भटकंती

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
4 Nov 2019 - 20:02

बुरहानपूर आणि महेश्वर - २ (अंतिम)

दिवस तिसरा - ०१ जून

स्मिता दत्ता's picture
स्मिता दत्ता in भटकंती
4 Nov 2019 - 12:35

क्रोएशियाची राजधानी झाग्रेब !!!!

सकाळी लवकर उठल्यावर आधी कपड्यांची अवस्था पाहिली.तसे बऱ्यापैकी वाळलेले होते. एखाद-दुसरा दमट असलेला मी ड्रायर ने वाळवून घेतला. बॅगा भरल्या. घर व्यवस्थित आवरून घेतलं. भांडीकुंडी जागच्या जागी ठेवून दिली. नाश्त्याचा डबा घेतला. आम्ही बरोबर यादी सकाळी सात वाजताची टॅक्सी बोलावली. सव्वासात ला टॅक्सी आली आणि ऍना पण आली. तिला बाय करून आम्ही निघालो.,बस स्टेशनला पोहोचलो पण आमची बस अजून लागायची होती.

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
2 Nov 2019 - 21:42

बुरहानपूर आणि महेश्वर

भारतातल्या सगळ्या राज्यांमधलं मध्य प्रदेश हे माझं आवडतं राज्य आहे. मला जुने महाल, गढ्या, राजवाडे, किल्ले, मंदिरं, छत्र्या, मशिदी, थडगी आणि स्मारकं पहायला आवडतात. मध्य प्रदेशात हे सगळं मुबलक आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं हे राज्य आताशा नुकतंच प्रसिद्धीच्या झोतात येत असल्यामुळं इथे गर्दी कमी असते, शिवाय महाराष्ट्राला लागून असल्यामुळे ते पोहोचायलाही सोयीचे आहे.

अनिकेत वैद्य's picture
अनिकेत वैद्य in भटकंती
25 Oct 2019 - 17:50

मदत हवी आहे म्हैसूर उटी ट्रिप

म्हैसूर उटीला ह्या दिवाळीत जाण्याचा प्लॅन नक्की आहे. आम्ही दोघे + ८ वर्षाचा मुलगा सोबत आहे.
स्वतःचे वाहन नेणार नाही.
रविवार, २७ ऑक्टोबर पुणे ते म्हैसूर प्रवास
सोमवार २८ ऑक्टोबर आणि मंगळवार २९ ऑक्टोबर म्हैसूर दर्शन
बुधवार ३० ऑक्टोबर म्हैसूर ते उटी बस ने
३०, ३१, १ नोव्हेंबर उटी दर्शन

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
23 Oct 2019 - 23:10

( २ ) चांदेला आणि बुंदेला प्रांत भटकंती

( २ ) चांदेला आणि बुंदेला प्रांत भटकंती

मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणांची भटकंती झाली त्याची माहिती अगोदरच्या ( १ ) चांदेला आणि बुंदेला प्रांत भटकंती या लेखात दिली आहे. फोटो बरेच असल्याने काही फोटो या लेखात देत आहे.
( शिल्प ओळख श्रेय - प्रचेतस. )
खजुराहो

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
18 Oct 2019 - 16:09

( १ ) चांदेला आणि बुंदेला प्रांत भटकंती

मागच्या आठवड्यात खजुराहो, झाशी, ओरछा अर्थात चांदेला आणि बुंदेला प्रांतात भटकंती झाली.

गाभा

अर्पित's picture
अर्पित in भटकंती
18 Oct 2019 - 15:59

बेंगलोर ट्रिप मधे काय का पहावे ??

मी सहकुटंब 21 डिसेंबर ते 30 डिसेंबर रोजी बंगलोर जायची योजना केली आहे.

बेंगळुरू मधे मित्रचया घरि रहनार आहे पन काही दिवस जवळपास भटकंती करायचा मानस आहे।

दिमातीला मित्रचि गाडी आसेलच.

मित्र सोबत नसताना सुधा आसपस कुठे फिरता येईल त्यासाथी मार्गदर्शन करावे.

अंतरजलावर पहिल्यनादा मराठी लिहितोय त्यामुले शुद्धलेखनासाथी माफी असावी

गतीशील's picture
गतीशील in भटकंती
18 Oct 2019 - 14:55

मदत हवी आहे

माझा एक जवळचा मित्र माद्रिद, स्पेन येथे २ वर्षासाठी जाणार आहे. त्याला तिथे भाड्याने फ्लॅट मिळवून देण्यासाठी कोणी मदत करू शकेल का? तो, त्याची पत्नी आणि १ वर्षाचा मुलगा असे तिघे राहणार आहेत तिथे.

स्वच्छंदी_मनोज's picture
स्वच्छंदी_मनोज in भटकंती
17 Oct 2019 - 20:42

सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ६

आज खुप दिवसांनी पुढचा भाग टाकतोय. मध्यंतरी न लिहीण्याचे कारण की कामाच्या रगाड्यामुळे लिहायला वेळ झाला नाही हे दुसरे पण खुप दिवसात मनाजोगा ट्रेक झाला नाही हे पहीले आणी मुख्य कारण :)
------------------------------------------------------------------------
पहील्या पाच भागांच्या लिंक्स.

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
15 Oct 2019 - 21:15

गंदीकोटा आणि बेलम गुहा - २ (अंतिम भाग)

दिवस ३

आजचा दिवस तसा आरामाचा होता. बेलम गुहा पाहणे आणि घरची गाडी पकडणे ही दोनच कामे आज करायची होती. उठलो आणि सुर्योदय पहाण्यासाठी धावतपळत घळीकडे निघालो. पण सुर्योदय आमच्या नशिबात नव्हता. ढगांमुळे सुर्यमहाराजांचे दर्शन झाले ते चार बोटे वर आल्यावरच. एका जोडप्यानं रात्र इथेच दगडांवर काढलेली दिसत होती. कल्पना छान होती. पुढच्या वेळी कदाचित?

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
14 Oct 2019 - 21:43

गंदीकोटा आणि बेलम गुहा - १

मला फिरायला प्रचंड आवडतं. आणि फिरण्याखालोखाल मला काही आवडत असेल तर ते प्रवासवर्णनं वाचणं. हाताशी भरपूर रिकामा वेळ असावा, एखाद्या सुंदर जागेचं रसाळ भाषेत केलेलं प्रवासवर्णन समोर असावं, आणि हातात कॉफीचा कप असावा, अहाहा, क्या बात है!

स्मिता दत्ता's picture
स्मिता दत्ता in भटकंती
10 Oct 2019 - 11:26

अना ..... अर्थात क्रोएशियन समाज ..!!!!!!!

सकाळी उठून समुद्रावर फिरायला गेलो. तिकडे तुरळक लोक जॉगिंगला आलेले. बरेचसे लोक कुत्र्यांना फिरवायला घेऊन आलेले. कुत्र्यांना फिरवणारे सर्रास सगळीकडे दिसतात. एकूणच युरोपात कुत्री, मांजर पाळण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यांची कुत्री पण शिस्तीची असतात. उगाच कुणाच्या अंगावर धावून जात नाहीत आणि उगाच भुंकत हि नाहीत. कितीतरी कुत्री मोकळीच निवांत चाललेली. मागून त्यांचे मालक येत होते.

मालविका's picture
मालविका in भटकंती
7 Oct 2019 - 16:19

ओ साथी चल ....

ओ साथी चल ....

Yogesh Sawant's picture
Yogesh Sawant in भटकंती
30 Sep 2019 - 14:38

सह्याद्रीतले हिरे माणके

महाराष्ट्राच्या पश्चिम भागात किनारपट्टीला समांतर पसरलेली जी डोंगररांग आहे तिला आजकाल Western Ghat असं म्हणतात. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमाभागापासून सुरु झालेली हि डोंगररांग महाराष्ट्राच्या पलीकडे गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोचते. पृथ्वीवरच्या सर्वात जास्त जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी हि एक जागा आहे.