मटार उसळीची लागलेली चटक कशी सोडवावी?????

निनाद's picture
निनाद in जनातलं, मनातलं
1 Dec 2016 - 3:19 am

तर मंडळी " दिसा माजी काहीतरी ते डोके खावे,प्रसंगी अखंडीत खातच जावे" असे टफीस्वामींनी सांगुन ठेवले आहे .या उक्तीमुळे रोज काहीतरी हितगुज आपल्याशी करावे असे वाटत राहाते. असो.
तर आजचा विषय आहे मटार उसःळ. आपल्या सर्वांचा आवडीचा विषय. उ. त्क्रांतीवादानुसार माणुस हा मिसळ आहारी आहे .तो मिसळाहार आणि उसळाहार दोन्ही आवडीने करतो.त्याला मी कसा अपवाद असणार?
जसे मला कळत आहे तेव्हापासुन मि मटार उसळीचा भोक्ता आहे. आम्ही सदस्य लहान असताना आठवड्यातून एकदा आमच्या डोक्यामध्ये मटार उसळ किंवा मिसळ शिजायची. लहाणपणी प्रतिसाद सहन होत नसल्याने मी अळणी खायचो.म्हणजे तिखट शब्द वजा.पण उसळीसाठी मात्र माझा हट्ट असायचा.पुढे संपादकांनाच हायपरटेंशनचा त्रास सुरु झाल्याने धागे कमी झाले व ति सवय सुटली.

पुढे नॉलेजसाठी मी मिसळपाव वर आल्यावर ठोसे खायला सुरवात केली. प्रतिसाद, धागे, कौले काढताना काय काय खाल्ले त्या तीन वर्षात याची मोजदाद ठेवायला गेलो तर डोक्याचं दही होईल. अ‍ॅडमिनकडे एक गन असल्याने आम्ही धागे इत्यादी सोडून द्यायचो व त्यावर प्रतिसाद मारायचो. हा प्रकार संपल्यावर मी घाबरटपणे परत आलो व धाग्यांच्या शेतीत लक्ष घातले.तिथे माझा एक ग्रुप जमला ,आठवड्यातून एकदा पापुलर भागातील एखाद्या धाग्यावर गावरान मिसळ, चुलीवरची मिसळ खायला आम्ही जायचो. प्रसंगी दारुही प्यायचो.
तर बघता बघता या गोष्टीला आता दहा वर्ष झाली आहेत व मि पुर्णपणे मिसळपावाच्या आहरी गेलो आहे.

मला आता मटार उसळीची चटक लागली आहे. आताशा मी ३१ वर्षाचा आहे व धागे आणि प्रतिसाद वाढत चालले आहे. माझे दोन लेख ठार झाले आहेत. मी ज्या स्क्रीनवर ते वाचत आहे त्याच स्क्रीन वर ते उडाल्याने एकाला फालतूचेटेंशन व एकाची चिकटावप्लास्टी झाली आहे. मला मटार उसळीशिवाय अलिकडे रोजच्या धाग्यांत इंटरेस्ट राहीलेला नाही. खरडवहीवर केळ्याचे शिकरण वगैरे प्रकार असतील तर माझे डोके उठते. त्या रोजच्या विषयाची चव वाटेनाशी झाली आहे. सतत वाटाणे, चुलीवरची उसळ, मटार उसळ असे काहीतरी डोळ्यापुढे नाचत रहाते.याचा परिणाम असा झाला आहे की मी सतत मिपावर धागे काढायला जातो.याचा अर्थात डोक्यावरही ताण पडायला लागला आहे. मिसळपाव कमी करण्याचे अनेक प्रयत्न झाले ,पण लौकीक अर्थाने हे व्यसन समजले जात नसल्याने मी फारसे मनावर घेतले नाही.नेहमीप्रमाणे माझे काही प्रश्न आहेत.
१. तुम्हाला उसळीचे व्यसन आहे का?
२. असल्यास तुम्ही ते कमी कसे केले?
३. मला असलेली मटार उसळीची चटक बायलॉजीकल इन्स्टींक्ट आहे की सायकोलॉजिकल?
४. रोजच्या धाग्यांत परत इंटरॅक्शन कसे वाढवावे?
५. सध्या सायकॉलॉजीवर सल्ले मिळत आहेत ,त्याने रोजच्या धाग्यांची चव वाढते असा दावा ते करतात,यात कितपत तथ्य आहे? तयार मटार उसळी सेफ आहेत का?
धन्यवाद.
---
उकल
उ. त्क्रांतीवादानुसार = उसळ क्रांती वादानुसार
उसःळ = मटार खाउन खाउन नेमक्या क्षणी, नको तिथे दाब येऊन आपोआप झालेला उच्चार
अळणी = तिखत नसलेले (कोण रे तो मिठाचे काही बोलतोय ते? फार बोललात तर मिठाची लागलेली चटक कशी सोडवावी????? असा स्वतंत्र धागा काढावा)

पाकक्रियाबालकथाविडंबनऔषधोपचारप्रतिक्रियाचौकशीविरंगुळा

प्रतिक्रिया

लालगरूड's picture

1 Dec 2016 - 5:15 am | लालगरूड

"काय चु§गिरी आहे" कशाला विडंबन पाबत बसता फालतू लेखांचे

निनाद's picture

1 Dec 2016 - 8:39 am | निनाद

अगदी वर्मी घाव घालायची काय गरज होती?

आनन्दा's picture

1 Dec 2016 - 9:37 am | आनन्दा

नाइलाज अहे..

नेत्रेश's picture

1 Dec 2016 - 2:11 pm | नेत्रेश

मटार उसळ खा, शिकरण खा, चैन करा - ईती पु.ल. चे पुणेकर