स्वच्छंद - २

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
2 May 2015 - 10:28 pm

स्वच्छंद - १

पूर्वी राहायचो त्या घ्रराच्या मागील भागी एक ताडाचे झाड होते. ते हळुहळु सुकत पूर्ण वठले. अखेर त्याचा शेंडा खडुन पडला. मात्र त्या झाडातली ढोली पोपटांनी सोडली नव्हती हे नेहेमी आठवते. पोपट घरटी बांधत नाहीत हे खरे, मात्र हल्ली त्यांना ढोल्या कुठे मिळतात हा एक प्रश्न आहे. मात्र या हुशार पक्ष्यांनी त्यावर उपाय शोधुन काढले आहेत. आमच्या छज्जाच्या छपराला बहुधा पाणी न साचता निथळुन जावे म्हणुन साधारण दोन इंच व्याशाची तीन भोके ठेवली आहेत. म्हणजे चार पाच इंच खोलीची ढोली. आमच्या छज्जाच्या भोकाच्या एकदा मी मधमाश्या अंदाज घेताना पाहिल्या आणि ताबडतोब कापडी बोळे कोंबुन भोके बंद केली. मात्र माझ्या शेजार्‍याच्या छज्जाच्या ढोल्या करुन त्यात पोपट अंडी घालतात व पिल्ले बाहेर येइ पर्यंत जा ये करतात. साहजिकच बेटे माझ्या कठड्यावरही येऊन बसतात. आंत डोकावुन पाहतात, शिळ घालतात, आपण शिळ घातली तर प्रतिसाद देतात. मात्र यांना घातलेली मिरची वा फळे त्यांनी खाल्ली नाहीत. मग कॉम्प्लानच्या जाहिरातीतल्या मुलाच्या मित्रागत विचारावेसे वाटते, 'अरे हे खातात तरी काय?'. आणि एक दिवस या प्रश्नाचे उत्तर मिळाले.

कुठुनतरी पोळी आणायची, तिकडे आंब्याच्या झाडावर आंबे हाणायचे!
1
2

पोपट असोत वा त्यांची पोरे असोत, या सर्वांना उच्चासनाची अभिलाषा असते. बेटे सकाळी उठल्यापासून उंच फांद्यांचे शेंडे पकडुन बसतात. मधेच कलकलाट करत उडतात, भरार्‍या मारतात, तारेवर बसतात आणि पुन्हा खांबखांब खांबोळी खेळागत आपापला शेंडा पकडतात. एकदा का टोकावर बसले, की दरबारात उच्चासनावर बसलेल्या सम्राटाचा व विद्वान न्यायाधीशाचा रुबाब त्यांच्यातुन प्रतित होतो. कंठ न फुटलेली गुबगुबीत पिल्ले फारच देखणी असतात

3

4

5

6

7

देवाना प्रत्येकाला स्वतःच्या रक्षणासाठी काहीतरी वरदान दिलं आहे. पोपटांना मिळालेलं वरदान म्हणजे त्यांचं हिरव्या छटांमधलं इंद्रधनुष्य. मोहक रुपा बरोबरच ह्या हिरव्या छटा पोपटांना पानांमध्ये इतक्या बेमालूम लपवितात की उंचावर घिरट्या घालणार्‍या घारींच्या नजरेस पडणे कठिणच.

8

9

10

11

पोपटांचा आवडता विसावा वा विरंगुळा म्हणजे केबल. केबल टी वीच्या कृपेने दर दोन इमारतींदरम्यान गच्ची ते गच्ची केबल टाकलेल्या असतात. सभेला यापरते उत्तम ठिकाण दुसरे कोणते.

12

कधी कधी तर १२- १४ सद्स्य एका ओळीत उपस्थित असतात. कधी कधी त्यात उपगट निर्माण होतात. अशीच एक सात सदस्यांची समिती. फरक इतकाच की अध्यक्ष उच्चासना ऐवजी खाली झोपाळ्यावर झुलताहेत.

14

सभा विसर्जित झाली की जोड्या जमतात. सगळ्यांबरोबर आपणही उडत आहोत असे भासवून एखादा हुशार राघु तिथेच बसून राहतो, आणि त्याच्या हाकेला प्रतिसाद देत त्याची जोडीदार येते.

15

मग हळुहळु ते जवळ सरकतात

16

हिंदोळ्यावर आपण दोघे...

17

'तो चोंबडा बघ कसे डोळे घालतोय आपल्या प्रेमात'

17

'तुझ्या चोचीला चोच माझी मिळं न अग हे बघुन दुश्मन जळं'

18

क्रमशः

वावरछायाचित्रणआस्वाद

प्रतिक्रिया

लालगरूड's picture

2 May 2015 - 11:33 pm | लालगरूड

खूप छान. :) photography
मस्त

स्पंदना's picture

3 May 2015 - 2:09 am | स्पंदना

मस्तच!!

श्रीरंग_जोशी's picture

3 May 2015 - 2:18 am | श्रीरंग_जोशी

अप्रतिम आहेत फोटोज. दोन्ही भाग खूप आवडले.

नरेंद्र गोळे's picture

3 May 2015 - 6:37 am | नरेंद्र गोळे

चोच लावून चोचीस क्षण बसावे
नयन नयनाला क्षणभरी मिळावे
भावनिर्भर कुजबूज करून काही
अंतरीची ते दाविती व्यथा ही

तिसरा पोपट मागच्या वर्षीचं पिल्लू असते. त्याची मैत्रीण मिळेपर्यंत आईबाबांबरोबरच राहते.
पेरूच्या झाडावर, शंकासुराच्या झुडपावर दोघे सकाळीच येतात. पेरू /शेंग शोधतात. एकाला चांगला खाऊ मिळाला की डाव्या पंजात पकडून शिटट्या मारून जोडीदारास बोलावणार आणि त्याला देऊन आणखी शोधायला जाणार असा क्रम असतो. छोट्या दगडी पेरूत बिया फार असतात ते यांना आवडतात. वरचा गर फेकतात, बी एकेक चोचीने फोडून त्यातला गर खातात. पडलेला गर बकऱ्या, गुरं खातात.
फोटो आवडले.

एक एकटा एकटाच's picture

3 May 2015 - 8:42 am | एक एकटा एकटाच

सुंदर छायाचित्रण आणि उत्तम निवेदन

प्रचेतस's picture

3 May 2015 - 8:56 am | प्रचेतस

सुरेख छायाचित्रे.

नाखु's picture

3 May 2015 - 9:45 am | नाखु

शुकमाह्त्म्य!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 May 2015 - 9:50 am | ज्ञानोबाचे पैजार

दुसरा भागही मस्तच.

पुभालटा

पैजारबुवा,

टवाळ कार्टा's picture

5 May 2015 - 1:12 pm | टवाळ कार्टा

पोपट चावत नैत?

सस्नेह's picture

5 May 2015 - 1:22 pm | सस्नेह

डोळे सुखावणारी सुरेख छायाचित्रे.
जीएंचे 'हिरवे रावे' आठवले.

मधुरा देशपांडे's picture

5 May 2015 - 1:57 pm | मधुरा देशपांडे

दोन्ही भागातली छायाचित्रे आवडली. अचुक टिपलेत अगदी.