मिपाधर्माला जागून, मिपाकर कुठेही असला तरीही कट्टे करायचे सोडत नाही. हा धागा वाचून, लंडनमधे असलेल्या स्वधर्म आणि स्वछंदी_मनोज यांनी व्यनी करून भेटायला जमेल असे कळवले आणि मिपा लंडन कट्टा (मिनी) होणार ह्याची खात्री झाली.
दोघेही लंडनपासून तासभर दूर असलेल्या उपनगरांमधे वास्तव्यास असल्याने सोयीची वेळ आणि ठिकाण स्वधर्म यांनी ठरवले पण ते माझ्या सोयीनुसार, एकाच सबवे लाईनने प्रवास करता यावा म्हणून. थेम्स नदी किनारी, आयकॉनिक टाउन ब्रीज जवळ असलेल्या एका पब मधे भेटून, कॉफी घेऊन, नदीकिनारी गप्पा मारत कट्टा गाजवायचा असे ठरले. ऑ, पब मधे कॉफी?? असं विचीत्र वाटलं ना? हो, पण कॉफीचाच प्लॅन होता बरं का. :-)
लंडनच्या भुरूभुरू पडण्यार्या पावसात मी ठरलेल्या पबजवळ पोहोचलो आणि कट्टेकरांची वाट पाहत असताना समोरच्या फूटपाथवर, रस्ता क्रॉस करण्याच्या तयारीत असलेले स्वधर्म दिसले.
सोशल मिडीयाच्या युगात, कायप्पावर ओळखीसाठी फोटो आधिच शेयर केले असल्यामुळे लगेच ओळखता आले आणि कायप्पावर कॉलही चालू होतेच. दोनेक मिनीटांनी मनोजही आले. रस्त्यावरच गप्पा चालू झाल्या, त्यांचा ओघ आणि आमचा आवाज पबमध्या ब्रिटीश लोकांच्या पचनी पडणार नाही असे एकंदरीत लक्षात आले आणि पबमधे कॉफी घेण्याचा प्लॅन कॅन्सल केला. नदीकिनारी क्वीन्स वॉकवर एखाद्या ब्रिटीश टपरीवर कॉफी घेण्याचे ठरले. पण लंडनच्या पावसाने सगळा चिकचिकाट होऊन किनार्यावर बसण्यायोग्य जागाच नव्हत्या. त्यामुळे, बर्याच पायपीटीनंतर, कोस्ता नावच्या एका कॉफी हाऊसमधे जाउन बसलो. आपापल्या आवडीच्या कॉफ्या ऑर्डर करून गप्पांचा फड जमवला.
ठाणेकर असलेल्या मनोजने गप्पांच्या सुरुवातीलाच, "अहो जाहो न करता अरे तुरे करूयात", असं फर्मान काढून सगळ्या औपचारिकतेला फाट्यावर मारले आणि मूळचा मुंबईकर असलेल्या मला एकदम हायसं वाटल. त्यामुळे पुढे गप्पांना विषयांना कसलेही बंधन नव्हते. पुणे, ठाणे, सांगली ते पार ट्रंपतात्या आणि रशिया युक्रेन असा प्रवास करत स्वैरसंचार चालू होता. पुढे, सिंगापूर आणि कौलालंपूरचं इन्फ्रा लंडनच्या इन्फ्रापेक्षा कसं उजवं आहे ह्यावर अस्मादिकांनी एक परिसंवाद घडवून, स्वधर्मला झीट आणली. :-)
कोस्ताच्या स्टाफने, "आता दुकान बंद करायची वेळ झाली", असं येउन सांगिल्यावर वेळेचे भान आले आणि त्या दोघांना लांबचा प्रवास करून घर गाठायचे असल्याने आवरते घेत कट्ट्याची सांगता केली. एक संध्याकाळ थेम्सच्या किनारी यादगार ठरून गेली.
एवढ्या प्रवासात असूनही तात्काळ सविस्तर कट्टा वॄत्तांत लिहिणे केवळ तुंम्हालाच जमले! आधी न भेटलेल्या फक्त एक नांव म्हणून माहित असलेल्या मिपाकरांना सदेह भेटण्याचा आनंद आगळाच! मिपाचे गाजलेले लेखक आणि चर्चा हा पण एक महत्वाचा विषय होता.
आता पुण्यातल्या मिपाकरांना डिसेंबर मध्ये भेटण्याची ओढ लागली आहे.
मला भारतात यावे लागले होते एमर्जन्सीला,
नाहीतर मधला फ्रान्स आणि इंग्लिश खाडी पार करायचीच होती एकदा. व्हीजाचा थोडा प्रॉब्लेम आला असता पण नानाला भेटायचेच होते.
सोबतच स्वधर्म शेठ आणि मनोजराव भेटले म्हणजे मोठीच संधी गमावली.
असो.
नेक्स्ट टैम
सध्या लंडनची काय अवस्था आहे?
स्थलांतरीत लोकांनी लंडन, पॅरिस बकाल केले आहे हि सद्यस्थिति आहे.
यादवी युद्धाची शक्यता आहे का? स्थानिक लोकांची काय स्थिति आहे?
लंडनस्थित मिपाकर: क्रुपया वेळ काढून लिहिते व्हा. वेगळा धागा टंका हि विनंती !!
प्रतिक्रिया
24 Sep 2025 - 11:17 am | विजुभाऊ
स्वाती राजेश , आदुबाळ , हे लंडनमधले मिपाकर आहेत
24 Sep 2025 - 3:49 pm | अमरेंद्र बाहुबली
गामा पैलवान!
24 Sep 2025 - 4:45 pm | गणेशा
अहो इतक्या वर्ष इकडे आहात.. इकडं पण कृपा दृष्टी द्यायची कि आपली :)
Enjoy your trip
29 Sep 2025 - 9:43 am | सोत्रि
मिपाधर्माला जागून, मिपाकर कुठेही असला तरीही कट्टे करायचे सोडत नाही. हा धागा वाचून, लंडनमधे असलेल्या स्वधर्म आणि स्वछंदी_मनोज यांनी व्यनी करून भेटायला जमेल असे कळवले आणि मिपा लंडन कट्टा (मिनी) होणार ह्याची खात्री झाली.
दोघेही लंडनपासून तासभर दूर असलेल्या उपनगरांमधे वास्तव्यास असल्याने सोयीची वेळ आणि ठिकाण स्वधर्म यांनी ठरवले पण ते माझ्या सोयीनुसार, एकाच सबवे लाईनने प्रवास करता यावा म्हणून. थेम्स नदी किनारी, आयकॉनिक टाउन ब्रीज जवळ असलेल्या एका पब मधे भेटून, कॉफी घेऊन, नदीकिनारी गप्पा मारत कट्टा गाजवायचा असे ठरले. ऑ, पब मधे कॉफी?? असं विचीत्र वाटलं ना? हो, पण कॉफीचाच प्लॅन होता बरं का. :-)
लंडनच्या भुरूभुरू पडण्यार्या पावसात मी ठरलेल्या पबजवळ पोहोचलो आणि कट्टेकरांची वाट पाहत असताना समोरच्या फूटपाथवर, रस्ता क्रॉस करण्याच्या तयारीत असलेले स्वधर्म दिसले.
सोशल मिडीयाच्या युगात, कायप्पावर ओळखीसाठी फोटो आधिच शेयर केले असल्यामुळे लगेच ओळखता आले आणि कायप्पावर कॉलही चालू होतेच. दोनेक मिनीटांनी मनोजही आले. रस्त्यावरच गप्पा चालू झाल्या, त्यांचा ओघ आणि आमचा आवाज पबमध्या ब्रिटीश लोकांच्या पचनी पडणार नाही असे एकंदरीत लक्षात आले आणि पबमधे कॉफी घेण्याचा प्लॅन कॅन्सल केला. नदीकिनारी क्वीन्स वॉकवर एखाद्या ब्रिटीश टपरीवर कॉफी घेण्याचे ठरले. पण लंडनच्या पावसाने सगळा चिकचिकाट होऊन किनार्यावर बसण्यायोग्य जागाच नव्हत्या. त्यामुळे, बर्याच पायपीटीनंतर, कोस्ता नावच्या एका कॉफी हाऊसमधे जाउन बसलो. आपापल्या आवडीच्या कॉफ्या ऑर्डर करून गप्पांचा फड जमवला.
ठाणेकर असलेल्या मनोजने गप्पांच्या सुरुवातीलाच, "अहो जाहो न करता अरे तुरे करूयात", असं फर्मान काढून सगळ्या औपचारिकतेला फाट्यावर मारले आणि मूळचा मुंबईकर असलेल्या मला एकदम हायसं वाटल. त्यामुळे पुढे गप्पांना विषयांना कसलेही बंधन नव्हते. पुणे, ठाणे, सांगली ते पार ट्रंपतात्या आणि रशिया युक्रेन असा प्रवास करत स्वैरसंचार चालू होता. पुढे, सिंगापूर आणि कौलालंपूरचं इन्फ्रा लंडनच्या इन्फ्रापेक्षा कसं उजवं आहे ह्यावर अस्मादिकांनी एक परिसंवाद घडवून, स्वधर्मला झीट आणली. :-)
कोस्ताच्या स्टाफने, "आता दुकान बंद करायची वेळ झाली", असं येउन सांगिल्यावर वेळेचे भान आले आणि त्या दोघांना लांबचा प्रवास करून घर गाठायचे असल्याने आवरते घेत कट्ट्याची सांगता केली. एक संध्याकाळ थेम्सच्या किनारी यादगार ठरून गेली.
