जनातलं, मनातलं
सहज सुचलं म्हणून
सहज सुचलं म्हणून
( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी)
इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे.
श्रीगणेशदर्शन
||मोरया ||
काल संकष्टीचतुर्थी होती, श्रीगणेशाचे दर्शन "झालं" का ? नाही झालं ? लक्षात नाही राहिलं ? विसरुन गेलास ?
हरकत नाही , आत्ता करू दर्शन.
____________________________
मुळात शिवशक्ती द्वैत च नाही. जो शिव आहे तीच शक्ती आहे, जी शक्ती आहे तोच शिव आहे !
हे दोघे भिन्न आहेत असे वाटणे , हे द्वैत आहे , असे वाटणे हा "तुझा" विचार आहे .
अघमर्षण
अघमर्षण :
संध्येमधील एक महत्वाचा विधी. अघमर्षण म्हणजे पापाचा नाश करणे , त्याग करणे !
पण मुळात पाप म्हणजे काय ?
पाप, शिक्षा आणि प्रायश्चित्त म्हणजे नक्की काय ?
शिवशक्ती हे द्वैत आहे असं वाटणं हेच एक पाप.
त्या पापाची शिक्षा म्हणजेच द्वैत.
शिवशक्ती अद्वैत आहे असं वाटणं हेही एक पापच.
त्या पापाची शिक्षा म्हणजे असं "वाटणं".
उस्ताद झाकीर हुसेन. एक आठवण
उस्ताद झाकीर हुसेन.
अंदाजे चाळीस वर्षांपूर्वी झाकीर हुसेन यांना सवाई गंधर्व संगीत महोत्सवात पहिल्यांदा पाहिले.अत्यंत आकर्षक व्यक्तीमत्व असलेले झाकीर म्हणजे प्रचंड उत्साह ,आणि चैतन्य.ते मंचावर एकटे येत नसत .त्यांचा श्वासच जणू असलेला 'जीवलग 'तबला' दोन्ही हातात असे. त्यांच्या साठी ती निर्जीव वस्तू नव्हती.ते होते त्यांचे आराध्य दैवत!
उस्ताद झाकिर हुसेन - भावपूर्ण श्रद्धांजली
उस्ताद झाकिर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना त्यांच्याविषयी नेमके काय लिहावे याचा विचार करत होतो. युट्युबवरच्या काही चित्रफितींचा क्रमबद्ध वापर करत उस्तादजींच्या अष्टपैलू तबलावादनाचा आढावा घ्यावा असे वाटले. त्या दिशेने केलेला हा प्रयत्न.
एकल तबला वादनः
सायंकाळच्या गंमती जमती.
खूप म्हणजे खूपच पूर्वी, लहानपणी शाळेला जाताना मला बसचा कंडक्टर म्हणायचा,"ए पोरी, लवकर चढ. तुझं दप्तर पडतंय बघ." नंतर काही वर्षांनी कंडक्टर मला "ताई" म्हणायचा. मग मावशी, काकू म्हणायला लागला. या संबोधनातल्या चढत्या श्रेणीवरुन माझ्या वाढत्या वयाची श्रेणी तुमच्यासारख्या चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईल. त्यानंतर आता तर मी म्हातारी किंवा चांगल्या शब्दांत वृद्धा, वयस्कर, ज्येष्ठ नागरिक झालेली आहे.
इव्हेंटफुल रात्र
प्रसंग क्र. १....
खाडकन झोपमोड झाली. घड्याळ बघीतले रात्रीचे पावणे तीन वाजले होते.घाई घाईत खाली गेलो. पार्किंग मधे माझी लाडकी पाढंरी बजाज चेतक दिसली नाही. इकडे तिकडे शोधले पण कुठेच दिसत नव्हती.
धाग्याबाबा, प्रतिसादक आणि वाचकाची गोची
पात्रे:
1. धाग्याबाबा - राजकीय लेख लिहिणारा, वाद निर्माण करण्यात पटाईत
2. प्रथम प्रतिसादक - लेखावर जोरदार समर्थन करणारा
3. द्वितीय प्रतिसादक - लेखावर चिरफाड करणारा
4. वाचक - वादाच्या गोंधळात सापडलेला साधा नागरिक
---
जीवाभावाचा "सोबती": सोबती सेवा फाउंडेशन
✪ रोगाकडून आरोग्याकडे नेणारी वाट
✪ अवघड जागची दुखणी आणि संवादाची सोबत
✪ "मला मरण हवंय!"
✪ देखभाल करणार्यांसमोरच्या अडचणी
✪ मोबाईल व्यसनमुक्ती
✪ आनंद घेण्याचा अधिकार आणि अपराधभाव
✪ योग्य वेळी थांबण्याची कला
वाचावे ते नवलंच - 'अमीश' जीवनपद्धती! (पूर्वार्ध)
एखाद्या देशात आजही काही लाख लोकसंख्या असलेले कुठल्याशा धार्मिक पंथाचे लोक फक्त आठवी पर्यंत शालेय शिक्षण घेतात, उपजीविकेसाठी शेती, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन आणि हस्तकौशल्यावर आधारित उद्योग करून आपली उपजीविका चालवतात, आपल्या दैनंदिन जीवनात वीज वापरत नाहीत, टि.व्ही.
आज मी साबणाने आंघोळ केली
या कथेत माझ्या एका मित्राचा अनुभव आहे. जो मी माझ्या शब्दांत मांडला आहे. निवृत झाल्यानंतर मी दिल्ली पासून दूर उपनगरात एका फ्लॅट मध्ये राहू लागलो. मुलाचे लग्न होऊन चार किंवा पाच महीने झाले असतील. मुलगा आणि सून दोघेही नौकरी करणारे. त्यांची कार्यालये ही घरापासून 20 ते 25 किलोमीटर दूर. एनसीआरचे रस्त्यावरचे ट्रॅफिक पाहता दोघांना ही स्वतच्या गाडीने ऑफिस जायला दीड एक तास रोजच लागतो.
महाराष्ट्राचा निकाल: आकड्यांचे निष्पक्ष विश्लेषण
महाराष्ट्राचा निकाल अनेकांना धक्कादायक वाटत असेल. महाराष्ट्रातल्या गेल्या लोकसभा निवडणूकीचे आकडे तपासले तर सहज लक्षात येते हा निकाल अपेक्षित होता. निवडणूकीचे आकडे तपासल्यावर अनेकांचे भ्रम दूर होतील. या वेळी 66 टक्के मतदान झाले. लोकसभेपेक्षा 4.70 टक्के जास्त मतदान झाले. अल्पसंख्यक समुदाय 90 टक्के मतदान करतो मग मतदान 55 टक्के असो की 65 टक्के. याचा अर्थ वाढलेली 90 टक्के मते बहुजन समाजाची होती.
माझे काय चुकले? २.०
• घरी सत्यनारायण पूजेच्या प्रसादाला आलेल्या शेजारच्या काकूंना मी सांगितले, “सत्यपीर ही बंगालातील मुसलमानांची पूजा आपण कॉपी केली आहे.” घरचे भडकले आणि पूजा संपेपर्यंत मला घराबाहेर काढले. सांगा, माझे काय चुकले?
मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे
मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे
परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो.
- ‹ previous
- 2 of 993
- next ›