारिक दृष्टीने उपयोग 'सर्व समाजाचे धारण व पोषण कशाने होते हे आपण पाहतो.
धर्म हा धृ = धारण करणे धातूपासून आला असून धमर्मानेच सर्व प्रजा बद्ध झालेली आहे, ज्याने सर्व प्रजेचे धारण होते तोच धर्म हा निश्चय होय.
धारणाद्धममित्याहु: धर्मा धारयते प्रजा: ।
यत्स्याद्धारणसंयुक्तं स धर्म इति निश्चय:|
(मभा.कर्ण ६९.५९.)
भारताअखेर व्यास म्हणतात -
उध्वबाहुर्विरोग्येषः नच कश्चिच्छणोति माम
धर्मादर्शश्च कामश्च स धर्मः किं न सेव्यते ।
" अरे बाहू उभारून मी आक्रोश करीत आहे, (परंतू माझे कोणी ऐकत नाही। धर्मानेच अर्थ, धर्मानेच काम प्राप्त होतो,
(तर) असला धर्म तुम्ही का आचरीत नाही?
*आत्म्याचे कल्याण?
पण हा कधी प्रक्टिकल बुद्धीबरोबर शुद्ध बुद्धी व्यावहारिक कर्माबरोबर (critique of Practical Reason) आत्म्याच्या चर्चा,आधिभौतिक कर्माबरोबर अध्यात्मिक नीतीशास्त्राचा विचार व्हावा, हेही मत वेदांत व पाश्चात्य येथे या सांगितले आहे. विचारवंतांनी सांगितले आहे.
*धर्म शब्दाची दुसरी व्याख्या 'चोदनालक्षणोर्थो धर्म' चोदना म्हणजे प्रेरणा !
अर्थात कोणी तरी अधिकारी पुरुषाचे "तू अमुक कर" अगर "करू नकोस असे सांगणे वा आज्ञा करणे. परंतू स्वैर मनोवृत्तीस आळा घालणे असे जे धर्माचे लक्षण आहे (गी 3.38].
धर्म- आचारप्रभव, धारणात्, प्रेरणा लक्षण म्हणा.
काही सामान्यजण समाजातील महाजन शिष्टाचार पाळणाऱ्याा लोकांच्या मागे चालत राहतात.
"महाजनो येन गतः स पन्था" ही युक्ती सामान्यांसाठी जरी सोपी असली तरी त्याने निर्वाह न लागता अखेरीस महाजनांच्या वर्तनाचे खरे तत्त्व कितीही गूढ असले तरी आत्म ज्ञानात शिरून विचारी पुरुषांस तेच शोधून काढणे भाग पडले.
*तसेच कोणताही सद्गुण अति होऊ देऊ नये, कारण हाच पुढे दुर्गुण होऊ शकतो कर्मनिर्णयाची ही युक्ती आहे तसेच नेमस्तही होऊ नये.
अविरोधातू यो धर्म : स धर्मः सत्यविक्रम
विरोधिषु महीपाल निश्चित्य गुरुलाघवम्
न बाधा विद्यते यत्र तं धर्म समुपाचरेत् ।
परस्परविरोधी धर्माचे तारतम्य किंवा लाघवगौरव,पाहूनच प्रसंगी आपल्या बुद्धीने खऱ्या धर्माचा किंवा कर्माचा निर्णय लागतो ( ममा. वन. १३१. ११, १२)
शास्त्र- अनेक शंका जेव्हा निघते तेव्हा मेंदूसमोरील ही गुंतागुंत काढून अर्थ सुगम करणे, डोळ्यासमोर घडणाऱ्या वा न घडणाऱ्या गोष्टींचे यथार्थ ज्ञान करुन देणे हे शास्त्राचे लक्षण आहे.
" अनेक संशयोच्छेदि परोक्षार्थस्य दर्शकम्"