विचार

एआय आणि उत्पादकता

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
21 Sep 2025 - 7:40 am

आज म०टा०च्या संवाद या पुरवणीत माझा प्रसिद्ध झालेला नवीन लेख
ए०आय० आणि उत्पादकता

-- राजीव उपाध्ये

मांडणीविचार

अकराव्या वाढदिवसाचं पत्र: गोष्ट "बीलीव्हरची"!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
18 Sep 2025 - 11:08 am
मुक्तकव्यक्तिचित्रणप्रकटनविचार

गूढ उपरे पाहुणे

निनाद's picture
निनाद in जनातलं, मनातलं
16 Sep 2025 - 1:26 pm

गेल्या काही वर्षांपासून खगोलात काही नाविन्यपूर्ण घटना घडत आहेत. म्हणजे आपल्या सूर्यमालेत बाहेरून येणाऱ्या काही वस्तू. २०१७ पासून, आपल्याला फक्त तीनच अशा वस्तू माहीत झाल्या आहेत ज्या दूर अंतराळातून आपल्या सूर्यमालेत आल्या आहेत.

विज्ञानविचार

शशक- एका पायाचा कावळा

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
16 Sep 2025 - 1:11 pm

वडील गेल्याने अचानक सुट्टी घेउन त्याला भारतात यावे लागले. चुलत भावांनी सुरुवातीचे विधी केले होते, पण "निदान पिंडदानाला तरी ये" म्हणुन त्याला गळ घातली होती. गुरुजी आले. त्यानी सगळे विधी समजावुन सांगितले. त्यावर तो आढ्यतेने म्हणाला" माझा या सगळ्यावर अजिबात विश्वास नाही. केवळ थोडक्यासाठी वाद नकोत म्हणुन मी हे सर्व करायला तयार झालोय."

सगळे घाटावर पिंडदानाला जमले. बराच वेळाने एक कावळा पिंडावर उतरला आणि भाताची मूद चिवडु लागला. त्याला एकच पाय होता. याने काही वेळ पाहीले मात्र आणि धाय मोकलुन रडु लागला. गुरुजींना कळेना काय झाले? त्यानी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले.

मांडणीविचार

सारे काही एकाच जातीसाठी

स्वधर्म's picture
स्वधर्म in जनातलं, मनातलं
14 Sep 2025 - 3:48 am

टीपः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार नक्कीच करता येऊ शकतो, त्यावर न्यायालयात अनेक खटलेही चालू आहेत. पण हा लेख मराठा समाजाविषयी शासनाचा दृष्टीकोन कसा आहे त्याविषयी आहे.

आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील

धोरणसमाजजीवनमानविचार

हिंदुत्ववादी आणि उजवे

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
10 Sep 2025 - 12:24 pm

बरेच भारतीय हे हिंदुत्ववादी लोक आणि उजव्या विचारांचे लोक यामध्ये गल्लत करतात.

आधी बघू की हिंदुत्ववादी म्हणजे काय?

१) त्यांना हिंदू धर्मातले देव ही संकल्पना मान्य असते. ते राम , कृष्ण , शंकर , हनुमान असे जे जे हिंदू धर्मातले देव आहेत ते त्यांना मान्य असतात. ते त्यांच्या अस्तित्वाबद्दल चिकित्सा करत नाहीत. हे काहीसे आक्रमक असतात.

२) ते हिंदू धर्माबद्दल चुकीच्या शब्दात केलेली टीका , निर्भत्सना यांना कडाडून विरोध करतात.

धोरणधर्मभाषासमाजजीवनमानप्रकटनविचारसमीक्षाअनुभव

नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
10 Sep 2025 - 8:43 am

नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र
================

-- राजीव उपाध्ये

डॉ० बर्नाड बेल या फ्रेंच विद्वान-मित्राने मला मानववंशशास्त्राची गोडी लावली (माझ्या लग्नात त्याने माझ्या बाजूने साक्षीदार म्हणून सही केली होती).
मानववंशशास्त्राच्या परिचयाने जगभरच्या मानवीसंस्कृतींकडे बघायचा निकोप दृष्टीकोन प्राप्त झाला तर "सर्व काही भारतीय ते सर्वश्रेष्ठ" हा (सनातनी) दुरभिमान गळून पडला.

मांडणीविचार

माझ्या पुण्याचा माझा गणेशोत्सव

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
5 Sep 2025 - 1:15 pm

सात- आठ वर्षांपूर्वीची गोष्ट. गणपतीचे दिवस होते. एरवी पुण्यात असताना कधी घरी गणपती बसवले नाहीत; पण दिल्लीत पांडे, गुप्ता, अरोडा, ब्रार, यादव, खान, मोइत्रा, रेड्डी, अय्यर अशा शेजार्‍यांच्या आग्रहामुळे दाही दिवस रोज घरी गणपतीची तबला - पेटी - ढोलकच्या साथीत जोरदार आरती व्ह्यायची. रोज एका घरातून बाप्पांसाठी प्रसाद यायचा. आमच्या घरी गेल्या दोन पिढ्यांत बनले नसतील इतके उकडीचे मोदक त्या एका आठवड्यात बनवले गेले होते. एकंदर धमाल होती. पण पुण्यातला गणेशोत्सव अर्थातच मिस करत होतो.

संस्कृतीधर्मसमाजप्रकटनविचारसद्भावनाआस्वाद

चिमण्यांना सांभाळतांना

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
28 Aug 2025 - 10:32 pm

कु..कू..कू..डीजेवर गाणं दणाणून वाजत होती.इकडे १० वर्षांची लेक काय बीट्स म्हणत कू..कू..कू..म्हणू लागली.मी म्हटलं,"अगं गप्प बस,नको म्हणू हे गाणं, हे चांगलं गाणं नाही." आधीच लेक एकपाठी आहे.थांबवल नसतं तर गाणं पाठ करून,घर दारी हेच गाणं गात बसली असती
"चांगलं नाही.काय वाईट आहे यात?" तिला ह्याच गाण्याचा द्वयार्थ ,गाण्यावरची बंदी सांगितले.ती म्हणाली " गाणं लिहिणाऱ्याला हे कळत नव्हतं का?त्याने असं का गाणं लिहिलं."

मुक्तकप्रकटनविचार

विश्वगुरु, म्हासत्ता इ०

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
27 Aug 2025 - 12:31 pm

श्री० मोहन भागवत यांच्या २०२१ पासून आजपर्यंतच्या भाषणांचा ए०आय० च्या मदतीने सारांश काढायचा प्रयत्न केला. उद्देश असा की त्यातून विश्वगुरु, म्हासत्ता इ० गाजरांपर्यंत पोचण्यासाठी काहीतरी ठोस मार्ग किंवा कार्यक्रम मिळावा. पण तरूणांची उत्पादकता, कल्पकता आणि नोकर्‍यांची निर्मिती याविषयी ते काहीही बोलत नाहीत. वर दिलेल्या शब्दढगामध्ये "राम" हा शब्द ठळकपणे दिसतोय पण पेटंट हा शब्द अजिबात सापडत नाहीये (तुम्हाला दिसला तर मला नक्की सांगा).

जीवनमानविचार