नमस्कार,
होळी, धूळवड, रंगपंचमीच्या शुभेच्छा. या निमीत्ताने विकिपीडिया करता लागणार्या मुक्त छायाचित्रांच्या विकिमीडिया कॉमन्स या ऑनलाईन संग्रहाचा थोडक्यात परिचय करून द्यावा असा उद्देश आहे. उदाहरणार्थ होळी हा लेख इंग्रजी आणि भारतीय भाषा आणि इंग्रजी विकिपीडियावर आहेच पण त्या सोबत अगदी कोरीयन नॉर्वेजीयन अशा भाषात देखील आहे. आपण विकिमीडिया कॉमन्स या संयुक्त प्रकल्पात एखादे छायाचित्र चढवले की प्रत्येक भाषेतील विकिपीडियात वेगळे चढवावे लागत नाही. त्यामुळे अजून नवीन इतर नवीन भाषेत लेख अनुवादीत झाला तर त्या भाषेत त्या देशात आपली संस्कृती माहिती होण्यास हातभार लागतो. भारतातील पर्यटन विकासास अप्रत्यक्ष मदतही होऊ शकते. अर्थात त्या करता महाराष्ट्रीय संस्कृतीच्या संदर्भाने असलेल्या छायाचित्रांची मोठी कमतरता भासते.
मी आणि इतर बरीच मि.पा.कर मंडळी विकिमीडिया कॉमन्सवरील छायाचित्रे मिपावर वापरत असतोच. मी विकिमीडिया कॉमन्सवरील होळी, धूळवड, रंगपंचमीची सध्याची काही चित्रे खाली दाखवतो. त्या खाली विकिमीडिया कॉमन्सवर छायाचित्रे कशी चढवावीत याची माहिती देतो.
*Radha, Krishna and sakhis playing Holi. Lucknow, Avadh (Oudh), 19th century. Opaque watercolor and gold on paper,
**A painting from the collection of Smithsonian Institute depicting Krishna-Radha and Gopis celebrating Holi
*बेल्जीअम मध्ये साजरी झालेली एक रंग पंचमी
*
After_Holi_Colors_a_Namaste,_So_i'll_spread_out_my_wings
*The Hindu festival of Holi Celebrations and partying on Holi in Germany 2012
*
A_celebration_of_Holi_Festival_of_Colors,_Utah_United_States_2013
विकिमीडीया कॉमन्स येथून छायाचित्रे अपलोड करणे केव्हाही श्रेयस्कर आहे. प्रथमतः बहुभाषिक प्रकल्प असल्याने किमान मेनू वगैरे मराठीतून वापरणे मराठी टंकन सुविधा इत्यादी बाबी तेथे उपलब्ध आहेतच. त्याकरीता साईन इन केल्या नंतर (पर्सनल) Preferences मध्ये Internationalisation >> लँग्वेज मध्ये मराठी निवडावी मराठी टंकनाकरीता विकिची सुविधा वापरावयाची झाल्यास त्या खालीच असलेला Enable the Universal Language Selector हा पर्याय निवडावा.
छायाचित्र अपलोडकरण्या साठी इतर सुविधा उपलब्ध आहेत पण मला स्वतःला Upload Wizard हि विशेष सुलभ सुविधा वापरणे आवडते. प्रिफरन्सेस मध्ये मराठी निवडल्यास सुविधा चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड) नावाने मराठीतही उपलब्ध होते.
कॉमन्सवर मुखपृष्ठाची मराठी आवृत्ती उपलब्ध आहे. त्याच्याच चर्चा पानवर मराठी आणि महाराष्ट्र संबंधित प्रमूख वर्गिकरणांचे दुवे उपलब्ध केले आहेत.
मराठी विकिपीडियावर आणि बंधूप्रकल्पात मराठी आंणि महाराष्ट्रीय संस्कृती विषयक छायाचित्रांची मोठी कमतरता आहे. जसे की समई महाराष्ट्रातील पारंपारीक जेवणाची पंगत मराठी सण इत्यादी साधी साधी छायाचित्रे सुद्धा उपलब्ध नाहीत. हवे असलेल्या चित्रांचे वर्गीकरण वर्ग:चित्र हवे येथे होते. त्या संबंधाने मराठी विकिपीडियावर प्रकल्प पान सुद्धा विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे सुद्धा आहे. कॉपीराईट बद्दल एक सदस्य चर्चा पान उपलब्ध आहे परंतु कॉमन्स मधून
चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड) वापरल्यास लायसन्सींग आणि त्यासंबंधी आणि इतर बर्याच गोष्टी पाहता पाहता होऊन जातात. छायाचित्र चढवल्या नंतर विकिपीडियावर चित्र कसे लावावे हे लगेच त्याचा ही दुवा उपलब्ध होतोच पण तरीही केवळ [[चित्रःचढवलेल्या छायाचित्र फाइल संचिकेचे नाव]] एवढे लिहिले आणि कॉमन्सवर छायाचित्र असेल तर सर्व भाषेतील हव्या त्या विकिपीडिया लेखात आणि बंधूप्रकल्पातील कोणत्याही लेखात सहजतेने करता येते.
प्रतिक्रिया
14 Mar 2014 - 3:27 pm | मारकुटे
इतर देशांमधे होळी, रंगपंचमी साजरी करतांना तेथील अंनिसवाले बोंब नाही मारत का?
