ठिपक्यांची मनोली (मुनिया)

Primary tabs

सानझरी's picture
सानझरी in कलादालन
10 Aug 2016 - 5:07 pm

गेल्या १० वर्षां पासुन आमच्या घरी मुनिया येतात. ऊन्हाळा संपुन पावसाळ्याची चाहुल लागली की लगेच हजर होतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू होते. शरिराच्या आकारापेक्षा ६ ७ पट मोठ्या आकाराचे गवताचे पाते आणुन घरटी करतात. त्यांच्यासाठी आम्ही बाल्कनीत बाजरी ठेवतो. एका वेळेस ७०-८० च्या थव्याने येतात. मुनिया ४ महिने तरी रोज येतात. मुनियांना आठवड्याला ४ ते ५ किलो बाजरी लागते. दिवसतुन तिनदा खायला घालावं लागतं. (बाजरी खाताना त्या सांडवतातही भरपुर आणि खाल्लेल्या बाजरीचे फोलपटं खाली पडतात. जरा कुठे खुट्ट झालं कि लगेच उडुन जातात तेव्हा, त्यांच्या पंखांनिही बाजरी खाली सांडते. त्यामुळे दिवसातुन दोनदा बाल्कनी झाडावी लागते.)
फोटो क्र. ४ : बाजरी संपली कि सगळे वाट बघत बसतात.
फोटो क्र. ५. मुनियाचं पिल्लू असं दिसतं. पुर्वी मुनिया आमच्या खिडकित घरटं देखील करायच्या.
फोटो क्र. ६. आमच्या घरी मांजर आहे म्हणुन खिडकीला अशी कायमस्वरूपी जाळी लावून घेतली. या काळात आम्ही बाल्कनिचा वापर करत नाही. फक्त सकाळी एकदा झाडांना पाणी घालायला जातो. बाल्कनिचं दारही सतत बंदच ठेवतो.

अवांतरः
फोटो क्र. ७ : मुनिया आल्या कि शिक्रा देखील हजेरी लावुन जातो.
फोटो क्र. ८ : मागच्या वर्षी सनबर्डने बाल्कनित घरटं केलं होतं. ती कायम घरट्यात बसुन असायची. आमचा वावरही होताच पण तिने बिंधास्त घरटं बांधलं. अगदी हाताला लागेल अश्या अंतरावर.
फोटो क्र. ९ : दोन वर्षांपुर्वी हा सनबर्ड बाल्कनित रोज झोपायला यायचा. साधारण ६-७ महिने येत होता.

या मुनियाच्या नावाविषयी थोडसं : जरी आमच्याकडे मुनिया १० वर्षांपासुन येत असल्या तरिही या जातीचं नेमकं नाव काय हे पुस्तक उघडुन वाचलं नाही. (निव्वळ आळशीपणा) कारण त्यांचा विणिचा हंगाम, घरटी कोणत्या गवताची आणि कशी बांधतात हे स्वतः रोजच बघत होते. काल हा लेख टाकल्यावर ही चुक लक्षात आली. फेसबुकवर स्केली ब्रेस्टेड मुनिया हा उल्लेख वाचला आणि मिही काहीही अभ्यास न करता हे नाव इथे टाकलं. पक्ष्यांबद्दल ४ पुस्तकांमधे मुनियां विषयी वाचत असता कळंलं की या ठिपक्यांच्या मुनिया आहेत. इंडियन स्पॉटेड मुनिया. स्केली ब्रेस्टेड मुनिया हा शब्दच या पुस्तकांमधे नाही. काही लोक स्केली ब्रेस्टेड मुनियाच म्हणत असतील तर त्यांच्यासाठी ही दुरुस्ती. आणि मी सुद्धा चुकीच नाव पसरवलं म्हणुन सॉरी. मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेल्या पक्षिकोश मधे यांच्यासाठी मराठी शब्द मनोली आहे. ठिपक्यांची मनोली, काळ्या डोक्याची मनोली इ.

फोटो क्र. १ :
1

फोटो क्रं २:
2

फोटो क्रं ३:
3

फोटो क्रं ४:
4

फोटो क्रं ५:
7

फोटो क्रं ६:
9

फोटो क्रं ७:
6

फोटो क्रं ८:
5

फोटो क्रं ९
8

राहती जागा

प्रतिक्रिया

बेस्ट! खूप सुंदर फोटो आणि वर्णन. तुम्ही खूप काळजी घेताय म्हणून त्या येतात.
मी इतके दिवस यांना स्केली ब्रेस्टेड मुनियाच म्हणत होते. यंदा आल्या का?

लेख आणि फोटो दोनही अप्रतिम!