(डावीकडून - स्वधर्म आणि स्वछंदी_मनोज)
(डावीकडून - स्वधर्म, स्वछंदी_मनोज आणि अस्मादिक)
(थेम्स नदी आणि रात्रीचा टाउन ब्रीज)
- (कट्टेकर) सोकाजी
29 Sep 2025 - 3:42 pm | स्वधर्म
एवढ्या प्रवासात असूनही तात्काळ सविस्तर कट्टा वॄत्तांत लिहिणे केवळ तुंम्हालाच जमले! आधी न भेटलेल्या फक्त एक नांव म्हणून माहित असलेल्या मिपाकरांना सदेह भेटण्याचा आनंद आगळाच! मिपाचे गाजलेले लेखक आणि चर्चा हा पण एक महत्वाचा विषय होता.
आता पुण्यातल्या मिपाकरांना डिसेंबर मध्ये भेटण्याची ओढ लागली आहे.
29 Sep 2025 - 6:30 pm | कर्नलतपस्वी
पुण्यात आपले स्वागत आहे. जरूर भेटूयात.
29 Sep 2025 - 8:48 pm | स्वधर्म
अभ्याही डिसेंबरमध्ये पुण्यात आहेत. पुण्यात खूप मिपाकर असणार असा अंदाज आहे. सगळ्यांना भेटायची उत्सुकता आहे.
29 Sep 2025 - 10:25 pm | चौथा कोनाडा
मी डिसेंबर २५ मिपाकट्टाच्या प्रतिक्षेत.
29 Sep 2025 - 10:45 am | सौंदाळा
भारीच सोकाजीनाना
ऐन वेळी धागा काढून त्यानंतर कट्टा होऊन त्याचा वृत्तांत पण आला.
मिपा इतिहासातील हा पहिलाच असा कट्टा असेल, सहीच
29 Sep 2025 - 11:13 am | अमरेंद्र बाहुबली
वा छानच!
29 Sep 2025 - 1:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चेष्टरला असतं तर आलो असतो. ;)
असो मस्त कट्टा वृत्तांत. धन्स.
-दिलीप बिरुटे
29 Sep 2025 - 1:42 pm | कर्नलतपस्वी
मस्तच. कुठल्याच प्रकारचा अहं मध्ये न आणता केवळ मिपाकर म्हणून आवर्जून वेळात वेळ काढून भेटणे फारच आवडले. तुम्हां तिघांनाही एक कडक सॅल्युट.
29 Sep 2025 - 2:02 pm | अभ्या..
मला भारतात यावे लागले होते एमर्जन्सीला,
नाहीतर मधला फ्रान्स आणि इंग्लिश खाडी पार करायचीच होती एकदा. व्हीजाचा थोडा प्रॉब्लेम आला असता पण नानाला भेटायचेच होते.
सोबतच स्वधर्म शेठ आणि मनोजराव भेटले म्हणजे मोठीच संधी गमावली.
असो.
नेक्स्ट टैम
29 Sep 2025 - 5:15 pm | सोत्रि
लेका असा कसा रे नेमक्या वेळी परत गेला होतास?
आपली भेट लैच दिसांपासून पेंडींग आहे!
- (भेटीचा बॅगलॅाग भरून काढण्याची आस असलेला) सोकाजी
29 Sep 2025 - 2:07 pm | Bhakti
थेम्स नदी किनारी छान भेट!
29 Sep 2025 - 8:43 pm | जुइ
झक्कासं कट्टा तोही थेम्स नदी किनारी!!
30 Sep 2025 - 9:28 am | श्रीरंग_जोशी
सर्व कट्टेकर्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
मुळा-मिठी-उल्हासच्या तट्टांना या टेम्सचे पाणी पाजा... जय जय मिपाधर्म माझा... जय जय मिपाधर्म माझा...!!
30 Sep 2025 - 12:14 pm | कर्नलतपस्वी
मस्तच.
30 Sep 2025 - 12:38 pm | अभ्या..
आमचे तट्टू भीमथडी चे.
भीमा सीना गोदावरी कृष्णा पंचगंगा मिठी आणी पवना करून सध्या लेक कॉन्स्टन्स चे गोडे पाणी पिते आहे.
1 Oct 2025 - 12:05 am | श्रीरंग_जोशी
उत्तम प्रगती रे अभ्या!!
30 Sep 2025 - 12:17 pm | कर्नलतपस्वी
टंकाळ्याचा रंकाळा की पुणे-मुंबई चा संदर्भाने.....
30 Sep 2025 - 11:41 pm | श्रीरंग_जोशी
सहजच वेगळ्या नद्यांची नावे वापरावीशी वाटली, तर वापरली :-).
2 Oct 2025 - 4:21 pm | नावातकायआहे
अतिअवांतर: