||श्री कातळोबा प्रसन्न||
ढिशक्लेमर – हा दशावतारचा review नाही. फक्त काही आठवणींची साठवण.
शनिवारी दुपारी घरातली सगळी कामं आवरली आणि बहिणीला call केला - ‘ए वैदू, उद्या दशावतार बघायला जायचं का?’ “हो चल ना, जाऊ की, मी येऊ शकते.” आमच्या बहिणाबाई काहीही आढेवेढे न घेता, अगदी पहिल्या झटक्यात सिनेमा बघायला यायला तयार झाल्या हा माझ्यासाठी अगदी सुखद धक्का होता. म्हणलं मॅडमचा मूड बदलण्याआधी पटकन तिकीट काढून घेऊ. तिकीट book केले आणि facebook उघडले. एव्हाना दशावतारचे reviews यायला लागले होते. एक-एक review वाचून मला अगदी तळ्यात – मळ्यात होत होतं. शेवटी मोबाईल बाजूला ठेवून मस्तपैकी झोप काढली.
दुसऱ्या दिवशी मला जास्त वाट बघायला न लावता वैदू वेळेवर आली, दशावतार बघून झाला, खादाडी झाली, धो-धो पाउस पडत होता म्हणून मग मॉलमध्ये थोडा वेळ window shopping पण झाली. पुढचे काही दिवस, म्हणजे अगदी आजसुद्धा सगळीकडे दशावतारचाच बोलबाला सुरु आहे. काही positive, काही negative, काही mixed reviews. कोणी कथेबद्दल लिहित होते, कोणी शेवटच्या पथनाट्याच्या प्रसंगाबद्दल, तर कोणी काही dialogue बद्दल. Most of the reviews मध्ये सगळ्याच कलाकारांचे अगदी भरभरून कौतुक करण्यात आले होते. सर्वांनी खरच कौतुक करण्यायोग्यच काम केलेले आहे. मला मात्र राहून राहून एक प्रश्न सतावत होता की बाबुली मेस्त्रीचे डोळे तपासणाऱ्या डॉक्टरांची भूमिका करणारा कलाकार कोण ?
जवळपास पन्नास एक review वाचून झाले होते. गुगलला विचारून झाले. पण त्या डॉक्टरांचे नाव काही कुठे सापडत नव्हते. शेवटी #cinemagully वर Mandar Vanita Vijay Rajapurkar यांनी लिहिलेल्या review मध्ये कळले की डॉक्टरांची भूमिका करणारा कलाकार म्हणजे ‘गुरु ठाकूर’.
(ऑ, ते तर कविता लिहितात ना, मराठी सिनेमांसाठी कथा लिहितात, गाणी बिणी लिहितात. ते अॅक्टिंगपण करतात हे तर अजिबातच माहीत नव्हते.)
गुरु ठाकूर आणि त्यांची बायको एकदा कोणत्या तरी cooking show मध्ये आले होते. त्यामध्ये त्यांनी बहुतेक नागपुरकडच्या दोन recipes करून दाखवल्या होत्या आणि मधून मधून त्यांचा struggle आणि industry मधल्या त्यांच्या सगळ्या प्रवासावर प्रश्न-उत्तरे, असा सगळा तो episode होता. अर्थात आई-बाबांनी तो episode पाहिला होता. आई was so overwhelmed with his life story, की त्या अर्ध्या तासाच्या episode ची सगळी story तिने मला तासभर रंगवून रंगवून सांगितली होती. गुरु ठाकुरांबद्दल काही ऐकण्याचा तो माझा पहिला आणि शेवटचा प्रसंग. माझा स्वभावच मुळात गद्य, त्यामुळे पद्य या विषयाकडे ... असो ...
गुरु ठाकुरांनी सादर केलेला डॉक्टर खरच कमाल. मुळात हे सगळं सांगण्याचे कारण म्हणजे माझा डॉक्टर मामा. डॉक्टर मामाचा दवाखाना होता तिसगावला. त्या छोट्याश्या गावामध्ये मामाने किती तरी तऱ्हेचे पेशंट पाहिले असतील. तऱ्हेचे आणि तऱ्हेवाईकसुद्धा. काही परिस्थितीने गांजलेले तर काही वृत्तीने. मात्र आपला प्रत्येक पेशंट बरा व्हावा ही त्याची तळमळ, काही प्रसंगी पेशंटना पथ्य पाणी समजाऊन सांगावे आणि कधी अजिबात ऐकतच नाही म्हणल्यावर ultimetum देऊन सांगावे, आपण शहरामध्ये राहतो म्हणून जास्त जाणवत नाही परंतु छोट्या गावांमध्ये medical field मध्ये काम करताना येणारे वेगवेगळे challenges - या सगळ्या बाबतीत अनेक किस्से माझे मामेभाऊ नरेंद्र आणि अनिरुद्ध सांगायचे. अनिरुद्धने तर खरं म्हणजे त्याच्या किश्श्यांचे एक पुस्तकच छापावे.
आमचा मामा म्हणजे अगदीच संत माणूस. पेशंटबद्दल त्याची आत्मीयता, पेशंटला आणि सोबतच्या नातेवाईकांना धीर देणे (emotionally आणि बरेचदा financially सुद्धा). गुरु ठाकुरांनी त्याच आत्मीयतेने आणि तळमळीने साकारलेल्या त्या ५-७ मिनिटांच्या प्रसंगामध्ये माझा मामाच मला आठवत होता.
मला आजोळी म्हणजे तिसगावला जाण्याचे प्रसंग माझ्या वाट्याला फार कमी आले पण अगदी prominently आठवणारी गोष्ट म्हणजे गावच्या bus stand वर उतरलं की मामाच्या घरी जाण्याच्या वाटेवर आधी मामाचा दवाखाना लागायचा. त्यामुळे आधी दवाखान्यात घुसून मामाला वर्दी दिली जायची. तिथे उगीच prescription pads बघायचे, stethoscope कानाला लावून heart beats ऐकायचे आणि वर परत “मामा, stethoscope दवाखान्यात ठेवू नको, घरी येताना सोबत घेऊन ये हं” असं सांगून आणि सगळा टाईम पास करून मग बागडत बागडत घरी जायचं अशा सगळ्या आठवणींची उजळणी या निमित्ताने झाली. ही उजळणी विस्मरणात जायला नको म्हणून ही आठवणींची साठवण.
----
प्रतिक्रिया
26 Sep 2025 - 3:16 pm | चौथा कोनाडा
व्वा मस्त लेख !
गुरू ठाकुरांचा डॉ मस्तच आहे.
दशावतार निमित्ताने डॉक्टर मामा आणि त्यांचा दवाखाना हे स्फुट आवडले. आनंद देणारी अशी आठवण !
त्या काळचे डॉ पैश्या पेक्षा माणुसकी ला महत्व देत .... आता सर्वच बदलले आहे.
कालाय तस्मै नम:
27 Sep 2025 - 8:11 pm | अनामिक सदस्य
तिसगाव, चाळिसगाव, अशी अजून काही नावात सन्ख्या असलेली गावान्ची नावे आहेत का?
28 Sep 2025 - 6:48 am | सुक्या
पाचगणी
बारामती
एकगाव
-- ऊगाच आपले काहीतरी - - -
सोलापुर (१६ पुर)
सातारा (७ तारा)
28 Sep 2025 - 4:35 pm | कॉमी
बत्तीस शिराळा
29 Sep 2025 - 10:27 pm | चौथा कोनाडा
चोवीसावाडी
28 Sep 2025 - 9:48 am | कर्नलतपस्वी
पंचमढी
एखतपुर(एक)
साडेसतरानळी
29 Sep 2025 - 8:14 am | कर्नलतपस्वी
+ १
29 Sep 2025 - 7:00 pm | सिरुसेरि
सांगली ( सहा ६ गल्ली )
29 Sep 2025 - 7:01 pm | सिरुसेरि
सांगली ( सहा ६ गल्ली )
30 Sep 2025 - 6:03 am | कर्नलतपस्वी
सातपूर
तिन्हेवाडी
30 Sep 2025 - 7:21 pm | स्वधर्म
साडे सतरा नळी - हडपसर जवळ
चौफुला - पुणे सोलापूर रोड
पाचवा मैल - सांगली ते पलूस रस्त्यावर