श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या समाधीच्या शताब्दीचे हे वर्ष आहे. या निमित्त्याने विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत.त्यांच्या ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात मला श्री.अजित कडकडे यांचे गायन ऐकण्याची संधी मिळाली.तसेच त्यांना भेटुन २ शब्द बोलण्याची संधी मिळाली. :) त्या कार्यक्रमाच्या वेळी मी काही क्षणचित्रे टिपली ती आपल्यासाठी इथे देत आहे.
{हौशी फोटुग्राफर } :)
मदनबाण.....
कॅमेरा :- निकॉन- डी-५१००
* रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत,कंप्रेस केल्यामुळे कलरशेड मधे फरक पडतो.
प्रतिक्रिया
14 Jan 2014 - 10:18 pm | अनुप ढेरे
वा,,, छान फोटो
14 Jan 2014 - 10:21 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर
अजित कडकडे माझे आवडते गायक आहेत. मी पण त्यांच्यासारखा गोव्याचाच आहे .धन्यवाद.
14 Jan 2014 - 11:26 pm | खटपट्या
लहानपणापासून मी अजित कडकडे ना बघतोय. ते आहेत तसेच आहेत. जणू काही चिरतरुण.
फोटो छान
15 Jan 2014 - 10:43 am | सौंदाळा
हेच म्हणतो.
15 Jan 2014 - 10:08 am | अजया
सुरेख भावमुद्रा टिपल्या आहेत!
15 Jan 2014 - 10:25 am | प्रमोद देर्देकर
बाणा आधी का नाही सांगितलेस मी सुद्धा आलो असतो ना?
त्यांची जुनी एक कॅसेट माझ्याकडे होती पण हरवली.
ज्यात १)"टाळी वाजवावी गुढी उभारावी", २)"पायी खदडावा वाजती गर्जती आले रघुपती दरबारा" ही गाणी होती.
मला ती हवी आहेत कोणाकडे असल्यास लिन्क देणे.
15 Jan 2014 - 10:50 am | माझीही शॅम्पेन
अरे बाप रे
धाग्याचे नाव बघून मला वाटल गेले की काय ... नंतर हायस वाटल !!!
15 Jan 2014 - 10:59 am | बर्फाळलांडगा
म्हणतो.
15 Jan 2014 - 9:16 pm | सूड
>>चला...... हवा येवू दया !
नको. हवेने वितळलात तर पितळ उघडं पडायचं.
15 Jan 2014 - 9:08 pm | मुक्त विहारि
आणि हे असे अप्रतिम फोटो इथे टाकल्याबद्दल मनापासून आभार
15 Jan 2014 - 10:55 pm | आशु जोग
जरा गाण्याबद्दल लिव की
16 Jan 2014 - 9:36 am | मंदार कात्रे
आभार मदनबाण जी
कड़कडे यान्चे "व्रुन्दावनी वेणू" हे माझे अत्यन्त आवडते गीत
16 Jan 2014 - 11:16 am | कोंकणी माणूस
मला वाटत श्री क्षेत्र माणगाव (सिंधुदुर्ग ) ला असावा .
16 Jan 2014 - 2:26 pm | मदनबाण
सर्व मंडळींना धन्स ! :)
@ खटपट्या
हो, ते चिरतरुण आहेत, आणि ते तसेच रहावेत ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. :)
@ प्रमोद देर्देकर
पुढच्यावेळी असा काही कार्यक्रम असल्यास आपल्याला नक्की कळवेन.
@ आशु जोग
त्यांच्या गाण्याबद्धल काय बोलु आणि लिहु ? ती माझी पात्रताच नाही ! त्यांनी शास्त्रीय संगीताने सुरुवात करुन नंतर भजन गायन केले. कित्येक वर्षांनी माझे कान त्रुप्त झाल्याचा आनंद मिळाला. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव कथन देखील केले. त्यांना तिथे नरसोबाच्या वाडीतील गुरुजी मंडळी आल्याचे माहित होते त्यामुळे त्यांनी आज मला माझ्या माहेरी आल्याचा आनंद झाला आहे असे सर्व श्रोत्यांना सांगितले. त्यांनी विठ्ठलाचे जे भजन म्हंटले त्यात त्यांनी विठ्ठल विठ्ठल असे आळवल्यावर माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले इतका आनंद मला मिळाला. त्यांच्या प्रत्येक गाण्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटाने सभागॄह भारुन गेले. :)
@ मंदार कात्रे
वॄंदावनी वेणु हे माझे देखील आवडते गीत आहे, त्यांच्याशी जेव्हा बोललो तेव्हा, आपले श्रीगुरु सारखा असता पाठीराखा हे गीत मला फार आवडते असे त्यांना मी सांगितले. :)
@कोंकणी माणूस
हा कार्यक्रम ठाण्यात झाला. ज्ञानराज कार्यालय पाचपाखाडी.