✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

Adrian Levy व Catherine Scott-Clark लिखित "अण्वस्त्रांबाबतची फसवणूक"

स
सुधीर काळे यांनी
Tue, 01/26/2010 - 14:38  ·  लेख
लेख
  • फसवणूक-प्रकरण पहिले: एक रागाने भडकलेला तरुण
  • फसवणूक-प्रकरण दुसरे: प्रकल्प "लोणी कारखाना"
  • फसवणूक-प्रकरण तिसरे: "मृत्यूच्या दरीत"
  • फसवणूक-प्रकरण चौथे: "कवड्या!"
  • प्रकरण पाचवे: फसवणूक-पाकिस्तान, अमेरिका व अण्वस्त्रांचा गुप्त व्यापार
  • 'फसवणूक'-प्रकरण सहावे-ज्यूंचा कल्पनाविलास
  • फसवणूक-प्रकरण सातवे-पाकिस्तानी अणूबॉम्ब सार्‍या मुस्लिम जगताचा!
  • फसवणूक-प्रकरण आठवे-अननसाचा केक
  • फसवणूक-प्रकरण ९-नेत्रपल्लवी करणारे ज. आइन्सेल (The Winking General)
  • फसवणूक-प्रकरण दहावे-"बांगड्या ल्यायलेले बदमाष!"
  • फसवणूक-प्रकरण अकरावे-"क्रांतिकारी रक्षकांचे पाहुणे" (Guest of the Revolutionary Guard)
  • फसवणूक-प्रकरण १२: प्रकल्प "A/B" (Project A/B)
  • फसणूक-प्रकरण तेरावे: "चेस्टनटस् व उकडलेला मासा" (Chestnuts and Steamed Fish)
  • फसवणूक-प्रकरण १४: एक नवी स्पष्ट दिशा
  • फसवणूक-प्रकरण १५: एक अरक्षित भगदाड (The Window of Vulnerability)
  • फसवणूक-प्रकरण १६: मुश आणि बुश
  • फसवणूक-प्रकरण १७: मोहीम फत्ते!
  • फसवणूक-प्रकरण १८: आपल्याला त्यांनी कुत्र्यांच्या तोंडी घातलंय्!
  • फसवणूक-प्रकरण १९: नवी विचारसरणी
  • न्यूक्लियर डिसेप्शन: प्रकरण२०-जागृती (Awakening)
  • फसवणूक-प्रकरण २१-उपसंहार (Afterword)

Book traversal links for Adrian Levy व Catherine Scott-Clark लिखित "अण्वस्त्रांबाबतची फसवणूक"

  • फसवणूक-प्रकरण पहिले: एक रागाने भडकलेला तरुण ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
148341 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

अभिनंदन .

रामदास
Tue, 01/26/2010 - 15:00 नवीन
पुढचे भाग वाचायला उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments

पुढचे भाग जसे लिहून होतील तसे मी येथे अपलोड करेन

सुधीर काळे
Tue, 01/26/2010 - 15:19 नवीन
धन्यवाद. पुढचे भाग जसजसे लिहून होतील तसतसे मी येथे अपलोड करेन. ------------------------ सुधीर काळे एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ, कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

अतिशय

बंडू बावळट
Tue, 01/26/2010 - 15:15 नवीन
अतिशय सुंदर उपक्रम. रामदासांप्रमाणेच मीही वाचायला उत्सुक! बंड्या.
  • Log in or register to post comments

छान उपक्रम

सुनील
Tue, 01/26/2010 - 15:28 नवीन
पुढे वाचण्यास उत्सुक. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

चांगला उपक्रम

चिरोटा
Tue, 01/26/2010 - 15:46 नवीन
पुढील भाग वाचण्यास उत्सुक. छोटीशी सुधारणा-
जेंव्हा प्रे. रेगन यांची कारकीर्द १९७९ साली संपली
असे न राहता- जेंव्हा प्रे. रेगन यांची कारकीर्द १९८९ साली संपली असे पाहिजे. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments

अशा एकाग्रतेने लेख वाचल्याचे कौतुक करावे तितके थोडेच!

सुधीर काळे
Tue, 01/26/2010 - 20:36 नवीन
'भेंडि'साहेब, टंकनातली चूक ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. अशा एकाग्रतेने लेख वाचल्याचे कौतुक करावे तितके थोडेच! मलाही बरे वाटले. चूक दुरुस्त केली आहे. पुनश्च धन्यवाद देतो. ------------------------ सुधीर काळे एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ, कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

चांगला उपक्रम आहे.

प्रमोद देव
Tue, 01/26/2010 - 16:20 नवीन
काळेसाहेब,आपला उपक्रम खूपच चांगला आहे. जे काही वाचतोय ते खरंच धक्कादायक आहे. पडद्याच्या पुढे आणि मागे चालणारे राजकारण किती परस्परविरोधी असते हे आता सर्वांना ठाऊक झालेले आहे. तरीही हे जे काही वाचतोय ते खरोखरच अकल्पित असे आहे आणि तितकेच सुरस देखिल आहे. असेच लिहिते राहा. आम्ही वाचायला उत्सुक आहोत. ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments

तुम्ही घेत

अजय भागवत
Tue, 01/26/2010 - 17:00 नवीन
तुम्ही घेत असलेल्या भाषांतराच्या कष्टाची जाणीव आहे. मुळ पुस्तक कसे असावे त्याचीही सहजपणे जाणीव होते. तुम्हाला ह्या कामासाठी शुभेच्छा. लोगो-नोलोगो, डॉक्टर विच अशा पुस्तकांतून अमेरीकन कार्पोरेट क्षेत्राची वैचारीक दिवाळखोरी माहीत झालीच होती. एन्रॉन हा तर टीप ऑफ आइसबर्ग असेल असे किस्से त्या पुस्तकात आहेत. एक अमेरीकन ज्यु असलेल्या ओळखीच्या माणसाने मला अमेरीकन कार्पोरेटमधे होणार्‍या महीलांच्या शोषणाच्या ज्या कथा ऐकवल्या होत्या त्यानंतर एक प्रकारची घ्रुणा त्याबद्दल वाटली होती व आहे. व ९/११ नंतर आणि रशिया-अफगाणिस्तान-अमेरीका अशा समीकरणातून बाहेर पडलेला भस्मासूर ह्याबाबत अनेक छोटे-मोठे लेख वाचल्यानंतर अमेरीका सरकारचा सहभाग कॉज की इफेक्ट हे समजले होतेच. तरीही सगळ्या देशात असतात तसे जागरुक नागरीक अमेरीकेतही आहेत आणी त्यांच्यापैकीच एका द्वयीने जीवाला उदार होऊन हे लिखाण केले आहे असे वाटले.
  • Log in or register to post comments

सुंदर उपक्रम

jaypal
Tue, 01/26/2010 - 18:33 नवीन
हा भाग आवडला Image removed. Image removed.Image removed.अणि पुढील भागांची ओढ लागली आहे, तेव्हा लवकर येऊद्यात. पुढील लिखाणास शुभेच्छा *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

अभिनंदन

आनंदयात्री
Tue, 01/26/2010 - 20:30 नवीन
अभिनंदन .. पुढचे भाग वाचण्यास उत्सुक !
  • Log in or register to post comments

वा! काळेकाका

निमीत्त मात्र
Tue, 01/26/2010 - 21:26 नवीन
वा! काळेकाका लेखमालेचे स्वागत आहे. पहिला भाग वाचून मिपाकरांसाठी ही मेजवानीच आहे असे दिसत आहे.
  • Log in or register to post comments

वाचतो आहे

श्रावण मोडक
Tue, 01/26/2010 - 21:41 नवीन
वाचतो आहे. एक सूचना - पुस्तकातील मजकूर आणि तुमची मते (जर अशा लेखांमध्ये मांडलेली असतील तर) यात काही अंतर राखता येईल का याचा विचार करा. म्हणजे मतप्रदर्शन करताना कशाविषयी लिहितो आहे हे वाचकाच्या ध्यानी येईल!
  • Log in or register to post comments

मूळ लेखकांच्या 'ताजमहाला'ला माझी 'वीट' लावायला कसंसंच वाटेल!

सुधीर काळे
Tue, 01/26/2010 - 21:52 नवीन
नाहीं. मी आधी प्रत्येक प्रकरणाचे संक्षिप्तीकरण करतोय् व नंतर त्या संक्षिप्त आवृत्तीचे "निव्वळ" भाषांतर करतोय्. माझी मते कुठेच मी लिहिणार नाहींय्. चुकून माकून सटकलं तर गोष्ट वेगळी. पण नाहींच होणार. लेव्ही व स्कॉट-क्लार्क यांच्या 'ताजमहाला'ला माझी 'वीट' लावायला कसंसंच वाटेल! ------------------------ सुधीर काळे एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ, कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

ठीक आहे

श्रावण मोडक
Tue, 01/26/2010 - 22:18 नवीन
हे ठीक आहे. पण तुम्हाला तुमचेही मत मांडण्याचा अधिकार आहे. मांडावेसे वाटले तर जरूर मांडा. कारण इथं तुम्ही काही नुसता (व्यापारी-व्यावसायीक) अनुवाद करत नाहीये. जे करता आहात ते आऊट ऑफ युवर ओन इंटरेस्ट आणि बहुतांशी सार्वजनिक हितार्थ म्हणता येईल अशा हेतूंतून करीत आहात. फक्त मते मांडलीत तर ती वेगळी ठेवा इतकेच मला सुचवायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

सल्ल्याबद्दल धन्यवाद. विचार करेन.

सुधीर काळे
Wed, 01/27/2010 - 07:25 नवीन
सल्ल्याबद्दल धन्यवाद. विचार करेन. ------------------------ सुधीर काळे एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ, कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

काका,ही

मदनबाण
Wed, 01/27/2010 - 05:17 नवीन
काका,ही लेखमाला वाचावयास उत्सुक आहे... :) आपला हा उपक्रम फार आवडला. पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे... जाता जाता :--- अमेरिकन सेनेची इराक मधे होणारी हानी यू-ट्यूब वरील अनेक व्हिडीयोत दिसुन येते... ied attacks on us in iraq किंवा sniper attack in iraq असा शोध घेतल्यास पाहावयास मिळणारे व्हिडीयो धक्कादायक आहेत !!! मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments

चांगला उपक्रम

अक्षय पुर्णपात्रे
Wed, 01/27/2010 - 07:35 नवीन
सुधीरकाका, उपक्रम आवडला. पुढील भाग वाचण्यास उत्सुक. धन्यवाद. ................................................... I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सहज
Wed, 01/27/2010 - 07:46 नवीन
चांगला उपक्रम. वाचतो आहे.
  • Log in or register to post comments

उत्तम

विजुभाऊ
Wed, 01/27/2010 - 14:02 नवीन
उत्तम लेखमाला. उत्तम इन्फोटेन्मेन्ट. Image removed.
  • Log in or register to post comments

असेच माहितीपूर्ण लेख येत राहू देत

पारंबीचा भापू
Wed, 01/27/2010 - 15:06 नवीन
सुधीरभाऊ, चांगला जमलाय लेख. अशा वाचनाने आम्हाला बरीच नवीन माहिती मिळत आहे. असेच माहितीपूर्ण लेख येत राहू देत. धन्यवाद. भापू
  • Log in or register to post comments

उत्तम उपक्रम काळेकाका!

चतुरंग
Tue, 02/02/2010 - 08:43 नवीन
अमेरिकी सरकारांचे हे काळे कारनामे खरोखर जगासमोर यायलाच हवेत. मराठीतून पुस्तक अनुवादण्याचा तुमचा निश्चय वाखाणण्याजोगा आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी तुम्ही घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. पुढील भाग वाचायला उत्सुक! चतुरंग
  • Log in or register to post comments

इतके कष्ट

संदीप चित्रे
Wed, 02/03/2010 - 01:36 नवीन
घेऊन लेखमाला लिहायला घेतल्याबद्दल धन्यवाद काळेकाका ! पुढचे भागही नक्की वाचणार.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सुधीर काळे
गुरुवार, 02/04/2010 - 12:44 नवीन
चतुरंग यांनी इथे तसेच खासगीत मला खूप प्रोत्साहन दिले याबद्दल खास आभार. पुढचे प्रकरण (प्रकरण-१: संतप्त तरुण) उद्या-परवापर्यंत चढवू शकेन असे वाटते. ------------------------ सुधीर काळे Parkinson's Laws 1. Work expands to occupy time available. 2. Bureaucrats add subordinates, not rivals. 3. In meetings, time spent on a point is inversely proportional to its importance!
  • Log in or register to post comments

स्तुत्य

गणपा
गुरुवार, 02/04/2010 - 13:22 नवीन
स्तुत्य उपक्रम. आवर्जुन वाचतो आहे. पु.अ.शु.
  • Log in or register to post comments

मी हे असे करेन. म्हणजे word to word भाषांतर वाटणार नाही.

जयंत कुलकर्णी
Sat, 04/10/2010 - 18:35 नवीन
अनेक वृत्तपत्रांत आलेल्या अग्रलेखांत कुणाच्या फायद्यासाठी त्यांनी हा कबूलीजबाब दिला असावा याबाबतही तर्‍हेतर्‍हेच्या अटकळी प्रसिद्ध झाल्या. प्रेसिडेंट जॉर्ज बुश यांनीही या फसवणुकीला जणू संमतीच दिली. कांहीं दिवसांनंतर ते म्हणाले, "खान यांनी त्यांचे सारे गुन्हे मान्य केले आहेत आणि त्यांचे या गुन्ह्यातील सहकारी आता या धंद्यातून बाहेर फेकले गेले आहेत. खान व त्यांचे छोटे टोळके अतीशय धक्कादायक गुन्ह्यांबद्दल दोषी आहेत. पण त्यांच्यावर खटला घालायची गरज दिसत नाहीं. बुश पुढे म्हणाले, "प्रेसिडेंट मुशर्रफ यांनी मला आश्वासन दिले आहे कीं ते खान यांच्या जालाबद्दलची (network) सर्व माहिती अमेरिकन सरकारला देतील व तो देश (पाकिस्तान) अशा अण्वस्त्रप्रसाराच्या मुळाशी असू दिला जाणार नाहीं." पाकिस्तान सरकारचे या घटनेवर इतके पूर्ण नियंत्रण आहे कीं खान व त्यांच्या सहकारी शास्त्रज्ञांना अमेरिकेत खटला घालण्यासाठी अमेरिकेच्या किंवा इतर पाश्चात्य राष्ट्रांच्या स्वाधीन करण्याची गरज नाहीं. माझे - अनेक वृत्तपत्रातल्या त्या काळातील अग्रलेखात त्यांनी हा कबूलीजबाब कोणाच्या फायद्यासाठी दिला असावा या विषयी अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होतो. प्रेसिडेंट बूश यांच्या संमतीशिवाय हे होणे शक्यच नव्हते असेही म्हट्ले जात होते, कारण काहीच दिवसांनी बूश महाशयांनी आपले तोंड उघडले " खान यांनी त्यांचे सर्व गुन्हे मान्य केले आहेत आणि त्यांच्या या गुन्ह्यातील सहकार्‍यांचे उद्योग आता बंद पड्ले आहेत. खान व त्यांचे सहकारी अत्यंत घृणास्पद अशा गुन्ह्यांचे दोषी आहेत पण त्यांच्यावर आरोप ठेउन खटला चालवण्याची आता आवश्यकता वाट्त नाही. पाकिस्तानचे अध्यक्ष श्री. मुशर्रफ यांची खात्री देत, ते पुढे असेही म्हणाले" प्रेसिडेंट मुशर्रफ यांनी मला असे आश्वासन दिले आहे की डॉ. खान व त्यांच्या टोळीच्या जाळ्यासंबधी सर्व माहीती ते अमेरीकेला देतील आणि अणवस्त्रप्रसाराचे मुळ पाकिस्तान असणार नाही याची काळजी घेतील. पाकिस्तानच्या सरकारचे या प्रकरणावर संपूर्ण नियंत्रण असून डॉ. खान व त्यांच्या सहकार्‍यांवर आरोप शाबित करुन त्यांच्या वर खटला चालवण्यासाठी त्यांना अमेरीकेच्या किंवा इतर पाश्चात्य देशांच्या ताब्यात देण्याची मुळीच गरज नाही' अर्थात तुमचे चांगलेच आहे. जयंत कुलकर्णी.
  • Log in or register to post comments

रुपांतर जास्त सुबक

शशिकांत ओक
Sat, 04/10/2010 - 19:17 नवीन
सुधीरजी, आपण इतके कष्ट घेऊन मराठीकरण करून लिहिता आहात. तेच आम्हाला अत्यंत आदरणीय व प्रिय आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या महायुद्धातील रम्य(?) कथांप्रमाणे या गोष्टी वाचून सोडून द्याव्यात अशा नाहीत. येथे वर्णित घटनांतील- कथनांतील मूळपात्रे व त्यांच्या कारवाया या इतक्या ताज्या आहेत की त्यांच्या परिणामाची झळ आजच्या वाचकांना बसणारी आहे. हे जगातील राज्यकर्त्यांनी ओळखून निदान आतातरी कणखरपणे हिरव्या अणुराक्षसाला कसे रोखावे याची आखणी करून प्रत्यक्षात आणावे असे अपेक्षित असले तरी जगाच्या एकंदरीत चालींचा प्रवाह आत्मविनाशाकडे आहे, हे स्पष्ट दिसत असताना कोणी त्याची फिकीर करताना दिसत नाही. उलट घटना त्यात तेल घालण्याचे काम करताना दिसतात. जयंतरावांचे रुपांतर जास्त सुबक आहे. तथापि पुढील काही भागातील काही उताऱ्यातील शब्दांचे जसेच्यातसे भाषांतर करावे लागेल. शशिकांत
  • Log in or register to post comments

आहो

जयंत कुलकर्णी
Sat, 04/10/2010 - 19:45 नवीन
:-) आहो ओकसाहेब, ही माझी टिका नव्हती. वाचन रंगतदार आणि मराठी वाटायला पाहिजे म्हणून लिहायचा उद्योग केला. तुम्ही The Yearling चे मराठीतले भाषांतर वाचले आहे का ? प्रत्येक भाषांतरकाराने तसे भाषांतर करायचे ध्येय ठेवले पाहिजे. काळ्यांना सहज शक्य आहे. फक्त तसा दृष्टीकोन ठेवला पाहिजे. असो चूक झाली असेल तर............... जयंत कुलकर्णी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

जयंत, मी

शशिकांत ओक
Sat, 04/10/2010 - 22:10 नवीन
जयंत, मी कुठे म्हणतोय ती तुमची टीका आहे म्हणून. उलट आपले रुपांतर सरस आहे. काळ्यांना तसे सरावाने व इतरांच्या प्रोत्साहनाने येईल. माझे म्हणणे धाग्यातील विचारांवर जास्त भर देणारे आहे. त्यावर आपला अभिप्राय काय आहे ते कळले असते तर आवडले असते. शशिकांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

धन्यवाद!

सुधीर काळे
Mon, 04/12/2010 - 12:18 नवीन
खरं सांगायचं तर मलाही हे जाणवलं होतं. नंतरची प्रकरणे पाहिल्यास माझे भाषांतरप्रविण्य सुधारले आहे असेच मला वाटते. सकाळला पाठवायच्या आधी इथे माझे लेख चढविण्याचा हाच उद्देश होताकीं इथे झालेल्या टीकेचा व सूचनांचा मी उपयोग करून घेऊन मगच ते 'wider audience' पुढे मांडायचे! त्यानुसार 'सकाळ'ला पाठवायच्या आधी हे प्रकरण मी पुन्हा सुधारून लिहिले आहे! सुधीर काळे, जकार्ता ------------------------ दोन अत्यंत वाचनीय दुवे: http://www.dnaindia.com/opinion/main-article_dynasty-vs-government_1368625 (DNA) व http://indiatoday.intoday.in/site/Story/89840/Inhuman+rights.html?complete=1 (India Today)
  • Log in or register to post comments

भले बहाद्दर

ss_sameer
Sun, 01/21/2018 - 12:44 नवीन
लगे रहो
  • Log in or register to post comments

ही लेखमाला गायब झाली.

आनन्दा
Wed, 07/18/2018 - 11:16 नवीन
ही लेखमाला गायब झाली. लिंका उघडत नाहीत.
  • Log in or register to post comments

अण्वस्त्रांबाबतची फसवणूक"

जयन्त बा शिम्पि
Fri, 08/14/2020 - 18:06 नवीन
आन्तर जालावर मूळ पुस्तक उपलब्ध आहे काय ? असल्यास लिन्क देवू शकता काय ? एका दमात वाचून काढण्याचा विचार आहे.
  • Log in or register to post comments

अण्वस्त्रांबाबतची फसवणूक"

जयन्त बा शिम्पि
Fri, 08/14/2020 - 18:06 नवीन
आन्तर जालावर मूळ पुस्तक उपलब्ध आहे काय ? असल्यास लिन्क देवू शकता काय ? एका दमात वाचून काढण्याचा विचार आहे.
  • Log in or register to post comments

अण्वस्त्रांबाबतची फसवणूक"

जयन्त बा शिम्पि
Fri, 08/14/2020 - 18:17 नवीन
ज्यांना अधिक माहिती हवी असेल त्यांनी https://nsarchive2.gwu.edu/nukevault/ebb333/index.htm या साइटवर पहावे. पुराव्यानीशी लेख आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि

माझ्याकडे मूळ छापील पुस्तक

मनो
Fri, 08/14/2020 - 22:01 नवीन
माझ्याकडे मूळ छापील पुस्तक आहे - अमेरिकेत कुठे असाल तर पाठवून देऊ शकतो .... पुस्तक अलीकडचे असल्याने PDF देणे बेकायदेशीर आहे. भारतात किंडल एडिशन रु. ४४९ इथे आहे https://www.amazon.in/Deception-Pakistan-United-Nuclear-Weapons-ebook/dp/B00JCC02SW/ या लेखकांची इतरही पुस्तके वाचनीय आहेत. मला सर्वात आवडलेले amber room. काश्मीरवरचे पुस्तक विचार करण्याजोगे आहे. आणि अर्थातच The Siege.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा