एक देणे... शिवी...

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
6 Jul 2025 - 11:53 pm
गाभा: 

१

एक देणे... शिवी...

अनेक प्रसंगी चर्चा रंगत जाते. मग पूर्वीच्या काळात पाणी भरायच्या जागा असतील, नंतरच्या काळात वार्षिक सर्वसाधारण भाग धारकांच्या सभा, राजकारणातील चढाओढ वगैरे असतील हमखास देण्या घेण्याच्या जागा मान्यता मिळवून आहेत.
सिनेमातील संगीत, गाण्यातून बरेचदा खूप बोलून न जमणारे कथन, थोडक्यात मन मोकळे करायची सोय आहे. तसेच काहीसे भावनिक आवेश शांत बसू देत नाही अशा वेळी आपसूक असे बोल बाहेर पडतात... त्या दिलेल्या शब्द संचयाला आपण सभ्य भाषेत शिवी देणे म्हणतो.
ती द्यावी का नाही ते वेळ, काळ, स्थळ आणि सामाजिक मान यावरून ठरवले जाते.
माझे म्हणणे वेगळे आहे. या शिव्या म्हणजे शब्द, शब्द समूह यांच्या उगमस्थानाचा शोध घेतला जाईल का? प्रत्येक भाषेत शिवी दिली जात असणार. त्यावर काही शोध कार्य केले असेल तर ते समजून घ्यायला आवडेल.
सौजन्याने दिलेली दूषणे, सौम्य शब्द रचना, आवाजाची वाढती श्रेणी, शब्द फेक यावर प्रकाश टाकला जावा. जास्त तिखट वेळ पडल्यास हातघाईच्या काळात तोंडाचा पट्टा चालू ठेवणे कमकुवत शरीरयष्टीच्या लोकांना बरे पडते असे म्हटले जाते. यावर आधारित काही मार्मिक शिव्यांची उदाहरणे दिली तर चालेल.
स्त्री समाज लोक लाजेकाजेस्तव गाली प्रदान अभियानांतर्गत जरा कमी सहभागी होत असेल असे भाबड्या पुरुषांना वाटते का? सासू म्हणजे (सारख्या सूचना) तर सून म्हणजे (सूचना नकोत) असे नाते संबंध फार प्राचीन काळापासून चालत असतील तर भावजयांत, बायकोच्या भावा- बहिणीची साला-ली म्हणून जी शाब्दिक आरती गायली जाते. याची आठवण या निमित्ताने हटकून होते.
विषय तसा चुरचुरीत आहे. या शिवी शब्दाला न देण्याची हिम्मत कोणाला आहे?
जसे सर्वसूखी या जगात असू शकत नाही तसाच काहीसा मान शिवीला न देणाऱ्याचा आहे हे मान्य केले पाहिजे! यावर आपले विचार जाणून घ्यायला आवडेल. टोन हलका फुलका, चेष्टेने घ्यायला हवा. नाहीतर या ठिकाणी लोकांना चेहरा कृद्ध करून शिव्यांची लाखोली वाहिली जायची! आपले काय म्हणणे आहे ?

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

7 Jul 2025 - 7:52 am | सौन्दर्य

ज्यावेळी एखाद्या प्रसंगात राग तर पराकोटीला पोहोचला आहे पण आपण काहीच करू शकत नाही अशी अगतिक भावना मनात येते त्यावेळी शिवी ही कुकरच्या शिट्टीसारखे कार्य करते, सर्व साचलेला राग मोकळा करून काही वाईट घडू देत नाही.

सुबोध खरे's picture

7 Jul 2025 - 10:38 am | सुबोध खरे

काही वेळेस आपले म्हणणे जास्त स्पष्टपणे सांगण्यासाठी शिवीचा वापर करता येतो.

उदा. तो माणूस चांगला नाही म्हटल्यावर अर्थ विषद होत नाही पण तो माणूस "हरामखोर" आहे म्हटल्यावर तो माणूस कसा आहे ते लगेच स्पष्ट होते.

किंवा भाषेचा चांगला उपयोग करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो.

उदा तो मुलगा 'अभ्यासात मागे" आहे एवढे सांगण्या ऐवजी नुसतं तो "ढ" आहे म्हटलं कि झालं.

शशिकांत ओक's picture

7 Jul 2025 - 2:13 pm | शशिकांत ओक

ढ असणे यात सर्व ढंग समजून देण्याची क्षमता आहे!

