(सई)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
12 May 2015 - 3:03 pm

जशी मिकाची सई मिकाची लाडकी आहे तशी आमची सई सुध्दा आम्हाला बेहद्द आवडते.

मिकाची कविता वाचल्यावर आम्हाला आमच्या सईची आठवण आली अणि मग तिच्या बद्दल चार ओळी खरडल्याशिवाय रहावले नाही.

माझी सई तशी बोल्ड आहे
सीन आणि सिनेमाची गरज पाहून
काय आणि कसं करायचे
ते निट ठरवता येतं तिला
---
माझी सई तशी शहाणी
हातात काही काम नसेल तर
रीअ‍ॅलीटी शोची अँकर बनणेही
जमतं तिला
---
माझी सई तशी डँबिस
दिग्दर्शक रोल देत नसेल तर
त्याची सासू होणंही
जमतं तिला
---
माझी सई तशी लब्बाड
किती अन् कोणाला लोणी लावल
तर किती अन् काय मिळेल
हे पक्क ठावूक तिला
---
माझी सई तशी बदमाष
झी मधला आपला शेअर संपला
की दुसर्‍या वाहिनी कडे जायचे हे
व्यवस्थित माहीतीये तिला
---
माझी सई जरी निरागस
नोएन्ट्री... मधल्या सारखा
लालचुटुक चेरी च्या रंगाचा ड्रेस
कसा मिरवायचा
हे चांगलच कळतं तिला
---
माझी सई तशी हुशार
शिरीन घाटगे आणि शशी देवधर,
दोघींची बेअरींग कशी सांभाळायची
समजतं तिला
---
माझी सई चिरतरुण आहे.....

फॅनाळलेला सईप्रेमी

आरोग्यदायी पाककृतीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यभूछत्रीवाङ्मयशेतीधर्मपाकक्रियाइतिहाससुभाषितेकृष्णमुर्तीशिक्षणछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

अगागागागा.
काय हे पैजारबुवा.

नाखु's picture

12 May 2015 - 3:10 pm | नाखु

सई रे सई कवीता..
पैजारबुवा शीघ्रविड्म्बन मस्त.

खुशाल वाचक
नाखु

आदूबाळ's picture

12 May 2015 - 3:13 pm | आदूबाळ

काव्यरस:
गरम पाण्याचे कुंड

हे पटलं.

अत्रुप्त आत्मा's picture

12 May 2015 - 5:12 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११ अगदी अगदी! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif

मदनबाण's picture

12 May 2015 - 3:14 pm | मदनबाण

आरारारा... सईला "हंटरवाली" कसं बनाव ते सुद्धा चांगलच ठावुक आहे बाँ... ;)

मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Increased Chinese fighter aircraft operations at the Kashgar airfield.

चुकलामाकला's picture

12 May 2015 - 3:39 pm | चुकलामाकला

:):):):):):):)

सूड's picture

12 May 2015 - 3:42 pm | सूड

यू टू पैजारब्रुटस?

पैसा's picture

12 May 2015 - 3:56 pm | पैसा

बाकी बालकविता वगैरे ठीके. पण माझी सई? पैजारवहिनी मिपावर येण्याची शक्यता किती आहे?

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 May 2015 - 4:52 pm | ज्ञानोबाचे पैजार

तिच्या परवानगी शिवाय मी कोणतीच गोष्ट करत नाही.

(आज्ञाधारक) पैजारबुवा,

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

12 May 2015 - 6:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हाहाहा

सईच्या निरागस बाल-लीला पुरेशा एक्सपोज (प्रतिशब्द ?) झाल्या नाहीत असे निरीक्षण नोंदवते.

असेच म्हणतो!
:)

>> दृष्यमान ?

तिमा's picture

16 May 2015 - 11:59 am | तिमा

एखाद्या "सई" नेच लीलाधराची वहिनी व्हावे. म्हणजे आणखी "साय" युक्त कविता वाचायला मिळतील.

मस्तच हो पैजारबुवा. अजून खूप खूप लिहा. अतिशय मस्त स्टाईल लिखाणाची.

तुडतुडी's picture

24 Jul 2015 - 12:40 pm | तुडतुडी

झकास ………… सईची पंखिण