गीतारहस्य चिंतन-२

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
8 Feb 2025 - 11:36 am

गीतारहस्य चिंतन -१
#कर्मजिज्ञासा२

* अस्तेय (चोरी)

एकाने यथान्याय मिळवलेली संपत्ती चोरून किंवा लुटून नेण्याची इतरांना मोकळीक मिळेल तर द्रव्यसंचय करण्याचे बंद पडून सर्वांचेच नुकसान होईल, समाजाची घडी विस्कळून सर्वत्र अनवस्था होईल हे निर्विवाद आहे. पण यासही अपवाद आहेत चोहोंकडे दुष्काळ पडल्यामुळे विकत, मजुरी करून, धर्मार्थहि अन्न मिळत नाही अशी आपत्ति प्राप्त झाल्यावर चोरीने आत्मसंरक्षण करण्याचे कोणी मनांत आणिल्यास त्यास आपण पापी समजू का?
बारा वर्ष दुष्काळ पडून विश्वामित्रावर असाच दुर्धर प्रसँग आला, व श्वपचाच्या ( कुत्र्याच्या मांसाची तंगडी) चोरून त्या अभक्ष्य अन्नाने आपला बचाव करण्यासाठी ते प्रवृत्त झाले (शां १४९).. '
जीवितं मरणात्श्रेयो जीवन्धर्ममवाप्नुयात्"

जगेल तर पुढे धर्म, म्हणून धर्मदृष्ट्याहि मरण्यापेक्षा जगणे श्रेयस्कर असे विश्वामित्रांनी यावेळी म्हंटले आहे.

पण जगणे हाच काहीं जगातील पुरुषार्थ नव्हे.

'मुहूर्त ज्वलितं श्रेयो न च धूमयितं चिरं (मभा उ१३२१५)

अंथरुणावर पडून कूजून किंवा घरांत शंभर वर्ष फूकट धुमसत पडण्यापेक्षा घटकाभर पराक्रमाची ज्योत दाखवून मेलास तरी बरे "
कारण 'देह त्यागिता कीर्ती मागे उरावी ।मना सज्जना हेचि क्रिया करावी||'

कोणत्या प्रसंगी जिवावर उदार होणे योग्य आणि कोणत्या प्रसंगी अयोग्य हे समजण्यास कर्माकर्मशास्त्राचाहि त्या बरोबर विचार करावा लागेतो. नाहीपेक्षा जीवावर उदार होण्याचे यश मिळणे दूर राहून मूर्खपणाने आत्महत्या केल्याचे पाप मात्र पदरांत पडण्याचा संभव असतो.

माता, पिता, गुरु वगैरे वंद्य व पूज्य पुरुषांची देवाप्रमाणे पूजा, शुश्रूषा करणे हाहि सामान्य व सर्वमान्य एक प्रधानधर्म आहे. कारण तसे न करणे कुटुंबाची, गुरुकुलाची किंवा एकंदर समाजाचीही नीट व्यवस्था कधीच राहणार नाही.

'न तेन वृद‌धो भवति येनास्य पलितं शिरः।

यो वै युवाप्यधीयानस्तं देवाः स्थविरं विदुः ।

डोके पांढरे झाले म्हणजे तेवढ्यानेच एखादा मनुष्य वृद्‌ध होत नाही, तरुण असला तरी ज्ञानवान त्याला देव म्हातारा समजतात. (म.भा.वन११३.)

राजा तर गुरुपेक्षांहि श्रेष्ठ अशी देवता आहे, परंतू त्यासही धर्म सुटत नाहीत, सोडिल तर नाश पावतो [म भा.शां ५९)

* काम, क्रोध आणि लोभ ही तिन्ही नरकाची द्वारे असून आपला नाशाची कारणे आहेत, पण काम व क्रोध हे शत्रू खरे के पण केव्हा? अनावर राहू दिल्यास....

सृष्टिक्रम चालू राहण्यास योग्य मर्यादेचे आंत त्यांची अत्यंत आवश्यकता आहे, ही गोष्ट शास्त्रकारांसहि संमत आहे.

लोके व्यवायामिषमदयसेवा नित्यास्ति जन्तो नहि तत्र चोदना । व्यवस्थितिस्तेषु विवाह यज्ञसुराग्रहैरासू निवृत्तिरिष्टा ।

या जगांत मैथुन, मांस व मद्य यांचे सेवन कर म्हणून कोणांस सांगावयास नको, ती मनुष्यास स्वभावतःच हवी असतात या तिहींची हि काही व्यवस्था लावावी, म्हणजे त्यांस मर्यादा किंवा आळा घालून व्यवस्थित रूप द्यावे या हेतूने विवाह, सोमयाग व सौत्रामणि यज्ञ यांची अनुक्रमे योजना केली आहे, त्यांतही निवृत्ती म्हणजे निष्कामाचरणच इष्ट होय. (निष्काम बुद्‌धीचे कर्म] (मम भाग - ११,१०-१४

* शौर्य, धैर्य, दया, शील, मैत्री, समता इ. सर्व सद्‌गुणांस काही मर्यादाही लागू आहेत.