प्रसाद गोडबोले's picture

7 Jul 2025 - 2:12 pm | प्रसाद गोडबोले

शिव्या देणे ही शाब्दिक हिंसा असल्याने मी शिव्या देणे प्रकर्षाने टाळतो.
"अरे माकडा " ही उपाधी मी शिवी म्हणून वापरतो.

पण तरीही कधीतरी तोल जातोच.
परवा एकाने गाडीला डावीकडून ओव्हरटेक केला अन् मी "अरे काय ही पद्धत झाली का ?" असे बोले पर्यंत त्याने अश्लाघ्य शिवी हासडली. आणि कसे कोणास ठाऊक पण न कळत माझ्याही मुखातून तशीच अश्लाघ्य शिवी प्रत्युत्तरदाखल दिली गेली. चार दिवस झाले ह्या घटनेला पण मला अजून वाईट वाईट आहे. माझी मलाच शरम वाटत आहे. :(

मी मनोमन क्षमा मागतो त्या व्यक्तीची.

क्रोध यावा कोठे | अवघे आपण निघोटे ||
ऐसे कळले ज्याला पूर्ण | जन तेची जनार्दन ||
ब्रीद बांधले चरणी | नीच दाविता करणी||
वेग क्रोधाचा उगवला | अवघा योग फोल झाला ||
ऐसी दूरदृष्टी करा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा||

प्रयत्न करत आहे माऊली.
आता असो द्यावी दया l तुमच्या लागतसे पायां ll

प्रसाद गोडबोले's picture

7 Jul 2025 - 2:13 pm | प्रसाद गोडबोले

शिव्या देणे ही शाब्दिक हिंसा असल्याने मी शिव्या देणे प्रकर्षाने टाळतो.
"अरे माकडा " ही उपाधी मी शिवी म्हणून वापरतो.

पण तरीही कधीतरी तोल जातोच.
परवा एकाने गाडीला डावीकडून ओव्हरटेक केला अन् मी "अरे काय ही पद्धत झाली का ?" असे बोले पर्यंत त्याने अश्लाघ्य शिवी हासडली. आणि कसे कोणास ठाऊक पण न कळत माझ्याही मुखातून तशीच अश्लाघ्य शिवी प्रत्युत्तरदाखल दिली गेली. चार दिवस झाले ह्या घटनेला पण मला अजून वाईट वाईट आहे. माझी मलाच शरम वाटत आहे. :(

मी मनोमन क्षमा मागतो त्या व्यक्तीची.

क्रोध यावा कोठे | अवघे आपण निघोटे ||
ऐसे कळले ज्याला पूर्ण | जन तेची जनार्दन ||
ब्रीद बांधले चरणी | नीच दाविता करणी||
वेग क्रोधाचा उगवला | अवघा योग फोल झाला ||
ऐसी दूरदृष्टी करा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा||

प्रयत्न करत आहे माऊली.
आता असो द्यावी दया l तुमच्या लागतसे पायां ll

कर्नलतपस्वी's picture

7 Jul 2025 - 2:58 pm | कर्नलतपस्वी

सर्व भाषेत शिव्या असतातच. जेव्हां नवीन रंगरूट,अनेक भाषिक एकत्र येतात तेव्हां सर्व प्रथम शिव्याच शिकून घेतात.

गाढव पंजाबीत खोत्या,कनडा कत्ती ......

याहून भयानक अशी विशेषणे आहेत. भाषेचा बिभत्स अलंकार म्हणता येईल.

शशिकांत ओक's picture

7 Jul 2025 - 6:37 pm | शशिकांत ओक

रंगलेल्या रात्री...
सखे काय सांगू तुला...
विरस झाला ग माझा ...
निघाला पुचाट लेकाचा...

विशिष्ट प्रसंगी विशिष्ट शिवी आपसूकच येते असा आमचा अनुभव आहे. याचे कारण काय असावे ? या उलट एकच शिवी कोणत्याही प्रसंगी वापरणारेही असतात. उदाहरणार्थ, तुम्ही स्वतःचे केस स्वतः कापून घेता, असे न्हाव्याला सांगितल्यावर " हम यहां क्या मैय्या xxने बैठे है ? अशी संवादफेक इंदुरात कानवर पडणे 'सरेआम' आहे... हे अगदी कोणत्याही प्रसंगी वापरले जाणारे प्रकटीकरण आहे.
-- विंग कमांडर्पंत, आता यावर सविस्तर लेख तुम्हीच लिहावा, ही विनंती.