✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वारली चित्रकला

र
राजेंद्र मेहेंदळे यांनी
Mon, 06/23/2014 - 23:17  ·  लेख
लेख
वारली चित्रकलेची मी तुम्हाला वेगळी काय ओळख करुन देणार? ठाणे जिल्ह्यातील आदीवासींनी जपलेली आणि वाढवलेली ही कला श्री.जिव्या सोमा मशे यांच्यासारख्या कलाकारांनी सातासमुद्रापार पोचवली आहे. ही नुसतीच चित्रशैली नसुन ती भाषासुद्धा आहे असे काहीजण मानतात. म्हणजे एखाद्या घरात लग्नकार्य असेल तर घरावर काढलेल्या चित्रांमधुन ते गावाला समजते. तसेच पूजा, सणवार, रोजचे जीवन असेही विषय चित्रात असतात. तर मलाही कधीतरी हा किडा चावला आणि मग सुरु झाला एक प्रवास. वारली कलेची पुस्तके मिळविणे,वाचणे, गुगलुन अजुन माहीती मिळवणे सुरु झाले. कागदावरुन कॅन्व्हासवर आणि कॅन्व्हासवरुन भिंतीवर अशी माध्यमे बदलत गेली.असाच हा एक प्रयत्न..आपल्याला आवडल्यास जरुर कळवा a
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला

प्रतिक्रिया द्या
112661 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

अरे व्वा! सुंदर प्रयत्न!!

आयुर्हित
Tue, 06/24/2014 - 00:05 नवीन
अरे व्वा! सुंदर प्रयत्न!!
  • Log in or register to post comments

प्रचंड सुंदर...

एस
Tue, 06/24/2014 - 00:38 नवीन
प्रचंड सुंदर...
  • Log in or register to post comments

माझ्या मित्राची ३-४ वर्षांची

प्रभाकर पेठकर
Tue, 06/24/2014 - 02:21 नवीन
माझ्या मित्राची ३-४ वर्षांची मुलगी म्हणजे अगदीच हातापायाच्या काड्या अशी होती. (चुणचुणीत. कुठलाही आजार किंवा व्याधी नाही. पण चणच अगदी बारीक.) त्याच्या घरी गेलो असता ती कोण आलय पाहायला बाहेर आली तर मित्राने ओळख करून दिली, 'ही आमची वारली चित्रकला'.
  • Log in or register to post comments

छान

चित्रगुप्त
Tue, 06/24/2014 - 03:17 नवीन
छान. दरवाजा सुद्धा रंगवून टाका. आणखी मजा येईल.
  • Log in or register to post comments

+१

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 06/24/2014 - 14:23 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

सर्वांचे आभार

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 06/24/2014 - 10:51 नवीन
चित्रगुप्तजी, दरवाजा ग्लॉसी असल्याने वॉटर बेस रंग त्यावर टिकत नाहीये, ओघळतोय..आणि ऑईल पेंटवर माझा अनुभव नाही... त्यामुळे दरवाजा बाकी ठेवलाय
  • Log in or register to post comments

वाह

चाणक्य
Tue, 06/24/2014 - 10:58 नवीन
मस्तच दिसतंय.
  • Log in or register to post comments

सुंदर . ह्याच्यासाठी कोणते

म्हैस
Tue, 06/24/2014 - 11:30 नवीन
सुंदर . ह्याच्यासाठी कोणते रंग वापरलेत ? मला पण आमच्या घरची भिंत रंग्वाय्चीये . पण घरचे असले काही उद्योग करू देत नाहीत :-(
  • Log in or register to post comments

रंग

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 06/24/2014 - 13:20 नवीन
यासाठी एशियन पेंट किंवा ड्युलक्स्चे अक्रिलिक रंग वापरले आहेत. आणि घरचे नाहीच उद्योग करु देणार हो!!! त्यासाठी पहीले मुलांना भिंत गिरमटुन खराब करुद्या :) मग नीट करायच्या नावाखाली रंगवायला घ्या..चित्र नीट न जमल्यास फक्त ब्रिक रेड रंग ठेवाल तरी छान दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

माझ्या मुलानी घराच दार

पिलीयन रायडर
Tue, 06/24/2014 - 15:53 नवीन
माझ्या मुलानी घराच दार उघडल्या उघडल्या जी भिंत दिसते ती फुल्ल रंगवुन ठेवली आहे.. (बाकी पण प्रत्येक भिंतीवर रेघोट्या आहेतच..पण हा त्याचा १०-१५ मि. सलग चालु असलेला मुक्त आविष्कार होता!! ) आता मला छान आयडिया मिळाली आहे.. रंगवुन टाकु..हाय काय न नाय काय!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

ब्येस

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 06/24/2014 - 15:55 नवीन
मुलाला पण घ्या मदतीला...त्याचीही हौस फिटेल फोटो डकवा झाल्यवर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

छानच. अजुन येउद्यात.

जागु
Tue, 06/24/2014 - 12:04 नवीन
छानच. अजुन येउद्यात.
  • Log in or register to post comments

सुंदर !

मितान
Tue, 06/24/2014 - 14:00 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments

मस्तच दिसतेय. तेवढा दरवाजा पण

शिद
Tue, 06/24/2014 - 14:08 नवीन
मस्तच दिसतेय. तेवढा दरवाजा पण रंगवता आला तर पहा म्हणजे आणखीन सुंदर दिसेल.
  • Log in or register to post comments

भिंत छान रंगवली आहे

दिपक.कुवेत
Tue, 06/24/2014 - 15:13 नवीन
फोटो बघुन तरी हि पेटिंग सोपी वाटते पण प्रत्यक्षात ती तशी आहे का? आय मीन कुणालाहि जमण्यासारखी आहे का? ह्या विषयावर एखादि सचित्र मालिका/लेख लिहिलेत तर जास्त आवडेल.
  • Log in or register to post comments

फार कठीण नाही

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 06/24/2014 - 15:22 नवीन
तसे फार कठीण नाहीये...फक्त किती मोठया जागेत काढायचे आहे त्याप्रमाणे आकार लहान मोठे करावे लागतात आणि त्याची साईझ सारखी ठेवावी लागते..थोडे ओबड धोबड झाले तरी छान दिसते. तसाही शेवटी एक रस्टीक लूक यायलाच हवा..ही कॅन्व्हासवरची काही चित्रे बघा Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

नंबर वन ! चांगलाच हात बसलाय

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 06/24/2014 - 15:25 नवीन
नंबर वन ! चांगलाच हात बसलाय तुमचा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

नाय हो

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 06/24/2014 - 15:33 नवीन
फावल्या वेळचे उद्योग (आमच्या भाषेत बेंचवर असतानाचे...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

वा हि कॅन्व्हासवरची पण खुप आवडली

दिपक.कुवेत
Tue, 06/24/2014 - 15:36 नवीन
खासकरुन ते पहिलं चित्र. नमुन्यादाखल रफ पेपेर वर लगेच एक / दोन चित्र काढुन पाहिली आहेत. जमतायेत. दिसतायेत तेवढि कठिण नाहि. ह्या विकेंडला आणखी प्रयत्न करुन जमलं तर ते चित्र ईथे डकवतो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

जे ब्बात

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 06/24/2014 - 15:41 नवीन
येउंद्या तर मग!!!काही मदत लागल्यास कळवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

अरे नक्किच

दिपक.कुवेत
Tue, 06/24/2014 - 15:44 नवीन
फक्त माझ्याकडे वॉटर कलर्स नाहियेत सो आधी स्केचपेन ने काढुन बघतो. आशा आहे जमतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

अरे नक्किच

दिपक.कुवेत
Tue, 06/24/2014 - 15:46 नवीन
फक्त माझ्याकडे वॉटर कलर्स नाहियेत सो आधी स्केचपेन ने काढुन बघतो. आशा आहे जमतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

स्टेन्सिल्स वापरू शकता

चित्रगुप्त
Wed, 06/25/2014 - 02:41 नवीन
वाटल्यास ज्या अगदी एकसारख्या आकाराच्या आकृत्या असतील त्यासाठी स्टेन्सिल्स कापून वापरू शकता. उदाहरणार्थ एका मनुष्याकृतीचे स्टेन्सिल करून तेच वेगवेगळ्या दिशेत फिरवून ठेवायचे आणि फोमचा तुकडा रंगात बुडवून स्टेन्सिलच्या कापलेल्या भागावर मारून रंगवायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

सुरेख चित्रे!

यशोधरा
Tue, 06/24/2014 - 16:34 नवीन
सुरेख चित्रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

वारली चित्रकला बघून वारल्या

बॅटमॅन
Tue, 06/24/2014 - 15:30 नवीन
वारली चित्रकला बघून वारल्या गेले आहे!!!! _/\_ लय म्ह. लयच भारी.
  • Log in or register to post comments

खूपच छान.

