जनातलं, मनातलं
लालची कावळा आणी नाचण
ही लिंक आपल्याला तू नळीवर घेऊन जाईल. चित्रफित बघा. रोजच्या पक्षीदर्शनात विविध पक्षांचे मानव सदृश्य स्वभाव बघायला मिळतात. ते बघताना प्रकृतीबद्दलचे कुतुहल आणखीन वाढत जाते.
रेकमेंडेशन लेटर
रेकमेंडेशन लेटर
==========
पूर्वप्रसिद्धी - फेबु, ऑगस्ट २०२४
माझ्या आईवडीलांनी मला बरंच काही दिलं, पण त्यात काही गुण द्यायचे ते विसरले. ते जन्मत: मिळाले असते तर आतापर्यंतचे आयुष्य जास्त सोपं गेलं असतं...
हे गुण कोणते?
- कोडगेपणा, गेंड्याची कातडी आणि हलकटपणा
हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ (ऐसी अक्षरे ३१)
गेला महिनाभर खंडेरावाच्या घराचे आम्ही सदस्य होतो.खाणदेशातले मोरगाव आमचच गाव होत :) :)
क्विक कॉमर्स आणि आपण
फार फार वर्षांपूर्वी कोणे एके काळी घरपोच फक्त पत्र आणि बिलं यायची. मग डॉमिनोज आणि पिझ्झा हट मुळे अर्ध्या तासात घरी पिझ्झा यायला लागला. फ्लिपकार्ट वरून पुस्तकं आणि मग एक एक करत सगळंच यायला लागलं. झोमॅटो, स्विगी यावरून जेवण मागवणं आता फार जुनी गोष्ट झाली. प्रत्येक लोकप्रिय हॉटेल बाहेर बघितलं तर या डिलिव्हरी वाल्यांची येजा सुरु असते.
आपरेशन सिंदूर : ट्रंप तात्या कोमात
ओपेरेशन सिंदूर नंतर ट्रंप तात्या कोमात गेले असे वाटू लागले आहे. तात्या एखाद्या मतिभ्रष्ट माणसासारखे बरगळू लागले आहे. नुकतेच ते म्हणाले भारत-पाक युद्धात अनेक जेट पडले. पण कोणाचे ते मात्र सांगू शकले नाही. अमेरिकेचे शेकडो आकाशात गमन करत हेरगिरी करणारे उपग्रह आणि सीआयए त्यांना खरी माहिती देऊ शकले नाही.
भाषिक अधःपतन आणि लिमिट n->0
भाषिक अधःपतन आणि लिमिट n->0
______
#स्वांत:सुखाय्
#मनुवादी सनातनी लेखन
________
काही आठवड्यांपूर्वी हा लेख सुचलेला पण सारखं सारखं तेच तेच काय लिहित बसायचं म्हणून कंटाळा करत होतो. पण आता हे निमित्त झाले आहेच तर लिहीन म्हणतो.
गर्भलिंग आणि पर्यावरण
गर्भलिंग आणि पर्यावरण
=====================
गर्भाचे लिंग निश्चित होण्यास वाय-गुणसूत्र कारणीभूत असते असे मानले गेले आहे. पण वाय गुणसूत्रावरील Sry या जनुकाचे गर्भधारणेच्या काळात काम बिघडले तर लिंगदोष निर्माण होतात. पर्यावरण यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पाडत असते.
फौजा सिंह- Turbaned Tornado!
नमस्कार. फौजा सिंह! जेव्हा मला त्याचं नाव कळालं, तेव्हा वाटलं की, सोशल मीडीयावरची ही अफवा असावी. पण नाही! ते अविश्वसनीय असलं तरी खरं होतं. वयाच्या फक्त ८९ व्या वर्षी ते धावायला सुरूवात केली! आणि लवकरच ९० व्या वर्षी मॅरेथॉन पळायला सुरूवात केली- म्हणजे ४२ किलोमीटर! त्यांची पहिली मॅरेथॉन सव्वा सहा तासांमध्ये त्यांनी पूर्ण केली!
कवडसे
तबल्याचा क्लास झाला होता आणि गुरुजींबरोबर गप्पा मारत बसलो होतो. सहसा अशा वेळी काहीतरी किस्से ऐकायला मिळत. तर विषय निघाला पिंजरा चित्रपटाचा. तर प्रभात स्टुडिओ मध्ये "ग साजणी -आली ठुमकत नार लचकत " या गाण्याचे रेकॉर्डिंग चालू होते. गाणे वरच्या पट्टीत होते त्यामुळे हाय पीच आवाज असणारा गायक पाहिजे होता. प्रभात मध्ये साफसफाई करणाऱ्यांचे मुख्य विष्णू वाघमारे म्हणून होते.
वार्तालाप: संपन्न बनण्याचा मार्ग
जाणपण निरूपण समासात समर्थांनी आध्यात्मिक प्रगती सोबत संसारात संपन्न आणि वैभवशाली बनण्याचा मार्ग ही सांगितलेला आहे. समर्थ म्हणतात, समाजात आर्थिक आणि सामाजिक विषमता नेहमीच असते. अजाणते पणे लोक राजकीय व्यवस्थेला दोष देतात, काही प्रारब्धला दोष देतात. भारतात अनेक राजनेता सामाजिक विषमतेचा उपयोग जातीय, भाषिक आणि प्रांतीय आधारवर प्रजेत भेद टाकून निवडणूक जिंकण्यासाठी करतात.
ब्रेकींग - नैराश्य != केमिकल लोच्या
ब्रेकींग - नैराश्य != केमिकल लोच्या
======================
एक महत्त्वाच्या व्यापक आढाव्यातून आढळले आहे की नैराश्य हे रासायनिक असंतुलनामुळे होते याला कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत.
ग्रोक४
ग्रोक४
===
बहुचर्चित ग्रोक४ चे नुकतेच अनावरण झाले. मी ग्रोक३ ची सशुल्क सेवा घेत असल्याने आणि मी त्याबाबत समाधानी असल्याने ग्रोक४ काय करणार याची उत्सूकता होतीच.
ग्रोक४ च्या लोकार्पणाचा समारंभ इथे बघायला मिळाला.
https://www.youtube.com/watch?v=MtYsUdfZPMA
डीग्री!
माझी डिग्री अर्धवट राहिलीय
मी तळमळतोय,
नेहमी, रोज.
कधी होईल पूर्ण?
का होत नाहीये?
का राहताहेत विषय?
मराठी अस्मिते साठी : उच्च शिक्षण मराठीत द्या.
काही महिन्यांपूर्वी मराठीचिये नगरी पुण्याला गेलो होतो. बाप आपल्या दोन वर्षाच्या मुलीशी आंग्ल भाषेत बोलत होता. दोन्ही उच्च शिक्षित नवरा -बायको ही त्याच भाषेत बोलत होते. दोन दिवस तिथे राहिलो आणि मला आपण "अनपढ़ गंवार" आहोत असा फील येऊ लागला. त्याची लेक बाहेर खेळताना इतर मराठी मुलांशी हिन्दीत मिश्रित आंग्ल भाषेत बोलत होती. बाहेर हिन्दी आणि घरात आंग्ल. लेकीसाठी मराठी भाषा परकी झाली होती.
- ‹ previous
- 4 of 1008
- next ›