काथ्याकूट

सन्घमित्रा's picture
सन्घमित्रा in काथ्याकूट
7 Jun 2017 - 19:04

मत्सर

माणूस हा सामाजिक प्राणी आहे . काही नाते संबंध त्याला जन्मतः मिळतात तर काही तो निर्माण करतो .काही नाते संबंध टाळता येतात तर काही नाही . काही नाते संबंधाना इच्छा नसताना हि तोंड द्यावे लागते . मानवी मन हे अजब आहे त्यात अनेक भाव भावनांचे मिश्रण आहे. एकमेकांबद्दल छुपा द्वेष ,मत्सर असूया काही लोक बाळगून असतात.

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
7 Jun 2017 - 13:44

को ह ण ह क ह र

डिस्केमर : खालील लेखातील मते, ही माझी वैक्तिक आहेत.मिपाच्या संपादकांचा किंवा इतर सद्स्यांचा ह्यात सहभाग नाही.

-----------------------------------------------------------

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
7 Jun 2017 - 13:34

द इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट अँड डेव्हलपमेंट पॉलिसी

आपण ट्रॅफिक, गर्दी, रस्ते या सगळ्याला शिव्या नेहमीच घालत असतो. परंतु या सगळ्याबद्दल काहीतरी प्रत्यक्षात करण्याची संधी एक तर विशेष येत नाही, आणि आली तर आपण सहभाग घेत नाही. एक उपक्रम नुकताच वाचनात आला ज्याबद्दल मिपाकरांना सांगावं असं वाटलं म्हणून हा धागा. विशेष माहिती नसल्याने निबंध लिहीत बसत नाही, पण उपक्रमाचा दुवा देतो.

खटासि खट's picture
खटासि खट in काथ्याकूट
7 Jun 2017 - 12:03

कर्जमाफी करताना बोके कसे वगळायचे ?

कर्जमाफी या विषयावर दुसरी बाजू मांडताना काही जणांचे मुद्दे विचारात घ्यावेसे वाटले. त्यात दम आहे.
शासनाला आणि संपक-यांना देण्यासाठी एक प्रस्ताव तयार करायचा आहे. अगदीच कच्चा आराखड्याचा चर्चाप्रस्ताव आपणासमोर ठेवत आहे. या आराखड्याचे नेमक्या प्रस्तावात रुपांतर करण्यासाठी आलेल्या सूचनांचे स्वागत आहे.

सागर's picture
सागर in काथ्याकूट
5 Jun 2017 - 14:03

आत्म्याला झंकारुन टाकणारी गाणी

इंग्रजीत ज्याला Soul Touching Songs म्हणतात. मराठीत आपण त्याला आत्म्याला झंकारुन टाकणारी गाणी म्हणूयात.
तर तुम्हाला खूपच आवडलेली व अगदी आत्म्याला वा मनाला खूपच टच करणारी तुमच्या आवडीची गाणी येथे शेअर करावीत यासाठी ही पोस्ट.

मी सुरुवात करतो:

मोदक's picture
मोदक in काथ्याकूट
2 Jun 2017 - 00:20

मदत हवी आहे - बाल्कनीतील शेती (फोटोंसह)

नमस्कार मंडळी,

शहरातील फ्लॅटला जोडून असलेल्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसमध्ये मिपाकरांनी शेतीचे प्रयोग केले आहेत का..? केले असल्यास आपले अनुभव कृपया या धाग्यावर द्या.

**** माझा अनुभव ****

तर्री's picture
तर्री in काथ्याकूट
1 Jun 2017 - 21:36

वासरे मारली जात असताना ....

वासरू मारते आहे ...

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in काथ्याकूट
1 Jun 2017 - 17:23

शेतकर्‍यांचा संप

आजपासून (१ जून) राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत.कदाचित राज्यातील शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी

काय आहेत संपावर जाणार्‍या शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्या ?

१) शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा.

२) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी.

३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा.

शेवटचा डाव's picture
शेवटचा डाव in काथ्याकूट
31 May 2017 - 08:43

कामगार संघटना

माझा एक मित्र एका pvt. Ltd. कंपनीत नोकरी करतो . तिथली मॅनेजमेंट त्याचा म्हणण्यानुसार खुपच जाचक नियम व अटी लावते आहे . म्हणून त्याना तिथे कामगार संघटना ऊभी करायची आहे त्या विषयी माहिती व मार्गदर्शन हव आहे .
1)संघटना कशी तयार करावी
2)कायदेशीर बाबी
3)कंपनी काय अ‍ॅक्शन घेऊ शकते
4)कंपनी त्यांची संघटना फेटाळून लावु शकते का ?

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in काथ्याकूट
30 May 2017 - 15:46

ग्रह व त्या॑च्या उपग्रहा॑च्या निरीक्षणासाठी कोणती दुर्बीण घ्यावी?

मी हौशी व प्राथमिक स्तरावरचा आकाश निरीक्षक आहे. मला परवडेल अशी (सुमारे १५ ते २० हजार रु. पर्य॑तची) शक्यतो भारतीय बनावटीची दुर्बीण विकत घेण्याबद्दल मिपाकरा॑कडून मार्गदर्शन अपेक्षित आहे. आपण सुचविलेल्या दुर्बिणीतील त्रुटी / मर्यादा , उत्पादक, अ॑दाजे कि॑मत याबाबत सविस्तर माहिती दिल्यास उपयोग होईल.

IT hamal's picture
IT hamal in काथ्याकूट
30 May 2017 - 14:58

श्रावण मोडक आणि मिपा

श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली ... मिपा होमपेज वर दिलेल्या लिंकवरून त्यांचे सारे लेख पुन्हा वाचले.. ९/१० वर्षापूर्वीचे मिपा पुन्हा अनुभवले. छान वाटले . त्यावेळचे बरेच id ( ब्रिटिश टिंग्या...तात्या.. सोत्री ..गुगळे .... इत्यादी ) आजकाल मिपावर active नाहीत . मी ८/९ वर्षांपासून मिपा वाचतोय..

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in काथ्याकूट
29 May 2017 - 15:49

आपलेच दात आणि...

एक विचित्र विषय आणि समस्या मांडत आहे, माझ्या बोलण्याचा कृपया कुणीही विपर्यास करून घेऊ नये कारण हा धागा मी तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी अजिबात काढलेला नाही तर कोणाला असे अनुभवले असतील तर त्यांनी अश्या प्रसंगी काय केले हे जाणून घेणे हा एकच या धाग्याचा हेतू.

अत्रे's picture
अत्रे in काथ्याकूट
28 May 2017 - 07:54

पिढींमधला टेक्निकल गॅप - वाढत आहे/कमी होत आहे?

आजकाल आपण बघतो की बऱ्याच 50-60 च्या वरती वय असणाऱ्याना नवीन टेक्नॉलॉजी (स्मार्टफोन, इंटरनेट) शिकायला अवघड जाते / त्यात रस नसतो. या उलट शाळेतल्या मुलांना मात्र या गोष्टी लवकर समजतात/ हाताळता येतात.

डोके.डी.डी.'s picture
डोके.डी.डी. in काथ्याकूट
28 May 2017 - 04:29

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक मुदत ठेव

महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्हा मध्यवर्ती बँका डबघाईला आल्या तर काही बंद ही पडल्या त्या आता फक्त शेतकरी विमा वाटप एवढेच काम करतात. त्यावेळी चालू असणाऱ्या अशा

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in काथ्याकूट
27 May 2017 - 23:52

तुम्ही कोणते वर्तमानपत्र वाचता आणि का ?

प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते तरी तुम्ही कोणते वर्तमानपत्र वाचता व का ?

उदाहरणार्थ पुणेकर 'दै. सकाळ' जास्त वाचतात.

मुंबईकर 'दै. महाराष्ट्र टाईम्स'.

नगरकर 'दै. लोकसत्ता' का वाचतात प्रश्न आहे.

औरंगाबाद 'दै. दिव्य मराठी'.

तसेच 'दै. टाइम्स ऑफ इंडिया'त जाहिराती जास्त असूनही लोक का घेतात?

राघवेंद्र's picture
राघवेंद्र in काथ्याकूट
26 May 2017 - 21:23

भारतात रेल्वेने प्रवास करताना काय खादाडी करावी ?

मोदकने फाऊल नोंदवल्यामुळे हा नविन धागा काढत आहे.

रेल्वे आणि इतर प्रवासात सर्वात मोठा फरक म्हणजे कायम खादाडी करण्याची उपलब्धता. भारतात बहुतांश ट्रेन या दर तासाला कुठल्यातरी स्थानक मध्ये थांबतात. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर प्रत्येक स्थानकावर काहींना-काही स्पेशल खादाडी साठी उपलब्ध असते.

Vinayak sable's picture
Vinayak sable in काथ्याकूट
26 May 2017 - 16:24

एक प्रश्न

लग्नपत्रिकेवर शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषाची चित्रे असावीत का........?

अ.रा.'s picture
अ.रा. in काथ्याकूट
26 May 2017 - 12:16

पंतप्रधान आवास योजनेबद्दलची माहिती

नमस्कार मित्रांनो ,
तुम्हा सर्वाना परिचयात असलेलया 'पंतप्रधान आवास योजनेबद्दल' थोडी अधिक माहिती जाणून घ्यावयाची आहे.
केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत ‘सर्वासाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित ‘प्रधानमंत्री आवास योजना’ २०१५ मध्ये सर्वसामान्यांसाठी सादर केली. पण सरकार दफ्तरी या योजनेची कोणाला माहिती आहेच असे नाही.

आशु जोग's picture
आशु जोग in काथ्याकूट
26 May 2017 - 11:34

मोदी सरकारची तीन वर्षे


मोदी सरकारची तीन वर्षे

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीला आज ३ वर्षे झाली. त्यांच्या कारकीर्दीबाबत काय बरे वाईट मुद्दे सांगता येइल विशेषतः मागच्या मनमोहनसिंग सरकारच्या तुलनेत . . .