वारली चित्रकलेची मी तुम्हाला वेगळी काय ओळख करुन देणार? ठाणे जिल्ह्यातील आदीवासींनी जपलेली आणि वाढवलेली ही कला श्री.जिव्या सोमा मशे यांच्यासारख्या कलाकारांनी सातासमुद्रापार पोचवली आहे.
ही नुसतीच चित्रशैली नसुन ती भाषासुद्धा आहे असे काहीजण मानतात. म्हणजे एखाद्या घरात लग्नकार्य असेल तर घरावर काढलेल्या चित्रांमधुन ते गावाला समजते. तसेच पूजा, सणवार, रोजचे जीवन असेही विषय चित्रात असतात.
तर मलाही कधीतरी हा किडा चावला आणि मग सुरु झाला एक प्रवास. वारली कलेची पुस्तके मिळविणे,वाचणे, गुगलुन अजुन माहीती मिळवणे सुरु झाले. कागदावरुन कॅन्व्हासवर आणि कॅन्व्हासवरुन भिंतीवर अशी माध्यमे बदलत गेली.असाच हा एक प्रयत्न..आपल्याला आवडल्यास जरुर कळवा
प्रतिक्रिया
24 Jun 2014 - 12:05 am | आयुर्हित
अरे व्वा! सुंदर प्रयत्न!!
24 Jun 2014 - 12:38 am | एस
प्रचंड सुंदर...
24 Jun 2014 - 2:21 am | प्रभाकर पेठकर
माझ्या मित्राची ३-४ वर्षांची मुलगी म्हणजे अगदीच हातापायाच्या काड्या अशी होती. (चुणचुणीत. कुठलाही आजार किंवा व्याधी नाही. पण चणच अगदी बारीक.) त्याच्या घरी गेलो असता ती कोण आलय पाहायला बाहेर आली तर मित्राने ओळख करून दिली, 'ही आमची वारली चित्रकला'.
24 Jun 2014 - 3:17 am | चित्रगुप्त
छान. दरवाजा सुद्धा रंगवून टाका. आणखी मजा येईल.
24 Jun 2014 - 2:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
24 Jun 2014 - 10:51 am | राजेंद्र मेहेंदळे
चित्रगुप्तजी, दरवाजा ग्लॉसी असल्याने वॉटर बेस रंग त्यावर टिकत नाहीये, ओघळतोय..आणि ऑईल पेंटवर माझा अनुभव नाही... त्यामुळे दरवाजा बाकी ठेवलाय
24 Jun 2014 - 10:58 am | चाणक्य
मस्तच दिसतंय.
24 Jun 2014 - 11:30 am | म्हैस
सुंदर . ह्याच्यासाठी कोणते रंग वापरलेत ? मला पण आमच्या घरची भिंत रंग्वाय्चीये . पण घरचे असले काही उद्योग करू देत नाहीत :-(
24 Jun 2014 - 1:20 pm | राजेंद्र मेहेंदळे
यासाठी एशियन पेंट किंवा ड्युलक्स्चे अक्रिलिक रंग वापरले आहेत. आणि घरचे नाहीच उद्योग करु देणार हो!!!
त्यासाठी पहीले मुलांना भिंत गिरमटुन खराब करुद्या :) मग नीट करायच्या नावाखाली रंगवायला घ्या..चित्र नीट न जमल्यास फक्त ब्रिक रेड रंग ठेवाल तरी छान दिसेल.
24 Jun 2014 - 3:53 pm | पिलीयन रायडर
माझ्या मुलानी घराच दार उघडल्या उघडल्या जी भिंत दिसते ती फुल्ल रंगवुन ठेवली आहे.. (बाकी पण प्रत्येक भिंतीवर रेघोट्या आहेतच..पण हा त्याचा १०-१५ मि. सलग चालु असलेला मुक्त आविष्कार होता!! )
आता मला छान आयडिया मिळाली आहे.. रंगवुन टाकु..हाय काय न नाय काय!!
24 Jun 2014 - 3:55 pm | राजेंद्र मेहेंदळे
मुलाला पण घ्या मदतीला...त्याचीही हौस फिटेल
फोटो डकवा झाल्यवर
24 Jun 2014 - 12:04 pm | जागु
छानच. अजुन येउद्यात.
24 Jun 2014 - 2:00 pm | मितान
सुंदर !
24 Jun 2014 - 2:08 pm | शिद
मस्तच दिसतेय. तेवढा दरवाजा पण रंगवता आला तर पहा म्हणजे आणखीन सुंदर दिसेल.
24 Jun 2014 - 3:13 pm | दिपक.कुवेत
फोटो बघुन तरी हि पेटिंग सोपी वाटते पण प्रत्यक्षात ती तशी आहे का? आय मीन कुणालाहि जमण्यासारखी आहे का? ह्या विषयावर एखादि सचित्र मालिका/लेख लिहिलेत तर जास्त आवडेल.
24 Jun 2014 - 3:22 pm | राजेंद्र मेहेंदळे
तसे फार कठीण नाहीये...फक्त किती मोठया जागेत काढायचे आहे त्याप्रमाणे आकार लहान मोठे करावे लागतात आणि त्याची साईझ सारखी ठेवावी लागते..थोडे ओबड धोबड झाले तरी छान दिसते. तसाही शेवटी एक रस्टीक लूक यायलाच हवा..ही कॅन्व्हासवरची काही चित्रे बघा
24 Jun 2014 - 3:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
नंबर वन ! चांगलाच हात बसलाय तुमचा !!
24 Jun 2014 - 3:33 pm | राजेंद्र मेहेंदळे
फावल्या वेळचे उद्योग (आमच्या भाषेत बेंचवर असतानाचे...)
24 Jun 2014 - 3:36 pm | दिपक.कुवेत
खासकरुन ते पहिलं चित्र. नमुन्यादाखल रफ पेपेर वर लगेच एक / दोन चित्र काढुन पाहिली आहेत. जमतायेत. दिसतायेत तेवढि कठिण नाहि. ह्या विकेंडला आणखी प्रयत्न करुन जमलं तर ते चित्र ईथे डकवतो. धन्यवाद.
24 Jun 2014 - 3:41 pm | राजेंद्र मेहेंदळे
येउंद्या तर मग!!!काही मदत लागल्यास कळवा
24 Jun 2014 - 3:44 pm | दिपक.कुवेत
फक्त माझ्याकडे वॉटर कलर्स नाहियेत सो आधी स्केचपेन ने काढुन बघतो. आशा आहे जमतील.
24 Jun 2014 - 3:46 pm | दिपक.कुवेत
फक्त माझ्याकडे वॉटर कलर्स नाहियेत सो आधी स्केचपेन ने काढुन बघतो. आशा आहे जमतील.
25 Jun 2014 - 2:41 am | चित्रगुप्त
वाटल्यास ज्या अगदी एकसारख्या आकाराच्या आकृत्या असतील त्यासाठी स्टेन्सिल्स कापून वापरू शकता. उदाहरणार्थ एका मनुष्याकृतीचे स्टेन्सिल करून तेच वेगवेगळ्या दिशेत फिरवून ठेवायचे आणि फोमचा तुकडा रंगात बुडवून स्टेन्सिलच्या कापलेल्या भागावर मारून रंगवायचे.
24 Jun 2014 - 4:34 pm | यशोधरा
सुरेख चित्रे!
24 Jun 2014 - 3:30 pm | बॅटमॅन
वारली चित्रकला बघून वारल्या गेले आहे!!!! _/\_
लय म्ह. लयच भारी.
24 Jun 2014 - 4:15 pm | प्रचेतस
खूपच छान.
24 Jun 2014 - 5:34 pm | धन्या
आमाले हापिसात फोटू दिसून नाय र्हायले. फ्लिकरवर चढवले काय बाप्पा?
24 Jun 2014 - 6:08 pm | राजेंद्र मेहेंदळे
चेपुवरुन लिंक कॉपी केल्यात
24 Jun 2014 - 8:56 pm | सूड
भिंत रंगवण्यापेक्षा चित्र कॅनव्हासवर काढून ते भिंतीवर लावणे मला केव्हांही सोयिस्कर वाटते. म्हणजे पसंत पडलं नाही किंवा बरेच दिवस झाले की बदलून दुसरं लावता येतं.
24 Jun 2014 - 11:15 pm | राजेंद्र मेहेंदळे
पण मुळात भिंतच खराब झाली असेल, आणि रंग द्यायला अजुन वेळ असेल किंवा सध्या बजेट नसेल...तर करुन बघायला काय हरकत आहे?
25 Jun 2014 - 12:01 am | प्यारे१
मस्तच हो!
25 Jun 2014 - 5:36 am | खटपट्या
मी केलेला एक प्रयत्न - वारली पासून विषयांतर केल्याबद्दल क्षमस्व
25 Jun 2014 - 7:05 am | मदनबाण
मस्तच !
@ खटपट्या
लयं भारी !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आजची स्वाक्षरी :- Apollo 440 - Charlie's Angels
25 Jun 2014 - 10:00 am | संजय क्षीरसागर
जबरी स्टाईल आणि लयकारी आहे रेषेत. कसे शिकलात? आणखी काही पेंटीग्ज आहेत का तुमची?
25 Jun 2014 - 11:39 am | खटपट्या
आवड भरपूर आहे. अजून काही जुनी पेंटिंग मिळतील तर अपलोड करतो. यु ट्यूब आणि नेटवर बघून बरेच साहित्य खराब करून शिकलो. हल्ली कामामुळे वेळ मिळत नाही. खरे तर जे जे स्कूल ऑफ आर्ट ला जायचे होते. पण……
25 Jun 2014 - 11:58 am | संजय क्षीरसागर
तुमची इतर चित्रं पाहून कंन्सीस्टन्सीबद्दल बोलता येईल, पण या एका चित्रातून तरी जबरदस्त पोटेंशियल दिसतं. त्यात जेजेचा विषय काढलायं, तर तुम्ही कामातून वेळ काढून (आणि अगदी फारच मूड असेल तर काम फाट्यावर मारुन), चित्रकलेला वेळ द्या. चांगली चित्र तुम्हाला दीर्घकालीन आनंद देतील. यू विल हॅव वन मोर डायमेंशन टू योर लाईफ.
25 Jun 2014 - 11:27 am | शिद
जबराट.
25 Jun 2014 - 1:07 pm | प्यारे१
अप्रतिम.....
संपादकांना विनंती: ह्या वाघोबाचा वेगळा धागा करावा. जमवाच्च. :)
25 Jun 2014 - 1:24 pm | संजय क्षीरसागर
अनुमोदन! सदस्यानं आणखी काही चित्रं अपलोड करुन, स्वतंत्र पोस्ट टाकली तर मजा येईल.
25 Jun 2014 - 10:57 pm | खटपट्या
नवीन चित्र काढून अपलोड करण्याचा जरूर प्रयत्न करेन.
25 Jun 2014 - 1:23 pm | राजेंद्र मेहेंदळे
हा वाघोबा कॅन्व्हासवर काढलाय की कुठल्या ग्लॉसी पृष्ठभागावर?
25 Jun 2014 - 10:55 pm | खटपट्या
घरी नेहमीसारखा डिस्टम्पर मारला होता. त्यावर पांढऱ्या ओईल पेंट चे चार ते पाच हात दिले. एशिअन अप्कोलाइट त्यातल्या त्यात घट्ट असतो. रंगामध्ये डायरेक्ट केरोसीन/टर्पेण्टैन न टाकता फक्त ब्रश केरोसीन मध्ये बुडवून घ्या. चार ते पाच पातळ हात दिल्यावर पृष्ठ भाग तयार झाला. या साठी दोन दिवस गेले.
मग जे चित्र काढायचे होते ते आधी पेन्सिल ने काढून घेतले (ओईल पेंट वर साधी पेन्सिल चालत नाही म्हणून ग्लास मार्किंग पेन्सिल वापरावी. सफेद व लाल रंगात बाजारात उपलब्ध असतात. तीही नसेल तर मुलांसाठी क्रेयोन चे खडू वापरतो ते सुद्धा चालतात.) एकदा मनासारखे स्केच झाले कि दुसऱ्या रंगाने ते स्केच भरून घ्यावे.
हेच काम आपण पाण्याचे रंग वापरून देखील करू शकतो. पण मग ती भिंत साफ करताना जपावी लागते. ओईल पेंट मधील चित्र आपण नेहमी ओल्या फडक्याने साफ करू शकतो.
25 Jun 2014 - 11:16 pm | हुकुमीएक्का
सुंदर वारली चित्रकला. *good*
26 Jun 2014 - 11:36 am | म्हैस
@राजेंद्र मेहेंदळे. धन्यवाद
प्रोब्लेम हा आहे कि घरात लहान मुलाच नाहीयेत . तरी पण gallary ची भिंत रंगवून बघेन .
वाघाचं चित्र तर सहीच . फक्त वाघाच्या सावलीत थोडीशी गडबड वाटतीये.
26 Jun 2014 - 1:07 pm | राजेंद्र मेहेंदळे
@म्हैस- गॅलरीची भिंत खडबडीत असते, त्यामुळे जरा मर्यादा येतात जसे की आकार बिघडु शकतात किंवा रंग नीट बसत नाही. तुमच्या गॅलरीला प्लास्टर केले असेल तर गोष्ट वेगळी. एकुण काय पृष्ठभाग सपाट पाहीजे
27 Jun 2014 - 10:56 pm | पैसा
सुंदर आयडिया. मी लहान असताना मापांच्या घरात रहात होते. त्या भिंती दर वर्षी लाल मातीने सारवतात. मात्र त्यावर काही चित्रे काढली असती तर मार पडला असता! तसल्या भिंतींवर अशी चित्रे काढायला फारच छान वाटेल.
29 Jun 2014 - 12:14 am | राजेंद्र मेहेंदळे
म्हणजे काय हो?
29 Jun 2014 - 12:39 am | पैसा
म्हणजे मातीच्या कच्च्या विटा. या भाजलेल्या नसतात. आणि आकाराने बर्याच मोठ्या असतात. अर्थात ही घरे उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात आतून उबदार असली तरी तेवढीशी मजबूत नसतात. कोकणातल्या गावांत चिरे परवडत नसतील ते लोक अशी घरे बांधतात. माझे आईवडील शिक्षक म्हणून एका गावात नोकरी करायचे तेव्हा आम्ही अशा एका घरात महिना २५ रुपये भाड्याने रहात होतो!
28 Jun 2014 - 10:14 am | इन्दुसुता
" अ हॅपी प्लेस"
तुमचे भित्तिचित्र पाहून ही जाणीव झाली की यू हॅव डिपिक्टेड अ व्हेरी हॅपी प्लेस.
चित्रकला आवडली.
@ खटपट्या, वाघाचे पेन्टींग आवडले.
अवांतरः कॉलेजच्या प्रथम वर्षात असताना आम्हीही आमच्या खोलीच्या भिंतीवर पेन्टींग केले होते ... ते पाहून आमचे पिताश्री हतबुद्ध झाले होते आणि त्यांनी मला " का उगाच भिंत खराब करतियेस" ( :D) असा प्रश्न विचारल्यानंतर परत कधी भिंत रंगवायला घ्यायची हिम्मत केली नव्हती, आता अंमळ करून बघावे म्हणतेय :)
29 Jun 2014 - 12:15 am | राजेंद्र मेहेंदळे
आणि तुमच्या चित्रासाठी शुभेच्छा
29 Jun 2014 - 8:40 pm | चौथा कोनाडा
सुंदर वारली चित्रकला ! आवडली !
19 Jan 2017 - 11:54 pm | nanaba
:(
20 Jan 2017 - 11:36 am | वपाडाव
आपल्या दोघांचा गणेशा झालेला आहे...
20 Jan 2017 - 12:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
बहुदा मूळ स्त्रोतावरून चित्रे काढून टाकलेली आहेत, त्यामुळे ती दिसत नाहीत.
22 Feb 2017 - 11:58 am | राजेंद्र मेहेंदळे
चेपु वरुन फोटो टाकला होता .तो आता डिलीट केलाय म्हणुन असे झाले. पुन्हा लिंक देतो.
22 Feb 2017 - 12:12 pm | राजेंद्र मेहेंदळे
https://photos.google.com/share/AF1QipPxVTocwZ_1ZafoxjN6ueuvKQF2_l-whJzl...