मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रण

(सई)

ज्ञानोबाचे पैजार ·
जशी मिकाची सई मिकाची लाडकी आहे तशी आमची सई सुध्दा आम्हाला बेहद्द आवडते. मिकाची कविता वाचल्यावर आम्हाला आमच्या सईची आठवण आली अणि मग तिच्या बद्दल चार ओळी खरडल्याशिवाय रहावले नाही. माझी सई तशी बोल्ड आहे सीन आणि सिनेमाची गरज पाहून काय आणि कसं करायचे ते निट ठरवता येतं तिला --- माझी सई तशी शहाणी हातात काही काम नसेल तर रीअ‍ॅलीटी शोची अँकर बनणेही जमतं तिला --- माझी सई तशी डँबिस दिग्दर्शक रोल देत नसेल तर त्याची सासू होणंही जमतं तिला --- माझी सई तशी लब्बाड किती अन् कोणाला लोणी लावल तर किती अन् काय मिळेल हे पक्क ठावूक तिला --- माझी सई त

स्वच्छंद - ३

सर्वसाक्षी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्वच्छंद - १ स्वच्छंद - २ पोपटांचे व्यक्तिचित्रण करयला खूप मजा आली. पोपटांचे वेगवेगळे आविर्भाव, मुद्रा खरोखरच मोहक होत्या.

छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल

संपादक मंडळ ·
लेखनविषय:
छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल या स्पर्धेलाही छान प्रतिसाद मिळाला. छायाचित्रे जरा कमी आली पण सगळीच अतिशय सुंदर होती. पहिल्या क्रमांकावर आलेले छायाचित्र वगळता इतर सर्वांनाच फार थोड्या फरकाने गुण मिळालेत.

एक "टवाळ" संध्याकाळ

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

पोपट....

ज्ञानोबाचे पैजार ·
माझ्यासाठी ठेवलेल्या पिंडाकडे पहात, मी हटवाद्या सारखा बसलो होतो, जाताजाता तिला अडकवल्या शिवाय, मी पिंडाला मुळी शिवणारच नव्हतो, तिच्या एका निर्दय नकारा मूळे, मी हे जग सोडले, हे सर्वांना ठाउक होते, तेव्हा मी अगतिक होतो, आता तिलाही तसेच झालेले मला पहायचे होते, बर्‍याच शपथा घेतल्या आणि घालल्या गेल्या, मी कशालाही बधलो नाही, आजूबाजूचे कावळेही प्रचंड दबाव टाकत होते, पण मी जागचा हललो नाही, मला खात्री वाटत होती, अजुन थोडेसे ताणले, की ती नक्की येईल, या जन्मी जरी नाही जमले, तरी पुढच्या जन्मीचे वचन नक्की देईल, मग दिमाखात पिंडाला चोच मारुन, तिच्या समोरुन मला उडून जायचे होते त्या आधि, एकदातरी माझ्यास

स्वच्छंद - २

सर्वसाक्षी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्वच्छंद - १ पूर्वी राहायचो त्या घ्रराच्या मागील भागी एक ताडाचे झाड होते. ते हळुहळु सुकत पूर्ण वठले. अखेर त्याचा शेंडा खडुन पडला. मात्र त्या झाडातली ढोली पोपटांनी सोडली नव्हती हे नेहेमी आठवते. पोपट घरटी बांधत नाहीत हे खरे, मात्र हल्ली त्यांना ढोल्या कुठे मिळतात हा एक प्रश्न आहे. मात्र या हुशार पक्ष्यांनी त्यावर उपाय शोधुन काढले आहेत. आमच्या छज्जाच्या छपराला बहुधा पाणी न साचता निथळुन जावे म्हणुन साधारण दोन इंच व्याशाची तीन भोके ठेवली आहेत. म्हणजे चार पाच इंच खोलीची ढोली.

श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -२

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

श्री तिर्थक्षेत्र रावेरी

सीतामंदीर तिर्थक्षेत्राचे महात्म्य

बाटलीचखणा घेऊन पिण्यासाठी या : नवसागरी भडका

सतिश गावडे ·
लेखनविषय:
बाटलीचखणा घेऊन पिण्यासाठी या : नवसागरी भडका या हो सारे भराभर, इथे डुलते व्हा कुठं बसू पुसू नका, अडडयामंधी जा गरीब तुम्ही कामकरी, ध्यानी धरा पक्के आयुर्हित जाणतो आम्ही, चार पानी एक्के वाद फालतू घालू नका, उगाच काहीबाही पिल्याबिगर जाण्याची, तुम्हांस मुभा नाही विदेशी महाग वाटते?

स्वच्छंद - १

सर्वसाक्षी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शहरात राहात असूनही सुदैवाने सकाळ उजाडते ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने. बुलबुलची साद, दयाळचा सूर, इवल्याश्या सनबर्डसचा चिवचिवाट, तांबटाचा टिकटिकाट, देवकावळ्याचे घुमणे, किंगफिशरचा किर्किरात, चिमण्यांची चिवचिव आणि सर्वांवर टिपेला जाणारा पोपटांचा कलकलाट. तसे पोपट पूर्वीपासूनच आहेत पण गेल्या पाच एक वर्षात त्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. निलगिरी, सुबाभुळ, शेकट, सोनमोहर अशा अनेक झाडांवर ही मंडळी वावरताना दिसतात. एकाने साद घालायची, तिघा चौघांनी प्रतिसाद द्यायचा, मग सर्वांनी कलकलाट करायचा आणि मग एकसमयाव्च्छेदेकरुन सर्वांनी थव्याने उडुन जायचे हा नित्यक्रम. पक्षी हा मुक्त व स्वच्छंद विहरतानाच छान दिसतो.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.