मंदिराबाहेर भेटलेली देवी
आज तो ऑफिसमधून घाई गडबडीत परतला. आल्याआल्या कॅमेराची बॅग भरली. घडयाळ बघितलं सहा वाजले होते. मंदिराचा वार्षिक उत्सव चालू व्हायला अर्धा तास होता अजून. प्रसादाचं जेवण असलं तरी सगळे फोटो काढून जेवायला उशीर होणारच . थोडा चहा पोटात गेला तर उत्साह टिकून राहील शेवटपर्यन्त असा विचार करून शेजारच्या हॉटेलात जाऊन चहा घेतला. चहा पिता पिता फोटो कसे काढता येतील ह्याचा विचार केला . चहा पिऊन थेट ममंदिराकडे चालू लागला. जाता जाता नेहमीचे नियम स्वतःला पुन्हा एकदा बजावले - " मन आणि कॅमेरा कुठेही भरकटू द्यायचा नाही.