प्रश्न: Is: O n t ⊆ I n t?
मागील पानावरून पुढे ...
हां तर कुठे होतो आपण की O n ⊆ I n. अर्थात सर्वच्या सर्व जीवमात्रांच्या संवेदना , सर्व ज्ञानेंद्रिय तून मिळालेल्या सर्व संवेदना आउटपुट ह्या एका विशाल इनपुट सेट चा सब सेट आहेत.
पण मग फक्त आजच्या क्षणाला जिवंत असलेल्या सर्व जीवांच्या संवेदनांच्यावर का थांबा ! इतिहासात होईन गेलेल्या सर्व जीवांच्या संवेदनांचा सर्वकालिक टाइम t डेटा असेल तोही वापरा.
व्याख्या
• समजा I n t: सर्वकालीन , सर्व "जीवांना" असलेल्या संवेदनांचा संच जो की LLM, किंबहुना LSM लार्ज सेन्सरी मॉडेल ला ट्रेन करताना वापरले गेले आहेत.
• समजा O n t: त्या सर्व संवेदना ज्या मानवी आणि अन्य कोणत्यातरी बुद्धिमत्तेला आकलन करता येईल अशा, अर्थपूर्ण, संवेदनांचा संच जे LSM भविष्यात कधीही टाइम t+१ आणि पुढे कधीही जनरेट करू शकेल.
प्रश्न असा आहे की O n t हा I n t च सब सेट असेल की सुपर सेट ?
---
क्रमशः