शिक्षा.....

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
11 Sep 2025 - 4:24 pm

टप्पी टप्पी टप्पी.... छोटा मन चेंडू खेळण्यात मग्न होता. खेळता खेळता त्याच्या हातून चेंडू निसटला आणि आईने कट्ट्यावर मांडून ठेवलेल्या काचेच्या कपला धडकला. कप खाली पडला आणि फुटला. सुमित्रा हे डोळ्याच्या कोपर्‍यातून पहात होती. तीला पहायचे होते की आता मन काय करतो. एक समजूतदार पालक म्हणून तीने यावर लगेच व्यक्त व्हायचे मुद्दामुनच टाळले.
"मम्मा माझ्या कडून कप फुटला. मला शिक्षा सांग" . मनच्या वाक्याची सुमित्राला गम्मत वाटली. आणि मन खोटे बोलला नाही याचे बरेही वाटले.
" कप फुटला ना मग शिक्षा ही हवीच. तूच ठरव काय शिक्षा घ्यायची ते" सुमित्रा म्हणाली.
" मी कोपर्‍यात पाच मिनीटे अंगठे धरून उभा रहातो" मन ने स्वतःच शिक्षा ठरवली आणि तो कोपर्‍यात उभा राहिला.
खळ्ळ..... सुमित्राकडून धुवत असताना बेसीन मधे एक कप फुटला. मन हे पहात होता हे सुमित्रालाही जाणवले.
" बघ माझ्याकडूनही चूक झाली. आता तू मला शिक्षा दे." सुमित्रा म्हणाली.
" ते चुकून झाले ना!. तू काय मुद्दाम होऊन केले आहेस? चुकून झाले त्याला शिक्षा कशाला द्यायची" मन च्या उत्तरावर सुमित्रा नि:शब्द झाली

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

11 Sep 2025 - 5:23 pm | युयुत्सु

आधुनिक झेन/जातक कथा!

श्वेता व्यास's picture

11 Sep 2025 - 6:29 pm | श्वेता व्यास

आवडली.
आमचं लहानपण आठवले, लहानपण कशाला; अजूनही तसंच आहे. आईकडून कप फुटला की इथे कोणी ठेवला आणि आईने ठेवलेला कप इतरांकडून फुटला की नीट बघता येत नाही का तुम्हाला. :D

श्वेता२४'s picture

11 Sep 2025 - 10:39 pm | श्वेता२४

लहानपण कशाला; अजूनही तसंच आहे
अगदीच असं होतं...

अभ्या..'s picture

11 Sep 2025 - 6:49 pm | अभ्या..

विजूभाऊ सारख्या कसलेल्या लेखकाकडून इतकी प्रायमरी प्रतिलिपी स्टाइल भाबडी कथा अपेक्षित नाही.
असो...

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Sep 2025 - 9:58 pm | अमरेंद्र बाहुबली

नाहितर काय? अतिशय दवनिय कथा आहे. वाचून सगळा मूड गेला आता एखादी मचाक वाचल्याशिवाय किंवा नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र धागा वाचल्याशिवाय मूड बनणार नाही. ;)

युयुत्सु's picture

12 Sep 2025 - 7:59 am | युयुत्सु

नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र धागा वाचल्याशिवाय मूड बनणार नाही. ;)

हा हा हा हा

विजुभाऊ's picture

12 Sep 2025 - 10:31 am | विजुभाऊ

अरे बापरे....
अभ्या भाउ.... मनावर घेतो तुमचे म्हणणे. नक्की.
एखादी झ्याक प्रेमकथा तळायला घेतो.

अभ्या..'s picture

12 Sep 2025 - 2:45 pm | अभ्या..

एखादी झ्याक प्रेमकथा तळायला घेतो.
होऊं द्या खरपूस अगदी.

छान. नवीन काळात कमी आकारात काही कथा आणि आशय बसवणे ही गरज आहे.

ही गोष्ट आमच्या काळातली होती.

आजच्या काळात अशी पनिशमेंट द्यायला हवी.

तू मला" डबल टाॅपिंग पिझ्झा,फ्रेंच फ्राईड आणी दोन तास एक्स्ट्रा स्क्रिन टाईम दे ",

बादवे,हाताचे आंगठे का पायाचे?

असंका's picture

13 Sep 2025 - 6:04 am | असंका

सत्य वचन!!
आवडली गोष्ट!!

धन्यवाद!!

पर्णिका's picture

15 Sep 2025 - 8:41 am | पर्णिका

छोटीशी गोष्ट आवडली.
आपल्या मुलांकडून येणारे असे टँजेन्ट्स आपले अनुभवविश्व समृद्ध करतातच पण माणूस म्हणून घडवतातदेखील.
मी लिहिन माझे काही अनुभव, इतरांचेही वाचायला आवडतील. :)