बगीच्यात फेरफटका मारताना निरनिराळ्या लोकांशी भेट होत असते. आजकाल ‘वोट चोरी’चा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. असाच एक तरुण मुलगा भेटला—आयटी क्षेत्रात काम करणारा, अमेरिकन कंपनीत नोकरी करणारा. साहजिकच, स्वतःला महाज्ञानी समजणारा.
गप्पा मारताना तो सहज म्हणाला, “ईव्हीएमच्या मदतीने वोट चोरी सहज शक्य आहे.”
मी विचारलं, “कसं शक्य आहे? ईव्हीएमला इंटरनेट कनेक्शन नसतं. शिवाय एकदा मतदान झालं की ती मशीन बंद केली जाते—वीजही नसते.”
तो म्हणाला, “आज टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. इंटरनेट नसतानाही आकाशीय तरंगांच्या माध्यमातून ईव्हीएममध्ये फेरफार करता येतो.”
त्याची गूढ भाषा मला काही समजली नाही. शेवटी मी त्याला म्हटलं, “मला तुझं सगळं पटतंय. ईव्हीएममध्ये वोट चोरी होऊ शकते.”
तो खुश झाला. म्हणाला, “म्हणजे राहुल गांधींचे आरोप बरोबर आहेत!”
तेवढ्यात मला पार्कमधल्या एका बाकावर एक गृहस्थ टाइम्स ऑफ इंडिया वाचताना दिसले. मी त्याला विचारलं, “आकाशीय तरंगांच्या माध्यमातून या वर्तमानपत्राचं नाव बदलून हिंदुस्तान टाइम्स करता येईल का?”
ते माझ्याकडे पाहून म्हणाले, “काका, हे शक्य नाही. कागदावर छापलेले शब्द बदलता येत नाहीत.”
मी म्हणालो, “ईव्हीएमचा डेटा जर बदलला, आणि त्यानुसार छापील कागदी स्लिप्स बदलल्या नाहीत, तर चोरी सहज उघडकीस येईल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काही निवडणूक क्षेत्रांमध्ये ईव्हीएमसोबत छापील स्लिप्सची मोजणी केली जाते. त्यामुळे वोट चोरी शक्य नाही.”
त्याचं तोंड अगदी लहान झालं. म्हणाला, “मला हे माहीत नव्हतं.”
बहुतेक त्याने कधीच मतदान केलेलं नसावं.
प्रतिक्रिया
6 Sep 2025 - 6:40 am | चित्रगुप्त
-- यावरून त्या तरूणाला काय म्हणायचे होते ते समजते.
18 Sep 2025 - 12:01 pm | विवेकपटाईत
राहुल बाबचे आरोप चुकीचे आहेत. हे तरुणाला व्यवस्थित कळले. बाकी त्याने कधीच मतदान त्यामुळे ईव्हीएम मध्ये कागदी स्लिप ही असतात हे माहीत नव्हते.
6 Sep 2025 - 9:45 am | अमरेंद्र बाहुबली
तरुणांमध्ये वोटचोरीबद्दल जागरूकता निर्माण होते आहे हे लोकशाहीच्या दृष्टीने चांगले लक्षण आहे! ह्यामुळे वोटचोरी करून सत्ता हडपणाऱ्या पक्षांना आणी काही अशिक्षित नेत्याना चाप बसेल अशी अपेक्षा!
18 Sep 2025 - 12:04 pm | विवेकपटाईत
तुमचे म्हणणे सत्य अशिक्षित नेते त्यांची नावे मी घेत नाही. एका अशिक्षित नेत्याची जो सर्वांना अशिक्षित समजतो प्रेस कांफेरेन्स करत राहतो. बाकी ईव्हीएम मध्ये हेराफेरी होऊ शकत नाही. हे कधी मत न देणार्यांना ही कळू लागले आहे.
10 Sep 2025 - 2:34 pm | निपा
कुठलेही इलेक्ट्रॉनिक device हॅक होऊ शकते . ओव्हर the एअर ऍक्सेस वर वायर्ड ऍक्सेस नसेल तरीही . ट्रान्स्पोर्टशन , हँडलिंग , मेकिंग इ. ला ऍक्सेस मिळू शकतो . सॉफ्टवेअर ओपन नाही आहे , म्हणजे सॉफ्टवेअर चे बग्स संभवतात . क्रिप्टोग्राफी पण ओपन नाही . क्लोज्ड सॉफ्टवेअर ला हॅकिंग चा धोका जास्त असतो. VVPAT पण १००% नाही, आणि सॅम्पलिंग मध्ये errors येतात. कदाचित १००% matching केलं कि समजेल किती विसंगती येते.
त्या पेक्षा खोटे मतदार उभे करणं सोपं असेल. जिथे पाहिजे तिथेच आणि जेवढा पाहिजे तेवढाच केलं कि manage होऊ शकतं . EC ने transparency ने व्हेरिफाय केलं पाहिजे .
10 Sep 2025 - 8:04 pm | सुक्या
खिक्क !!
17 Sep 2025 - 5:08 pm | संजय खांडेकर
आपण यातील तज्ज्ञ दिसत, कृपया काही शंकांचे निरसन विस्ताराने कराल का? म्हणजे आमच्या सारख्या अज्ञान सामान्य जनांना काही खरी माहिती मिळेल.
ईव्हीएम नक्की कोणत्या टप्प्यात हॅक केले जाते? मतदान सुरु असताना / मतदान सुरु होण्यापूर्वीच / मतदान संपल्यावर सीलबंद केले गेल्यावर?
कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिवाइस पॉवर अप नसताना कसे हॅक केले जाते?
इव्हीएमची सॉफ्टवेअर सुरक्षा खरंच इतकी तकलादू आहे कि कोणीही कधीही कुठूनही ते हॅक करू शकतो , आणि जर असे असेल तर देशातील कोणत्याही विरोधी पक्षाला असे हॅकर का मिळत नाहीत जे सत्ताधाऱ्यांऐवजी विरोधकांची हॅकिंग करतील कि असा काही कायदा केला गेला आहे हॅकरनी फक्त सत्ताधाऱ्यांसाठीच हॅकिंग करावे ?
17 Sep 2025 - 11:01 pm | अमरेंद्र बाहुबली
सेट केले असतील तर? कारण इव्हीएम बनवणाऱ्या कंपनीत चार गुजराती भाजपेयी डायरेक्टर आहेत म्हणतात! ईव्हीएम मशीन गुजरात मध्ये बनतात!
18 Sep 2025 - 2:08 am | चित्रगुप्त
बापरे. गुजरात मधे बनणारे खाकरे, ढोकळे, फरसाण वगैरे खाणे आता बंद केले पाहिजे म्हणायचे. गुजराती भाजपेयी फरसाणवाल्यांनी त्यात काय काय सेट केलेले असेल कुणास ठऊक. लईच डेंजरस मामला हाय ह्यो.
परम.पूज्य. राजदुलारे साहेबांनी अजून याचा विरोध कसा केलेला नाही, याचे अश्चर्य वाटते.
18 Sep 2025 - 4:57 am | अमरेंद्र बाहुबली
खाकरे, ढोकळे, फरसाण
नाय वो, नाक्यावरचा मारवाडी देखील बनवतो,महाराष्ट्रात बरका! :)18 Sep 2025 - 12:35 pm | कर्नलतपस्वी
कुछ भी,
गुजरात मधला मारवाडी गुजराती मग तामिळनाडूतील मारवाडी तामिळ का...
18 Sep 2025 - 3:54 pm | संजय खांडेकर
माझ्या वरीलएकाही प्रश्नाचे समाधानकारक / विस्तारपूर्वक उत्तर मिळाले तर बऱ्याच शंकांचे समाधान होईल, नुसत्या शक्यतांनी आरोप सिद्ध होत नाहीत ना?
23 Sep 2025 - 4:49 pm | निपा
मला माहित नाही. मी ईव्हीएम डिव्हाइसचा तज्ञ नाही. मी पेमेंट डोमेनमध्ये फसवणूक विश्लेषक आहे. माझ्या तज्ज्ञतेच्या क्षेत्रात, सोशल इंजिनिअरिंग द्वारे ऍक्सेस घेणे खूप सोपे आहे. कधी कधी प्रत्यक्षात डिव्हाइस हॅक होतात. परंतु मॅक्सिमम वेळा ते दोन्हीच्या संयोजनात केले जाते .
पुन्हा, मी असा दावा केला नाही की ईव्हीएम हे हॅक केलेले डिव्हाइस आहे. परंतु माझ्या समजुतीनुसार, कोणतेही डिव्हाइस हॅक करणे शक्य आहे. ते हॅक प्रूफ असूच शकत नाही.
आपल्याला माहित नाही की ते कोणते सॉफ्टवेअर वापरत आहेत, सिस्टममध्ये कोणते मशीन सूचना (एम्बेडेड) आहेत. पुरेशी चाचणी केली गेली आहे की नाही किंवा कोणत्या प्रकारचे एन्क्रिप्शन वापरले जात आहे. त्यामुळे भाकित करणे खूप कठीण आहे . परंतु जर तुमच्याकडे डिव्हाइसमध्ये प्रवेश असेल तर ते सर्व करणे निश्चितच शक्य आहे. सरकार एक पक्ष आहे जिथे अमर्याद शक्यता आहेत.
मी अशा अनेक फसवणूक आणि विश्लेषणात्मक कंपन्यांना भेटलो आहे जे अतिशय सुव्यवस्थित डिव्हाइस हॅक करण्याचा दावा करतात. मी अशा प्रात्यक्षिकांमध्ये भाग घेतलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस हॅक प्रूफ आहे तर तुम्ही मूर्खांच्या स्वर्गात राहत आहात..
23 Sep 2025 - 5:26 pm | अमरेंद्र बाहुबली
तर तुम्ही मूर्खांच्या स्वर्गात राहत आहात..
+१23 Sep 2025 - 6:37 pm | आग्या१९९०
परंतु जर तुमच्याकडे डिव्हाइसमध्ये प्रवेश असेल तर ते सर्व करणे निश्चितच शक्य आहे. सरकार एक पक्ष आहे जिथे अमर्याद शक्यता आहेत.
ईव्हीएम समर्थक नेमके हेच मुद्दे मान्य नाहीत. ८० च्या दशकात रंगीत टीव्ही रिमोट आणि विना रिमोट मिळत. दोनपेक्षा अधिक चॅनेल भारतात उपलब्ध नसल्याने रिमोट tv च्या तुलनेने स्वस्त विनारिमोटचे टीव्ही घेण्याकडे लोकांचा कल असे. केबल टीव्ही मुळे अनेक वाहिन्या उपलब्ध झाल्यावर, टीव्ही दुरुस्ती करणारे ह्याच टीव्हीना रिमोटचे सर्किट लावून द्यायचे. हेच सरकार ईव्हीएम सोबत करू शकते. त्यामुळेच निवडणूक आयोग आव्हान देणाऱ्यांना ईव्हीएम यंत्र खोलण्याची परवानगी देत नाही.
18 Sep 2025 - 9:12 am | युयुत्सु
१००१% सहमत!
कुठलेही इलेक्ट्रॉनिक device हॅक होऊ शकते .
१००१% सहमत!
18 Sep 2025 - 4:21 pm | विजुभाऊ
असहमत.
जे डिव्हाईस सॉफ्ट्वेअर प्रोग्राम वापरून चालतात / कंट्रोल करता येतात अशीच उपकरणे हॅक करता येतील.
( उद्या म्हणाल की भिंतीवरचे इलेक्ट्रॉनिक घड्याळ हॅक करा)
त्यातही ज्या उपकराणात डाटा इंटरॅक्ट्इव्ह पद्धतीने प्रोसेस होते अशी उपकरणे हॅक होऊ शकतात.
याचे कारण असते की उपकरणातील रॅम वापरली जात असताना त्यात डाटा किंवा इन्स्ट्रक्षनची सरमिसळ करता येते.
18 Sep 2025 - 12:09 pm | विवेकपटाईत
आकाशीय तरंग घेण्याची सुविधा नसेल तर कोणत्याही डिवाईस मध्ये बदल करता येत नाही. ईव्हीएम मध्ये मत नोंद होण्याची काळ आणि वेळ असते. बाकी प्रत्येक ईव्हीएम मत देण्याआधी अजेंट किमान 50-60 स्लीप्स चेक करतात. ईव्हीएम ठीक आहे याची खात्री करतात. त्यामुळे प्रत्येक विधान सभा क्षेत्रात 5 ईव्हीएम मोजले तरी भरपूर आहे. बाकी जे कधी मतदान करत नाही त्यांचा मनात फालतू शंका येतात.
23 Sep 2025 - 4:36 pm | निपा
जिथे चिप आहे , म्हणजे machine instruction आहेत . तो device हॅक होऊ शकतो . हे सर्व फार बेसिक आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे हॅकिंगची शक्यता कमी करण्यासाठी काही उपाययोजना आहेत. पण त्यामुळे हॅकिंगची शक्यता नाहीशी होत नाही. तो नेहमी शून्य नसलेला(नॉन-zero ) असेल.
10 Sep 2025 - 4:30 pm | कंजूस
एका calculator ला चालवून दाखवा कोणत्यातरी तरंगांनी.
10 Sep 2025 - 8:04 pm | सुक्या
तेच म्हणतो मी. कॅलक्युलेटर २ फुट लांब ठेउन, २ + २ = ५ करुन दाखवा.
23 Sep 2025 - 9:57 am | सुबोध खरे
सर्वज्ञ म्हणतात ना
कुठलेही इलेक्ट्रॉनिक device हॅक होऊ शकते .
१००१% सहमत!
म्हणजे हॅक होऊ शकते.
तुम्ही कोण गोमाजी लागून गेलात कॅल्क्युलेटर हॅकी करून दाखवा म्हणणारे
23 Sep 2025 - 4:29 pm | निपा
हॅकिंग फक्त तरंग मधूनच होत असते का ? हॅकिंग म्हणजे इल्लिगल ऍक्सेस . तो कसाही मिळवता येतो. calculator ला हॅक करून chaतgpt लावणारे महाभाग आहेत या जगात.
23 Sep 2025 - 6:37 pm | अभ्या..
तुमचे ज्ञान कितीही परफेक्ट असले तरी जोपर्यंत त्यांच्या पार्टी ला सपोर्ट करीत नाही, त्यांच्या थिअरीज ना मदत करीत नाही तोपर्यंत काहीही उपयोग नाही.
सगळे ग्यानेश कुमार एकतर काहीही बिनबुडाची उदाहरणे देतील नाहीतर खिल्ली उडवतील.
भले तुमच्या ज्ञानाने थोडी जरी विरोधी शंका निर्माण झाली तर कसे व्हायचे?
सो...काहीही झाले तरी."मशीन परफेक्ट, चु. आयोग परफेक्ट, ग्यानेश परफेक्ट, निवडून आलो ती निवडणूक परफेक्ट, पार्टी परफेक्ट आणि सुप्रीम तर काय परफेक्शनचे दुसरे नावच" असेच म्हणायचे बरं का.
23 Sep 2025 - 6:40 pm | अमरेंद्र बाहुबली
+1 कितीही पुरावे दिले तरीही भाजपेयी मान्य करणारच नाहीत!
23 Sep 2025 - 6:51 pm | आग्या१९९०
दिल्लीच्या मुख्यमंत्री बाईंनी मान्य केले ,परंतु बीजेपी समर्थक एक वेळ बिळात लपतील पण चुकूनही मान्य करणार नाही.
23 Sep 2025 - 7:17 pm | सुबोध खरे
calculator ला हॅक करून chaतgpt लावणारे महाभाग आहेत या जगात.
calculator ला कोणतीही तार किंवा वायरलेस प्रणाली न लावता हॅक करणे शक्य आहे?
विज्ञानाचे सामान्य ज्ञान असणाऱ्या व्यक्तींना काही तरी पटेल असेल विधान असावे.
अगदी वादासाठी एखादे इ व्ही एम हॅक केले जाईल असे मान्य केले तरी १०-१२ लाख इ व्ही एम हॅक करणार? त्याशिवाय VVPAT जितक्या वेळेस वापरले तितक्या वेळेस बरोबर आले.
असो
आकाशातील ग्रहांची शांती करता येते दुराग्रहाची नाही.
23 Sep 2025 - 8:42 pm | निपा
तुम्ही अजूनही वायरलेस हॅकिंगमध्ये अडकला आहात. हा एकमेव मार्ग नाही. प्रवेश सर्वात महत्वाचा आहे. हे कुठेही होऊ शकते,
उत्पादन, रॅम बर्न करणे, सूचना लोड करणे, माहिती लोड करणे, movement........ जर तुमच्याकडे पुरेसे संसाधन असेल तर हे करता येईल.....माझा ओपी तपासा, मी नमूद केले आहे की कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस हॅक करणे शक्य आहे. निकाल बदलण्यासाठी प्रत्येक ईव्हीएम हॅक करणे आवश्यक नाही. व्हीव्हीपीएटी ऑडिट ट्रेल देखील त्याच डिव्हाइस आणि तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले जाते. तसेच व्हीव्हीपीएटी मशीन देखील बिघाड होऊ शकते. ते फक्त गुंतागुंत वाढवते. नियमानुसार, सिस्टम जितकी गुंतागुंतीची असेल तितकी ती भेद्यतेसाठी अधिक संवेदनशील असते.
शेवटचे
ईव्हीएम मशीन हॅक करता येते का? उत्तर हो आहे.
ते करणे सोपे आहे का? उत्तर नाही आहे. तुम्हाला प्रचंड संसाधने आणि अंतर्गत समर्थन लागेल.
तुम्हाला सर्व ईव्हीएमएस हॅक करण्याची आवश्यकता आहे का? नाही. कदाचित तुम्ही फक्त जिथे गरज असेल तिथेच हॅक कराल. हॅक फार स्पष्ट असण्याची गरज नाही. बहुधा स्विंग सीटवर. जिथे विजय निश्चित आहे तिथे तुम्ही सोडू शकता. जिथे पराभव निश्चित आहे तिथे देखील सोडू शकता.
23 Sep 2025 - 11:03 pm | सुक्या
निपा,
हॅकिंग थोडा वेळ बाजुला ठेवा. थोडाच वेळ.
आता मतदान प्रक्रिया कशी होते. तिथे ईवीएम कसे सेट करतात. सर्व हजर लोकांच्या साक्षीने डमी वोट टाकुन कशी ट्रायल घेतली जाते. मतदान झाल्यावर किती लोकांच्या समक्ष ते यंत्र सील होते. गोडाऊन मधे किती सीसीटीवी च्या देखरेखित ते असते. किती लोकांच्या साक्षीने ते उघडले जाते. आणी शेवटात त्याचे मत कसे मोजतात ह्या सगळ्या प्रक्रिया समजाउन घ्या. (ह्या सगळ्या मला अगदी डिटेल मधे माहीती आहेत कारण माझ्या घरातले ३ जण हे प्रत्येक निवड्णुकीत ह्यात सहभागी असतात)
मग विचार करा, हॅकिंग कुठे करता येउ शकते. कसे करता येईल. वगेरे वगेरे. . .
बाकी जर ईवीएम हॅक करता येत असेल तर निवडणुक आयोगाकडे तक्रार देउन त्यांची चुक दाखवुन द्यायला काय हरकत आहे? दुध का दुध पाणी का पाणी.
24 Sep 2025 - 3:07 am | कंजूस
>>ईव्हीएम मशीन हॅक करता येते का? उत्तर हो आहे.>>
असे दावे अमेरिकेतून करणारे मात्र अमेरिकेतील बॅलट मतदान घेत नाहीत यावर गप्प आहेत.
18 Sep 2025 - 12:22 pm | विवेकपटाईत
बिना निवडणूक जिंकता रस्त्यावर क्रांति घडवून सत्तेत येण्याचे ज्यांचे मनसुबे आहे, ते नेता वोट चोरी इत्यादि आरोप लावतात आहे. निवडणूक पूर्वी महिना दोन महीने आधी प्रत्येक बूथ वर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांजवळ मतदाता सूची असते. निवडणूकीच्या 15 दिवस आधी ही नाव टाकले जाऊ शकतात. त्यानंतर ही तीन महीने आक्षेप घेण्यासाठी असतात. ते न करता वर्षभरांनी मीडियात बोंब मारायची. दुसरी कडे SIR चा विरोध करायचा. बोगस नावे, मृतांची नावे, डुप्लीकेट मतदारांची नावे कापण्याचा विरोध करायचा. असाच मूर्खपणा सुरू राहिला तर बहुतेक 2029 मध्ये ही मजबूरी में मोदींना लोकांना मतदान करावे लागेल. राहुल विसरून जातात भारत बंगला देश आणि नेपाळ नाही.
18 Sep 2025 - 1:38 pm | आग्या१९९०
आज राहुल गांधींनी टाकलेली " एस " निवडणूक आयोग कशी परतवते ह्याची उत्सुकता आहे.
23 Sep 2025 - 10:01 am | सुबोध खरे
आज राहुल गांधींनी टाकलेली " एस " निवडणूक आयोग कशी परतवते ह्याची उत्सुकता आहे.
काही लोक अजून राहुल गांधींवर विश्वास ठेवतात हे वाचून फार करमणूक झाली.
त्यांनी ऍटम बॉम्ब फोडला https://www.thehindu.com/news/national/what-we-have-found-is-an-atom-bom...
मग हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहेत https://www.indiatoday.in/india/story/rahul-gandhi-hydrogen-bomb-congres...
आमच्या बंड्याने( बोका) एक डोळा सुद्धा उघडला नाही
23 Sep 2025 - 10:05 am | अमरेंद्र बाहुबली
अडवणूक आयोग भाजपला मदत करायला कुठल्याही थराला जाईल! भाजपनेही उपकाराची जाणीव ठेऊन आयोग प्रमुखावर कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही ह्याची तजवीज करून ठेवली आहे.
23 Sep 2025 - 10:37 am | सुबोध खरे
भाजपनेही उपकाराची जाणीव ठेऊन आयोग प्रमुखावर कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही ह्याची तजवीज करून ठेवली आहे.
भुजबळ बुवा
तुम्ही कायम काही तरी भंपक टंकून स्वतःला हास्यास्पद करण्याचा पण केला आहे का?
मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून काढून टाकण्यासाठी महाभियोग करावा लागतो ज्याच्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेत दोन तृतीयांश बहुमत लागते.
उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना काढून टाकण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते तीच.
एवढा टोकाचा विरोध करून सुद्धा काँग्रेस च्या सरकारला श्री शेषन याना का हाकलता आले नाही याचे कारण हेच आहे
टंकण्यापूर्वी नीट वाचन तरी करत चला.
18 Sep 2025 - 2:41 pm | चौथा कोनाडा
वाचत आहे ....
रागा म्हणताहेत ते रोचक आहे :
" मी विरोधी पक्षनेता असून 100 टक्के पुराव्यांसह बोलत आहे "
19 Sep 2025 - 4:38 am | शेखर काळे
रागांना एका प्रश्न विचारला गेला की - सबूत है तो आप कोर्ट मे क्यों नही जाते ?
त्यावर त्यांचे उत्तर होते - वो मेरा काम नही है. मै Opposition leader हूं. मेरा काम है oppose करना.
18 Sep 2025 - 4:22 pm | विजुभाऊ
पुरावे कोर्टासमोर कधीच आणत नाहीत. इतके गुप्त असतात.
20 Sep 2025 - 7:09 pm | गामा पैलवान
निवडणूकीची चोरी उघडी पाडण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करावे लागतात. असे प्रयत्न करणे पप्पू व/वा कॉंग्रेसच्या आवाक्याबाहेरील काम आहे.
अशा प्रयत्नांचे उदाहरण म्हणून २०२० सालच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतली मतांच्या चोरीवर लिहिलेला माझाच लेख उद्धृत करतो : https://misalpav.com/comment/1185927
-गा.पै.
23 Sep 2025 - 10:36 pm | कॉमी
पद्धतशीर प्रयत्न ?
ख्याख्या.
एलिजिबल अर्थात पात्र मतदार आणि राज्यनिहाय नोंदणीकृत मतदार ह्यात गोंधळ घालून रचलेला मनोरा म्हणजे पद्धतशीर प्रयत्न ?
अरे देवा :)
23 Sep 2025 - 8:17 pm | स्वधर्म
इव्हीएम बनवताना, त्यात उमेदवारांची नांवे घालताना, ते परत नेऊन ठेवल्यावर गोदामात इ.इ.
त्याला अॅक्सेस हा असतोच. त्या अॅक्सेस मध्ये काय करता येईल याच्या शक्यता अनंत आहेत. मागे तर इव्हीएम्स कुठे कुठे सापडली अशी बातमीही आली होती. पण...
काहीही छेडछाड शक्य नाही असे केवळ तेच म्हणू शकतात ज्यांनी आधीच मत बनवलेलं आहे.
आणि अगदी सुप्रीम कोर्टात जाणारे लोक आहेत. कशासाठी? सत्य शोधण्यासाठी नव्हे, तर क्ष व्यक्तीची डीग्री खरी आहे की नाही हे सत्य विद्यापीठाने सांगू नये यासाठी! जेंव्हा तर्कशुध्द सासासार विचार हा प्रकारच संपतो, तेंव्हा पुढे काहीच होऊ शकत नाही.
बाकी पप्पू म्हटलं तरी रागा यांचं पारडं जड होत आहे, जे पचवायला थोडं कठीणच जातंय. पण समजू शकतो.
23 Sep 2025 - 8:31 pm | अभ्या..
इव्हीएम बनवताना, त्यात उमेदवारांची नांवे घालताना, ते परत नेऊन ठेवल्यावर गोदामात इ.इ.
त्याला अॅक्सेस हा असतोच. त्या अॅक्सेस मध्ये काय करता येईल याच्या शक्यता अनंत आहेत.
इतकेच नाही, मतदार नोंदणी पासून ते निकाल जाहीर करुन सर्टीफिकेटं देण्यापर्यंत जबाबदारी निवडणूक आयोगाचीच आहे. त्यातल्या बहुतांश घटक संशयास्पद वाटत आणि तसेच वागतही आहेत. फक्त मतदानयंत्रावर आणि ते हॅक होते की नाही हे सुध्दा स्वतःच्या पध्दतीने ठरवणार्या निवडणूक आयोगावर कितपत विश्वास ठेवायचा हेच ठरत नसताना आणि केवळ तोच मुद्दा उचलून बाकींच्या मुद्द्यांना आणि ते मांडणार्याना खोटे ठरवायचे ही तर पॉलीसी चालू आहे.
व्यक्तीद्वेषाची कावीळ असे सतत हिणवत राहून स्वतःही प्रचंड द्वेषपूर्ण विषेशणे वापरणार्यांकडून भले ते कितीही हुशार दाखवत असले तरी तर्कशुध्द सारासार विचार अपेक्षितच नाहिये.
23 Sep 2025 - 9:15 pm | स्वधर्म
>> बाकींच्या मुद्द्यांना आणि ते मांडणार्याना खोटे ठरवायचे ही तर पॉलीसी चालू आहे.
अगदी अगदी! शिवाय ते हॅकींग करुन दाखवण्याचे आयोगाचे आव्हान तर आणखीनच मजेदार आहे. काय तर म्हणे ते फक्त कोरी इव्हीएम देणार आणि तुंम्ही म्हणे फक्त त्यात मते देऊन फक्त ती बरोबर येत नाहीत असे दाखवायचे. हॅकिंग हे किती अनंत प्रकारे होऊ शकते हे सरकारी डोके असलेल्यांना समजणं खरोखरच अशक्य आहे कारण समजून घ्यायचंच नाही!
24 Sep 2025 - 6:05 am | कर्नलतपस्वी
काहीही छेडछाड शक्य नाही असे केवळ तेच म्हणू शकतात ज्यांनी आधीच मत
अगदी,अगदी. सहमत आहे.
जे कुणी इ व्ही एम हॅक करू शकतात अशा मिपाकरांचा कायप्पावर ग्रुप बनवूया. याची माहीती सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग व राहूल गांधी यांना देऊ .
जर प्रयत्न सफल झाले तर भारतीय लोकशाहीवर मोठे उपकार होतील.
मिपा मालक,चालक,संपादक यांनी विशेष लक्ष घालावे ही विनंती.
अन्यथा.....
24 Sep 2025 - 7:02 am | कंजूस
इविएम घोटाळ्यावर संशय असणाऱ्यांना मात्र त्यांचा झालेला विजय नि:संशय पाक असल्याबद्दल खात्री वाटते हे विशेष.