व्हिन्सेंट व्हान गॉग-अभिवाचन‌ प्रयोग

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
29 Sep 2025 - 2:06 pm

व्हिन्सेंट व्हान गॉग (१८५३-१८९०)
१
उर्सूलाच्या(युजेनी) प्रेमात पडलेल्या व्हॅन गॉग सुरुवातीच्या काळात अनेक शेतातील चित्रे रेखाटली .अगदी तिला लग्नाची मागणी घातली, पण त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला. तीने तिचे लग्न आधीच ठरल्याचे सांगितले. विन्सेंट च्या आयुष्यात प्रेमाची कमतरता कधीच भरून आली नाही.
२

विन्सेंट व्हॅन गॉग, एक डच चित्रकार, ज्याच्या जीवनाची कथा उत्कटतेने आणि दुखद घटनांनी भरलेली आहे. आयुष्यात जिवंतपणी त्याचे केवळ एकच चित्र विकले गेले. तरीही चित्रांची साथ त्याने शेवटपर्यंत सोडली नाही

सूर्यफूल "आणि "तारांगित रात्र" ह्या चित्रांनी त्याच्या मृत्यूनंतर त्याला अमरत्व दिले. - अशा रंगांच्या जा‌दूगाराची एकाकी कहाणी लेखक-आर्यविंग स्टोन यांनी लिहिली. ज्याचा अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी केले. हीच गोष्ट व्हान गाँगच्या चित्रांसह अभिवाचन‌ कलाकृतीद्‌वारे सादर करण्याचा यशस्वी प्रयोग शेखर नाईक यांनी साकार केला. धनेश, धीरेश, अवधा, अश्विनी यांनी आवाजाच्या अप्रतिम सादरीकरणातून या चित्रकाराची कथा उलगडून सांगितली.
३
खरे पाहता त्याच्या घरातच कलाक्षेत्रातील कलाकृतींचे विक्रीचे धागेदोरे होते. पण प्रेमाच्या शोधात विन्सेंट नंतर अजूनच एकाकी झाली पुढे त्यांना धार्मिक श्रद्‌धेची गोडी लागली व पाद्री बनण्याचा प्रयत्नही केला. याबाबतचे ऑफिशल पदवी ना तत्सम अभ्यासक्रम ते पूर्ण करू शकले नाही परंतू बेल्जियमधील बोरिनेज येथील कोळसा खाणी भागात त्यांनी मिशनरी म्हणून काम स्वीकारले.
४

तिथल्या गरीब लोकांप्रमाणे राहण्याचे ठरवून त्याने मोठे घर सोडून लहान झोपडीत राहायला सुरु केले. काळाचा घाला पडला एका दुर्घटनेत अनेक खाण कामगारांचा मृत्यू झाला .या दुःखाच्या काळात तो सामान्यांप्रमाणे त्यांच्यासोबत होता पण चर्चला हे प्रतिष्ठेला धक्का वाटल्याने त्यांनी त्यात्या लोक या पदावरून दूर केले.
तरीही पुढे या काळातील कथा सरकतांना खाणीतील कामगारांचे त्यांच्या कुटुंबाचे अशांततामय
कष्टमय जीवनही व्हिन्सेंटने चित्रात रेखाटले, जी चित्रे मी कधीच पाहिली नव्हती.
६
अशाच उतरत्या काळातही -कुपोषणाच्या अवस्थेत ते गेले.पण भावाच्या थिओ यांच्या सांगण्यावरून पुन्हा मन लावून चित्रे काढू लागला. भावाने दिलेल्या आर्थिक मदतीने चित्र काढत होता. घरालाही पिव‌ळा रंग दिला, yellow house तो त्याचा स्टुडिओ होता. पुढे एका वेश्येशी त्याची ओळख झाली तेथील वेश्यालयाचेही अनेक चित्र त्याने रेखाट‌ले. चित्रकार गॉगीनने त्याला आठवणीतून चित्र काढण्याची सूचना केली, त्यानुसार त्याने अनेक गर्द रंगांची चित्रे रेखाटली. पण चित्रकाराला पोटाची भूक अनेकदा मिटवता येत नसे .अशा अनेक ताणतणावात गोगीन- व्हेन गॉगची मैत्री तर तुटली पण कानही तुटला..... अशाच एका भ्रमाच्या वेळी व्हिन्सेंटने स्वतःचा कान कापला होता, तो कान त्याने वेश्यालयातील गॅबीला दिला...?
७

८

येलो हाऊस
९
व्हॅन गॉगला वेडा समजून त्याची रवानगी लोकांच्या तक्रारीमुळे मनोरुग्ण दवाखान्यात करावी लागली. तिथल्या डॉक्टर रे' यांच्या सहा‌नुभूती वागणूकीने त्याला हायसे वाटले असेल.तिथे क्लिनिक,बागा,प्रिझनर राऊंड, स्टाररी नाईट चक्रव्यूहाचे चित्र अशी अनेक चित्रं रेखाटली.
'स्टारसी नाईट' हे चक्रव्यूहासारखे चित्र याच काळात काढले.
@

परंतू १९९० नंतर गंभीर आजारात असतानाच गव्हाच्या शेतात स्वता:वर गोळी झाडली. तो आधीच अशक्त झाला होता, त्यात जखमेचा संसर्ग वाढून तीन दिवसातच व्हॅन गॉग मरण पावला. अंतिम काळातही भावाने 'थिओने धाव घेतली पण "दुःख कायमचे राहीले" गॉग मृत्यू पावला.

