✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ठिपक्यांची मनोली (मुनिया)

स
सानझरी यांनी
Wed, 08/10/2016 - 17:07  ·  लेख
लेख
गेल्या १० वर्षां पासुन आमच्या घरी मुनिया येतात. ऊन्हाळा संपुन पावसाळ्याची चाहुल लागली की लगेच हजर होतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू होते. शरिराच्या आकारापेक्षा ६ ७ पट मोठ्या आकाराचे गवताचे पाते आणुन घरटी करतात. त्यांच्यासाठी आम्ही बाल्कनीत बाजरी ठेवतो. एका वेळेस ७०-८० च्या थव्याने येतात. मुनिया ४ महिने तरी रोज येतात. मुनियांना आठवड्याला ४ ते ५ किलो बाजरी लागते. दिवसतुन तिनदा खायला घालावं लागतं. (बाजरी खाताना त्या सांडवतातही भरपुर आणि खाल्लेल्या बाजरीचे फोलपटं खाली पडतात. जरा कुठे खुट्ट झालं कि लगेच उडुन जातात तेव्हा, त्यांच्या पंखांनिही बाजरी खाली सांडते. त्यामुळे दिवसातुन दोनदा बाल्कनी झाडावी लागते.) फोटो क्र. ४ : बाजरी संपली कि सगळे वाट बघत बसतात. फोटो क्र. ५. मुनियाचं पिल्लू असं दिसतं. पुर्वी मुनिया आमच्या खिडकित घरटं देखील करायच्या. फोटो क्र. ६. आमच्या घरी मांजर आहे म्हणुन खिडकीला अशी कायमस्वरूपी जाळी लावून घेतली. या काळात आम्ही बाल्कनिचा वापर करत नाही. फक्त सकाळी एकदा झाडांना पाणी घालायला जातो. बाल्कनिचं दारही सतत बंदच ठेवतो. अवांतरः फोटो क्र. ७ : मुनिया आल्या कि शिक्रा देखील हजेरी लावुन जातो. फोटो क्र. ८ : मागच्या वर्षी सनबर्डने बाल्कनित घरटं केलं होतं. ती कायम घरट्यात बसुन असायची. आमचा वावरही होताच पण तिने बिंधास्त घरटं बांधलं. अगदी हाताला लागेल अश्या अंतरावर. फोटो क्र. ९ : दोन वर्षांपुर्वी हा सनबर्ड बाल्कनित रोज झोपायला यायचा. साधारण ६-७ महिने येत होता. या मुनियाच्या नावाविषयी थोडसं : जरी आमच्याकडे मुनिया १० वर्षांपासुन येत असल्या तरिही या जातीचं नेमकं नाव काय हे पुस्तक उघडुन वाचलं नाही. (निव्वळ आळशीपणा) कारण त्यांचा विणिचा हंगाम, घरटी कोणत्या गवताची आणि कशी बांधतात हे स्वतः रोजच बघत होते. काल हा लेख टाकल्यावर ही चुक लक्षात आली. फेसबुकवर स्केली ब्रेस्टेड मुनिया हा उल्लेख वाचला आणि मिही काहीही अभ्यास न करता हे नाव इथे टाकलं. पक्ष्यांबद्दल ४ पुस्तकांमधे मुनियां विषयी वाचत असता कळंलं की या ठिपक्यांच्या मुनिया आहेत. इंडियन स्पॉटेड मुनिया. स्केली ब्रेस्टेड मुनिया हा शब्दच या पुस्तकांमधे नाही. काही लोक स्केली ब्रेस्टेड मुनियाच म्हणत असतील तर त्यांच्यासाठी ही दुरुस्ती. आणि मी सुद्धा चुकीच नाव पसरवलं म्हणुन सॉरी. मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेल्या पक्षिकोश मधे यांच्यासाठी मराठी शब्द मनोली आहे. ठिपक्यांची मनोली, काळ्या डोक्याची मनोली इ. फोटो क्र. १ : 1 फोटो क्रं २: 2 फोटो क्रं ३: 3 फोटो क्रं ४: 4 फोटो क्रं ५: 7 फोटो क्रं ६: 9 फोटो क्रं ७: 6 फोटो क्रं ८: 5 फोटो क्रं ९ 8
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राहती जागा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
146867 वाचन

💬 प्रतिसाद (92)

प्रतिक्रिया

छान

मराठी_माणूस
गुरुवार, 08/11/2016 - 15:38 नवीन
छान अवांतरः तिसरी कसम मधील "चलत मुसफिर ......पिंजडेवाली मुनिया" ह्या गाण्यातील हीच ति मुनिया काय ?
  • Log in or register to post comments

असेल कदाचित. नक्की माहित नाही

सानझरी
Fri, 08/12/2016 - 10:24 नवीन
असेल कदाचित. नक्की माहित नाही. मुनियांना त्यांच्या आवाजासाठी पाळतात. वेगवेगळ्या रंगाच्या जातिच्या मुनिया आजही विकत मिळतात. त्यांच्या मंजुळ आवाजाला तो भाळला असा त्या गाण्याचा अर्थ असू शकतो.(अर्थात वहिदा वर राज भाळला असं). हे माझं पर्सेप्शन. मी अजुन यात माहिती काढायचा प्रयत्न करते. मुनियाचा हा संदर्भ लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

भारी.

सूड
गुरुवार, 08/11/2016 - 19:16 नवीन
भारी.
  • Log in or register to post comments

हे भारी आहे! फार आवडले!!

जव्हेरगंज
गुरुवार, 08/11/2016 - 20:27 नवीन
हे भारी आहे! फार आवडले!!
  • Log in or register to post comments

सूड आणि जव्हेरगंज.. खूपखूप

सानझरी
Fri, 08/12/2016 - 15:12 नवीन
सूड आणि जव्हेरगंज.. खूपखूप धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

फोटो दिसले. सुंदर आले आहेत.

सपे-पुणे-३०
Fri, 08/12/2016 - 13:58 नवीन
फोटो दिसले. सुंदर आले आहेत. बाल्कनीही छान सजवली आहे. ते खिडक्यांवर काय लावलंय, मॅग्निफाईड सुक्या शेंगेसारखं?
  • Log in or register to post comments

धन्यवाद. त्या गार्वीच्या

सानझरी
Fri, 08/12/2016 - 15:12 नवीन
धन्यवाद. त्या गार्वीच्या शेंगा आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सपे-पुणे-३०

एकच सांगतो -- खुप भाग्यवान

५० फक्त
Fri, 08/12/2016 - 16:29 नवीन
एकच सांगतो -- खुप भाग्यवान आहात..
  • Log in or register to post comments

खरंच..touch wood..

सानझरी
Sat, 08/13/2016 - 13:30 नवीन
खरंच..touch wood..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

चलत मुसाफिर मोह लिया रे...पिंजड़ेवाली मुनिया....ती हीच काय ?

माम्लेदारचा पन्खा
Fri, 08/12/2016 - 16:50 नवीन
तिला पिंजर्यात का ठेवतात ते कळलं आता....अतिसौंदर्य सुध्दा शाप आहे !
  • Log in or register to post comments

आणि नाजूक घुंगरां सारखा मंजुळ

सानझरी
Sat, 08/13/2016 - 13:35 नवीन
आणि नाजूक घुंगरां सारखा मंजुळ आवाज देखील! दुपारच्या वेळेला सगळं शांत असताना ऐकावा.. स्वग॔!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

आहाहा किती क्युट. आमच्याकडे

जागु
Fri, 08/12/2016 - 16:51 नवीन
आहाहा किती क्युट. आमच्याकडे मुनिया येतात पण अगदी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये. सोबत वेडे राघू पण असतात.
  • Log in or register to post comments

बाजरी रख्खो!!

