संध्याकाळचा एक पर्पल-प्रसन्न संवाद

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
9 Apr 2017 - 8:59 am

आटपाट परगावात आटपाट काम निघाले आणि अस्मादीकांनी एजंट महोदयांना मोबाईल फिरवला, रेल्वेचे कन्फर्म्ड तिकीट उपलब्ध झाले नाही तेव्हा बसगाडी शिवाय पर्याय नव्हता, शिवनेरी शिवाय इतर बससेवांवर मागची बरीच वर्षे चालवलेला बहीष्कार उठवण्याची वेळ आली होती. एजंट महोदयांनी टूरीस्ट बस सर्वीसचे दोन च्यार ब्र्यांड सांगितले म्हटले आडल्या पांथस्थाला कुठलेही ब्र्यांड चालेल, उन्हाळा आला आहे तेव्हा सावली एसीगार असावी म्हणजे झाले, स्लिपर सीट खालची का वरची अशी चौकशी करून झाली एजंट मोहोदयांकडून प्रिटंऔट मिळण्याच्या आधीच बस सर्वीसने एसेमेस पोचचा निरोप दिला आणि बस सर्वीसचे नाव वाचले 'प्रसन्ना पर्पल'!

एकुण त्यांची बससेवा सेवा शब्दाला जागणारी असेल, अंग न दुखणारे आणि स्वच्छ आंथरूण, अनाऊंसमेंट सिस्टीममधून केल्या जाणार्‍या अगत्यपूर्वक सूचना असा जातानाचा प्रवास सुखकर झाल्यामुळे परतीसाठी 'प्रसन्ना पर्पल' निवडली. बस निघण्यास तब्बल तासभराचा आवकाश होता तेव्हा तिकीट घेऊन वाटपाहू खुर्चीत स्थानापन्न होतो न होतो तोच - तसे पाहता एक नित्याचाच अनुभव- एक सहा सात वर्षाची चुणचुणीत मुलगी, 'मुझे भूख लगी है पाँच रूपये चाहीए' झिपरे वेणी न घातलेले केस पण अंगात टिशर्ट, निळी जीन्स ऑदरवाईज फॅशनबालां फाटलेल्या वापरतात तशी गुडघ्यापाशी फाटलेली. मी सहसा नुसती भिक देत नाही, पब्लिक प्लेसमध्ये कोणतेही स्वच्छतेचे काम करून दे मी पैसे देतो असे उत्तर देत असतो आता पर्यंत कोणत्याही भिकार्‍याने कामकरून पैसे घेतले नाही ते माझ्या सोबत वेळ घालवण्यापेक्षा कमाईसाठी पुढचा मार्ग निवडतात.

असंच काही काम याही मुलीला सांगावे म्हणूनही आणि माझ्याकडे वेळ होता म्हणूनही मी त्या छोट्या मुलीशी जाणीवपुर्वक संवाद वाढवला , 'क्या खाने का दिल करता है ?' तिची डिमांड तिच्या परिस्थितीला साजेलशी वाढली, 'बीस रुपये देंगे तो वंहा का आलू चाट अच्छा होता है पेट भरके खाऊंगी'; तेवढ्यात शेजारच्या खुर्चीतील नुकताच परीचय झालेले एक सहप्रवासी लहान मुलांकडून भीक मागून घेण्याचा व्यवसाय वगैरेबद्द्ल चर्चा करु इच्छित होते तिकडे जरासे दुर्लक्ष करून मी त्या मुलीशी संवाद चालू ठेवला. 'नाम क्या है आपका ?' मी, 'आदित्या' तिच उत्तर 'पिताजी का नाम ?' तिच्या उत्तरातून आडनाव 'संधू'च निटसे काय ते कळाले. 'कंहा रहती है आप ?' मी, 'यंही कंही भी सो जातींहूं' ती पूर्ण खरी उत्तरे देत नसावी तसे तिच्या अंगावरचे कपडे फारसे मळलेले नव्हते. 'कौनसी स्कूल मे जाती है आप' मी, 'स्कूल नही जाती मां बाप मर गये मेरे पैसे दोना मुझे' पढवल्या प्रमाणे अर्धकच्ची माहिती देत आपल्याला पैसे मिळतील की नाही या विचारात पडलेली. 'तो क्या हुआ आप अपना अपना स्कूल जा सकती है, वंहा खाना भी तो मिलता है' मी उगीचच , 'कभी कभी जाती हूं, पैसे दोना' पुन्हा एकदा अर्धखोटं उत्तर, 'कौनसी स्कूल जाती हो' उत्तर नाही किसके साथ जाती हो, 'अंकल कभी कभी, भेजते है पर मै नही जाती, मुझे एबीसीडी नही आती' तीच जरा अधिक खर उत्तर पण हे अंकल कोण ते ती सांगण्याच टाळते हे लक्षात येते. आपने तो अभी 'एबीसीडी' बोल दिया ना तो बाकी भी बोलो' यावर ती जराशी गोंधळून हा माणूस केव्हा पैसे देणार अशा त्राग्याने उत्तरली 'मुझे एबीसिडी नही आता, एक दोन आता है बोलूं", 'हां बोलो' एक ते चार पर्यंत अंक मोजले, मी तिला बोर्डावरचे नंबर वाचून दाखवण्यास सांगितले ते जमले नाही. मग तिचे पुन्हा 'पैसे दो'. आप 'एक दोन की गिनती बिसतक बोलके दिखाईए', ती 'मुझे नही आता मै स्कुल नही जाती' मी 'नही आपको आगे गिनती कहके दिखाना पडेगा आप एक से बीसतक गिनती करेंगे तो हर गिनती पे दो रुपये दुंगा' तिला २*२० चा गुणाकार कळण्याची शक्यता नव्हती पण म्हटले तरच पैसे मिळतील हे तिच्या लक्षात आले, दुसर्‍या कुणाला ती विचारण्यास गेली नाही पण स्वतःच्या मेमरीला ताण देत देत आधी दहा पर्यंत आणि असंख्य वेळा पुन्हा पुन्हा पुढे म्हण म्हणाल्यावर एक ते पंधरा तिने बरोबर म्हणून दाखवले. मग बे एक बे चा चुकीचा प्रयत्न तिने स्वतःहून केला तर मी तिच्या कडून बे एक बे दोनदा व्यवस्थीत घोकून घेतले. 'शूभं करोती कल्याणम' अर्था सहीत म्हणून घेतले 'मेरा नमस्कार इश्वर को' असे हात वर दाखवत शेवटच्या ओळीचा अर्थ मी इश्वर शब्द न उच्चारताही तिने स्वतःहूनच सांगितला. अर्ध्या तासाच्या मेहनती नंतर अजून काही ऐकण्यास ती थकेल म्हणून आधी हातात तिच्यासाठी तिस रुपये धरले आणि 'आप कलसे स्कूल जाने वाले है तोही पैसे दुंगा, स्कुलमे टिचरके पास जाना, आप मुझे पढाओ पढाई बिना मै नही जाऊंगी ऐसे बोलो, आप मुझे मारेंगे तोभी मै स्कुलसे नही जाऊंगी' (अस वाक्य म्हणून घेताना मीच द्विधा मनस्थितीत होतो) , 'आप मुझे मारेंगे तोभी मै स्कुलसे नही जाऊंगी' या वाक्यावर तिचा छोटासा चेहरा पडला 'आप मारेंगे तो मै स्कुल नही आती' हे वाक्य ओठातल्या ओठात तिने बदलले वाक्य बदलताना तिच्या चेहर्‍यावरील हावभावांनीच सांगितले शाळेतील तिचा मागचा अनुभव छडी लागे छम छम त्या लहानगीला झेपला नसावा तरीही हा पैसे देणारा अंकल आपण त्याला हवे तसे म्हटल्या शिवाय बधणार नाही पाहून तिने ओठातले वाक्य बदलले, ' मै कल स्कूल जाऊंगी, आप मारेंगे तो भी स्कूलसे नही जाऊंगी ऐसे टिचर को बताऊंगी' असे किमान बळेच का होईना ती बिचारी म्हणाली. अजून किती तिची परिक्षा घ्यावी, शेवटी मी तिला तिस रूपये देताच ते छोट फुलपाखरू भुर्र्कन उडूनही गेलं, उरलेल्या प्रवासात प्रसन्नतेच्या रंगावर प्रश्नचिन्ह बाकी ठेऊन, कोण बरोबर मदर तेरेसा की बाबा आमटे की बाल कामगारांच्या प्रश्नांना उचलून धरणारे नोबेल विजेते कि अजून कोण ? माझ्या व्यक्तिगत मर्यादात मी मदर तेरेसा की बाबा आमटे किंवा एखाद्या एनजीओच्या कार्यकर्त्याप्रमाणे काहीच करत नाही / करु शकत नाही पैकी कसल्यातरी हिंदोळ्यावर, आरामदायी 'पर्पल प्रसन्ना' बसच्या सीटवर बसून एरवी 'पर्पल प्रसन्ना' हे ब्रँडनेम कस आणि का तयार झाल असेल असा मार्केटींगच्या अंगाने विचार केला असता त्या एवजी बसच्या हिंदोळ्यांवर प्रसन्नतेच्या रंगाला हि पर्पल छटा का ? असा विचार मनात दाटून येत राहीला.

बालकथासमाजअनुभव

प्रतिक्रिया

कंजूस's picture

9 Apr 2017 - 11:20 am | कंजूस

भिकाय्रांचे एजंट असतात त्यामुळे कोणी एकटे भीक मागू शकत नाही कुठेही. तीसातले पाच तिला पोहोचतील बहुतेक.

माहितगार's picture

9 Apr 2017 - 12:47 pm | माहितगार

वस्तुतः भिकार्‍यांना माझ्याकडून पैसे फारच क्वचीत कॅश स्वरूपात पोहोचतात, लेखात म्हटल्या प्रमाणे काम करण्याची अट सहसा पूर्ण न करता बहुसंख्य कल्टी मारतात. लहान मुलांना अशी अट कडक पणे लावणे कठीण जाते आणि तुम्ही म्हणालेलाही मुद्दा लक्षात घ्यावा लागतो म्हणून खाद्य अथवा वस्तुरुपात देण्याचा पर्याय आसपास असेल तर विकत घेऊन देण्यास प्राधान्य देतो. आत्ताच लहान बाळ हातात घेऊन मॉलच्या बाहेर उन्हात उभ्या बाईस काकड्या आणि स्विट कॉर्न दिला.

दुसरेतर कॅश दिलीच तर इतर कुणाला न देण्याचे आवर्जून सांगतो. असा अनुभव आळंदीस अस्थी विसर्जनास गेले असताना नदीकाठी खूप मोठा बायकांचा घोळका पैसे मागण्यास मागे लागला. त्यातील एका लहान मुलीस बाजूला बोलावले आणि इतर कुणास पैसे न देता पळून जाण्यास सांगीतले. अर्थात हेही बेस्ट पर्याय नव्हेत. त्यांना शालेय जिवनाची संधी हाच केवळ खरा न्याय असतो आणि त्रयस्थ म्हणून आपण त्यासाठी फारसे काही करू शकत नाही. जे शाळेतून शिकतात त्यांच्यासाठी विकिपीडियावर काही केल्याचे समाधान असते, ते शिक्षणाचा गंधही न मिळणार्‍या मुलांकडे बघुन जरासे फिके पडते खरे.

प्रतिसादासाठी आभार

जव्हेरगंज's picture

9 Apr 2017 - 12:28 pm | जव्हेरगंज

छान

पैसा's picture

9 Apr 2017 - 2:37 pm | पैसा

लहान बाळं तर भाड्याने आणलेली असतात भीक मागणार्‍यांकडे. एका बाळाचे आईबाप नोकरीला गेले असताना आया भिकार्‍याकडे बाळ भाड्याने देत असल्याची सत्यकथा मधे वाचली होती.

लहान मुलांकडून भीक मागून त्यावर जगणारे अनेक लोक असतात असे ऐकले आहे. बस प्रवाशाना भिकारी त्रास देतात तेव्हा पोलीस अशा वेळी कुठे असतात हे कळत नाही. गोव्यात आल्यापासून रस्त्यात भिकारी बघायची सवय मोडली आहे. कोंकण रेल्वेतच काय ते दिसतात त्यांच्याबद्दल कुतुहलमिश्रित भीती वाटते.