प्रचेतस
Tue, 06/24/2014 - 16:15 नवीन
खूपच छान.
  • Log in or register to post comments

आमाले हापिसात फोटू दिसून नाय

धन्या
Tue, 06/24/2014 - 17:34 नवीन
आमाले हापिसात फोटू दिसून नाय र्‍हायले. फ्लिकरवर चढवले काय बाप्पा?
  • Log in or register to post comments

चेपुवरुन लिंक कॉपी केल्यात

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 06/24/2014 - 18:08 नवीन
चेपुवरुन लिंक कॉपी केल्यात
  • Log in or register to post comments

भिंत रंगवण्यापेक्षा चित्र

सूड
Tue, 06/24/2014 - 20:56 नवीन
भिंत रंगवण्यापेक्षा चित्र कॅनव्हासवर काढून ते भिंतीवर लावणे मला केव्हांही सोयिस्कर वाटते. म्हणजे पसंत पडलं नाही किंवा बरेच दिवस झाले की बदलून दुसरं लावता येतं.
  • Log in or register to post comments

तेही बरोबरच

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 06/24/2014 - 23:15 नवीन
पण मुळात भिंतच खराब झाली असेल, आणि रंग द्यायला अजुन वेळ असेल किंवा सध्या बजेट नसेल...तर करुन बघायला काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments

मस्तच हो!

प्यारे१
Wed, 06/25/2014 - 00:01 नवीन
मस्तच हो!
  • Log in or register to post comments

मी केलेला एक प्रयत्न - वारली

खटपट्या
Wed, 06/25/2014 - 05:36 नवीन
मी केलेला एक प्रयत्न - वारली पासून विषयांतर केल्याबद्दल क्षमस्व Image removed.
  • Log in or register to post comments

मस्तच !

मदनबाण
Wed, 06/25/2014 - 07:05 नवीन
मस्तच ! @ खटपट्या लयं भारी ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- आजची स्वाक्षरी :- Apollo 440 - Charlie's Angels
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

क्या बात है खटपट्या !!

संजय क्षीरसागर
Wed, 06/25/2014 - 10:00 नवीन
जबरी स्टाईल आणि लयकारी आहे रेषेत. कसे शिकलात? आणखी काही पेंटीग्ज आहेत का तुमची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

आवड भरपूर आहे. अजून काही जुनी

खटपट्या
Wed, 06/25/2014 - 11:39 नवीन
आवड भरपूर आहे. अजून काही जुनी पेंटिंग मिळतील तर अपलोड करतो. यु ट्यूब आणि नेटवर बघून बरेच साहित्य खराब करून शिकलो. हल्ली कामामुळे वेळ मिळत नाही. खरे तर जे जे स्कूल ऑफ आर्ट ला जायचे होते. पण……
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

दादा,

संजय क्षीरसागर
Wed, 06/25/2014 - 11:58 नवीन
तुमची इतर चित्रं पाहून कंन्सीस्टन्सीबद्दल बोलता येईल, पण या एका चित्रातून तरी जबरदस्त पोटेंशियल दिसतं. त्यात जेजेचा विषय काढलायं, तर तुम्ही कामातून वेळ काढून (आणि अगदी फारच मूड असेल तर काम फाट्यावर मारुन), चित्रकलेला वेळ द्या. चांगली चित्र तुम्हाला दीर्घकालीन आनंद देतील. यू विल हॅव वन मोर डायमेंशन टू योर लाईफ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

जबराट.

शिद
Wed, 06/25/2014 - 11:27 नवीन
जबराट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

अप्रतिम.....

प्यारे१
Wed, 06/25/2014 - 13:07 नवीन
अप्रतिम..... संपादकांना विनंती: ह्या वाघोबाचा वेगळा धागा करावा. जमवाच्च. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

वाघोबाचा वेगळा धागा करावा.

संजय क्षीरसागर
Wed, 06/25/2014 - 13:24 नवीन
अनुमोदन! सदस्यानं आणखी काही चित्रं अपलोड करुन, स्वतंत्र पोस्ट टाकली तर मजा येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

नवीन चित्र काढून अपलोड

खटपट्या
Wed, 06/25/2014 - 22:57 नवीन
नवीन चित्र काढून अपलोड करण्याचा जरूर प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

लय भारी

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 06/25/2014 - 13:23 नवीन
हा वाघोबा कॅन्व्हासवर काढलाय की कुठल्या ग्लॉसी पृष्ठभागावर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

घरी नेहमीसारखा डिस्टम्पर

खटपट्या
Wed, 06/25/2014 - 22:55 नवीन
घरी नेहमीसारखा डिस्टम्पर मारला होता. त्यावर पांढऱ्या ओईल पेंट चे चार ते पाच हात दिले. एशिअन अप्कोलाइट त्यातल्या त्यात घट्ट असतो. रंगामध्ये डायरेक्ट केरोसीन/टर्पेण्टैन न टाकता फक्त ब्रश केरोसीन मध्ये बुडवून घ्या. चार ते पाच पातळ हात दिल्यावर पृष्ठ भाग तयार झाला. या साठी दोन दिवस गेले. मग जे चित्र काढायचे होते ते आधी पेन्सिल ने काढून घेतले (ओईल पेंट वर साधी पेन्सिल चालत नाही म्हणून ग्लास मार्किंग पेन्सिल वापरावी. सफेद व लाल रंगात बाजारात उपलब्ध असतात. तीही नसेल तर मुलांसाठी क्रेयोन चे खडू वापरतो ते सुद्धा चालतात.) एकदा मनासारखे स्केच झाले कि दुसऱ्या रंगाने ते स्केच भरून घ्यावे. हेच काम आपण पाण्याचे रंग वापरून देखील करू शकतो. पण मग ती भिंत साफ करताना जपावी लागते. ओईल पेंट मधील चित्र आपण नेहमी ओल्या फडक्याने साफ करू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

सुंदर.

हुकुमीएक्का
Wed, 06/25/2014 - 23:16 नवीन
सुंदर वारली चित्रकला. *good*
  • Log in or register to post comments

@राजेंद्र मेहेंदळे. धन्यवाद

म्हैस
गुरुवार, 06/26/2014 - 11:36 नवीन
@राजेंद्र मेहेंदळे. धन्यवाद प्रोब्लेम हा आहे कि घरात लहान मुलाच नाहीयेत . तरी पण gallary ची भिंत रंगवून बघेन . वाघाचं चित्र तर सहीच . फक्त वाघाच्या सावलीत थोडीशी गडबड वाटतीये.
  • Log in or register to post comments

गॅलरीचा प्रॉब्लेम

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 06/26/2014 - 13:07 नवीन
@म्हैस- गॅलरीची भिंत खडबडीत असते, त्यामुळे जरा मर्यादा येतात जसे की आकार बिघडु शकतात किंवा रंग नीट बसत नाही. तुमच्या गॅलरीला प्लास्टर केले असेल तर गोष्ट वेगळी. एकुण काय पृष्ठभाग सपाट पाहीजे
  • Log in or register to post comments

मस्तच!

पैसा
Fri, 06/27/2014 - 22:56 नवीन
सुंदर आयडिया. मी लहान असताना मापांच्या घरात रहात होते. त्या भिंती दर वर्षी लाल मातीने सारवतात. मात्र त्यावर काही चित्रे काढली असती तर मार पडला असता! तसल्या भिंतींवर अशी चित्रे काढायला फारच छान वाटेल.
  • Log in or register to post comments

मापांचे घर?

राजेंद्र मेहेंदळे
Sun, 06/29/2014 - 00:14 नवीन
म्हणजे काय हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मापं

पैसा
Sun, 06/29/2014 - 00:39 नवीन
म्हणजे मातीच्या कच्च्या विटा. या भाजलेल्या नसतात. आणि आकाराने बर्‍याच मोठ्या असतात. अर्थात ही घरे उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात आतून उबदार असली तरी तेवढीशी मजबूत नसतात. कोकणातल्या गावांत चिरे परवडत नसतील ते लोक अशी घरे बांधतात. माझे आईवडील शिक्षक म्हणून एका गावात नोकरी करायचे तेव्हा आम्ही अशा एका घरात महिना २५ रुपये भाड्याने रहात होतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

" अ हॅपी प्लेस"

इन्दुसुता
Sat, 06/28/2014 - 10:14 नवीन
" अ हॅपी प्लेस" तुमचे भित्तिचित्र पाहून ही जाणीव झाली की यू हॅव डिपिक्टेड अ व्हेरी हॅपी प्लेस. चित्रकला आवडली. @ खटपट्या, वाघाचे पेन्टींग आवडले. अवांतरः कॉलेजच्या प्रथम वर्षात असताना आम्हीही आमच्या खोलीच्या भिंतीवर पेन्टींग केले होते ... ते पाहून आमचे पिताश्री हतबुद्ध झाले होते आणि त्यांनी मला " का उगाच भिंत खराब करतियेस" ( :D) असा प्रश्न विचारल्यानंतर परत कधी भिंत रंगवायला घ्यायची हिम्मत केली नव्हती, आता अंमळ करून बघावे म्हणतेय :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

राजेंद्र मेहेंदळे
Sun, 06/29/2014 - 00:15 नवीन
आणि तुमच्या चित्रासाठी शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्दुसुता
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा