जर विशालची तरही तर आमची जरही
(जरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला
मोकळे हापिसात् कधिही, व्हायचे नव्हते मला
या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला,
कळ उठता पोटातूनी, दाबूनी ठेउ किती?
दर्प जहरी इतरे जनांना, द्यायचे नव्हते मला
आज गडबड जाहली पोटामधे माझ्या कशी?
करपट ढेकर द्यायची, मिटींग मधे नव्हती मला
वेळ नाही काळ नाही, ना कुणाची लाजही,
पाचवी वाटी बासुंदीची , प्यायची नव्हती मला,
पोट भरण्या अर्थ नव्हता, पंगती मधे तुझ्या
खात आलो मी जरीही, खायचे नव्हते मला
पैजारबुवा,
प्रतिक्रिया
19 Jan 2018 - 11:52 pm | नाखु
भेंडी कंपनीतून लग्नसमारंभात गेलो आणि परत हाफीसात आलो की असली बिलामत येऊ शकते
जबरा काव्य
20 Jan 2018 - 11:15 am | प्राची अश्विनी
:):)
20 Jan 2018 - 6:19 pm | टवाळ कार्टा
आरारा....तुम्हीपण शिष्य झालात =))
20 Jan 2018 - 7:12 pm | शार्दुल_हातोळकर
सॉलिड हो पैजारबुवा !!
20 Jan 2018 - 8:02 pm | manguu@mail.com
छान
पोटातल्या कळेकडे लक्ष असल्याने काही अक्षरे कमीजास्त झालीत, तरीही जरही छान आहे.
23 Jan 2018 - 10:56 am | विशाल कुलकर्णी
बॉसच्या प्रेमळ शिव्या त्या ऐकणे पुन्हा नको
ऑनसाइट अंधश्रद्धा, स्वप्न मी बघणार नाही ;)
23 Jan 2018 - 11:07 am | विशाल कुलकर्णी
बॉसच्या प्रेमळ शिव्या त्या ऐकणे आता नको
बोल कुजकट ते पुन्हा ऐकायचे नव्हते मला ;)
आता जमलं वृत्ताबरहुक़ूम !
24 Jan 2018 - 6:31 pm | ss_sameer
हा हा हा
23 Jan 2018 - 12:08 pm | दुर्गविहारी
हा हा हा !!! और ये लगा सिक्सर