बाप्पा
बाप्पा
धीन ता धीन धीन ता धीन ता धीन धीन ता धीनधीनधीनाक धीनधीनधीनाक
बाप्पा
धीन ता धीन धीन ता धीन ता धीन धीन ता धीनधीनधीनाक धीनधीनधीनाक
यजमा'ण :-" काय गुर्जी, एव्हढ्यातच अलीकडे लग्न झालं म्हणे तुमचं!? "
गुर्जी:-" हो!!!"
यजमा'ण :-" आणि मुलगाही झाला लगेच! "
गुर्जी:-" हो!!!!! "
यजमा'ण :-" उशिरा होऊन बर जमलं(लवकर!) "
गुर्जी:-"!!!"
यजमा'ण :-" ह्या ह्या ह्या...15 ओव्हर झाल्यावर उतरलात खेळायला! "
गुर्जी:-" (दु दु दु दु!!!) "
यजमा'ण :-" तरी फास्टेस्ट फिफ्टी झाली की(तुमची!) "
गुर्जी:-" (लउल्लूल्लूल्लूऊ) "
यजमा'ण :-" भाग्यवान आहात. "
गुर्जी:-" हो!!!!!!! "
निळ्या-जांभळ्या
आभाळाखाली,
हिरव्यागार कुरणाच्या
लुसलुशीत गवतावर
निवांतपणे
पहुडलेला असताना,
पलीकडच्या,
ताटव्यातल्या फुलांवरून
एक नाजूकशी पाकोळी
उडतउडत
माझ्याकडे आली
आणि मला म्हणाली…
"बाबा, तू आज आपिशला ज्यावू नको,
आपण गार्डनमध्ये खेळायला ज्यावू"
- संदीप चांदणे (१०/०९/२०१८)
बालीत कपडे स्वस्त मिळतात. सरकारी कामातूनवेळ काढून खरीदारी करायला गेलो. मालमध्ये फिरताना, लाकडाचे आई, बाबा आणि बाळ या उलूक परिवाराने ध्यान आकर्षित केले. खरीदारी पूर्ण झाली, तरीही सारखे-सारखे लक्ष त्या उलूक परिवाराकडे जायचे, जणू ते म्हणत होते, आम्हाला हि तुझ्या सोबत यायचे आहे. अखेर राहवले नाही, भारतीय मुद्रेत फक्त ८० रुपये देऊन उलूक परिवार खरेदी केला. काही सहकार्यांनी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. एक दुसर्याच्या कानात, मला ऐकू येईल एवढ्या जोरात म्हणाला, "शायद दिल के साथ दिमाग भी खराब हो जाता है" दुसरा उद्गरला "नहीं यार, पटाईतजी पठिया (सठिया) गए है".
भटांच्या वाड्यातील भुतावळ- भा. रा. भागवत
सूर्यावर स्वारी? - भा रा भागवत.
माझा प्रिय मित्र सागर ह्याने माझ्या डोक्यात काही वर्षांपूर्वी भागवतांच्या संक्षेपाचे मूळ रूप शोधायचे खूळ डोक्यात घातले, त्याबद्दल त्याचे मानावे तेवढे आभार आणि उपकार कमीच आहेत! त्याने हे खूळ दिले नसते आणि मीदेखील वाहवत जाऊन भारांचा संग्रह जमा करू शकलो नसतो.
हरवलेला डबा
मणी गोष्ट..............
एक गाव मां एक राजा रास. त्याले एक पत्नी आणि पोरे रातस.
राजा एकदम साधा माणूस रास. त्यान गावं बी खूश रास. राजा ना पोरे आण प्रजा ना पोरे एकच शाळा मा जातस.
एक दिन काय व्हस ; दुसरा गाव ना राजा त्याले निरोप धाडस. " तू मनासंगे युद्ध कर , मी तुले हराई टाकसू"
मग राजा बोलस त्याले तु मन गाव बरबाद करी टाकशी त्यानापेक्षा आपण एक युक्ती करु. अमना गामना गावं मां आपण एक वादविवाद स्पर्धा ठेऊ . जर तुमी माले हारी टाक तर हाई गावं तुनं . राजा अशी अट टाकस.'त्या प्रमाणे एक दिन तो दुष्ट राजा येस येवाण ठरावस.
खुरपणी
संयम संपला संतापाने, फुलला माझा श्वास
लागलात जर मागे माझ्या, घेइन मिपा संन्यास ||१ ||
इक्षुदंडी कविता लिहिता, धावत येती टवाळ
प्रतिसादांच्या उतरंडीने, मन होते किती घायाळ ||२ ||
पान खाऊन येती दाजीबा पिंकाच्या टाकीत चुळा,
चार शब्दही कौतुकाचे लिहीले न माझ्या भाळा ||३ ||
एकएक प्रतिसाद वाचून माझे अंगअंग शहारले
श्वास होतो विग्दद, हे माझे विश्वची न उरले |||४ ||
पेरणा सांगायलाच पाहिजे का दर वेळी?
चालः- गे मायभू तुझे मी
नोटा
नोटा कितीक असती
हजार पाचशेच्या
नाही कुणास मुल्य
कागद वाटती साऱ्या
दूरस्थ आयकर विभाग
ठाऊक पाहतो मजला
डोळ्यांत् कॅशियरच्या
अनुकंप दाटलेला
झालो विवश परंतु
बोलणार काही नाही
निःशब्द भावनांना
होळीच साक्षी राही
अत्यंत भित्रे
08112016
पैजारबुवा,