(श्मश्रू)
श्मश्रू
पाणावलेला ब्रश
खसाखसा साबणावर फिरवूनी
सुरुवात जाहली श्मश्रू ला
काय बेरहेमीने वस्तरा,
चालवला त्या न्हाव्यानी
रूळली अधरांवरती मिशी,
अन ओघळली दाढी गाली
काय मोल त्या केसांना ,
क्षणात साफ केले त्यानी
असो राठ किंवा विरळसे डोके
नरम करी पाण्याचे थेंब उडवून
ओळखातो न सांगता
कोणाची भादरावी कशी .....
- पैजारबुवा