' विपदि धैर्यमथाभ्युद‌ये क्षमासदसि वाक्‌पटुता युधि विक्रमः ।

संकटकाली धैर्य, उत्कर्षाचे वेळी क्षमा, सभेत वकृत्व व युद्धात शौर्य के गुण आहेत,

'देशे काले च पात्र च तद्‌द्दानं सात्विक विदुः'
देश, काल व पात्रता पाहून दिलेले जे दान तेच सात्विक होय.
* आचार कालामानाप्रमाणेच देशाचार, कुलाचार किंवा ज्ञातिधर्मति जमेंस धरावे लागतात, तरीही आचाराआचारांतहि तारतम्य पहावे लागते.

'न हि सर्वहितः कश्विदाचारः सम्प्रवर्तते ।

तेनैवान्यः प्रभवति सो ऽ परं बाधते पुनः ।।

सर्वांना सर्वदा एकसारखाच हितकारक असा आचार सापडत नाही. एक आचार घ्यावा तर दुसरा त्याच्या वरचढ असतो, व हा दुसरा आचार पत्करावा तर तो तिसऱ्याला पुनः विरुद्ध पडतो. "(शां२५९)

संसारात अनेक वेळी कठीण प्रसंग येतात कधी अहिंसा आणि आत्मरक्षण, कधी सत्य आणि सर्वभूतहित, कधी देहसंरक्षण आणि यश, कधी भिन्न भिन्न नात्यांनी उपस्थित होणारी कर्तव्ये यांत लढा पडून सर्वमान्य नीतीनियमांनी काम न भागता अनेक अपवाद कसे उत्पन्न होतात, त्यावेळ कर्तव्याकर्तव्याधमर्माचा निर्णय करण्यास काही कायमचे धोरण किंवा युक्ती आहे की नाही हे जाणण्याची इच्छा मनुष्यास होते.
त्यावेळी सूक्ष्म अभ्यासाची गरज असते.

इतिहासवाङ्मयआस्वादमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

9 Feb 2025 - 8:09 pm | प्रसाद गोडबोले

भक्ती ताई, हा लेख विस्कळीत झालाय !
मुख्य विषय काय आहे हेच कळत नाहीये.

पुलेशु

प्रगोदादा,ठीक आहे.अजून सुटसुटीत मांडण्याचा प्रयत्न करीत राहते.
हा भाग पहिल्या भागाचा कर्मजिज्ञासाचा दुसरा भाग आहे.सत्य, अहिंसा,अस्तेय या सारखी कर्म मनुष्य अनेकदा धर्म -अधर्म अशा द्वंद्वात टाकतात.तेव्हा याबाबत सूक्ष्म अभ्यास केला तर अनेकदा योग्य मार्ग जो इतरांचेही नुकसान करणार नाही आणि स्वतः चेही रक्षण करेल असा सापडतो.

या प्रकरणात टिळकांनी कर्म करतांना अनेक नीती शास्त्रानुसार कशा करायच्या,पाळायच्या यांचा संभ्रम पडत असतो‌ तेव्हा अपवाद कसा ओळखावा हे सांगितले आहे.तेव्हा काळानुसार धर्म बदलतो.नीतीस अनेक अपवाद असतात.अर्थात ते समजण्यासाठी सूक्ष्म अभ्यास असावा अथवा कृष्ण साथीला हवा.

भक्ती ताई तुमची ही गीतारहस्य चिंतन लेखमाला वाचून घरी असलेला गीतारहस्य ग्रंथ वाचायला सुरुवात केली आहे परंतु शंभर वर्षांपेक्षा जुनी मराठी वाचायला क्लिष्ट वाटते आहे आणि वर त्यातील तत्वज्ञान समजून घेणे जिकरीचे वाटते आहे तरीही नेटाने प्रयत्न करतो आहे.

ह्या ग्रंथावर एखादे सहज समजण्यासारखे भाष्य उपलब्ध आहे का?

परंतु शंभर वर्षांपेक्षा जुनी मराठी वाचायला क्लिष्ट वाटते आहे आणि वर त्यातील तत्वज्ञान समजून घेणे जिकरीचे वाटते आहे तरीही नेटाने प्रयत्न करतो आहे.

पण मला का इतकं सोप्पा वाटतोय बरे ;)
अतिशयोक्ती नाही.पण मी जवळपास २०२० पासून वैदिक संस्कृती समजून घेण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे मी युट्यूबवर अगणित चित्रफिती पाहिल्या.एका विषयातून दुसरा, त्यातून तिसरा अशी ही मालिका सुरूच आहे.म्हणजे इतर कमी असं मी म्हणतं नाही.असं म्हणतात, ज्ञानाचा सगळ्यांत उपयोगी मार्ग पुस्तक आहे.मला तर खुप मज्जा येतेय ;) :)

ह्या बद्दल सहमत आहे...

स्वधर्म's picture

10 Feb 2025 - 6:26 pm | स्वधर्म

टिळकांना गीता आपल्या आयुष्यातील कोणते निर्णय घेताना कशी उपयोगी पडली, अशी काही उदाहरणे या ग्रंथात तुमच्या वाचनात आली, तर वाचायला आवडेल. ज्ञानाइतकेच आचरण महत्वाचे, म्हणून विचारत आहे.