पोट्रेट, निसर्गचित्र, फुलं, ऑलिव्ह, फळबागा, शेतं, समुद्र होड्या अशी अनेक हिन्सेंट व्हॅन गॉग यांची चित्रे आज सर्वात अधिक मूल्य मिळवणाऱ्या चित्रांपैकी आहेत.पण विन्सेंट व्हॅन गॉग यांचे आयुष्य कायम दुःखमय राहिले.

#
त्याच्या आयुष्याच्या अनेक घटना अजून आहेत पण अभिवाचनाच्या वेळेमर्यादेमुळे थोडक्यात खुप कल्पकपणे व्हेन गॉग ऊर्जा रंगभवन येथे सादर झाला.
-भक्ती

कलामुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

कंजूस's picture

29 Sep 2025 - 6:15 pm | कंजूस

छान परिचय अभिवाचन कार्यक्रमाचा.

माधुरी पुरंदरे यांचे पुस्तक वाचले आहे मागेच.

कर्नलतपस्वी's picture

29 Sep 2025 - 6:32 pm | कर्नलतपस्वी

हेच म्हणतो. प्रचि छान आहेत.

Lust for life याच पुस्तकाचा माधुरीं पुरंदरे यांनी अनुवाद केला आहे का ?
वर 1990 ही एक छोटीशी चूक झालेली आहे अनवधानाने कंदाचीत.

हो, लस्ट ऑफ लाईफ हेच ते पुस्तक.
हो ते १८९० वाचावे.

Bhakti's picture

29 Sep 2025 - 7:47 pm | Bhakti

लस्ट *फॉर लाईफ

सुबोध खरे's picture

29 Sep 2025 - 8:27 pm | सुबोध खरे

आपल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी राजे शिवाजी संग्रहालयात सुद्धा वॅन गॉफ ची बरीच चित्रे आहेत.

मी ऍमस्टरडॅम येथे जाऊन व्हॅन गॉफ चे संग्रहालय पाहिले. २४ युरो तिकीट होते. म्हणजे आजमितीस जवळ जवळ ३००० रुपये.

त्यानंतर मुद्दाम आपल्या मुंबईतील छत्रपती शिवाजीराजे संग्रहालयाला भेट दिली असता आपले संग्रहालय किती श्रीमंत आहे ते लक्षात आले. अनेक युरोपीय चित्रकारांची चित्रे आहेत राजा रविवर्मा यांची सुद्धा.

अक्षरशः तीन तास पाहिल्यावरसुद्धा संग्रहालय बरेच बाकी होते. आणि तिकीट केवळ ६० रुपये.

आपल्याला आपल्या गोष्टींची किंमत नाही हेच खरे.

ज्यांना व्हॅन गोफ यांची चित्रे पाहायची इच्छा आहे त्यांनी मुंबईचा म्युझियम अर्थात छत्रपती शिवाजी राजे संग्रहालय याला जरूर भेट द्यावी

चौथा कोनाडा's picture

29 Sep 2025 - 10:17 pm | चौथा कोनाडा

खुपच अप्रतिम आहे व्हिन्सेंट व्हान गॉग-अभिवाचनाचा प्रयोग. माझ्या मित्रामुळे पुण्यातील एफटीआयआयच्या प्रेक्षागृहात हे अभिवाचन ऐकण्याचा योग आला.
त्यात अभिनेते गिरिश परदेशी आणि अभिनेत्री अश्विनी गिरी आणि इतर अभिवाचक होते....

हा लेख ही सुंदर ..... व्हान गॉग याच्या बद्दल उत्सुकता जागवणारा आणि अभिवाचन ऐकण्याचा अनुभव घेण्याला प्रवृत्त करणारा.

कुमार१'s picture

30 Sep 2025 - 7:32 am | कुमार१

छान परिचय व फोटो !

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

30 Sep 2025 - 4:22 pm | हणमंतअण्णा शंकर...

आर्ट मार्केटची ठासायला चीनची ही पेन्टिंग इंडस्ट्री : डाफेन

https://www.youtube.com/watch?v=1fDUTxddr4s

चित्रगुप्त's picture

1 Oct 2025 - 4:09 am | चित्रगुप्त

व्हिन्सेंट व्हान गॉगबद्दल सखोल माहितीसाठी खालील माहितीपट अवश्य बघावा :

बीबीसी डॉक्युमेंटरी (तीन भाग एकत्रितपणे, सुमारे अडीच तास)
Waldemar On The Life Of Vincent Van Gogh | Vincent: The Full Story (Full Series)
https://youtu.be/365r2m7_B10?si=zcy25utexGfjKbvX