जनातलं, मनातलं

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जनातलं, मनातलं
23 Feb 2024 - 20:56

सोम्या बाबा.

संज्याची आई आली तेव्हा मी खाटेवर लोळत पडलो होतो. खरतर पोटात कावळे ओरडत होते. कुणीतरी जबरदस्ती करून जेव म्हणून सांगावं म्हणून मी कितीतरी वेळ वाट पाहत होतो. पण आई सुद्धा लक्ष देत नव्हती.
"हे महाराज लोळत का पडलेत? आज खेळायला गेले नाय?" संज्याच्या आईनं माझ्या आईला विचारलं.
"रुसलाय," आई म्हणाली.
"कशाला?" संज्याच्या आईनं प्रतिप्रश्न केला.
"त्याला गाय हवेय," आई म्हणाली.

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
23 Feb 2024 - 11:00

गूढ कथा: अक्कल दाढ

(काल्पनिक कथा)

स्मिताके's picture
स्मिताके in जनातलं, मनातलं
21 Feb 2024 - 22:13

अपहरण - भाग ३

भाग २ - https://misalpav.com/node/51954

या घटनेला बरोबर एक आठवडा झाल्यादिवशी न्यू यॉर्क हेराल्ड वृत्तपत्रात एक जाहीरनामा छापण्यात आला. हा मसुदा कोणीतरी जाहिरात म्हणून पाच डॉलर्सच्या मोबदल्याबरोबर त्या वृत्तपत्राकडे पाठवला होता. त्यावर शिक्का होता, न्यू यॉर्क टपाल खाते, विभाग २. त्यावर पाठवणाऱ्याचा नावपत्ता नव्हता.

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
21 Feb 2024 - 12:54

द होल ट्रूथ!

जेव्हा पक्या मला रस्त्यात आडवा गेला तेव्हाच मला समजायला पहिजे होत कि आजचा दिवस काही आपला नाही.
“चल, काहीतरी पिऊया.”
“नकोरे. अगदी आत्ताच चहा पिऊन बाहेर पडलोय.”
“मी कुठे म्हणतोय चहा घे म्हणून. काहीतरी थंडा घेऊ या. लस्सी, कोक, लिंबूपाणी किंवा अमृत कोकम. उन बघ काय राणरणतेय. फारा दिवसांनी पकड मध्ये आला आहेस. खूप गप्पा पेंडिंग आहेत.”

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
18 Feb 2024 - 12:00

द्वेष्टे -भाग 2

त्या पाय-या रेघारेघांच्या सुती कापडानी आच्छादलेल्या होत्या. ॲबोजीनने पहिल्या मजल्यावरील उजळलेल्या खिडक्या बघितल्या ,त्याक्षणी त्याचा थरथरता श्वास अगदी स्पष्ट ऐकू येत होता.

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
18 Feb 2024 - 11:25

द्वेष्टे -भाग 1

सुप्रसिद्ध रशियन लेखक अंतोन चेखाॅव यांच्या Enemies/एनिमीज कथेचा हा भावानुवाद. ज्यानी वाचली नसेल त्यांच्यासाठी आणि वाचली आहे त्यांच्यासाठीही.कारण त्यांच्या अनुवादाबद्दलच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील ]

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जनातलं, मनातलं
17 Feb 2024 - 18:37

पाकिस्तान-४

.

स्मिताके's picture
स्मिताके in जनातलं, मनातलं
17 Feb 2024 - 04:06

अपहरण - भाग २

९ जूनला सकाळी अकरा वाजता वॉशिंग्टन पोलीस खात्याच्या प्रमुखांना बरोबर घेऊन इन्स्पेक्टर बायरन्स राज्यसचिवांच्या घरी गेले, आणि त्यांच्या खाजगी भेटीची मागणी केली. तिथे खूप गडबड उडाली होती. सर्व राजकीय महत्त्वाच्या व्यक्ती तिथे हजर होत्या. त्यांची व्हिजिटिंग कार्डं आत पाठवली जात होती. त्या भयंकर बातमीवर तावातावाने चर्चा झडत होत्या. टपाल खात्यातून येणाऱ्या तारांचा तर जणू पाऊस पडत होता.

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
16 Feb 2024 - 22:13

ही बाईपण भारी देवा

ही बाईपण भारी देवा

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
16 Feb 2024 - 19:35

शापित डबल धमाका: थोर स्वातंत्र्यसैनिक-वैज्ञानिक - पांडुरंग सदाशिव खानखोजे

पांडुरंग सदाशिव खानखोजे हे नाव आपल्याला शालेय पाठ्यपुस्तकात कधी वाचायला मिळाले नसेल. ना इतिहास विषयात ना भूगोलात. राजकीय व्यक्तींना काही विशिष्ट विचारांचे वावडे असते वा काही विचारधारा त्यांना अडचणीच्या वाटतात. शालेय पाठ्यपुस्तकात काही थोर व्यक्तींना हेतुपुरस्सर वगळलेले आढळून येते तर काही व्यक्तींचे अवाजवी उदात्तीकरण केलेले दिसून येते.

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
16 Feb 2024 - 16:31

असा मी असामी.

माझ्या आवडत्या लेखकांच्या यादीत हल्लीच एका नव्या लेखकाची भर पडली आहे. भेदक आणि चमकदार लिखाण. त्यांनी लिहिलेलं एक ललित वाचून मला धक्का बसला. ह्या लेखकाला मी केव्हा भेटलो? अगदी डिट्टो मला समोर ठेवून ते ललित लिहिले गेले असणार. मला ओळखणाऱ्या मोजक्या लोकांचा मी मनोमन आढावा घेतला. तर त्यात ह्या नावाचा कोणीही नव्हता. पण नंतर विचार केला कि हल्ली काय लोक टोपणनाव नाव घेऊन लिहितात.

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
14 Feb 2024 - 08:24

व्ही फॉर - भाग चार - अंतिम

व्ही फॉर - भाग चार - अंतिम

--------------------------------

त्यांच्या गॅंगमध्ये एक उत्तमसिंग नावाचा पोरगा होता. मध्य प्रदेशातला. त्याच्या सहाय्याने तिकडून भारीभारी शस्त्रास्त्रं यायची . थातूरमातूर गुन्हेगारीपण आता काळाबरोबर बदलली होती .

दिप्या आणि आणखी चार पोरं पळाली . आधी नाशिक , गुजरात आणि मग तिथून मध्यप्रदेशांत एके ठिकाणी .

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
13 Feb 2024 - 22:49

आकाश दर्शनाची पर्वणी! तारे जमीं पर!!

कल्पना चावला स्पेस एकेडमीच्या विद्यार्थ्यांसोबत आकाशातल्या खजिन्याची लूट

✪ तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी रात्रभराचं आकाश दर्शन शिबिर
✪ मुलांचा आनंदमेळा आणि ता-यांचा झगमगाट
✪ “रात है या सितारों की बारात है!”
✪ मृग नक्षत्र? नव्हे, हा तर मोssssठा तारकागुच्छ!
✪ प्रकाश प्रदूषण नसलेलं अप्रतिम आकाश आणि तारकागुच्छांची उधळण

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
13 Feb 2024 - 21:09

व्ही फॉर - भाग तीन

व्ही फॉर - भाग तीन
----------------------------
रियाला किडनॅप केल्याचं तिने आई-वडिलांना सांगितलं होतं . बापरे! साधी मध्यमवर्गीय माणसं ती . घाबरलीच . पोरीला किडनॅप केलं, त्यात तो नामचीन गुंडा ! पण पुढे त्यांच्या कानावर असं आलं की त्याच्यावर हल्ला झालाय . तो वाचेल याची शक्यता फारच कमी आहे. पण त्यांनी एक केलं . त्या क्षणापासून त्यांनी रियासाठी स्थळ बघायची सुरुवात केली.

स्मिताके's picture
स्मिताके in जनातलं, मनातलं
12 Feb 2024 - 21:41

अपहरण - भाग १

८ जून १८९३. सकाळी दहा वाजताची वेळ. न्यू यॉर्क, शिकागो, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को, बॉस्टन..सर्व मोठ्या शहरांतल्या स्थानिक वृत्तपत्रांच्या इमारतींबाहेर प्रचंड गर्दी जमली होती. पूर्वी जेम्स गारफील्ड या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येनंतर अशी गर्दी झाली होती म्हणतात. रात्रीपर्यंत तर इतकी खळबळ माजली, की लिंकन यांच्या हत्येच्या दिवसाची आठवण यावी.

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
12 Feb 2024 - 21:27

व्ही फॉर – भाग दोन

व्ही फॉर – भाग दोन
--------------------
मयत उरकून ते परत निघाले.

गाडीत खास पोरं होती ; पण सगळेच शांत होते . कारण दिप्या शांत होता. पोरांना वाटत होतं की भाई दुःखात आहे - मोठ्या भाईच्या . ते खरंही होतं; पण दिप्या या क्षणाला डबल दुःखात होता .

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
12 Feb 2024 - 08:37

पैज.

मी आपला माझ्याच धून मध्ये गाडी चालवत होतो. शिल्पा रावची गाणी ऐकत.
कलंक नाही...
हवाके साथ साथ. घटाके संग संग. रस्ता असा कि जणू तेरी चाल है नागीन जैसी.
माझी गाडी म्हणजे जुना खटारा. मेकानिक म्हणतो, “आता बस झालं. मी पण कंटाळलो. मोडीत काढा. कंडम गाडी. भंगार मध्ये टाका. दुसरी घ्यायला झालीय.”

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
11 Feb 2024 - 20:27

व्ही फॉर ... (भाग १)

व्ही फॉर ... (भाग १)
-----------------
दिप्या एक गँगस्टर होता . मोठा भाईचा उजवा हात !

त्या दिवशीची सकाळ उजाडली तीच भयानक खबर घेऊन... मोठा भाई त्यांच्या गॅंगचा डॉन होता . त्याची हत्या करण्यात आली होती.

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
11 Feb 2024 - 09:28

वार्तालाप: अहल्या शिळा राघवे मुक्त केली

अहल्या शिळा राघवे मुक्त केली
पदी लागतां दिव्य होऊनी गेली.
जया वर्णिता सिणली वेदवाणी
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी.