✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ठिपक्यांची मनोली (मुनिया)

स
सानझरी यांनी
Wed, 08/10/2016 - 17:07  ·  लेख
लेख
गेल्या १० वर्षां पासुन आमच्या घरी मुनिया येतात. ऊन्हाळा संपुन पावसाळ्याची चाहुल लागली की लगेच हजर होतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू होते. शरिराच्या आकारापेक्षा ६ ७ पट मोठ्या आकाराचे गवताचे पाते आणुन घरटी करतात. त्यांच्यासाठी आम्ही बाल्कनीत बाजरी ठेवतो. एका वेळेस ७०-८० च्या थव्याने येतात. मुनिया ४ महिने तरी रोज येतात. मुनियांना आठवड्याला ४ ते ५ किलो बाजरी लागते. दिवसतुन तिनदा खायला घालावं लागतं. (बाजरी खाताना त्या सांडवतातही भरपुर आणि खाल्लेल्या बाजरीचे फोलपटं खाली पडतात. जरा कुठे खुट्ट झालं कि लगेच उडुन जातात तेव्हा, त्यांच्या पंखांनिही बाजरी खाली सांडते. त्यामुळे दिवसातुन दोनदा बाल्कनी झाडावी लागते.) फोटो क्र. ४ : बाजरी संपली कि सगळे वाट बघत बसतात. फोटो क्र. ५. मुनियाचं पिल्लू असं दिसतं. पुर्वी मुनिया आमच्या खिडकित घरटं देखील करायच्या. फोटो क्र. ६. आमच्या घरी मांजर आहे म्हणुन खिडकीला अशी कायमस्वरूपी जाळी लावून घेतली. या काळात आम्ही बाल्कनिचा वापर करत नाही. फक्त सकाळी एकदा झाडांना पाणी घालायला जातो. बाल्कनिचं दारही सतत बंदच ठेवतो. अवांतरः फोटो क्र. ७ : मुनिया आल्या कि शिक्रा देखील हजेरी लावुन जातो. फोटो क्र. ८ : मागच्या वर्षी सनबर्डने बाल्कनित घरटं केलं होतं. ती कायम घरट्यात बसुन असायची. आमचा वावरही होताच पण तिने बिंधास्त घरटं बांधलं. अगदी हाताला लागेल अश्या अंतरावर. फोटो क्र. ९ : दोन वर्षांपुर्वी हा सनबर्ड बाल्कनित रोज झोपायला यायचा. साधारण ६-७ महिने येत होता. या मुनियाच्या नावाविषयी थोडसं : जरी आमच्याकडे मुनिया १० वर्षांपासुन येत असल्या तरिही या जातीचं नेमकं नाव काय हे पुस्तक उघडुन वाचलं नाही. (निव्वळ आळशीपणा) कारण त्यांचा विणिचा हंगाम, घरटी कोणत्या गवताची आणि कशी बांधतात हे स्वतः रोजच बघत होते. काल हा लेख टाकल्यावर ही चुक लक्षात आली. फेसबुकवर स्केली ब्रेस्टेड मुनिया हा उल्लेख वाचला आणि मिही काहीही अभ्यास न करता हे नाव इथे टाकलं. पक्ष्यांबद्दल ४ पुस्तकांमधे मुनियां विषयी वाचत असता कळंलं की या ठिपक्यांच्या मुनिया आहेत. इंडियन स्पॉटेड मुनिया. स्केली ब्रेस्टेड मुनिया हा शब्दच या पुस्तकांमधे नाही. काही लोक स्केली ब्रेस्टेड मुनियाच म्हणत असतील तर त्यांच्यासाठी ही दुरुस्ती. आणि मी सुद्धा चुकीच नाव पसरवलं म्हणुन सॉरी. मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेल्या पक्षिकोश मधे यांच्यासाठी मराठी शब्द मनोली आहे. ठिपक्यांची मनोली, काळ्या डोक्याची मनोली इ. फोटो क्र. १ : 1 फोटो क्रं २: 2 फोटो क्रं ३: 3 फोटो क्रं ४: 4 फोटो क्रं ५: 7 फोटो क्रं ६: 9 फोटो क्रं ७: 6 फोटो क्रं ८: 5 फोटो क्रं ९ 8
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राहती जागा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
146867 वाचन

💬 प्रतिसाद (92)

प्रतिक्रिया

जोडी मस्त. कमानीवरचे पण भारी.

अभ्या..
Wed, 08/10/2016 - 17:09 नवीन
जोडी मस्त. कमानीवरचे पण भारी.
  • Log in or register to post comments

धन्यू :)

सानझरी
Wed, 08/10/2016 - 17:12 नवीन
धन्यू :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मस्त फोटो

शान्तिप्रिय
Wed, 06/07/2017 - 08:53 नवीन
मस्त फोटो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

खल्लास

स्पा
Wed, 08/10/2016 - 17:12 नवीन
खल्लास
  • Log in or register to post comments

सुंदर!

पिशी अबोली
Wed, 08/10/2016 - 17:23 नवीन
सुंदर! किती नशीबवान आहात. अर्थात, फोटोत दिसतंय त्याप्रमाणे तेवढं करतापण तुम्ही त्यासाठी.
  • Log in or register to post comments

असंच म्हणते

अंतरा आनंद
Wed, 08/10/2016 - 17:39 नवीन
असंच म्हणते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

मस्तच फोटो.. खासकरून जोडीचा..

संजय पाटिल
Wed, 08/10/2016 - 17:37 नवीन
मस्तच फोटो.. खासकरून जोडीचा..
  • Log in or register to post comments

छान लेख आणी फोटो

सिरुसेरि
Wed, 08/10/2016 - 17:52 नवीन
छान लेख आणी फोटो
  • Log in or register to post comments

मस्तं फोटो.

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/10/2016 - 18:20 नवीन
मस्तं फोटो. पक्षी आपल्या बाल्कनीत वावरतात, घर करतात हा अनुभव फारच सुखद असतो !... अर्थातच, कबुतरे सोडून ;)
  • Log in or register to post comments

"आमच्या घरी आलेले अनाहूत

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 08/11/2016 - 02:33 नवीन
"आमच्या घरी आलेले अनाहूत पाहुणे" इथे पाहता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मस्त १+

पगला गजोधर
Wed, 08/10/2016 - 19:09 नवीन
नशिबात योग हवा, घरबसल्या असे सुंदर पक्षीदर्शन होण्याचा.
  • Log in or register to post comments

आहाहा!

सुमीत भातखंडे
Wed, 08/10/2016 - 19:11 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

अरे वा.खूप छान.

अजया
Wed, 08/10/2016 - 19:18 नवीन
अरे वा.खूप छान. माझंही घर असं घरट्यांच्या बाबतीत भाग्यवान आहे! चिमणी राॅबिन बुलबुल सुगरण भारद्वाज आमचे शेजारी असतात!
  • Log in or register to post comments

मला हा लेख एडिट (संपादन) करता

सानझरी
Wed, 08/10/2016 - 19:20 नवीन
मला हा लेख एडिट (संपादन) करता येत नाहिये. admin@misalpav.com वर मेल टाकलाय. कृपया चेक करा.
  • Log in or register to post comments

'साहित्य संपादक' या आयडीवर

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/10/2016 - 20:40 नवीन
'साहित्य संपादक' या आयडीला तुमचे म्हणणे कळवा. ते मदत करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

साहित्य संपादक हा आयडी

सानझरी
Wed, 08/10/2016 - 21:21 नवीन
साहित्य संपादक हा आयडी सापडेना. ईमेल आयडी आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मिपाच्या पानाच्या खालपर्यंत

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/10/2016 - 23:00 नवीन
मिपाच्या पानाच्या खालपर्यंत स्क्रोल करा. उजव्या बाजूच्या कॉलममध्ये साहित्य संपादकांशी संपर्क करण्याचा दुवा सापडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

मस्त...

मुक्त विहारि
Wed, 08/10/2016 - 19:22 नवीन
नशीबवान आहात. फोटो पण उत्तम आले आहेत.
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर फोटो.वाशी,उरण

कंजूस
Wed, 08/10/2016 - 20:03 नवीन
अतिशय सुंदर फोटो.वाशी,उरण भागात,तसेच पनवेल - तळोजा, हिजीमलंग ,कल्याण,ठाणे बेलापूर रोड या परिसरात खूप होत्या या मुनिया.आता सर्व वसाहती झाल्या,गवत मोकळी जागा गायब झाली.तुम्ही खूप मदत करताहात.
  • Log in or register to post comments

धन्यवाद. निसर्गासाठी काहितरी

सानझरी
गुरुवार, 08/11/2016 - 14:25 नवीन
धन्यवाद. निसर्गासाठी काहितरी करतोय हेच समाधान वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अप्रतिम फोटो.

संत घोडेकर
Wed, 08/10/2016 - 20:26 नवीन
अप्रतिम फोटो.
  • Log in or register to post comments

सुन्दर फोटो. एवढा मोठा थवा

स्वामी संकेतानंद
Wed, 08/10/2016 - 20:30 नवीन
सुन्दर फोटो. एवढा मोठा थवा कुणाच्या घरी पहिल्यांदा पाहतोय. एरवी वखार मंडळाचे गोडाउन किंवा राइस मिलच्या अंगणात पाहिले आहे. आमच्याघरीही एकदा घरटे केले होते. पण मांजरीने पिल्लांना खाल्ले. लालबुड्या बुलबुल दरवर्षी घरटे करायचा. एके वर्षी मांजरीने पिल्ले खाल्ली. एका वर्षी भारद्वाजने घरटे मोडले. तिसर्‍या वर्षी परत मांजरीने पिल्ले खाल्ली. नंतर बुलबुलने आमच्या घरचा नाद सोडला. शिंपीची पिल्ले मात्र जगली,वाचली आणि उडाली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद. मांजर आमच्या घरीही

सानझरी
गुरुवार, 08/11/2016 - 14:33 नवीन
धन्यवाद. मांजर आमच्या घरीही आहे, पक्षी आणि तिला जपताना तारेवरची कसरत होते आणि गैरसोय देखिल.(पण त्यांच्यासाठी काय पण) मुनिया आमच्या घरी खिडकीत घरटं करायच्या तेव्हा आम्ही खिडकी कायम लावून ठेवायचो. आणि माऊलाही एकदा नाही म्हटलं कि ती जात नाही. शिंजीरनेही घरटं केलं होतं. माऊ घरट्याच्या खालून फिरुन यायची पण शिंजीरने अंडी दिलीच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

साहित्य संपादकांचा ईमेल आयडी

सानझरी
Wed, 08/10/2016 - 22:43 नवीन
साहित्य संपादकांचा ईमेल आयडी सांगा रे कोणीतरी.. आपलाच लेख एडिट करता येत नाही हा काय फालतू प्रकार आणि..
  • Log in or register to post comments

खुपच सुंदर

विप्लव
Wed, 08/10/2016 - 22:49 नवीन
खुपच सुंदर
  • Log in or register to post comments

वा! फारच सुंदर...

मयुरा गुप्ते
Wed, 08/10/2016 - 23:04 नवीन
छान पोजेस वगैरे देउन बसले आहेत असं वाटतं. आमच्या कडे हमिंगबर्ड्स येतात. त्यांच्या साठी खास 'हनीसकल' नावाची फुलझाडं लावाली आहेत. पण त्यांना कॅमेरात कसं बंदिस्त करायचं हे पेच सुटलेला नाहिये कारण अतिशय वेगवान हालचाली, आणि कुठल्याही चाहुलीने बिचकतात. --मयुरा
  • Log in or register to post comments

कॅमेरात बंदिस्त करावं असं

सानझरी
गुरुवार, 08/11/2016 - 14:36 नवीन
कॅमेरात बंदिस्त करावं असं नेहमिच वाटतं, पण त्यापेक्शा तो क्षण जगा. कॅमेर्‍यापायी मी अनेक सुंदर क्षण गमावलेत. पक्ष्यांच आपल्या अवती भोवती असणंच महत्वाचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरा गुप्ते

हमिंगबर्ड फीडर वापरून बघ

मिसळपाव
Sun, 08/14/2016 - 02:01 नवीन
मयुरा, हमिंगबर्ड फीडर वापर. एखाद्या फुलावर हमिंगबर्ड परत परत येणार, तू नेमकी तेव्हा त्याचा फोटो टिपणार हे अवघड आहे. हमिंगबर्ड फीडर लाउन दोन-तीन तास त्यावर व्हिडीओ कॅमेरा लाउन ठेव. नाही तीन तासांचा व्हिडीओ नाही ठेवायचा! त्यातले हवे ते शॉट्स सेव्ह करायचे. उदा. खाली दिलेले फोटो; पहिला आजचा आणि पुढचे तीन आधी कधी काढलेले. पण फीडर लावलास तर ही पथ्यं न चुकता पाळायची; - नियमित लावायचा. दोन दिवस लावला, वीकए़डला राहून गेलं होणार असेल तर लावूच नये. विशेषतः त्यांच्या मायग्रेशनच्या वेळी. - नेक्टर तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवायचा नाही. फार उन्हाळा असेल तर दोन दिवसानीच बदलायचा. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरा गुप्ते

ओहोहो.. फारच सुंदर

मयुरा गुप्ते
Tue, 08/16/2016 - 03:05 नवीन
क्या बात है! फारच परिश्रम्पूर्ण फोटोज काढले आहेत तुम्ही. सध्या इथे कडक उन्हाळा असल्यामुळे आजुबाजुला अनेक प्रकारचे साप आणि त्यांची पिलावळ दिसते. एकदा कॉयोटीनेही (छोट्या कोल्ह्यासारखा दिसणारा प्राणी) दर्शन दिले. आणि आज आमच्या पाठीमागच्या अंगणात 'स्कंक-Skunk'( मराठी नाव?) येऊन गेला. एकदा बॉब कॅट (मोठी रानटी मांजर) ही दर्शन देउन गेलीये... पण हे सगळे प्राणीमात्र अगदी क्वचितच दिसतात. बरेच वेळा त्यांचे नैसर्गिकपणे अन्न शोधायचे मार्ग बंद झाले की मग अशी एखादी च्क्कर मारुन जातात. तुमची हमिंगबर्ड फीडर ही आयडीया मस्त आहे. कुठेतरी सुरक्षित ठीकाणी लावावी लागेल मला. धन्यवाद. --मयुरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

नाही हो!

मिसळपाव
Tue, 08/16/2016 - 20:02 नवीन
फारच परिश्रम्पूर्ण फोटोज काढले आहेत तुम्ही.
नाही हो, नुसता कॅमेरा फोकस करून ठेवला होता घरातनं - श्रेय या हमिंगबर्डस् चं कारण या 'दोनच' फुलांसाठी ते दिवसातनं सत्रांदा चक्कर मारून जातात! हमिंगबर्ड फीडर ठेवायला लागलात तर कदाचित दोन-तीन आठवडेसुद्धा जातील त्याना शोध लागेपर्यंत. पण एकदा त्याना पत्ता लागला आणि तुम्ही नियमित ठेवत असला तर पुढच्या वर्षी नेमके येतील तुमच्या 'फुलांकडे' :-) बॉब कॅट दिसलंय - वॉव! एक करून बघा यात अजून ईंटरेस्ट असला तर. अ‍ॅमेझोनवर 'trail camera' शोधलंत तर बरेच ऑप्शन्स दिसतील. असा ट्रेल कॅमेरा आठवडाभर रात्री लावून ठेवा. तो मोशन अ‍ॅक्टिव्हेटेड असतो आणि ट्रिगर झाल्यावर फोटो/व्हिडीओ घेतो - संपूर्ण अंधारातसुद्धा. I bet you will discover many such / other such interesting friends who pay a visit to your yard!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरा गुप्ते

सुंदर फोटो.

सानझरी
Tue, 08/16/2016 - 17:57 नवीन
सुंदर फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

काल हमिंगबर्ड बद्दल या ओळी

सानझरी
Fri, 08/19/2016 - 12:02 नवीन
काल हमिंगबर्ड बद्दल या ओळी वाचल्या.. Have you ever observed a humming-bird moving about in an aerial dance among the flowers - a living prismatic gem that changes with every change of position - how in turning it catches the sunshine on its burnished neck and gorget plumes... the beams changing to visible flakes as they fall, dissolving into nothing, to be suceeded by others and yet others? In its exquisite form... it is a creature of such fairy-like loveliness as to mock all description. -- W.H. Hudson (1841 - 1922)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

फार सुंदर. आमच्याकडेही असे

एस
गुरुवार, 08/11/2016 - 00:49 नवीन
फार सुंदर. आमच्याकडेही असे चिमण्या, बुलबुल, इ. पाहुणे मुक्तपणे वावरत असतात. आजमितीस कृत्रिम घरट्यात चिमण्यांच्या कितव्यातरी पिढीचा संसार सुरू आहे. आणि लेटेस्ट भाडेकरू (त्यांचं त्यांनीच घरटं बांधलंय!) आहेत श्री. आणि सौ. शिंजिर.
  • Log in or register to post comments

अभिनंदन. वाचून आनंद वाटला.

सानझरी
गुरुवार, 08/11/2016 - 14:40 नवीन
अभिनंदन. वाचून आनंद वाटला. आम्हीही घरटी लावलीत पक्ष्यांसाठी. मागे ब्राम्हणी मैना घरटं बघुन गेली, पण आमच्या मांजरीकडे बघुन नांदायला आली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आत्ता सकाळी सकाळी दिसले लांब

पिशी अबोली
गुरुवार, 08/11/2016 - 08:23 नवीन
आत्ता सकाळी सकाळी दिसले लांब गवताची पाती घेऊन झाडात बसलेले मुनिया, आणि हा धागा आठवला.
  • Log in or register to post comments

गवताच्या पातीचा धागा चोचीत

सानझरी
Fri, 08/19/2016 - 12:03 नवीन
गवताच्या पातीचा धागा चोचीत घेऊन उडून जाणारी मुनिया बघितली कि मला स्वर्गिय नर्तकाची आठवण येते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

फोटो रुसलेत बहुतेक.

सपे-पुणे-३०
गुरुवार, 08/11/2016 - 09:39 नवीन
फोटो रुसलेत बहुतेक. मुनियांना बाजरी आवडते हे माहित नव्हतं. आमच्या बाल्कनीत भिंत व एसीच्या बेचकीत ह्या घरटं करायच्या. दुसऱ्या वर्षी त्याच घरट्यावर अजून दोन मजले चढवले. नंतर नंतर त्या धिटुकल्या झाल्या होत्या. आम्ही बाल्कनीत गेलो तरीही उडून न जाता एका टोकाला लक्ष ठेऊन बसायच्या. अंडी आणि पिल्लांच्या रक्षणाबाबत सर्वांत बेदरकार म्हणजे कबूतर आणि त्यांच्यानंतर बुलबुल.
  • Log in or register to post comments

मुनियांना बाजरी आवडते.

सानझरी
गुरुवार, 08/11/2016 - 14:41 नवीन
मुनियांना बाजरी आवडते. वाट्यात ठेवत रहा. त्यांना पत्ता लागला कि आणखी येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सपे-पुणे-३०

फोटो दिसत नाहीत. :(

रातराणी
गुरुवार, 08/11/2016 - 09:40 नवीन
फोटो दिसत नाहीत. :(
  • Log in or register to post comments

फोटो दिसत नाहीत. मुनिया उडुन

गंम्बा
गुरुवार, 08/11/2016 - 14:00 नवीन
फोटो दिसत नाहीत. मुनिया उडुन गेल्या काय?
  • Log in or register to post comments

चला

नाखु
गुरुवार, 08/11/2016 - 14:06 नवीन
माझ्यासारखे फोटो न दिसणारे कुणी तरी आहे तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा

हमको भी तुम्हारे साथ ले लो

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 08/11/2016 - 14:48 नवीन
हमको भी तुम्हारे साथ ले लो चचा. फट्टु दिखताईच नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

आता दिसताहेत फोटो. :)

सानझरी
गुरुवार, 08/11/2016 - 18:17 नवीन
आता दिसताहेत फोटो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

ठिपक्यांची मनोली (मुनिया)

सानझरी
गुरुवार, 08/11/2016 - 14:23 नवीन
या मुनियाच्या नावाविषयी थोडसं : जरी आमच्याकडे मुनिया १० वर्षांपासुन येत असल्या तरिही या जातीचं नेमकं नाव काय हे पुस्तक उघडुन वाचलं नाही. (निव्वळ आळशीपणा) कारण त्यांचा विणिचा हंगाम, घरटी कोणत्या गवताची आणि कशी बांधतात हे स्वतः रोजच बघत होते. काल हा लेख टाकल्यावर ही चुक लक्षात आली. फेसबुकवर स्केली ब्रेस्टेड मुनिया हा उल्लेख वाचला आणि मिही काहीही अभ्यास न करता हे नाव इथे टाकलं. पक्ष्यांबद्दल ४ पुस्तकांमधे मुनियां विषयी वाचत असता कळंलं की या ठिपक्यांच्या मुनिया आहेत. इंडियन स्पॉटेड मुनिया. स्केली ब्रेस्टेड मुनिया हा शब्दच या पुस्तकांमधे नाही. काही लोक स्केली ब्रेस्टेड मुनियाच म्हणत असतील तर त्यांच्यासाठी ही दुरुस्ती. आणि मी सुद्धा चुकीच नाव पसरवलं म्हणुन सॉरी. मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेल्या पक्षिकोश मधे यांच्यासाठी मराठी शब्द मनोली आहे. ठिपक्यांची मनोली, काळ्या डोक्याची मनोली इ. फोटों साठी संपादकांना निरोप पाठवलाय. त्यांनी एडिट केले कि दिसतील. (मला माझाच लेख एडिट करता येत नाही हे एक वेगळंच प्रकरण.
  • Log in or register to post comments

मनोली खूप गोड नाव आहे.

पिशी अबोली
गुरुवार, 08/11/2016 - 16:28 नवीन
मनोली खूप गोड नाव आहे. असंच शिंपी पक्ष्याला 'लिचकूर' असं नाव दुर्गाबाईंनी नमूद केलंय ते आठवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

हेच

स्वाती दिनेश
गुरुवार, 08/11/2016 - 19:18 नवीन
मनोली नाव खूप आवडलं, फोटो तर मस्तच.. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

धन्यवाद अबोली आणि स्वाती. :)

सानझरी
Fri, 08/12/2016 - 10:28 नवीन
धन्यवाद अबोली आणि स्वाती. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

सुंदर आहेत फोटो! जोड़ीचा फारच

रातराणी
Fri, 08/12/2016 - 10:41 नवीन
सुंदर आहेत फोटो! जोड़ीचा फारच गोड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

अप्रतिम फोटो!

श्रीगुरुजी
गुरुवार, 08/11/2016 - 14:50 नवीन
अप्रतिम फोटो! हे पक्षी 'ठिपक्यांचा मुनिया' या प्रकारातले आहेत. हा पक्षी साधारणपणे चिमणीएवढा असतो. शिक्रांपासून या पक्षांना जपा. शिक्रा दिसले की लगेच हाकलून लावा. शिक्रा असल्या लहान पक्ष्यांना पकडून खातात.
  • Log in or register to post comments

लेख अपडेट केलाय. शिक्रा

सानझरी
गुरुवार, 08/11/2016 - 18:21 नवीन
लेख अपडेट केलाय. शिक्रा वर्षातुन एकदाच दिसतो. मुनियांची शिकार करायला येतोच एखादेवेळेला. निसर्ग तो. चालायचंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा