संध्याकाळचा एक पर्पल-प्रसन्न संवाद
आटपाट परगावात आटपाट काम निघाले आणि अस्मादीकांनी एजंट महोदयांना मोबाईल फिरवला, रेल्वेचे कन्फर्म्ड तिकीट उपलब्ध झाले नाही तेव्हा बसगाडी शिवाय पर्याय नव्हता, शिवनेरी शिवाय इतर बससेवांवर मागची बरीच वर्षे चालवलेला बहीष्कार उठवण्याची वेळ आली होती. एजंट महोदयांनी टूरीस्ट बस सर्वीसचे दोन च्यार ब्र्यांड सांगितले म्हटले आडल्या पांथस्थाला कुठलेही ब्र्यांड चालेल, उन्हाळा आला आहे तेव्हा सावली एसीगार असावी म्हणजे झाले, स्लिपर सीट खालची का वरची अशी चौकशी करून झाली एजंट मोहोदयांकडून प्रिटंऔट मिळण्याच्या आधीच बस सर्वीसने एसेमेस पोचचा निरोप दिला आणि बस सर्वीसचे नाव वाचले 'प्रसन्ना पर्पल'!