सानझरी
Sat, 08/13/2016 - 13:55 नवीन
बाजरी रख्खो!!
  • Log in or register to post comments

1+

बाबा योगिराज
Sat, 08/13/2016 - 14:07 नवीन
फोटो आणि लेख दोन्ही जब्रा. खरच नशीबवान आहात. पुलेशु. पुभाप्र. बाबा योगीराज.
  • Log in or register to post comments

खूपच गोड :)

यशोधरा
Sat, 08/13/2016 - 18:36 नवीन
खूपच गोड :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

चैतू
Sat, 08/13/2016 - 20:11 नवीन
सिमेंटच्या जंगलात तुम्हाला निसर्गाची साथ लाभते आहे हे बघून आनंद झाला.
  • Log in or register to post comments

सुरेख!

पैसा
Sat, 08/13/2016 - 22:51 नवीन
सुरेख लेखन आणि फोटो!
  • Log in or register to post comments

खूपच गोडूल्या आहेत या मनुल्या

खटपट्या
Wed, 08/17/2016 - 00:31 नवीन
खूपच गोडूल्या आहेत या मनुल्या !!
  • Log in or register to post comments

सगळ्यांना मनापासून धन्यवाद..

सानझरी
गुरुवार, 08/18/2016 - 12:56 नवीन
सगळ्यांना मनापासून धन्यवाद..
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सविता००१
गुरुवार, 08/18/2016 - 13:10 नवीन
फार भारी फोटो. नशीबवान आहात
  • Log in or register to post comments

या वर्षी देखील मुनिया ने

सानझरी
गुरुवार, 11/03/2016 - 09:28 नवीन
या वर्षी देखील मुनिया ने आमच्या खिडकीत घरटं केलं. आता पिल्लं उडून गेलेत म्हणून घरटं बाहेर काढून त्याचे फोटो काढले. पहीला फोटो : फर्नच्या पानांमधे गुंफलेलं घरटं दुसरा फोटो : घरट्याचं तोंड तिसरा फोटो : घरटं बाहेर काढल्यावर असं दिसतं Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

खूप छान. असेच घरटे आमच्या

ऋतु हिरवा
Mon, 04/17/2017 - 17:48 नवीन
खूप छान. असेच घरटे आमच्या किचनच्या बाल्कनीत मुनियांनी केले होते. जोडी नेहमी येत असे. पिल्ले उडून गेलेली पण आम्ही पाहिली. आता त्याच घरट्यात चिमण्यांनी अंडी घातली होती. व त्यातून पिल्ले बाहेर आली आहेत. चिव चिव आवाज येत असतो. चिमण्यांची जोडी चोचीत पिल्लांना काहीतरी खायला घेउन येत असते. बर्याच वेळा अळ्या किडे असतात. त्यांना खाण्यासाठी मी तांदूळाचे दाणे घालून ठेवते. त्यांना न्याहाळणे हा एक छंद होउन बसला आहे. तुमचे फोटो खूप सुरेख आहेत. मनोली नावही खूप गोड !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

खूप छान लिहिलं आहात. फोटो तर

ज्योति अळवणी
Mon, 01/02/2017 - 23:30 नवीन
खूप छान लिहिलं आहात. फोटो तर अप्रतिम
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

सानझरी
Tue, 01/03/2017 - 20:13 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी

तुमच्या भाग्याचा हेवा वाटतो..

पुंबा
Tue, 01/03/2017 - 12:36 नवीन
तुमच्या भाग्याचा हेवा वाटतो.. प्रकाशचित्रे उत्तम..
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

सानझरी
Tue, 01/03/2017 - 20:13 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

सानझरी सुरेख बोलके फोटो आणि

उल्का
गुरुवार, 01/12/2017 - 07:28 नवीन
सानझरी सुरेख बोलके फोटो आणि तू दिलेल्या माहितीमुळे अधिकच बोलके झाले आहेत.
  • Log in or register to post comments

लई धन्यवाद :)

सानझरी
Sat, 01/28/2017 - 14:43 नवीन
लई धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्का

Lovely!!

प्रीत-मोहर
Sat, 01/28/2017 - 20:48 नवीन
Lovely!!
  • Log in or register to post comments

I envy you for this :-)

अनिंद्य
Tue, 02/14/2017 - 12:12 नवीन
I envy you for this :-) सध्या आमच्या बागेतील काही भाग हे कबुतरांचे मॅटर्निटी वॉर्ड्स झाले आहेत :-)
  • Log in or register to post comments

काय सुन्दर फोटो आहेत !!

सप्तरंगी
Wed, 02/15/2017 - 18:32 नवीन
काय सुन्दर फोटो आहेत !!
  • Log in or register to post comments

अप्रतिम छायाचित्रे

चष्मेबद्दूर
Mon, 02/20/2017 - 18:33 नवीन
अप्रतिम छायाचित्रे
  • Log in or register to post comments

Khup sundar photos

अमिता राउत
Sun, 03/05/2017 - 03:11 नवीन
Khup chhan vatal evdhe pakshi bghun.. Kharch inspiring ahe he. Pakshyansathi aapn thod faar tri krayla hav.. Me sudhha prayatn kren.
  • Log in or register to post comments

Khup sundar photos

अमिता राउत
Sun, 03/05/2017 - 03:14 नवीन
Khup chhan vatal evdhe pakshi bghun.. Kharch inspiring ahe he. Pakshyansathi aapn thod faar tri krayla hav.. Me sudhha prayatn kren.
  • Log in or register to post comments

यावर्षी आलेल्या मुनीयांचा

इडली डोसा
Mon, 06/05/2017 - 09:20 नवीन
यावर्षी आलेल्या मुनीयांचा व्हिडीओ टाका ना सानझरीताई :D
  • Log in or register to post comments

ओ आज्जी.. नै टाकणार video

सानझरी
Mon, 06/05/2017 - 11:58 नवीन
ओ आज्जी.. नै टाकणार video ज्जा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा

ये पोरी

इडली डोसा
Tue, 06/13/2017 - 03:40 नवीन
आज्जिचं ड्वाळं मिटायच्या आत त्येवडा व्हिड्यो टाक कि ,किती आटवन करायची म्हातार्‍या मान्सानं. आस काय करतीयास, आं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

खुपच अप्रतिम

वन्दना सपकाल
Fri, 06/30/2017 - 10:13 नवीन
खुपच अप्रतिम
  • Log in or register to post comments

या वर्षी देखील मुनिया ने

साक्षी
Wed, 03/21/2018 - 10:56 नवीन
या वर्षी देखील मुनिया ने आमच्या खिडकीत घरटं केलं. आता पिल्लं उडून गेलेत म्हणून घरटं बाहेर काढून त्याचे फोटो काढले. पहीला फोटो : फर्नच्या पानांमधे गुंफलेलं घरटं दुसरा फोटो : घरट्याचं तोंड तिसरा फोटो : घरटं बाहेर काढल्यावर असं दिसतं>> सानझरी, एक सल्ला पक्षी उडून गेले तरी घरटे काढू नये. जागा पसंत पडली असेल तर ती जोडी दरवर्षी तेच घरटे डागडुजी करून वापरते. साक्षी.
  • Log in or register to post comments

@ साक्षी,

अनिंद्य
Mon, 04/02/2018 - 16:26 नवीन
@ साक्षी, फोटो दिसले नाहीत हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साक्षी

बेस्ट! खूप सुंदर फोटो आणि

वर्षा
Wed, 07/31/2019 - 16:36 नवीन
बेस्ट! खूप सुंदर फोटो आणि वर्णन. तुम्ही खूप काळजी घेताय म्हणून त्या येतात. मी इतके दिवस यांना स्केली ब्रेस्टेड मुनियाच म्हणत होते. यंदा आल्या का?
  • Log in or register to post comments

लेख आणि फोटो दोनही अप्रतिम!

इरामयी
Wed, 07/31/2019 - 20:54 नवीन
लेख आणि फोटो दोनही अप्रतिम!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा