पाऊसः ३

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
2 Jul 2025 - 6:46 pm

पाऊस: १

पाऊसः २

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जूनमध्ये येणारा पाऊस मे च्या मध्यातच सुरु झाला. भाजून काढणार्‍या एप्रिलनंतर मे मात्र सुखद गारवा देऊन गेला. सह्याद्रीच्या विकट शिखरांवरती पाऊसकाळाची चाहूल दाटून आली, नभमंडळावर गडद मेघांची सैन्ये आक्रमू लागली. क्षितिजाच्या कडांवरुन सावळ्या ढगाण्चे घोडदळ आकाशाला व्यापून टाकू लागले. वारा अंगणभर धावू लागला, हिरव्या पानांशी कानगोष्टी करु लागला. अचानक एखादी मेघमाला वार्‍यासंगे नृत्य करुन डोंगराच्या कपारीत अडकू लागली आणि त्यातून स्त्रवणार्‍या पाण्याचे झरे निसर्गरागाचे सूर छेडू लागले.

मेघैः संकुलितो व्योम, गर्जितैः कम्पितं जगत्।
वर्षास्रवणशीतेन, नूतनं जीवनं यथा॥

आकाश मेघांनी भरलेले आहे, त्यांचे गडगडणे जग कंपवित आहे. पावसाच्या थेंबांनी शीतलता पसरु लागली आहे आणि नवे जीवन उमलू लागले आहे.

a

सह्याद्रेरुचिरं रूपं, शिखराणां सुसंहतिः।
नीलच्छायाम्बुधाराभिः, भूषितं जलवृष्टिभिः॥

सह्याद्रीचे सौंदर्य त्याच्या शिखरसमूहात आहे; निळ्या छटेच्या जलधारांनी आणि पावसाच्या थेंबांनी ते सुशोभित झाले आहे.

a

सहियस्सिं सिरिमुत्तिअ, मेहमाला विलम्बिअ।
आवरिअ गगणं सारा, हरिवल्ली विअ दिस्सइ॥

एखाद्या मूर्तीच्या गळ्यात जशी मोत्यांची माळ जशी शोभूम दिसते तशी सह्यगिरीच्या गळ्यावर ही मेघमाला शोभून दिसत आहे. हरीत तृणांनी आच्छादलेली ही भूमी गगनाला विलक्षण देखणं बनवत आहे.

a

पवसबिण्दु विअ मुग्गा, पसिणं धरिअं वसुंधरा।
पवसस्स पहिलं सिन्नं, पम्हट्ठं जण धरिणी॥

पावसाचे मोत्यांसारखे दिसणारे थेंब धरित्रीवर पसरत आहेत. पावसाने झालेले पहिले स्नान ह्या वसुंधरेला जणू नववधूसारखी शोभा देत आहे.

a

सिहगज्जं विअ मेहं, गुञ्जइ दिस्सइ अंबरं।
गगणमणिवलय भित्ती, मेहमाला विलम्बिअ॥

मेघ जणू सिंहासारखी गर्जना करुन आकाशाला व्यापून टाकू लागले आहेत. मेघांची ही माला गगनावर जणू मण्यांच्या भिंतीसारखी शोभा देत आहे.

a

मेघालीलां ललितविलसत्संहतं चञ्चलं,
नीलाम्बोधरमालिकामिव नभो मूर्धनि।
नृत्यन्तं जलदानमुपशृणु मदोन्मत्तवत्,
धाराभिर्विलसन्ति दिशः शीतलैः कम्पिताः॥

मेघांची लीला चंचल आणि सुंदर आहे, निळ्या मेघांच्या मालिकांनी भरलेले आभाळ विलक्षण शोभा देत आहे. मदमत्तासारखा नृत्य करनारा मेघ जलदान करत आहे आणि त्याच्या दशदिशा शीतल होऊन आनंदित होत आहेत.

a

सहियशिखरमग्गलं, मेहमणिवला विलम्बिअ।
गगणनृत्तमंच विअ, पवसवेणीविलासिअं॥

सह्यशिखरावर लटकलेली ही मौक्तिमय मेघमाला लटकत असून गगन हाच नृत्यमंच झाला आहे, पावसाच्या वेणीचा हा विलास त्याच्यावर जणू शोभत आहे.

a

पतन्ति सलिलधारा मत्तगजस्य इवोरसि।
शिखरेषु च गिर्याणां स्रवन्तीव जलश्रुतिः॥

पावसाच्या कोसळाधारा जणू ह्या मत्त गजासारख्या दिसणार्‍या दिसणार्‍या पर्वतावरुन कोसळत आहेत, ह्या गिरीशिखरांवरुन वाहणार्‍या ह्या धारा विलक्षण नाद निर्माण करत आहेत.

a

आसत्ता सिखरे मेहा जलपूरिअकन्दर।
नदीपवाग्गसंभिन्ना यान्ति तटं जलस्सया॥

शिखरांवर मेघ अडकत आहेत, गिरीकुहरांमध्ये पाणी भरु लागलं आहे. नदीप्रवाहांमुळे जलाशय तुडुंब भरुन वाहत आहेत.

a

अम्बुधारा समायाता सस्सिं संपुरयंतिणी।
जनयंति महापूरं जलस्सयमहाप्लवं॥

पावसाच्या धारांनी सह्यागिरी भरला आहे, आणि महापूरासारख्या वाहणार्‍या प्रवाहामुळे जणू महाप्रलयाचाच भास होत आहे.

a

सरं सरिस्समायुत्तं गिरिमज्झे सुशोभदि।
मेहच्छन्नं य रउवं सस्सस्स सुमणोहरं॥

जलांनी भरलेल्या नद्या सरोवरे पर्वतांना शुशोभित करत आहेत. मेघांनी आच्छादलेली गिरीशिखरे विलक्षण मोहक दिसत आहेत.

a

वारिधारा शशिनमिव मुखं प्रावृणोति नृणां,
स्वप्नानन्दं जनयति चिरं शीतलैः वारिभिः।
वृक्षाणां दलदलनवमन्दानिलैः कम्पनं,
वर्षाधीशः सकलजगतः शान्तिमभ्यर्पयेत्॥

पावसाच्या धारांनी जणू चंद्राचे मुख झाकले जाते आणि थंड पावसाचे थेंब लोकांना स्वप्नवत सुख देतात. झाडांची पाने मंद वाऱ्यात थरथरु लागली आहेत. आणि पावसाचा अधिपती सकल जगाला शांती प्रदान करत आहेत.

a

वर्षासंभावनया मुदिता भूमिरेषा सदा,
यस्यामम्बुधरधवलधाराभिराकीर्णता।
निर्मुक्ता जलकणगणनिःशङ्कया कम्पते,
हर्षेणैव समं वनमिदं वन्दते वारिदम्॥

पावसाच्या आशेने ही भूमी नेहमी आनंदी असते, मेघांच्या शुभ्र धारांनी ती परिपूर्ण होते. जलकणांची चिंता न करता ही धरित्री कंपित होत आहे. हर्षित झालेले हे वन पावसाला वंदन करत आहे.

a

प्रपातकन्दरं धावन् मन्दारद्रुममालिनम्।
व्योममज्जन्निवाम्भोधिः स्वनन् पात्यति निर्झरः॥

मंदारवृक्षांनी वेढलेल्या कड्यांतून पळत येणारा हा निर्झर आकाशात सामावल्यासारखा वाटत आहे आणि मोठी गर्जना करुन तो कोसळत आहे.

a

धवलमेहसदिसं पवइ जलणिहरं णिरीअं।
चंदकांतशिलामणिअं वुअळिअं जलं वच्चं॥

धवल मेघासारखा दिसणारा हा शुभ्र जलप्रपात जणू चंद्रासारख्या दिसणार्‍या शिला वितळून वाहू लागल्यासारखा भासत आहे.

a

नभसि नीलघनमण्डलमध्यवर्ती,
विहगनादविततं वनराजिशोभा।
विरचितं जलधिपातधारया तु,
विलसति प्रावृषि रम्यतरं वसन्ति॥

नीलसर मेघमंडळ आकाशात विलसत आहे, विहंग नाद करुन वृक्षराजीला शोभवत आहेत, वर्षाधारांमुळे ही सर्व सृष्टी अतिशय रम्य दिसत आहे.

a

वनविवरं पविअ जलणिहरं सप्पसुवणसिअं।
कंडीअं कोटिसहसस जलपट्टीं पवत्ता॥

वनरुपी विवरांतून सप्तस्वरांसारखा आवाज करणारा हा जलप्रवाह जणू कोटी सहस्त्र जलप्रवाहांसारखा पसरलेला दिसत आहे.

a

घनधाराभिराक्रान्तं, कूपं तडागमण्डलम्।
पूरितं जलपूरैश्च, जीवनाय सदा स्थितम्॥

पावसाच्या धारांनी तळी, विहिरी संपृक्त होत आहेत, समग्र जीवनाला जणू हे जल आधार देत आहे.

a

शृङ्गातो गिरिशिखरिणो निपतन्ति जलानि,
स्वर्गाताम्बुधरपतितं सुधया सन्निभम्।
तृप्तिं यान्ति मृगकपयो जलसिक्तवपुः,
वर्षा रम्या जनहृदयं प्रमदाम्भोधिवत्॥

पर्वतांच्या शिखरावरून पडणारे पाण्याचे थेंब जणू स्वर्गातून अमृतच पडल्यासारखे दिसत आहेत. अखंड पडणार्‍या ह्या जलाने प्राणी आणि पक्षी तृप्त होत आहेत आणि हा वर्षाऋतूचा काळ जनांच्या हृदयाला आनंदाने पोषवित आहे.

a

प्रतिक्रिया

कंजूस's picture

2 Jul 2025 - 9:03 pm | कंजूस

जबरी फोटो.
श्लोकांचे वर्णन चपखल आहे.
बारदानं पांघरलेल्या बकऱ्या जात आहेत मजेशीर.
कठड्यावरून झरा कोसळत आहे भारी फोटो .

करून गेले.

मस्त.

Bhakti's picture

3 Jul 2025 - 10:43 am | Bhakti

+१ सहमत,
सौंदर्यपूर्ण श्लोक,शब्दांनी,प्रचिंनी,वर्णानाने धो धो बरसणारा सुंदर लेख आहे.

बाकी अशा मावळात ठीकठिकाणी खोपट टाकून " इथे झुणका भाकर" मिळेल पाटी लावल्यास खूप पर्यटक येतील.
कोकणात अंबाडीची भाजी आणि तांदळाची भाकरी खाताना शेतकरी दिसतात.

नयनरम्य लेख आवडला

श्वेता व्यास's picture

4 Jul 2025 - 12:16 pm | श्वेता व्यास

खतरनाक फोटू आहेत. तुमच्यासारख्या मनसोक्त भटकंती करायला मिळणाऱ्या लोकांचा खूप हेवा वाटतो :)