14 Mar 2014 - 3:37 pm | अनुप ढेरे
=))
14 Mar 2014 - 10:00 pm | आनंदी गोपाळ
बेल्जियम जर्मनी इ. देशांत प्यायला पाणी नसले तर बियर वापरतात असे आइकून आहे. बियरचे फवारे मारून त्यात होळीनिमित्ताने भिजायला आवडेल. आपण तशी सोय करणार आहात काय?
रच्याकने : यंदाच्या गारपीटी निमित्त होळीसाठी आयोजित केलेला ओर्गॅनिक रंगाम्वरचा २०० रुपये खर्च या गारपीट्ग्रस्त शेतकर्यांना देण्याचा माझा विचार मी अमलात आणला आहे.
तुमचे काय?
15 Mar 2014 - 7:56 am | माहितगार
ओर्गॅनिक रंगाम्वरचा २०० रुपये खर्च या गारपीट्ग्रस्त शेतकर्यांना देणार हा विचार स्वागतार्हच आहे, गारपीटीने शेतकरी त्रस्त असताना पाण्या एवजी बिअरचे फवारे उडवण्याची सोय केल्यास "होळीनिमित्ताने भिजायला आवडेल" ; (आणि मग फोटू कोण कोणाचा काढणार) ; (ह. घ्या) तुम्ही बिअरच्या स्वप्नात रंगलेले असताना युर्योमेरीकेतील लोक भांगेच्या स्वप्नात रंगतील; बाकी फोटो आठवणीने विकिमीडियावर चढवावेत :) (रंगपंचमी म्हणजे जिकडे तिकडे चोहीकडे; 'आनंदी' 'आनंद' आहे :) ह. घ्या) . प्रतिसादाकरता धन्यवाद आणि शुभेच्छा.
*(तळटीप: गारपिटीचे कॉपीराईट फ्री फोटूपण चालतील )
17 Mar 2014 - 11:13 am | मारकुटे
बियरमधे नाचताय? इतके थर्डक्लास विचार आमचे नाहीत माफ करा.
आणि हो मदतीबद्दल म्हणाला तर आम्ही ज्या संस्कृतीत वावरतो तिथे दिलेल्या मदतीचा उच्चार केला जात नाही.
17 Mar 2014 - 12:09 pm | कवितानागेश
अंनिस फक्त पश्चिम महाराष्ट्रात आहे. बाकीच्या जगाशी त्यांचा संबंध नाही.
उगाच वेडे प्रश्न विचारु नका...
(स्वगतः झाला रंग लावून अंनिसवाल्यांना! ;) )
16 Mar 2014 - 3:44 am | निनाद मुक्काम प...
रंग पंचमीचा हा सण जर्मनी मध्ये विविध तारखेला साजरा केला जातो , सध्या येथे अजूनही थंडी असल्याने बहुदा पुढील महिन्यात उन्हाळा सुरु झाल्यावर साजरा केला जाईल.
16 Mar 2014 - 4:10 am | विकास
पाश्चिमात्य देशांमधे सगळ्यात मोठ्या प्रमाणावर होळी स्पॅनिशफोर्क, युटाह येथे साजरी केले जाते. इंटरेस्टींगली, त्याच्या जवळच मॉर्मन चर्चचे जगातले प्रमुख चर्च (सत्तास्थान) आहे. येथे हरे राम हरे कृष्णचे (इस्कॉनचे) मंदीर आहे. या होळी आणि धुळवडीस साधारण ५०,००० लोकं एकत्र येतात. इस्कॉनचे असल्याने मांसाहारी देखील नसते तेंव्हा बिअर अथवा इतर अल्कोहोलीक पेय नसणे हे स्वाभाविक आहे.
16 Mar 2014 - 3:42 pm | मनिम्याऊ
आई है होली रंग भरी, इस पर्व को मनाये,
नाता है एक दूजे से, इसे न भूल जाये|
बहुत बड़ी हे दुनिया, इसमे न खो जाये,
रंग और उमंग में बसी, प्रीत को जान जाये|
कितने भी दूर हो, लेकिन मेरी ऊँची हे सदाए,
होली के रंग खेले संग, कभी न भूल पाए|
प्रीत के इस पर्व पर, तुम हमे और हम तुम्हे बुलाये,
माना दुनिया का सफर कठिन हे, आती आंधी और हवाए|
पर जरुरी नही की हम, दुनिया में इसी रूप में दोबारा आये,
प्रेम का लेन देन न कर सके, जीवन में यह सोच कर न पछताए|
सुनहरी किरणे आतुर खड़ी स्वागत में, दूर कर दे काली घटाए,
हम तो है उन्ही के वो भी है हमारे, सोच कर मुस्कुराये|
छोटी सी है यह जिन्दगी, यु ही न चली जाये,
आज मिलकर करे एक वादा, दे सभी को दुआए|
पगडंडी लम्बी है पर इतनी संकरी नही की, उसमे दो नही समाये,
प्रेम स्नेह की बरसात हो, सभी के जीवन में खुशिया छाए|
आओ होली मनाये,आओ होली मनाये
--नारायणी माया
16 Mar 2014 - 9:13 pm | तुमचा अभिषेक
झिंदगी ना मिलेगी दोबारा मध्ये टमाटर तुडवत उड्या मारणे ते देखील सही होते..
पण उगाच शालेय पाठ्यपुस्तकातील लाल चिखलची आठवण होते..
4 Apr 2014 - 9:34 am | माहितगार
अनुप ढेरे, निनाद मुक्काम प..., विकास, मनिम्याऊ, तुमचा अभिषेक, लीमाउजेट, मारकुटे, आनंदी गोपाळ आपणा सर्वांना प्रतिसादांसाठी धन्यवाद